ववि२०१३(रविवार,दि.२८.७.२०१३)- मुंबई आणि पुणे अंतीम बस रुटस

Submitted by ववि_संयोजक on 24 July, 2013 - 23:40

पुणे आणि मुंबई दोन्हीचे वविचे अंतीम बस रुटस आणि वेगवेगळ्या बस थांब्यांहून बस निघायच्या वेळा इथे देत आहोत.

मुंबई अंतीम बस रुटः-

1)दादर- स्वामीनारायण मंदिर ( 5.45am) संयोजक-इंद्रधनुष्य (मो. नं.-9833953887)

2)बोरीवली- ओंकारेश्वर मंदीर ,नॅशनल पार्क समोर (6.20 am)
(पश्चिम द्रुतगती मार्गाने सांताक्रूझ , गोरेगाव, मालाड ,कांदिवली बोरीवली. दहिसर वाल्यांना हायवे वर याव लागेल.) संयोजक-विनय भिडे (मो. नं.-9820284966)

3)काशिमिरा घोडबंदर (6.25am)

4)ठाणे-आनंद टॉकीजच्या जवळ(7.15 am) संयोजक-योगेश कुळकर्णी (मो. नं.-९९३००५६९६३)

5)तीन हात नाका (7.25 am)

6)कल्याण- शिवाजी पुतळा - मुरबाड फाटा (8am)


पुणे अंतीम बस रुटः-

संयोजकः- मयूरेश कंटक-(मो. नं.-9922401778)

1)ट्रेझर पार्क-सहकारनगर-१- (5 am)

2)राजाराम पूल,सिंहगड रोड- (5.15 am)

3)डिपी रोड कॉर्नर-आशिष गार्डन,कोथरुड - (5.30 am)

4) किनारा हॉटेल ,पौड रोड - (5.40 am)

5) गुडलक चौक,डेक्कन - (5.50 am)

6) दापोडी- मेगामार्टसमोर- (6.10 am)

7) नाशिक फाटा- (6.15 am)

वर दिलेल्या वेळा या त्या त्या बस थांब्यावरून बस सुटण्याच्या वेळा आहेत.कृपया सर्वांनी आपापल्या थांब्यावर किमान दहा मिनिटे आधी येऊन उपस्थित रहावे.म्हणजे वविच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येईल.

बस रूट संदर्भात काही शंका असतील तर खालील संयोजकांशी संपर्क साधावा.

१)मुंबई:-विनय भिडे (मो. नं.-9820284966)

२)पुणे:- मयूरेश कंटक (मो. नं.-9922401778)

पुण्याच्या बसची माहिती खालीलप्रमाणे-

नंबर:-MH 14 HD 1151

रंग- पांढरा

मेक- टाटा आयशर (३२ सीटर)

वविकरांसाठी काही सूचना:-
१)कृपया वेळेचे बंधन पाळावे. आपापल्या बस थांब्यांवर वेळेआधी दहा मिनीटस उपस्थित रहावे.

२) रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टींना परवानगी नाही ).

३) वर्षाविहार असल्याने दिवसभरात पाण्यात भिजणे हे होणारच. तेव्हा टॉवेल,जास्तीचे कपडे, लहान मुलांसाठी गरजेचे असल्यास रेनकोट, औषध या गोष्टी न विसरता घेऊन यावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिल्यांदाच चाललोय... > पैहिल्यांदा येणार्‍यांनी पहिल्या स्टॉप वरच बस मधे चढावे.

वेध लागले आता मला पण Happy

मी पण पहिल्यांदा येणार पण मला दादर पर्यंत जाणे कठीण पडेल.

मुंबैच्या बस मधे खादाडीचा काय प्लॅन ? किती लोक आहेत साधारण ? कोण कोण काय काय आणणार आहेत ?
( आयॅम म्हणजे फारच स्पॉइल्ड बाय बारा बस यू सी )

Dadar la pickup he byesht jhaal..
Naahitar bhalyaa pahaate train ch tond baghaav laagal asat.

अनिल भाई ... ववि ला जमत नसेल तर फक्त पिक अप पॉईंटला या ....तिथेही धमालच असते ...

योग्या .... तु जर नाही आलास ना ....

उल्हास काका ... तुम्ही याल अशी आशा आहे , निराश करु नका....

बादवे मुंबई बस तुडंब भरली आहे लोक्स .... तरिही अजुन कोणास यायच असेल तर त्याचीही व्यवस्था केली जाईल ...

मी स्वत: दहिसर ला बस पकडणार आहे ... त्यामुळे बोरीवली पर्यंतच्य्ता लोकांनी इन्द्रा आणि
वैभव आयरे ९८२०३२४३०७ यांना संपर्क करा ...

ठाण्याचा जो काही हात पाय आणि माणसांचा घोळ आहे त्याकरता आनंद मैत्री ९७६९४५४४२९ आणि सहनशक्ती असेल तर घारुआण्णा ९८१९९९३६३४ यांना संपर्क करावा . Proud

या वर्षी रुट बदलल्यामुळे ठिकाण बदलल्यामुळे प्लान काँक्रिट नाहीये , पण कोणालाही मागे ठेवणार नाही याची खात्री बाळगा ...

संयोजक हे तुमच्या आमच्यातलीच हाडा मांसाची माणसच आहेत ....

क्या बात है विनय! संयोजकांच्या या स्पिरीटमुळेच दरवर्षी ववि दणक्यात होतो. Happy

या वर्षी रुट बदलल्यामुळे ठिकाण बदलल्यामुळे प्लान काँक्रिट नाहीये , पण कोणालाही मागे ठेवणार नाही याची खात्री बाळगा ...

संयोजक हे तुमच्या आमच्यातलीच हाडा मांसाची माणसच आहेत ....
>>>> Happy क्या ब्बात विनय...

रीना नाही का यंदा? मग तव्यावरचं अंडं कोण आणणार आहे?

मी स्वत: दहिसर ला बस पकडणार आहे>> विनय दहिसर ला म्हणजे टोल नाक्याला का? काशिमीरा चा स्टॉप कोणता ते कळेल का?

मी गोरेगाव हायवे (पूर्व) इथून बस पकडेन
आरेचा स्टॉप आहे तिथून>>>>>>>>>>> ओक्के जाई नोटेड ..... वेळ लक्षात ठेव

मी, मालाडला, पश्चिम द्रूतगती मार्गावरील, पुष्पा पार्कच्या थांब्यावर उभा असेन...>>>>>>>>>>> देव काका नोटेड

वैभव, मी महिंद्रा स्टॉप, ठाकूर काँप्लेक्स......... वेळ ६.१०??>>>>>>>>>>> ओके, मग ओवा आणि तुझ्या लेकाचा स्टॉप? Proud

Pages