"Everything you see I owe to spaghetti." - सोफिया लॉरेन
सोफियाकडं बघून यावर विश्वास बसत नाही पण हे कार्बवालं फूड बर्याच जणांचं आवडतं आहे. करायला सोपं , वन डिश मील म्हणून झटपट होणारं आणि किती वेगवेगळ्या पाककृती तयार होतील याला अंतच नाही. म्हणजे एन्डलेस पॉसिबिलीटीज बरं का.. मूळच्या इटालियन प्रकाराला मायबोलीकरांनी भटवून
भारतीय म्हणजे एकदम मराठमोळंच करुन टाकलं- हाच तो वरणातला पास्ता! मराठीकरण माबोकर करणार नाहीतर कोण?
पण अलिकडं माझी एक माबोकर मैत्रीण म्हणाली की तिला सारखे तेच तेच सॉसेज वापरुन कंटाळा आलाय. म्हणजे टोमॅटो बेस्ड, क्रीमी, पेस्टो इ. म्हणून जरा अजून वेगळे प्रकार सुचवावे म्हटलं. ते वाचून तुम्हाला काही अजून सुचले तर तुम्हीही लिहा.
पहिल्यांदा पास्ता शिजवायची बेसिक पद्धत बघू. पाकिटावर सूचना लिहिलेल्या असतात त्यानुसारच तो शिजवावा. पाणी उकळल्यावर थोडं मीठ (तेल घालायची गरज नाही) घालून पास्ता घालावा आणि तो हलवावा. अजिबात हलवला नाही तर चिकट गोळा होईल. शिजल्यावर चाळणीवर ओतून पाणी काढावं पण त्यापूर्वी त्यातलं थोडं पाणी बाजूला काढून घ्यावं असं "अमेरिकाज टेस्ट किचन"ची ब्रिजिट म्हणते. हे कशासाठी? तर जो सॉस तयार होत असतो त्याची कन्सिस्टसी हवी तशी करण्यासाठी ते वापरायचं. पास्त्यातले पाणी काढल्यावर तो थंड पाण्याने धुवायचा नाही. उलट तो तसाच सॉसमध्ये घालायचा त्यामुळे सॉस त्याला व्यवस्थित लागतो. पण पास्ता ड्रेन केल्यानंतर फार वेळ ठेवला जाता कामा नये. सॉस तयार ठेवून लगेच पास्ता त्यात घालावा. म्हणजे एका बाजूला पास्त्याचे पाणी उकळत ठेवले की बाजूला सॉस बनवायला सुरुवात करावी किंवा सॉस आधी बनवावा.

हल्ली restaurants मध्येही पास्त्याचे फ्युजन प्रकार मिळू लागलेत. मला या प्रकाराची धास्ती आहे, फोडणीच्या मॅगी नूड्ल्स खाल्ल्यापासून. फ्युजन हे कधी जमतं कधी दोन पाकसंस्कृतींचं त्रांगडं होतं. पण व्हॅपिआनोसारख्या restaurants मध्ये काही प्रकार ट्राय केल्यावर ती जरा कमी झाली.
आता सॉसचे काही प्रकार बघू.
सॉस बनवण्याची बेसिक पद्धत तीच आहे. पसरट भांड्यात मध्यम आचेवर ऑलिव्ह ऑइल घालून मग ड्राय स्पायसेस, भाज्या-मीट नीट परतून आणि मग सॉसचा बेस घालावा. मीठ चवीनुसार.
ऑरेंज सॉसमधला पास्ता-
ऑरेंज ज्यूस
ताज्या थाई मिरच्या बारीक चिरुन
लसूण बारीक चिरुन
बॉक चॉय
सोया सॉस
(रंगीत ढबू, चिकन इ. घालू शकता, तयार ऑरेंज सॉसही वापरु शकता)
नंतर वरुन parmesan चीज, ब्लॅक पेपर इ.

