ववि२०१३(रविवार,दि.२८.७.२०१३)- मुंबई आणि पुणे अंतीम बस रुटस

Submitted by ववि_संयोजक on 24 July, 2013 - 23:40

पुणे आणि मुंबई दोन्हीचे वविचे अंतीम बस रुटस आणि वेगवेगळ्या बस थांब्यांहून बस निघायच्या वेळा इथे देत आहोत.

मुंबई अंतीम बस रुटः-

1)दादर- स्वामीनारायण मंदिर ( 5.45am) संयोजक-इंद्रधनुष्य (मो. नं.-9833953887)

2)बोरीवली- ओंकारेश्वर मंदीर ,नॅशनल पार्क समोर (6.20 am)
(पश्चिम द्रुतगती मार्गाने सांताक्रूझ , गोरेगाव, मालाड ,कांदिवली बोरीवली. दहिसर वाल्यांना हायवे वर याव लागेल.) संयोजक-विनय भिडे (मो. नं.-9820284966)

3)काशिमिरा घोडबंदर (6.25am)

4)ठाणे-आनंद टॉकीजच्या जवळ(7.15 am) संयोजक-योगेश कुळकर्णी (मो. नं.-९९३००५६९६३)

5)तीन हात नाका (7.25 am)

6)कल्याण- शिवाजी पुतळा - मुरबाड फाटा (8am)


पुणे अंतीम बस रुटः-

संयोजकः- मयूरेश कंटक-(मो. नं.-9922401778)

1)ट्रेझर पार्क-सहकारनगर-१- (5 am)

2)राजाराम पूल,सिंहगड रोड- (5.15 am)

3)डिपी रोड कॉर्नर-आशिष गार्डन,कोथरुड - (5.30 am)

4) किनारा हॉटेल ,पौड रोड - (5.40 am)

5) गुडलक चौक,डेक्कन - (5.50 am)

6) दापोडी- मेगामार्टसमोर- (6.10 am)

7) नाशिक फाटा- (6.15 am)

वर दिलेल्या वेळा या त्या त्या बस थांब्यावरून बस सुटण्याच्या वेळा आहेत.कृपया सर्वांनी आपापल्या थांब्यावर किमान दहा मिनिटे आधी येऊन उपस्थित रहावे.म्हणजे वविच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येईल.

बस रूट संदर्भात काही शंका असतील तर खालील संयोजकांशी संपर्क साधावा.

१)मुंबई:-विनय भिडे (मो. नं.-9820284966)

२)पुणे:- मयूरेश कंटक (मो. नं.-9922401778)

पुण्याच्या बसची माहिती खालीलप्रमाणे-

नंबर:-MH 14 HD 1151

रंग- पांढरा

मेक- टाटा आयशर (३२ सीटर)

वविकरांसाठी काही सूचना:-
१)कृपया वेळेचे बंधन पाळावे. आपापल्या बस थांब्यांवर वेळेआधी दहा मिनीटस उपस्थित रहावे.

२) रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टींना परवानगी नाही ).

३) वर्षाविहार असल्याने दिवसभरात पाण्यात भिजणे हे होणारच. तेव्हा टॉवेल,जास्तीचे कपडे, लहान मुलांसाठी गरजेचे असल्यास रेनकोट, औषध या गोष्टी न विसरता घेऊन यावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद संयोजक .

६ वाजता नक्की तिथे उभे असू , मायबोली टी शर्ट मुळे गेल्या वेळेसारखी आपलीच माणसे आहेत का हा गोंधळही होणार नाही Happy

आनंद टॉकिजच्या जवळ-तीन हात नाका >>> Uhoh

आनंद टॉकीज ईस्टला, तीन-हाथ-नाका वेस्टला, दोन्हींतलं अंतर किमान दीड ते दोन कि.मी.

नक्की कुठे ७:१५ वाजता? Uhoh

लले, मला केव्हापासूनच एक प्रश्न पडला आहे, की तू हा'थ' का म्हणतेस? Proud

बरे, आमचं काय? कुठे? किती वाजता?

मंजू, गुड ऑब्झर्वेशन, हां! Wink तू विचारल्यावर मी पण त्यावर विचार केला.

२५ वर्षांपूर्वी ठाण्यात रहायचो तेव्हा अशा नावाचा कुठला चौक ठाण्यात अस्तित्त्वात आहे हेच माहिती नव्हतं. ५ वर्षांपूर्वी ठाण्यात आल्यावर मी सर्वप्रथम हे नाव एका रिक्षावाल्याकडून ऐकलं, तो होता भैय्या, साहजिकच त्यानं तो शब्द तसा उच्चारला आणि माझ्या डोक्यात ते 'थ'च बसलंय पक्कं त्यामुळे Lol

मल्ल्या, कोणीही बसला हात दाखवला तर आधी विचार की माबोमेंबर्स आहात का ते.... मगच त्यांना बशीत घे Proud

या वेळेला पुण्याच्या बशीत अंताक्षरी सगळ्यांना मिळून खेळता येईल Proud

मी, मालाडला, पश्चिम द्रूतगती मार्गावरील, पुष्पा पार्कच्या थांब्यावर उभा असेन...
बस तिथे किती वाजेपर्यंत पोचेल?

टी शर्ट घालणे कंपलसरी आहे का?
>>
साडी घातली तरी चालेल की. Biggrin

यावेळेला खुप गाठी भेटी मिसणारेय मी
>>
अवं, मग या की. कोन नाय म्हनतंय.

टी शर्ट घालणे कंपलसरी आहे का? ...>>> योगुली,कंपल्सरी वगैरे काहीही नाही. पण आपण टीशर्ट्सचं वाटप वविच्या आधी एक आठवडा याचसाठी करतो की ज्या ज्या वविकरांनी टीशर्ट्स घेतले आहेत मायबोलीचे त्यांना ते घालुन वविला येता यावं. त्यामुळे टीशर्ट्स घेतलेल्या वविकरांनी ते घालुन येणं अपेक्षित नक्कीच आहे. Happy

Pages