दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सतिश तारे - मधुमेह व गँगरिनमुळे निधन ... खरच वाईट झालं. अत्यंत गुणी कलाकार....

सतीश तारे Sad विश्वास बसत नाहीये.

प्रशांत दामले एका मुलाखतीत म्हटला होता की "सतीशबरोबर काम करायला खूप एनर्जी लागते" अत्यंत गुणी अभिनेता गेला, भावपूर्ण श्रद्धांजली.

सतिश तारे - मधुमेह व गँगरिनमुळे निधन >>>>>>>>>>>>:अरेरे: फारच वाईट झालं.

सतिश तारे>>> शॉकिंग न्युज.

फार वय नव्हतं की त्यांच.
Sad

सतीश तारे गेले.. त्यांची एनर्जी तर प्रेक्षकांत बसूनदेखील जाणवायची.
जादू तेरी नजर मधे, प्रशांत दामलेंच्या सोबत असत. वळू मधे पण छोटीशी भुमिका होती.

माझ्या पिढीच्या पुण्यात वाढलेल्यांनी सुनील आणि सतीश दोन्ही भावांना तार्‍यांच्या बालनाट्यात पाह्यलंय. दोघंही अव्वल दर्जाचे कलाकार. धाकट्या सुनीलला पुणं सोडून मुंबईला येणं जमलं नाही. त्याने फारच लवकर जगच सोडलं.
सतीशने मुंबईत येणं कसतरी जमवलं. बरेच टक्केटोणपे खाऊन, काही चुका करूनही हा आपल्या कलेच्या जोरावर घट्ट राह्यला. आणि इतक्या लवकर हा दुर्दैवी अंत... Sad

हो तोच.

काय्?सतिश तारे?
आईग्ग!! आता आताच तर 'फु बाई फु' च्या मागच्या पर्वात बघितला होता त्यांचा अभिनय.

भावपुर्ण श्रद्धांजली!! Sad

बापरे काय धक्कादायक बातमी ? सतीश तारे यांचे निधन? खळखळून हसवणारा अभिनेता गेला.>>>>>>>>>>>>>> :अरेरे:श्रद्धांजली

सतीश तारे यांना श्रद्धांजली.
लहानपणीची बालनाट्य आणि एलदुगो आठवण झाली

४-५ दिवसांपूर्वी, कुठल्यातरी नाटकाच्या जाहिरातीत, त्यांनी आपल्या वडीलांबद्दल आणि भावाबद्दल लिहिलेल वाचलं होतं. Sad

माझ्या पिढीच्या पुण्यात वाढलेल्यांनी सुनील आणि सतीश दोन्ही भावांना तार्‍यांच्या बालनाट्यात पाह्यलंय. दोघंही अव्वल दर्जाचे कलाकार.>>
खरच. विनोदी नटांमधला एक तारा निखळला. Sad भावपूर्ण श्रध्दांजली.

विनोदी नटांच्या नभांगणातील एक तारा निखळला. श्रद्धांजली..

Pages