पास्ता थाय..
ग्रीन करी पेस्ट - चमचाभर
नारळाचे दूध (सॉसचा बेस)
मश्रूम्स
गाजर julienne
लाल ढबूचे तुकडे
कांद्याची कोवळी पात - वरुन सजावटीसाठी
चीज आणि पास्त्याची ताटातूट करवत नसेल तर वरुन चीज, मिरपूड घालू शकता. छान चव येते.


वरुन लेमन बेसिल किंवा पायनॅपन बेसिल किंवा थाई बेसिल-
हिरव्या वाटणातला पास्ता-
यात फार काय सांगायची गरज नाही पण कोथिंबीर, हिरवी मिरची, हवा तर कांदा यांच्या वाटणाचा बेस.
वरुन ग्रीक ओरेगॅनो.

व्हाईट वाईन, कॅरॅमलाइज्ड अनियन सॉस-
अगदी अंगासोबत असलेला सॉस, मश्रूम्स आणि कॅरॅमलाइज्ड अनियनची वेगळी चव येते पण सर्वांना आवडेलच असे नाही. यात रोस्टेड लसूण घातलेलाही छान लागतो.
गुड ओल्ड चिकन अल्फ्रेडो-
सॉससाठी क्रीम चीज किंवा कुकिंग क्रीम चीज वापरु शकता. त्यात बरेच फ्लेवर्स येतात.
डाव्या बाजूच्या लिस्टमधून फ्लेवर सिले़क्ट केल्यावर माहिती आणि रेसिपीजही येतील.
क्रश्ड रेड पेपर, चिकन ऑलिव्ह ऑइलमध्ये परतून मग क्रीम चीज थोडे दुधात मिसळून एकजीव करुन ओतायचे.

Whole wheat Fusili..

Rogatoni-

वरुन कोथिंबीर-
गुलाबी पास्ता-
टोमॅटो puree आणि क्रीम बेस असलेला हा सॉस. यात ड्राय इटालियन स्पायसेस आहेत आणि वरुन फ्रेश बेसिल.


टोमॅटो puree न वापरता आणि सॉस जास्त नसलेला पास्ताही छान लागतो. वरच्या कॅरॅमलाइज्ड अनियनवाल्या पास्त्यासारखाच हा फ्रेश टोमॅटो तुकडे, पालकाची पाने, ब्रोकोली इ घालून केलेला पास्ता. तुम्हाला हवे तसे इटालियन सीझनिंग घालू शकता. वरुन चीज.

फ्रेश टोमॅटोऐवजी सन-ड्राईड टोमॅटोजची पेस्ट करुन तो बेस म्हणून वापरलेला सॉस. ग्रिल्ड रंगीत बेल पेपर्स, pappadew आणि ऑलिव्ह आणि पर्पल बेसिल. हँडमेड (मी नव्हे, whole foods) Tagliatelle वापरुन.

मग आता "पास्ता प्रयोग" सुरु करा किंवा केलेले इथे लिहा. सगळ्याच दृष्टीने हे 'कम्फर्ट फूड' होऊन जाईल. मग तुम्हीही सोफियाप्रमाणेच म्हणू शकता.
ब्लेम इट ऑन पास्ता.
हा अजुन एक
हा अजुन एक

