दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राणसाहेब गेले आणि हिंदी चित्रपटसृष्टीतला प्राणच गेला Sad
मला वाटते सद्ध्या ते सर्वात जुने व्यक्तिमत्व होते,
त्यांच्या आधीचा कोणी कलाकार अजुनही असेल असे वाटत नाही.
भावपुर्ण श्रद्धांजली !!!

प्राण Sad

श्रद्धांजली.

बोस ऑडियो चे अमर बोस ह्यानाही श्रद्धांजली. Sad
ऑडियो क्षेत्रात अत्यंत भरीव कामगिरी केली आहे त्यानी.

प्राण यांना श्रद्धांजली!
-गा.पै.

प्राण यांना श्रद्धांजली. अत्यंत आवडता अभिनेता.
माबो वरच वाचून बनी रुबेन यांचे "आणि प्राण" हे पुस्तक बाबांना भेट दिले होते. ते वाचून त्यांच्याबद्दल आदर खूपच वाढ्ला.

अमर बोस ह्यानाही श्रद्धांजली.

अमर बोस यांना श्रद्धांजली.
माधवी देसाईंनाही ! त्यांचं 'नाच ग घुमा' एक काळ गाजवून गेलं. त्यानंतर तशी मराठी आत्मचरित्रे खूप वाचली पण मूर्तीभंजनाचा तो अनुभव कायम लक्षात राहिला.

बिहार मधल्या छोट्या २२ पिलांना श्रद्धांजली! Sad
खुप वाईट वाटतेय त्यांच्याबद्दल!

Sad

अमर बोस, Sad श्रद्धांजली!
माधवी देसाई, Sad श्रद्धांजली!
बिहार मधल्या छोट्या २२ पिलांना श्रद्धांजली! Sad

अंबाजोगाईच्या जेष्ठ समाजसेविका शैलाताई लोहिया यांचे निधन. Sad

शैलाताईंनी आणि डॉ. लोहियांनी ७०-८० च्या दशकात अंबाजोगाईमध्ये मानवलोक ही संस्था सुरु केली. त्याचबरोबर निराधार स्त्रियांसाठी मनस्विनी हा प्रकल्पही सुरु केला. लातुरच्या भुकंपानंतर त्याभागात मानवलोकनी खूप काम केलं होतं.
या दोघांच्या कामामूळे सगळे अंबाजोगाईकर यांना भाभी आणि बाबुजी म्हणूनच ओळखतात.

भाभींना श्रद्धांजली.

Sad

हुतात्मा झालेल्या पाच भारतीय जवानांना श्रद्धांजली! रामदानच्या कालावधीत मोठ्या उदार मनाने आतंकवाद्यांविरुद्ध मोहिमा थंडावणार्‍या षंढ भारतीय नेत्यांना या बातमीचं काहीही सोयरसुतक नसेलच म्हणा! पाकिस्तान खुशाल शस्त्रसंधी करार हज्जारो वेळा मोडतो. भारताने मात्र मोडायचा नाही. यावरून सध्याचे भारतीय राज्यकर्ते पाकिस्तानचे पाठीराखे आहेत हे सिद्ध होतं.
-गा.पै.

प्रेमनाथ सिंह, शंबू सरन राय, व्ही. कुमार राय, रघुनंदन प्रसाद आणि कुंडलिक केरबा माने या जवानांना श्रद्धांजली.

Pages