ववि२०१३(रविवार,दि.२८.७.२०१३)- मुंबई आणि पुणे अंतीम बस रुटस

Submitted by ववि_संयोजक on 24 July, 2013 - 23:40

पुणे आणि मुंबई दोन्हीचे वविचे अंतीम बस रुटस आणि वेगवेगळ्या बस थांब्यांहून बस निघायच्या वेळा इथे देत आहोत.

मुंबई अंतीम बस रुटः-

1)दादर- स्वामीनारायण मंदिर ( 5.45am) संयोजक-इंद्रधनुष्य (मो. नं.-9833953887)

2)बोरीवली- ओंकारेश्वर मंदीर ,नॅशनल पार्क समोर (6.20 am)
(पश्चिम द्रुतगती मार्गाने सांताक्रूझ , गोरेगाव, मालाड ,कांदिवली बोरीवली. दहिसर वाल्यांना हायवे वर याव लागेल.) संयोजक-विनय भिडे (मो. नं.-9820284966)

3)काशिमिरा घोडबंदर (6.25am)

4)ठाणे-आनंद टॉकीजच्या जवळ(7.15 am) संयोजक-योगेश कुळकर्णी (मो. नं.-९९३००५६९६३)

5)तीन हात नाका (7.25 am)

6)कल्याण- शिवाजी पुतळा - मुरबाड फाटा (8am)


पुणे अंतीम बस रुटः-

संयोजकः- मयूरेश कंटक-(मो. नं.-9922401778)

1)ट्रेझर पार्क-सहकारनगर-१- (5 am)

2)राजाराम पूल,सिंहगड रोड- (5.15 am)

3)डिपी रोड कॉर्नर-आशिष गार्डन,कोथरुड - (5.30 am)

4) किनारा हॉटेल ,पौड रोड - (5.40 am)

5) गुडलक चौक,डेक्कन - (5.50 am)

6) दापोडी- मेगामार्टसमोर- (6.10 am)

7) नाशिक फाटा- (6.15 am)

वर दिलेल्या वेळा या त्या त्या बस थांब्यावरून बस सुटण्याच्या वेळा आहेत.कृपया सर्वांनी आपापल्या थांब्यावर किमान दहा मिनिटे आधी येऊन उपस्थित रहावे.म्हणजे वविच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येईल.

बस रूट संदर्भात काही शंका असतील तर खालील संयोजकांशी संपर्क साधावा.

१)मुंबई:-विनय भिडे (मो. नं.-9820284966)

२)पुणे:- मयूरेश कंटक (मो. नं.-9922401778)

पुण्याच्या बसची माहिती खालीलप्रमाणे-

नंबर:-MH 14 HD 1151

रंग- पांढरा

मेक- टाटा आयशर (३२ सीटर)

वविकरांसाठी काही सूचना:-
१)कृपया वेळेचे बंधन पाळावे. आपापल्या बस थांब्यांवर वेळेआधी दहा मिनीटस उपस्थित रहावे.

२) रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टींना परवानगी नाही ).

३) वर्षाविहार असल्याने दिवसभरात पाण्यात भिजणे हे होणारच. तेव्हा टॉवेल,जास्तीचे कपडे, लहान मुलांसाठी गरजेचे असल्यास रेनकोट, औषध या गोष्टी न विसरता घेऊन यावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ये री म्हणजे तु पण येणारेस का? Uhoh पहिले उगी नाटक करत होतीस्..........आता दादा नावाच लेबल कुणाकुणाला चिटकतेय काय माहीत Proud

संयोजक धन्स्........पण अपेक्षित Uhoh ....कारण माझे सहकुटुंबासाठी घेतलेले टीशर्ट पोहचले नैयेत माझ्यापर्यंत...... Sad

साजिर्‍याला चहा घेतल्याशिवाय वविला आल्यासारखं वाटत नाही...>>>>रिया,चहा घेतल्याशिवाय नव्हे ओतल्याशिवाय... Proud

कारण माझे सहकुटुंबासाठी घेतलेले टीशर्ट पोहचले नैयेत माझ्यापर्यंत....>>> योगुले,मल्ल्याने घेतलेत ना टी शर्ट तुझे?उद्या गाठ की मग त्याला.

