"Everything you see I owe to spaghetti." - सोफिया लॉरेन
सोफियाकडं बघून यावर विश्वास बसत नाही पण हे कार्बवालं फूड बर्याच जणांचं आवडतं आहे. करायला सोपं , वन डिश मील म्हणून झटपट होणारं आणि किती वेगवेगळ्या पाककृती तयार होतील याला अंतच नाही. म्हणजे एन्डलेस पॉसिबिलीटीज बरं का.. मूळच्या इटालियन प्रकाराला मायबोलीकरांनी भटवून भारतीय म्हणजे एकदम मराठमोळंच करुन टाकलं- हाच तो वरणातला पास्ता! मराठीकरण माबोकर करणार नाहीतर कोण?
पण अलिकडं माझी एक माबोकर मैत्रीण म्हणाली की तिला सारखे तेच तेच सॉसेज वापरुन कंटाळा आलाय. म्हणजे टोमॅटो बेस्ड, क्रीमी, पेस्टो इ. म्हणून जरा अजून वेगळे प्रकार सुचवावे म्हटलं. ते वाचून तुम्हाला काही अजून सुचले तर तुम्हीही लिहा.
पहिल्यांदा पास्ता शिजवायची बेसिक पद्धत बघू. पाकिटावर सूचना लिहिलेल्या असतात त्यानुसारच तो शिजवावा. पाणी उकळल्यावर थोडं मीठ (तेल घालायची गरज नाही) घालून पास्ता घालावा आणि तो हलवावा. अजिबात हलवला नाही तर चिकट गोळा होईल. शिजल्यावर चाळणीवर ओतून पाणी काढावं पण त्यापूर्वी त्यातलं थोडं पाणी बाजूला काढून घ्यावं असं "अमेरिकाज टेस्ट किचन"ची ब्रिजिट म्हणते. हे कशासाठी? तर जो सॉस तयार होत असतो त्याची कन्सिस्टसी हवी तशी करण्यासाठी ते वापरायचं. पास्त्यातले पाणी काढल्यावर तो थंड पाण्याने धुवायचा नाही. उलट तो तसाच सॉसमध्ये घालायचा त्यामुळे सॉस त्याला व्यवस्थित लागतो. पण पास्ता ड्रेन केल्यानंतर फार वेळ ठेवला जाता कामा नये. सॉस तयार ठेवून लगेच पास्ता त्यात घालावा. म्हणजे एका बाजूला पास्त्याचे पाणी उकळत ठेवले की बाजूला सॉस बनवायला सुरुवात करावी किंवा सॉस आधी बनवावा.
हल्ली restaurants मध्येही पास्त्याचे फ्युजन प्रकार मिळू लागलेत. मला या प्रकाराची धास्ती आहे, फोडणीच्या मॅगी नूड्ल्स खाल्ल्यापासून. फ्युजन हे कधी जमतं कधी दोन पाकसंस्कृतींचं त्रांगडं होतं. पण व्हॅपिआनोसारख्या restaurants मध्ये काही प्रकार ट्राय केल्यावर ती जरा कमी झाली.
आता सॉसचे काही प्रकार बघू.
सॉस बनवण्याची बेसिक पद्धत तीच आहे. पसरट भांड्यात मध्यम आचेवर ऑलिव्ह ऑइल घालून मग ड्राय स्पायसेस, भाज्या-मीट नीट परतून आणि मग सॉसचा बेस घालावा. मीठ चवीनुसार.
ऑरेंज सॉसमधला पास्ता-
ऑरेंज ज्यूस
ताज्या थाई मिरच्या बारीक चिरुन
लसूण बारीक चिरुन
बॉक चॉय
सोया सॉस
(रंगीत ढबू, चिकन इ. घालू शकता, तयार ऑरेंज सॉसही वापरु शकता)
नंतर वरुन parmesan चीज, ब्लॅक पेपर इ.
पास्ता थाय..
ग्रीन करी पेस्ट - चमचाभर
नारळाचे दूध (सॉसचा बेस)
मश्रूम्स
गाजर julienne
लाल ढबूचे तुकडे
कांद्याची कोवळी पात - वरुन सजावटीसाठी
चीज आणि पास्त्याची ताटातूट करवत नसेल तर वरुन चीज, मिरपूड घालू शकता. छान चव येते.
वरुन लेमन बेसिल किंवा पायनॅपन बेसिल किंवा थाई बेसिल-हिरव्या वाटणातला पास्ता-
यात फार काय सांगायची गरज नाही पण कोथिंबीर, हिरवी मिरची, हवा तर कांदा यांच्या वाटणाचा बेस.
