"Everything you see I owe to spaghetti." - सोफिया लॉरेन
सोफियाकडं बघून यावर विश्वास बसत नाही पण हे कार्बवालं फूड बर्याच जणांचं आवडतं आहे. करायला सोपं , वन डिश मील म्हणून झटपट होणारं आणि किती वेगवेगळ्या पाककृती तयार होतील याला अंतच नाही. म्हणजे एन्डलेस पॉसिबिलीटीज बरं का.. मूळच्या इटालियन प्रकाराला मायबोलीकरांनी भटवून
भारतीय म्हणजे एकदम मराठमोळंच करुन टाकलं- हाच तो वरणातला पास्ता! मराठीकरण माबोकर करणार नाहीतर कोण?
पण अलिकडं माझी एक माबोकर मैत्रीण म्हणाली की तिला सारखे तेच तेच सॉसेज वापरुन कंटाळा आलाय. म्हणजे टोमॅटो बेस्ड, क्रीमी, पेस्टो इ. म्हणून जरा अजून वेगळे प्रकार सुचवावे म्हटलं. ते वाचून तुम्हाला काही अजून सुचले तर तुम्हीही लिहा.
पहिल्यांदा पास्ता शिजवायची बेसिक पद्धत बघू. पाकिटावर सूचना लिहिलेल्या असतात त्यानुसारच तो शिजवावा. पाणी उकळल्यावर थोडं मीठ (तेल घालायची गरज नाही) घालून पास्ता घालावा आणि तो हलवावा. अजिबात हलवला नाही तर चिकट गोळा होईल. शिजल्यावर चाळणीवर ओतून पाणी काढावं पण त्यापूर्वी त्यातलं थोडं पाणी बाजूला काढून घ्यावं असं "अमेरिकाज टेस्ट किचन"ची ब्रिजिट म्हणते. हे कशासाठी? तर जो सॉस तयार होत असतो त्याची कन्सिस्टसी हवी तशी करण्यासाठी ते वापरायचं. पास्त्यातले पाणी काढल्यावर तो थंड पाण्याने धुवायचा नाही. उलट तो तसाच सॉसमध्ये घालायचा त्यामुळे सॉस त्याला व्यवस्थित लागतो. पण पास्ता ड्रेन केल्यानंतर फार वेळ ठेवला जाता कामा नये. सॉस तयार ठेवून लगेच पास्ता त्यात घालावा. म्हणजे एका बाजूला पास्त्याचे पाणी उकळत ठेवले की बाजूला सॉस बनवायला सुरुवात करावी किंवा सॉस आधी बनवावा.

हल्ली restaurants मध्येही पास्त्याचे फ्युजन प्रकार मिळू लागलेत. मला या प्रकाराची धास्ती आहे, फोडणीच्या मॅगी नूड्ल्स खाल्ल्यापासून. फ्युजन हे कधी जमतं कधी दोन पाकसंस्कृतींचं त्रांगडं होतं. पण व्हॅपिआनोसारख्या restaurants मध्ये काही प्रकार ट्राय केल्यावर ती जरा कमी झाली.
आता सॉसचे काही प्रकार बघू.
सॉस बनवण्याची बेसिक पद्धत तीच आहे. पसरट भांड्यात मध्यम आचेवर ऑलिव्ह ऑइल घालून मग ड्राय स्पायसेस, भाज्या-मीट नीट परतून आणि मग सॉसचा बेस घालावा. मीठ चवीनुसार.
ऑरेंज सॉसमधला पास्ता-
ऑरेंज ज्यूस
ताज्या थाई मिरच्या बारीक चिरुन
लसूण बारीक चिरुन
बॉक चॉय
सोया सॉस
(रंगीत ढबू, चिकन इ. घालू शकता, तयार ऑरेंज सॉसही वापरु शकता)
नंतर वरुन parmesan चीज, ब्लॅक पेपर इ.

