ववि२०१३(रविवार,दि.२८.७.२०१३)- मुंबई आणि पुणे अंतीम बस रुटस

Submitted by ववि_संयोजक on 24 July, 2013 - 23:40

पुणे आणि मुंबई दोन्हीचे वविचे अंतीम बस रुटस आणि वेगवेगळ्या बस थांब्यांहून बस निघायच्या वेळा इथे देत आहोत.

मुंबई अंतीम बस रुटः-

1)दादर- स्वामीनारायण मंदिर ( 5.45am) संयोजक-इंद्रधनुष्य (मो. नं.-9833953887)

2)बोरीवली- ओंकारेश्वर मंदीर ,नॅशनल पार्क समोर (6.20 am)
(पश्चिम द्रुतगती मार्गाने सांताक्रूझ , गोरेगाव, मालाड ,कांदिवली बोरीवली. दहिसर वाल्यांना हायवे वर याव लागेल.) संयोजक-विनय भिडे (मो. नं.-9820284966)

3)काशिमिरा घोडबंदर (6.25am)

4)ठाणे-आनंद टॉकीजच्या जवळ(7.15 am) संयोजक-योगेश कुळकर्णी (मो. नं.-९९३००५६९६३)

5)तीन हात नाका (7.25 am)

6)कल्याण- शिवाजी पुतळा - मुरबाड फाटा (8am)


पुणे अंतीम बस रुटः-

संयोजकः- मयूरेश कंटक-(मो. नं.-9922401778)

1)ट्रेझर पार्क-सहकारनगर-१- (5 am)

2)राजाराम पूल,सिंहगड रोड- (5.15 am)

3)डिपी रोड कॉर्नर-आशिष गार्डन,कोथरुड - (5.30 am)

4) किनारा हॉटेल ,पौड रोड - (5.40 am)

5) गुडलक चौक,डेक्कन - (5.50 am)

6) दापोडी- मेगामार्टसमोर- (6.10 am)

7) नाशिक फाटा- (6.15 am)

वर दिलेल्या वेळा या त्या त्या बस थांब्यावरून बस सुटण्याच्या वेळा आहेत.कृपया सर्वांनी आपापल्या थांब्यावर किमान दहा मिनिटे आधी येऊन उपस्थित रहावे.म्हणजे वविच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येईल.

बस रूट संदर्भात काही शंका असतील तर खालील संयोजकांशी संपर्क साधावा.

१)मुंबई:-विनय भिडे (मो. नं.-9820284966)

२)पुणे:- मयूरेश कंटक (मो. नं.-9922401778)

पुण्याच्या बसची माहिती खालीलप्रमाणे-

नंबर:-MH 14 HD 1151

रंग- पांढरा

मेक- टाटा आयशर (३२ सीटर)

वविकरांसाठी काही सूचना:-
१)कृपया वेळेचे बंधन पाळावे. आपापल्या बस थांब्यांवर वेळेआधी दहा मिनीटस उपस्थित रहावे.

२) रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टींना परवानगी नाही ).

३) वर्षाविहार असल्याने दिवसभरात पाण्यात भिजणे हे होणारच. तेव्हा टॉवेल,जास्तीचे कपडे, लहान मुलांसाठी गरजेचे असल्यास रेनकोट, औषध या गोष्टी न विसरता घेऊन यावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म्म्म्म
एका दमात हा आख्खा बाफ वाचला मी.
मी मिसणार सगळं . पण तीन हात नाक्यावर\ शी\ला तुम्हाला बाय बाय करायला यायचा प्लॅन आहे. बघुयात कितपत जमतय हे.
लोक्स भरपुर मज्जा करा. एन्जॉय.

कित्ती सार्‍या त्या पोस्टी Happy
इतके वर्षं वृत्तांत वाचायचो आणी ठरवायचो कि आपण पण पुढच्या ववि ला नक्कि जायचं, फायनली घटीका जवळ आली...
जाम Exited आहे, Happy

मी वैभवला इमेल केली आहे , माझा नंबर पण दिलाय. मी एक वाजता घरी पोचेन. तेंव्हा करु का फोन ?
खंदे संयोजक काय झोपायचे नाहीत आदल्या रात्री >>>>>>>>>>> हे मीच तुला विचारणार होतो की"आदल्या रात्री १२.३० नंतर फोन केला तर चालेल काय Proud पण डोन्ट वरी तु फोन केलास तरी चालेल, Proud

एक सुचना: जर माझ्या सौ ने फोन उचलला तर तिला सांग की तु सांताक्रुझ पश्चिमेतुन मेधा बोलत आहेस, कारण तिचं माहेर देखिल सांताक्रुझ पश्चिमला असल्याने तुला तिच्या बोलण्यातुन आपलेपणा जाणवेल Proud तिच्या माहेरचं माणुस Proud

.

या वेळी सर्वांना किंडर जॉय चॉकलेट वाटणार आहेत, प्रत्येकाने मोकळे डबे घेवून या चॉकलेट न्यायला
Happy

वविकरांना खूप खूप शुभेच्छा! मज्जा करा. भले मोठ्ठे वृत्तांत लिहा Happy

@ मेधा - दॅट्स द स्पिरिट! अमेझिंग अ‍ॅटिट्यूड आहे तुझा. माझ्याकडून तुला साष्टांग दंडवत Happy

वॉव ! मेधा लँड झाल्याबरोबर येतेय वविला _/|\_ खरचं ग्रेट आहेस तु , आमचा जेटलॅग ३-३ दिवस जात नाही.
मजा करा लोकहो !

PuNekarano, aali ka GaDee?
Mumbaikar, avara bharbhar!
majja kara loko!!!

मी रात्रभर जागाच आहे....
मंडळी उठा आता...आज आपला वविवार ना!
मीही, आता तयारी करतोय..निघायची!

medha land zalya zalya vaveela?!! Great aahes Medha!
yandache vaveekar lucky aahet Medha yeNar mhaNaje!

Pages