ववि२०१३(रविवार,दि.२८.७.२०१३)- मुंबई आणि पुणे अंतीम बस रुटस

Submitted by ववि_संयोजक on 24 July, 2013 - 23:40

पुणे आणि मुंबई दोन्हीचे वविचे अंतीम बस रुटस आणि वेगवेगळ्या बस थांब्यांहून बस निघायच्या वेळा इथे देत आहोत.

मुंबई अंतीम बस रुटः-

1)दादर- स्वामीनारायण मंदिर ( 5.45am) संयोजक-इंद्रधनुष्य (मो. नं.-9833953887)

2)बोरीवली- ओंकारेश्वर मंदीर ,नॅशनल पार्क समोर (6.20 am)
(पश्चिम द्रुतगती मार्गाने सांताक्रूझ , गोरेगाव, मालाड ,कांदिवली बोरीवली. दहिसर वाल्यांना हायवे वर याव लागेल.) संयोजक-विनय भिडे (मो. नं.-9820284966)

3)काशिमिरा घोडबंदर (6.25am)

4)ठाणे-आनंद टॉकीजच्या जवळ(7.15 am) संयोजक-योगेश कुळकर्णी (मो. नं.-९९३००५६९६३)

5)तीन हात नाका (7.25 am)

6)कल्याण- शिवाजी पुतळा - मुरबाड फाटा (8am)


पुणे अंतीम बस रुटः-

संयोजकः- मयूरेश कंटक-(मो. नं.-9922401778)

1)ट्रेझर पार्क-सहकारनगर-१- (5 am)

2)राजाराम पूल,सिंहगड रोड- (5.15 am)

3)डिपी रोड कॉर्नर-आशिष गार्डन,कोथरुड - (5.30 am)

4) किनारा हॉटेल ,पौड रोड - (5.40 am)

5) गुडलक चौक,डेक्कन - (5.50 am)

6) दापोडी- मेगामार्टसमोर- (6.10 am)

7) नाशिक फाटा- (6.15 am)

वर दिलेल्या वेळा या त्या त्या बस थांब्यावरून बस सुटण्याच्या वेळा आहेत.कृपया सर्वांनी आपापल्या थांब्यावर किमान दहा मिनिटे आधी येऊन उपस्थित रहावे.म्हणजे वविच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येईल.

बस रूट संदर्भात काही शंका असतील तर खालील संयोजकांशी संपर्क साधावा.

१)मुंबई:-विनय भिडे (मो. नं.-9820284966)

२)पुणे:- मयूरेश कंटक (मो. नं.-9922401778)

पुण्याच्या बसची माहिती खालीलप्रमाणे-

नंबर:-MH 14 HD 1151

रंग- पांढरा

मेक- टाटा आयशर (३२ सीटर)

वविकरांसाठी काही सूचना:-
१)कृपया वेळेचे बंधन पाळावे. आपापल्या बस थांब्यांवर वेळेआधी दहा मिनीटस उपस्थित रहावे.

२) रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टींना परवानगी नाही ).

३) वर्षाविहार असल्याने दिवसभरात पाण्यात भिजणे हे होणारच. तेव्हा टॉवेल,जास्तीचे कपडे, लहान मुलांसाठी गरजेचे असल्यास रेनकोट, औषध या गोष्टी न विसरता घेऊन यावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud आता काल काय आपण हिब्रू मधे बोललो कां?! त्यांना योग्यवेळी योग्य ठिकाणहून पिक-अप कर, त्यासाठीचा योग्य तो काँटॅक्ट नंबर योग्य त्या ठिकाणी सेव्ह केला आहेसच! Wink

पुणे संयोजक- बसचा नंबर, ड्रायव्हरचे नाव, बसचा रंग वगैरे काही तपशील आहेत का? हे तपशील असलेले बरे असते. वृत्तांताची सुरूवात करता येते Proud

आता काल काय आपण हिब्रू मधे बोललो कां?! त्यांना योग्यवेळी योग्य ठिकाणहून पिक-अप कर, त्यासाठीचा योग्य तो काँटॅक्ट नंबर योग्य त्या ठिकाणी सेव्ह केला आहेसच!>>>>>>>>>>>> योग्य काय अयोग्य काय हे तपासत बघण्याची ही वेळ नाही, आता डोक्यात फक्त एकच किडा वळवळतोय ववि ववि ववि ववि Lol

Happy आणि बघ! तुला यंदा 'भिड्यांच्या शिड्या' चढाव्या लागणार नैयेत! आधीच 'देवदर्शन' होणारेय!! Happy

बादवे मुंबई बस तुडंब भरली आहे लोक्स .... तरिही अजुन कोणास यायच असेल तर त्याचीही व्यवस्था केली जाईल ...
>>>
हे पुणेकरांसाठी पण आहे का? Blush

संयोजक इकडे लक्ष द्या प्लिजच!

म्हणजे आता आपली भेट रविवारी....नाही नाही.. रविवारी नाही आता वविवारी म्हणूया!

बादवे मुंबई बस तुडंब भरली आहे लोक्स .... तरिही अजुन कोणास यायच असेल तर त्याचीही व्यवस्था केली जाईल .

>>> हे वाक्य खास नतद्रष्टासाठी लिहिल्यासारखं वाटतंय Proud

नतद्रष्ट आहे का वविला? तो पुण्याहून येईल ना? मुंबई बस तुडुंब भरली आहे. विन्या साईड कार्स लावणार असेल आता.

मुंबई बस तुडुंब भरली आहे. विन्या साईड कार्स लावणार असेल आता.>>>>>>>>>>> बेस्ट बरोबर बोलण झालं आहे, मुंबई ठाण्याहुन माबोकरांची संख्या आणखी वाढल्यास डबल डेकर बस करण्याचा मानस आहे Proud

बादवे मुंबई बस तुडंब भरली आहे लोक्स .... तरिही अजुन कोणास यायच असेल तर त्याचीही व्यवस्था केली जाईल ...
>>>
>>हे पुणेकरांसाठी पण आहे का? इश्श !

प्रिया, पण हे विचारतांना लाजायचं काय कारण आहे? Wink

हे पुणेकरांसाठी पण आहे का?...>>>रिया,तुझ्यासाठी बसचा पूर्ण टप मोकळा आहे गं... Proud

हे वाक्य खास नतद्रष्टासाठी लिहिल्यासारखं वाटतंय...>>> लले,तू लईच हुषार बघ... Proud

पुणे संयोजक- बसचा नंबर, ड्रायव्हरचे नाव, बसचा रंग वगैरे काही तपशील आहेत का? हे तपशील असलेले बरे असते....>>> सगळं सांगणार बघा. :).

Pages