वरुन ग्रीक ओरेगॅनो.
व्हाईट वाईन, कॅरॅमलाइज्ड अनियन सॉस-
अगदी अंगासोबत असलेला सॉस, मश्रूम्स आणि कॅरॅमलाइज्ड अनियनची वेगळी चव येते पण सर्वांना आवडेलच असे नाही. यात रोस्टेड लसूण घातलेलाही छान लागतो.
गुड ओल्ड चिकन अल्फ्रेडो-
सॉससाठी क्रीम चीज किंवा कुकिंग क्रीम चीज वापरु शकता. त्यात बरेच फ्लेवर्स येतात.
डाव्या बाजूच्या लिस्टमधून फ्लेवर सिले़क्ट केल्यावर माहिती आणि रेसिपीजही येतील.
क्रश्ड रेड पेपर, चिकन ऑलिव्ह ऑइलमध्ये परतून मग क्रीम चीज थोडे दुधात मिसळून एकजीव करुन ओतायचे.
Whole wheat Fusili..
Rogatoni-
वरुन कोथिंबीर-गुलाबी पास्ता-
टोमॅटो puree आणि क्रीम बेस असलेला हा सॉस. यात ड्राय इटालियन स्पायसेस आहेत आणि वरुन फ्रेश बेसिल.
टोमॅटो puree न वापरता आणि सॉस जास्त नसलेला पास्ताही छान लागतो. वरच्या कॅरॅमलाइज्ड अनियनवाल्या पास्त्यासारखाच हा फ्रेश टोमॅटो तुकडे, पालकाची पाने, ब्रोकोली इ घालून केलेला पास्ता. तुम्हाला हवे तसे इटालियन सीझनिंग घालू शकता. वरुन चीज.
फ्रेश टोमॅटोऐवजी सन-ड्राईड टोमॅटोजची पेस्ट करुन तो बेस म्हणून वापरलेला सॉस. ग्रिल्ड रंगीत बेल पेपर्स, pappadew आणि ऑलिव्ह आणि पर्पल बेसिल. हँडमेड (मी नव्हे, whole foods) Tagliatelle वापरुन.
मग आता "पास्ता प्रयोग" सुरु करा किंवा केलेले इथे लिहा. सगळ्याच दृष्टीने हे 'कम्फर्ट फूड' होऊन जाईल. मग तुम्हीही सोफियाप्रमाणेच म्हणू शकता. ब्लेम इट ऑन पास्ता.
जळगावकडे शेवांची मसालेदार
जळगावकडे शेवांची मसालेदार भाजी करतात. त्यात पास्ता घालून यंव लागेल असा अंदाज!
पास्ता माझा फेव. चीज, क्रीम
पास्ता माझा फेव. चीज, क्रीम वाले पास्ते मला आवडतात.....टॉमेटो वगैरे इंडियन टेस्ट जवळ जाणारे आवडत नाहीत........पिक्स एकदम यम्मी.....
येस्स सिमंतिनी. चकप
येस्स सिमंतिनी.:डोमा: चकप रहस्य/सवय.:फिदी:
टॉमेटो बासिल पास्ता माझ्या आवडीचा. लोलाचे फोटो नेहेमीप्रमाणे कातिल.
पंजाबी ग्रेव्हीतली मॅकरोनी
पंजाबी ग्रेव्हीतली मॅकरोनी
लोला, सगळे पास्ते(अनेकवचन
लोला, सगळे पास्ते(अनेकवचन करावे का?) मस्त दिसत आहेत. ग्रीन करी टेम्प्टींग आहे.
आणि हो राहिलेच. फोटो खूप सुंदर आहेत
माझी पण रिक्षा
कोल्ड पास्ता सॅलड
वॉव मस्त पास्ते. फोटोही खुप
वॉव मस्त पास्ते. फोटोही खुप सुंदर.
हे पास्ता चे वेगवेगळे प्रकार
हे पास्ता चे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत????
म्हणजे वर फोटोत दाखविल्याप्रमाणे काही नूड्ल्स पेक्शा थोडे जाड तर काही नळी सारखे?
ह्या प्रकारांची नावे काय ????/ आणि चवी मध्ये काय फरक असतो?
हे पास्ता चे वेगवेगळे प्रकार
हे पास्ता चे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत????>>
http://fasta-co.com/wp-content/uploads/2013/04/pasta-poster-web.pdf
मस्त! पण पास्ता ड्रेन
मस्त!