पास्ता थाय..
ग्रीन करी पेस्ट - चमचाभर
नारळाचे दूध (सॉसचा बेस)
मश्रूम्स
गाजर julienne
लाल ढबूचे तुकडे
कांद्याची कोवळी पात - वरुन सजावटीसाठी
चीज आणि पास्त्याची ताटातूट करवत नसेल तर वरुन चीज, मिरपूड घालू शकता. छान चव येते.


वरुन लेमन बेसिल किंवा पायनॅपन बेसिल किंवा थाई बेसिल-
हिरव्या वाटणातला पास्ता-
यात फार काय सांगायची गरज नाही पण कोथिंबीर, हिरवी मिरची, हवा तर कांदा यांच्या वाटणाचा बेस.
वरुन ग्रीक ओरेगॅनो.

व्हाईट वाईन, कॅरॅमलाइज्ड अनियन सॉस-
अगदी अंगासोबत असलेला सॉस, मश्रूम्स आणि कॅरॅमलाइज्ड अनियनची वेगळी चव येते पण सर्वांना आवडेलच असे नाही. यात रोस्टेड लसूण घातलेलाही छान लागतो.
गुड ओल्ड चिकन अल्फ्रेडो-
सॉससाठी क्रीम चीज किंवा कुकिंग क्रीम चीज वापरु शकता. त्यात बरेच फ्लेवर्स येतात.
डाव्या बाजूच्या लिस्टमधून फ्लेवर सिले़क्ट केल्यावर माहिती आणि रेसिपीजही येतील.
क्रश्ड रेड पेपर, चिकन ऑलिव्ह ऑइलमध्ये परतून मग क्रीम चीज थोडे दुधात मिसळून एकजीव करुन ओतायचे.

Whole wheat Fusili..

Rogatoni-

वरुन कोथिंबीर-
गुलाबी पास्ता-
टोमॅटो puree आणि क्रीम बेस असलेला हा सॉस. यात ड्राय इटालियन स्पायसेस आहेत आणि वरुन फ्रेश बेसिल.


टोमॅटो puree न वापरता आणि सॉस जास्त नसलेला पास्ताही छान लागतो. वरच्या कॅरॅमलाइज्ड अनियनवाल्या पास्त्यासारखाच हा फ्रेश टोमॅटो तुकडे, पालकाची पाने, ब्रोकोली इ घालून केलेला पास्ता. तुम्हाला हवे तसे इटालियन सीझनिंग घालू शकता. वरुन चीज.

फ्रेश टोमॅटोऐवजी सन-ड्राईड टोमॅटोजची पेस्ट करुन तो बेस म्हणून वापरलेला सॉस. ग्रिल्ड रंगीत बेल पेपर्स, pappadew आणि ऑलिव्ह आणि पर्पल बेसिल. हँडमेड (मी नव्हे, whole foods) Tagliatelle वापरुन.

