पास्ते के वास्ते

Submitted by लोला on 21 July, 2013 - 13:19

"Everything you see I owe to spaghetti." - सोफिया लॉरेन

सोफियाकडं बघून यावर विश्वास बसत नाही पण हे कार्बवालं फूड बर्‍याच जणांचं आवडतं आहे. करायला सोपं , वन डिश मील म्हणून झटपट होणारं आणि किती वेगवेगळ्या पाककृती तयार होतील याला अंतच नाही. म्हणजे एन्डलेस पॉसिबिलीटीज बरं का.. मूळच्या इटालियन प्रकाराला मायबोलीकरांनी भटवून Wink भारतीय म्हणजे एकदम मराठमोळंच करुन टाकलं- हाच तो वरणातला पास्ता! मराठीकरण माबोकर करणार नाहीतर कोण?

पण अलिकडं माझी एक माबोकर मैत्रीण म्हणाली की तिला सारखे तेच तेच सॉसेज वापरुन कंटाळा आलाय. म्हणजे टोमॅटो बेस्ड, क्रीमी, पेस्टो इ. म्हणून जरा अजून वेगळे प्रकार सुचवावे म्हटलं. ते वाचून तुम्हाला काही अजून सुचले तर तुम्हीही लिहा.

पहिल्यांदा पास्ता शिजवायची बेसिक पद्धत बघू. पाकिटावर सूचना लिहिलेल्या असतात त्यानुसारच तो शिजवावा. पाणी उकळल्यावर थोडं मीठ (तेल घालायची गरज नाही) घालून पास्ता घालावा आणि तो हलवावा. अजिबात हलवला नाही तर चिकट गोळा होईल. शिजल्यावर चाळणीवर ओतून पाणी काढावं पण त्यापूर्वी त्यातलं थोडं पाणी बाजूला काढून घ्यावं असं "अमेरिकाज टेस्ट किचन"ची ब्रिजिट म्हणते. हे कशासाठी? तर जो सॉस तयार होत असतो त्याची कन्सिस्टसी हवी तशी करण्यासाठी ते वापरायचं. पास्त्यातले पाणी काढल्यावर तो थंड पाण्याने धुवायचा नाही. उलट तो तसाच सॉसमध्ये घालायचा त्यामुळे सॉस त्याला व्यवस्थित लागतो. पण पास्ता ड्रेन केल्यानंतर फार वेळ ठेवला जाता कामा नये. सॉस तयार ठेवून लगेच पास्ता त्यात घालावा. म्हणजे एका बाजूला पास्त्याचे पाणी उकळत ठेवले की बाजूला सॉस बनवायला सुरुवात करावी किंवा सॉस आधी बनवावा.

pasta2.jpg

हल्ली restaurants मध्येही पास्त्याचे फ्युजन प्रकार मिळू लागलेत. मला या प्रकाराची धास्ती आहे, फोडणीच्या मॅगी नूड्ल्स खाल्ल्यापासून. फ्युजन हे कधी जमतं कधी दोन पाकसंस्कृतींचं त्रांगडं होतं. पण व्हॅपिआनोसारख्या restaurants मध्ये काही प्रकार ट्राय केल्यावर ती जरा कमी झाली.

आता सॉसचे काही प्रकार बघू.

सॉस बनवण्याची बेसिक पद्धत तीच आहे. पसरट भांड्यात मध्यम आचेवर ऑलिव्ह ऑइल घालून मग ड्राय स्पायसेस, भाज्या-मीट नीट परतून आणि मग सॉसचा बेस घालावा. मीठ चवीनुसार.

ऑरेंज सॉसमधला पास्ता-
ऑरेंज ज्यूस
ताज्या थाई मिरच्या बारीक चिरुन
लसूण बारीक चिरुन
बॉक चॉय
सोया सॉस
(रंगीत ढबू, चिकन इ. घालू शकता, तयार ऑरेंज सॉसही वापरु शकता)
नंतर वरुन parmesan चीज, ब्लॅक पेपर इ.

picc1.jpgpichc1.jpgपास्ता थाय..
ग्रीन करी पेस्ट - चमचाभर
नारळाचे दूध (सॉसचा बेस)
मश्रूम्स
गाजर julienne
लाल ढबूचे तुकडे
कांद्याची कोवळी पात - वरुन सजावटीसाठी

चीज आणि पास्त्याची ताटातूट करवत नसेल तर वरुन चीज, मिरपूड घालू शकता. छान चव येते.

thaip.jpgpastatha.jpg

वरुन लेमन बेसिल किंवा पायनॅपन बेसिल किंवा थाई बेसिल-
basil.jpgहिरव्या वाटणातला पास्ता-
यात फार काय सांगायची गरज नाही पण कोथिंबीर, हिरवी मिरची, हवा तर कांदा यांच्या वाटणाचा बेस.
वरुन ग्रीक ओरेगॅनो.