पण पास्ता ड्रेन केल्यानंतर फार वेळ ठेवला जाता कामा नये. सॉस तयार ठेवून लगेच पास्ता त्यात घालावा.
>>> नुकताच याचा अनुभव घेतला. चवीतला, अॅपिअरन्समधला फरक पाहिला आणि आधीची (सांगोवांगी) पध्दत कशी चुकीची होती हे पुरेपूर कळलं.
जियो लोला. एकदम मस्त.
जियो लोला. एकदम मस्त.
वॉव! मस्त व्हेरीएशन्स.. फोटो
वॉव! मस्त व्हेरीएशन्स.. फोटो क्लासच!
वॉव पास्ता आणी फोटो दोन्ही
वॉव पास्ता आणी फोटो दोन्ही मस्त!
फोटो पाहून करावस वाटतयं, यातल
फोटो पाहून करावस वाटतयं, यातल काही केलं तर नक्की इथे लिहिन.
पण पुण्यात ताजी बेझिल कुठे मिळेल?
फोटो पाहून करावस वाटतयं, यातल
फोटो पाहून करावस वाटतयं, यातल काही केलं तर नक्की इथे लिहिन.
पण पुण्यात ताजी बेझिल कुठे मिळेल?
लोला स्लर्पी एकदम
लोला स्लर्पी एकदम
ये मेरी तरफ से
ये मेरी तरफ से

वॉव लोला दी तुझं नाव बदलुन
वॉव लोला दी तुझं नाव बदलुन पास्तालोल्ला ठेव.......
वॉव. भारी फोटो!
वॉव. भारी फोटो!
मस्त! धन्यवाद!
मस्त! धन्यवाद!
मस्त. फ्युजन कन्फ्युजन बद्दल
मस्त.
फ्युजन कन्फ्युजन बद्दल अगदी अगदी. सध्या इथे मध्य भारतात आणि पार बिहार मध्ये पण पास्ता फार फेवरिट आहे. पण कुकरी शोज मध्ये वगरे उत्साही गृहिणी जे काय बोडण बनवितात त्याला पास्ता किसी भी अँगलसे म्हणवत नाही. हहपुवा होते बघून.
अराबिआटा, मॅक अॅन्ड चीज व स्पिनॅच पास्ता व्हाइट सॉस मध्ये माझे फेवरिट. स्पिनॅच वर हल्की दालचिनी पावडर पसरवली तर स्वाद एकदम मस्त येतो. पायोनिअर वुमन पण नवरा गावी गेला की मैत्रीणींसाठी एक स्प्रिन्ग व्हेजीज घालून पास्ता बनवते तो मस्त आहे. ब्लॉग वर रेसिपी आहे. साधी मॅकरोनी हल्क्या तेलावर क्रिस्प परतून नुसती मीठ मिरेपूड नैतर कांदा कॅप्सिकम गार्लिक घालून पण लै भारी लागते.
फारफेले पास्ता सकाळच्या घाईच्या वेळेत लवकर शिजत नाही. तेव्हा मॅकरोनीच बरी.
सह्ही फोटो!
सह्ही फोटो!
शिजवण्याच्या टीप्स मस्त आणि
शिजवण्याच्या टीप्स मस्त आणि फोटो ऑस्सम!
वॉव बरेच नविन ऑप्शन्स
वॉव बरेच नविन ऑप्शन्स मिळाले.. धन्यवाद लोला
आम्ही पास्ता प्रेमी त्या मुळे नक्की च ट्राय करू.
फोटो तर जबरी !!!
लोला पास्त्याचे मस्त
लोला पास्त्याचे मस्त प्रकार!
आणि फोटो एकदमच तोंपासु!
सुपर फोटो!
सुपर फोटो!
पास्टा सौस कसा बन्वाय्चा ?
पास्टा सौस कसा बन्वाय्चा ?
लोला मस्त व्हेरिएशन्स
लोला मस्त व्हेरिएशन्स सुचवलेस. फोटो सही आलेत.
पास्टा सौस कसा बन्वाय्चा ?
पास्टा सौस कसा बन्वाय्चा ?
कैलास, हल्ली भारतातही रेडीमेड
कैलास, हल्ली भारतातही रेडीमेड पास्ता सॉस मिळत असावेत पण मिळत नसल्यास टोमॅटो प्युरे वापरून करता येतील किंवा ताज्या टोमॅटोचा रस वापरुनही पास्ता सॉसचा बेस करता येईल.
मस्त वेरिएशन्स आहेत. थॅन्क्स
हा माझ्या लेकाचा फेवरेट
Pages