क्लास फोटो लोला!!! भारी
क्लास फोटो लोला!!!
भारी पास्ते आहेत. ह्यातले काही ट्राय करुन भाचेमंडळींना किती आवडले ह्याचा रिपोर्ट देण्यात येईल.:)
मस्त जमलाय लेख ! पास्ता
मस्त जमलाय लेख ! पास्ता आमचाही आवडीचा.
ही माझ्या लेकाची फेव्ह. डिश.
जबरी फोटोग्राफ्स! पास्ता बरेच
जबरी फोटोग्राफ्स! पास्ता बरेच दिवसात खाल्ला नव्हता... आता हे फोटो पाहून लवकरच पास्ता खावा म्हणते!
मंडळी, कैच्याकै म्हणा पण एक
मंडळी, कैच्याकै म्हणा पण एक कल्पना प्लीज ऐका. ग्लुतेन फ्री मिलेट लसान्य मिळतो ऐकले आहे. तेव्हा पासून झणझणीत कांद्याचे पिठले, लसून चटणी घालून करावा असे मनात आहे.
कुणी वापरला आहे का असला ग्लुतेन फ्री प्रकार? चव कशी असते - बाजरी सारखी का नेहमीसारखी?
लोला, कोल्ड प्रकार(पास्ता
लोला, कोल्ड प्रकार(पास्ता सॅलड्स)ही लिही.
लोला. मस्त बीबी. आजच अल्पनाने
लोला. मस्त बीबी.
आजच अल्पनाने लिहिलाय तसा पालक पास्ता केला होता. लेकीबाईने चट्टामट्टा खाल्ला.
माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या
माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या ना. पुण्यात ताजी बेझिल कुठे मिळेल?
मस्त आयडीयाज्! फोटो क्लास!
मस्त आयडीयाज्! फोटो क्लास!
मस्त आयडिया आहेत. ब्लॉगचं
मस्त आयडिया आहेत.
ब्लॉगचं मनावर घे(च)
शर्मिला, फोटू मीच काढलेत, जे
शर्मिला, फोटू मीच काढलेत, जे काय हाताशी असेल त्याने. म्हणजे टिकटॉक, एसएलआर, फोन इ.
चंचल, सॉस कसले आहेत?
प्राचीस, माहीत नाही. तुळस वापरुन बघा.
बाई, कोल्ड फारसा बनवला जात नाही, पण लिहीते. ते प्रकरण सॅलड प्रकारात मोडेल.
मस्त मस्त मस्त!!!
मस्त मस्त मस्त!!!
लोला, फोटूज मस्त आहेत
लोला, फोटूज मस्त आहेत !
पास्त्याचे प्रकारही आवडलेत.
पास्त्याला लसणीची, किंवा तिखट किंवा नुसती मिठाची चव आणण्यासाठी काय करायचे असते ?
नंद्या, म्हणजे काय? मूळ
नंद्या, म्हणजे काय? मूळ पास्त्यालाच?
पास्ता घरी बनवताना पिठात घाल लसूण, तिखट, मीठ.
वॉव! काय मस्त फोटोज. पास्ता
वॉव! काय मस्त फोटोज. पास्ता फेव असल्याने लगेच खावेसे वाटतेय.
प्राचीस>> पुण्यात सगळे फिरंग पदार्थ मिळण्याचे ठिकाण म्हणजे दोराबजी अन गोदरेज नेचर्स बास्केट. किंवा ग्रीनटोकरी नावाची साइट पहा.
रेडीमेड पेक्षा घरीच काही केले
रेडीमेड पेक्षा घरीच काही केले तर छरन चव लागेल असे वाटते. थँक्स सायो
पुन्हा सगळे फोटो पाहून पास्ता
पुन्हा सगळे फोटो पाहून पास्ता खायची भूक लागायला लागलीये.
कैलास, घरी करणार असाल तर हवं असल्यास ही ट्राईड अँड टेस्टेड रेसिपी करुन बघा.