मग आता "पास्ता प्रयोग" सुरु करा किंवा केलेले इथे लिहा. सगळ्याच दृष्टीने हे 'कम्फर्ट फूड' होऊन जाईल. मग तुम्हीही सोफियाप्रमाणेच म्हणू शकता.
ब्लेम इट ऑन पास्ता.
मी मोझरेल्ला घालून गरम करत
मी मोझरेल्ला घालून गरम करत नाही. पास्ता बोलमध्ये काढला की वरुन तुकडे करुन घालते. तार येते पण मला आणि माझ्या मुलाला असंच खायला आवडतं.
लोला, तुझे पांढरे शुभ्र पास्ता बोल्स्/प्लेट्स खूप आवडल्या. शेप मस्त आहेत.
मी देखिल क्रिम चिझ वापरते
मी देखिल क्रिम चिझ वापरते बर्याचवेळेस.
व्हाईट सॉस बनवताना साध्या दुधाऐवजी लाईट इव्हॅपोरेटेड मिल्क वापरते कधीकधी.
माझा फेवरेट पास्ता - गरम स्पगेटी/स्पायर्ल्स वर चारग्रिल्ड व्हेजिटेबल्स (रेड ऑनिअन, रेड/ग्रिन कॅप्सिकम, झुकिनी, वांग), विल्टेड स्पिनॅच, फ्रेश क्रश्ड ब्लॅक पेपर, फ्रेश पार्स्ली बारिक चिरून त्यावर भुरभुरायची आणि वरतुन एव्हीओओ... हेवन....
हवच तर शेव्ड पार्मेजान....मी तर ते ही नाही घालत बर्याच वेळेस....
नवर्याला आणि लेकीला क्रिम बेस्ड पास्ते जास्त आवडतात...
Great photo and pasta Sayo.
Great photo and pasta Sayo.
सायो, मी ऑऑ वर बारीक चिरलेला
सायो,
मी ऑऑ वर बारीक चिरलेला कांदा आणि लसुण परतून घेते. मग हव्या त्या भाज्या घालते. मग टोमॅटो घालून थोडे शिजवते. शेवटी कधी टोमॅटो प्युरे किंवा थोडा रेडीमेड पास्ता सॉस घालते. पास्ता घालून नंतर चवीकरता चिली फ्लेक्स / क्रश्ड ब्लॅक पेपर, सिझनिंग, मीठ घालते. वरून चीज अर्थातच.
एका मैत्रिणीकडे खाल्ला, आवडला म्हणुन तिच्याच कृतीने करते.
बरोबर आहे की रेसिपी मग तरीही
बरोबर आहे की रेसिपी मग तरीही का मस्त होत नाही म्हणतेस?
चव मला पहिजे तशी येत नाही,
चव मला पहिजे तशी येत नाही, इतकेच