ओतल्याशिवाय Lol

योग्स Happy

त्यादिवशी काही तरी ठरत होतं ना की बसस्टॉपपाशी एक चेंजींग स्पॉट ठेवायचाय? Uhoh
मग येतील कपडे बदलता तुला योग्स Proud

Proud
अस कसं असं कस?
ज्याला गाडीतून, पहिल्या स्टॉपपासूनच वविचा टीशर्ट घालून यायचा असेल त्याने काय करायचं? Proud

खुश खबर.................... खुश खबर.................. खुशखबर..................
.
.
.
.
.
.
वविच्या दिवशी पाऊस पण येणार आहे. Proud

ज्याला गाडीतून, पहिल्या स्टॉपपासूनच वविचा टीशर्ट घालून यायचा असेल त्याने काय करायचं? >>>>>>>>>>>>>>> त्याने टी-शर्ट घालुन पहिल्या स्टॉपजवळ उभं रहायचं Proud

काशिमीरा चा स्टॉप कोणता ते कळेल का? >> शिवाजीच्या पुतळ्याजवळ !
विन्या.. बघतो रे.. प्रयत्न सुरु आहेत.. ! उद्यापर्यंत 'डन' होइल अशी आशा !

सकाळपासून एवढ्या नविन पोस्ट्स?? म्हटलं रूटस-बीटस बदललेत म्हणून मारामारी जुंपलीय की काय इथे?! Happy
पण रीया आलीय नां, मग ठीक आहे......... Wink

या बाफवर एकूण १३५ पोस्टींपैकी वैभवायरे१२३४५ यांच्या १७ पोस्टी (संयोजक आहेत ते), बागुलबुवाच्या ४ पोस्टी (संयोजक आहेत ते), मंजूडीच्या ५ पोस्टी (यांना वविचे वेध लागलेत), पौर्णिमाच्या ६ पोस्टी (या मुरलेल्या वविकर) आहेत. तरी कविन, ओवी आणि सामीच्या पोस्टी मोजल्या नाहीयेत.
.
.
.
.
.
.
.
आणि रिया.च्या २० पोस्टी आहेत (ही वविला येणार नाही/ आहे.)

तरी कविन, ओवी आणि सामीच्या पोस्टी मोजल्या नाहीयेत.>>>>>>> प्रत्येकी ४० च्या आसपास असतील Proud (घे माझी अजुन एक पोष्ट वाढली) Proud

एय, तरी मी जास्ती बोलत नाही हां वैभ्या! तुला माहिती आहेच!>>>>>>>>>> बोलत नाहीसच, फ्फक्त किबोर्ड बडवतेस हो ना? Proud

खरच आशु डी

याच बरचस श्रेय तुमच्यासारख्या जुन्या जाणत्या आणि अनुभवी संयोजकांना जात ...

घारु , नील , आनंदमैत्री , आनंद केळकर , इन्द्रा , मयुरेश , हिम्या लोक गेली कित्येक वर्ष सतत ववि करता आणि टी शर्ट करता काम करताहेत , त्यांना पाहुन मी, अम्या , कविता , मुग्धा, योकु आणि बरेच नवीन संयोजक उत्साहात काम करतो ... वैभव आयरे दरवर्शी बरीच मदत करतो ...

कामाच स्वरुप काहीही असो ...
टी शर्ट सॉर्टींग करता रात्रभर जागण , वाटप , ववि करता लोकांना फोन करण ,माहिती देण ...आणि बरेच काही ....

ऑलमोस्ट हा एक सण म्हणून साजरा केला जातो ....

विन्या.. पुरे.. थोड ववि साठी शिल्लक ठेव ! Proud म्हणजे उपस्थितवविकरांना टाळ्या वाजवता येतील.. नि त्या तुला ऐकू येतील... Proud

विनय, ववि निरोप समारंभाचे भाषण मस्त जमलंय. आता फक्त पाठांतर करा. Happy
आणि ते 'तुमच्यासारख्या ' ऐवजी 'खालील ' करा.

Pages