ववि२०१३(रविवार,दि.२८.७.२०१३)- मुंबई आणि पुणे अंतीम बस रुटस

Submitted by ववि_संयोजक on 24 July, 2013 - 23:40

पुणे आणि मुंबई दोन्हीचे वविचे अंतीम बस रुटस आणि वेगवेगळ्या बस थांब्यांहून बस निघायच्या वेळा इथे देत आहोत.

मुंबई अंतीम बस रुटः-

1)दादर- स्वामीनारायण मंदिर ( 5.45am) संयोजक-इंद्रधनुष्य (मो. नं.-9833953887)

2)बोरीवली- ओंकारेश्वर मंदीर ,नॅशनल पार्क समोर (6.20 am)
(पश्चिम द्रुतगती मार्गाने सांताक्रूझ , गोरेगाव, मालाड ,कांदिवली बोरीवली. दहिसर वाल्यांना हायवे वर याव लागेल.) संयोजक-विनय भिडे (मो. नं.-9820284966)

3)काशिमिरा घोडबंदर (6.25am)

4)ठाणे-आनंद टॉकीजच्या जवळ(7.15 am) संयोजक-योगेश कुळकर्णी (मो. नं.-९९३००५६९६३)

5)तीन हात नाका (7.25 am)

6)कल्याण- शिवाजी पुतळा - मुरबाड फाटा (8am)


पुणे अंतीम बस रुटः-

संयोजकः- मयूरेश कंटक-(मो. नं.-9922401778)

1)ट्रेझर पार्क-सहकारनगर-१- (5 am)

2)राजाराम पूल,सिंहगड रोड- (5.15 am)

3)डिपी रोड कॉर्नर-आशिष गार्डन,कोथरुड - (5.30 am)

4) किनारा हॉटेल ,पौड रोड - (5.40 am)

5) गुडलक चौक,डेक्कन - (5.50 am)

6) दापोडी- मेगामार्टसमोर- (6.10 am)

7) नाशिक फाटा- (6.15 am)

वर दिलेल्या वेळा या त्या त्या बस थांब्यावरून बस सुटण्याच्या वेळा आहेत.कृपया सर्वांनी आपापल्या थांब्यावर किमान दहा मिनिटे आधी येऊन उपस्थित रहावे.म्हणजे वविच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येईल.

बस रूट संदर्भात काही शंका असतील तर खालील संयोजकांशी संपर्क साधावा.

१)मुंबई:-विनय भिडे (मो. नं.-9820284966)

२)पुणे:- मयूरेश कंटक (मो. नं.-9922401778)

पुण्याच्या बसची माहिती खालीलप्रमाणे-

नंबर:-MH 14 HD 1151

रंग- पांढरा

मेक- टाटा आयशर (३२ सीटर)

वविकरांसाठी काही सूचना:-
१)कृपया वेळेचे बंधन पाळावे. आपापल्या बस थांब्यांवर वेळेआधी दहा मिनीटस उपस्थित रहावे.

२) रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टींना परवानगी नाही ).

३) वर्षाविहार असल्याने दिवसभरात पाण्यात भिजणे हे होणारच. तेव्हा टॉवेल,जास्तीचे कपडे, लहान मुलांसाठी गरजेचे असल्यास रेनकोट, औषध या गोष्टी न विसरता घेऊन यावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांस्कृतिक कार्यक्रमाची झलक कधी दाखवणार?
वविकार्यक्रमांची जाहिरात का होत नाहीये?
वविला न येणार्‍यांसाठी तरी करा Proud

वविकार्यक्रम>>> मंजुतै सबर का फल मिठा होता है
सध्या ती झाकली मुठ आहे सव्वा लाखाची..... उघडल्यावर जी निघेल एक करोडची

वविला न येणार्‍यांसाठी इथे दिसणारा उत्साहच पुरेसा आहे की वो चुटपुट लावायला Wink

(तळटिपः ही जाहिरात नाही वस्तुस्थिती आहे Proud )

Proud
तायडे, तुला मी जाड झाल्याच न जाणवल्याबद्दल मी तुझी अतिशयच आभारी आहे ग Proud

ओवी, होना!
पण थांब अजुन... इतक्यात बातमी फोडू नको Proud
(ती काय फुटायची राहीलीये म्हणा Proud
तरीही )

उचला उचली????? Uhoh
आचार्‍याहून डायरेक्ट कुली????????
अस होतं नुसते फोटोच टाकले की
किमान या वेळेला तरी ढोलकी सोडून दुसरं काही तरी आण Proud

उचला उचली????? अ ओ, आता काय करायचं
आचार्‍याहून डायरेक्ट कुली????????>>>>>>>>>>>> सगळ्या भूमिका कराव्या लागतात, नाहितर इंडस्ट्रीच्या बाहेर Wink Proud

खर तर बायको गेटमध्ये होती ,तीला गाडीत बसविले होते आणि गाडीही नीट पार्क केली नव्हती,माझ्या गाडीमुळे मागच्या गाड्या अडकल्या होत्या ,

(जास्त वेळ थांबण शक्य नव्हत कारण पेपर चालू होते परवा संपलेत ) , वविला भेटूच की, Happy

मी खूप कन्फूज होतो अग, एकतर अभ्यास झाला नव्हता,त्यात बायको डोक खात होती,पार्कींगला जागा मिळत नव्हती आणि तुम्ही लोक तिकीट खिडकी सोडून मागे जाउन बसले, एवढी जास्त बुध्दी नाही माझी लक्षात ठेवायला

पण मी तूला याआधी कुठतरी पाहील असाव अस वाटतय ,कुठ नाही आठवत, एखाद्या कविसंमेलनात वगैरे असाव ,त्या दिवशी घाईत होतो , सटकलो लवकर ........
Happy

तुझी बायको येणारेय का वविला?
लोकांनो या पोस्टीची स्क्रिशॉ घेऊन ठेवा Proud
किरण कडून रस्त्यात चहा उकळायला कामी येईल Proud

नाही , बायको येणार नाही - कुठेतरी सुखाने जगू दे की मला Happy

कमाल म्हणजे तिला पावसात भिजायला आवडत नाही,

चहा उकळायला वेळ मिळेल का ते बघा , मुरबाड भरपूर लांब आहे,

सगळ्याला वेळ मिळतो बरं!
साजिर्‍याला चहा घेतल्याशिवाय वविला आल्यासारखं वाटत नाही Proud

Pages