आरती, भाज्या परतून वेगळ्या
आरती, भाज्या परतून वेगळ्या काढून घ्यायच्या मग टोमॅटो सॉस बनवायचा मग ते शेवटी सर्व एकत्र करायचे. पा वु. ची ट्रिक आहे.
धन्यवाद नताशा आणि स्वाती.
धन्यवाद नताशा आणि स्वाती. दोराबजीला मिळेल याची खात्री होती पण एवढ्या दूर जायला नको वाटतं. नळ स्टॉपला चेक करेन.
प्राचीस, माझे नाव स्वाती आहे.
प्राचीस, माझे नाव स्वाती आहे.
सॉरी, मोबाईलवरून प्रतिसाद
सॉरी, मोबाईलवरून प्रतिसाद देताना चुक झाली, पण आता सुधारली आहे.
धन्यवाद अमा, करुन बघते. वरचे
धन्यवाद अमा, करुन बघते. वरचे सगळेच प्रकार करुन बघते
आरती, पास्ता कसा शिजतो त्यावर
आरती, पास्ता कसा शिजतो त्यावर चव बरीच अवलंबून असते. तो नेमका (अल दान्ते) - कणी नाही पण गच्चही नाही असा शिजावा लागतो. जर सॉसमधे घालून थोडा परतणार असू तर किंचित कणी ठेवावीच कारण उरलेला सॉसमधे शिजतो.
लोलाने लिहिलंय त्याप्रमाणे पास्ता शिजवल्यावर लगेच वापरावा. ठेवून दिला की चव आणि टेक्स्चर 'मरतं'.
स्वाती, ओक्के
स्वाती, ओक्के
सह्ही!!! पास्ता माझा पण
सह्ही!!! पास्ता माझा पण आवडता. पण चीझ जास्त घातलेला आवडत नाही मला. भरपूर चीझवाला एकच प्रकार आवडतो तो म्हणजे मॅक अॅन्ड चीज. ते सुद्धा बेक्ड जास्त आवडतं.
लोला, फोटो नेहमीप्रमाणेच क्लास!!
बाकी सगळ्यांनी पण मस्त फोटो टाकलेत.
थाय ग्रीन करी + नारळाच्या
थाय ग्रीन करी + नारळाच्या दुधातला पास्ता आज केला. एकदम भारी लागतो हा प्रकार. लेकींनाही आवडला!
काल रात्री पास्ता केला.
काल रात्री पास्ता केला. टोमाटो प्लेन सॉस होता त्यात लाल तिखट, लसूण बारीक करून घातली, थोडे जिरे, ओवा, किंचित पाणी आणि चीज घालून सॉस केला आणि कोबी, चवळी शेंगा,कांदा,बटाटा,चीज घालून केला पास्ता, चांगला झाला होता.
अन्जू, शूर आहेस तू. अजून
अन्जू, शूर आहेस तू.
अजून कोणाचे काही प्रयोग?
हा स्वीट अॅण्ड सावर सॉसमधला. stir fry फ्रोजन व्हेजी मिक्स मिळते. त्या भाज्या परतून घेतल्या.
लोला अग कसली शूर, आयत्या
लोला अग कसली शूर, आयत्या टोमाटो सॉसचा केला आणि सोप्यात सोपा प्रयत्न, इथे सगळे किती छान छान प्रकार करतायेत. फोटो मस्त आलाय लोला.
वा वा! छान आहे .. फ्रोझन
वा वा! छान आहे .. फ्रोझन व्हेज्जी मिक्स् मधल्या भाज्या थकेल्या नाही वाटत का?
(लोलाजी, तुमचे पास्ते के वास्ते पूर्व आशिया शी जुळलेले दिसतात ..)
>>भाज्या थकेल्या नाही वाटत
>>भाज्या थकेल्या नाही वाटत का
असतील. पण सगळे थकेले असले की वापरायच्या. किंवा ताज्या नसतील तेव्हा.
लेमन झेस्ट पास्ता - ऑ ऑ, लसुण
लेमन झेस्ट पास्ता -
ऑ ऑ, लसुण , मिरेपुड, लिंबाचा रस, चिली फ्लेक्स / इटालिअन हर्ब्ज , चीझ.. सन-ड्राईड टोमॅटो नि सिमला मिरची होता म्हणुन मी अॅड केला ..
मस्त.. दिवसातल्या कोणत्याही
मस्त.. दिवसातल्या कोणत्याही वेळी पास्ता बघितला तरी तेवढाच खावासा वाटतो.
सायो + १०
सायो + १०
घरी केलेला स्पाईसी मरीनारा
घरी केलेला स्पाईसी मरीनारा वापरून केलेला पास्ता.
गेल्या २-३ आठवड्यात मिळून थाई
गेल्या २-३ आठवड्यात मिळून थाई आणि संत्र्याच्या रसातला असे पास्ते करुन बघितले. मज्जा आली! धन्यवाद लोला!
अरे वा, पास्ता हा माझाही खूप
अरे वा, पास्ता हा माझाही खूप आवडता प्रकार.. पण आत्तापर्यंत घरी बेसिक ( व्हाईट सॉसमधला) पास्ता करायचे, आता हे नवीन प्रकार नक्की ट्राय करून पाहीन.. फोटो खरच खूप सुंदर आणि तोंपासू आलेत.
ही माझी नवीन आवडलेली रेसिपी.
ही माझी नवीन आवडलेली रेसिपी. फूड चॅनलवरच्या मूळ रेसिपीत थोडे बदल केले आहेत.
https://www.foodnetwork.com/recipes/ina-garten/capellini-with-tomatoes-a...
काय मस्त दिसतय हे सायो
काय मस्त दिसतय हे सायो
थॅन्क्स टीना. मलाच हा फोटो
थॅन्क्स टीना. मलाच हा फोटो बघून पुन्हा पुन्हा खायचं क्रेव्हिंग होतंय. इनफॅक्ट हेडरमध्ये लोलाच्या पास्त्याचे फोटोही छळवादी आहेत.
मस्त दिसत आहे पास्ता, सायो.
मस्त दिसत आहे पास्ता, सायो.
गरम गरम पास्ता हे जवळ जवळ आमटी भातासारखं कम्फर्ट फूड होऊ घातलं आहे माझ्यासाठी.
Pages