ऑलिव्ह ऑईलवर लसणीच्या चकत्या चांगल्या परतून घ्याव्यात. त्यावर भाज्या (रंगीत भोपळी मिरची- चौकोनी तुकडे करुन, झुकिनी- स्लाईस करुन, गाजर हवं असल्यास- स्लाईस करुन, वांगीही चक्क बरी लागतात- ती ही स्लाईस करुन) परतून घ्याव्यात. त्यावर पास्ता सिझनिंग, मऊ झाल्यावर मीठ घालावं. जरा मऊसम, रसवाले टोमॅटो तुकडे करुन घालावेत व शिजू द्यावं. हे सुरु असताना एकीकडे पास्ता उकळत्या पाण्यात शिजत ठेवावा. शिजल्यावर त्यातलं थोडं पाणी ह्या भाज्यांवर घालावं. पास्ता ड्रेन करुन ह्यावर घालावा व गरम गरम खावं.
(भाज्या अशा नको असतील तर तुकडे करुन परतून जरा शिजल्यावर टोमॅटोसकट सगळं मिक्सरला फिरवावं. ह्यात वांगी वगळावीत)
प्राचीस, पुण्यात नळ स्टॉपजवळ,
प्राचीस, पुण्यात नळ स्टॉपजवळ, टेक महिंद्राच्यामागच्या बाजूला, आयसीआयसीआय बँक एटीएम समोर एक दुकान आहे. तीथे ग्रीन टोकरीचे प्रोडक्टस मिळतात, त्यांच्याकडे आहे फ्रेश बेसिल.
सगळे पास्ते मस्त.
मी पुर्वी लसूण परतून, कांदा चांगला परतून, टोमॅटो घालून मग अक्रोड क्रश करुन टाकायचे, मग पास्ता मिक्स करायचा आणि वरुन सिझनींग टाकून पास्ता बनवायचे.
हा माझा आवडता पास्ता
हा माझा आवडता पास्ता
सायो, मस्तं आहे पास्ता!!
सायो,
मस्तं आहे पास्ता!!
सायो, पास्ता एकदम रीफ्रेशींग
सायो, पास्ता एकदम रीफ्रेशींग दिसत आहे ..
सायो, मस्त फोटो. मला पास्ता
सायो, मस्त फोटो.
मला पास्ता खूप आवडतो पण कधीच "मस्त" वगैरे होत नाही. तर एखादे पास्ता गटग करा बरे लवकर
लोला,
ची़ज : वेगवेगळे प्रकार आणि उपयोग - असा पण एखादा धागा काढ. कुठले चीज कधी, कुठे, कसे वापरायचे लक्षात ठेवायला नको.
सायो मस्तच दिसतोय फोटो..
सायो मस्तच दिसतोय फोटो.. रंगसंगती वगैरे अप्रतिम..
मस्त दिसतायत सगळ्यांचे पास्ते
मस्त दिसतायत सगळ्यांचे पास्ते
पास्ता आवडल्याबद्दल
पास्ता आवडल्याबद्दल धन्यवाद.
आरती, पास्ता का मस्त होत नाही? काय, कसा करतेस ते सांगितलंस तर काय चुकतंय ते सांगता येईल.
सायो, चीज कुठलं वापरलय ?
सायो,
चीज कुठलं वापरलय ?
मॉझरेल्ला. मी पास्त्यात कायम
मॉझरेल्ला. मी पास्त्यात कायम हेच वापरते. पूर्वी पार्मेजान वापरलंय पण हल्ली नाही.
ओके , थॅक्स !
ओके , थॅक्स !
हे फ्रेश मो. दिसते आहे. कोल्ड
हे फ्रेश मो. दिसते आहे. कोल्ड पास्त्याला जास्त छान लागेल. फोटो छान आहे.
पास्त्यात सहसा parmesan, romano वापरतात. वरुन घालायला आणि सॉसमध्ये. चीज बेस्ड सॉस असेल तर रिकोटापण वापरतात कधी कधी. अल्फ्रेडो सॉसमध्येही parmesan वापरतात. मी कुकिंग क्रीम चीज घालते सोपं म्हणून.
मी पण पार्मेजान, रोमॅनो हेच
मी पण पार्मेजान, रोमॅनो हेच चीज घालते.
सायो, मॉझरेल्ला घालून गरम केलं तर त्याला तार नाही का येत? पास्ता तोंपासु दिसतोय.
Pages