green.jpggreeko.jpgव्हाईट वाईन, कॅरॅमलाइज्ड अनियन सॉस-
अगदी अंगासोबत असलेला सॉस, मश्रूम्स आणि कॅरॅमलाइज्ड अनियनची वेगळी चव येते पण सर्वांना आवडेलच असे नाही. यात रोस्टेड लसूण घातलेलाही छान लागतो.

caron.jpgगुड ओल्ड चिकन अल्फ्रेडो-
pasta1.jpg

सॉससाठी क्रीम चीज किंवा कुकिंग क्रीम चीज वापरु शकता. त्यात बरेच फ्लेवर्स येतात.
डाव्या बाजूच्या लिस्टमधून फ्लेवर सिले़क्ट केल्यावर माहिती आणि रेसिपीजही येतील.

क्रश्ड रेड पेपर, चिकन ऑलिव्ह ऑइलमध्ये परतून मग क्रीम चीज थोडे दुधात मिसळून एकजीव करुन ओतायचे.
pasta3.jpgpasta4.jpg

Whole wheat Fusili..

wwf.jpg

Rogatoni-

pasta5.jpg

वरुन कोथिंबीर-
pasta6.jpgगुलाबी पास्ता-
टोमॅटो puree आणि क्रीम बेस असलेला हा सॉस. यात ड्राय इटालियन स्पायसेस आहेत आणि वरुन फ्रेश बेसिल.

pinksauce.jpgpasta.jpg

टोमॅटो puree न वापरता आणि सॉस जास्त नसलेला पास्ताही छान लागतो. वरच्या कॅरॅमलाइज्ड अनियनवाल्या पास्त्यासारखाच हा फ्रेश टोमॅटो तुकडे, पालकाची पाने, ब्रोकोली इ घालून केलेला पास्ता. तुम्हाला हवे तसे इटालियन सीझनिंग घालू शकता. वरुन चीज.

arrabi1.jpg

फ्रेश टोमॅटोऐवजी सन-ड्राईड टोमॅटोजची पेस्ट करुन तो बेस म्हणून वापरलेला सॉस. ग्रिल्ड रंगीत बेल पेपर्स, pappadew आणि ऑलिव्ह आणि पर्पल बेसिल. हँडमेड (मी नव्हे, whole foods) Tagliatelle वापरुन.

tetragleli.jpg

मग आता "पास्ता प्रयोग" सुरु करा किंवा केलेले इथे लिहा. सगळ्याच दृष्टीने हे 'कम्फर्ट फूड' होऊन जाईल. मग तुम्हीही सोफियाप्रमाणेच म्हणू शकता. Wink ब्लेम इट ऑन पास्ता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो फार सुंदर आहेत. 'पालकाची पाबे'चं पाने कर.

वाइल्ड गार्लिक पास्ता. यात नूडल्सना चांगली चव असल्यामुळे फार काही घालावं लागत नाही.

wild-garlic-pasta-maayboli.jpg

मस्त! फोटो तर खतरा दिसताहेत. पास्ता-थाय ची कल्पना अतिशय मस्त आहे.

एक माझ्याकडून (फोटो नंतर कधीतरी)

लेमन्-बटर-बेसिल/केपर्स सॉस (पिकाटा सॉस)

बटर वर थोडं फ्लोअर परतून त्यात व्हेज्/नॉनव्हेज स्टॉक (नपेक्षा पास्ता उकडतानाचं पाणी) घालून शिजवणे, मग त्यात लेमनज्यूस आणि बेसिलची पानं अथवा केपर्स अथवा दोन्ही घालून जाडसर सॉस बनवणे. आणखी चवीकरता चिली फ्लेक्स, ड्रायबेसिल वगैरे घाला. शिजवलेला पास्ता (पेनी किंवा फुझिली बेस्ट) घालून, चांगलं एकत्र करून वाढणे. ही बेसिक कृती. ही एकदम यम्मी लागते. पुढे जाऊन यात चिकन / मशरूम्स / ब्रोकोली / रंगित सिमला मिर्च्या वगैरेही घालून मुलांना वाढत्या प्रमाणात वैताग देऊ शकता. विसु: यात ऑऑ घालू नये. चव बदलते पक्षी बिघडते.

आजच लेकीच्या डब्याकरता केला. थोडाच उरला त्याचा फोटू...

फोटूत दिसतोय त्यापेक्षा नक्कीच जास्त छान लागतो चवीला. Happy

प्रचंड टेम्प्टींग !!!!!!
लालु,
नेक्स्ट टाइम येइन तेंव्हा पास्ता स्पेशल मेनु हवा !

फोटो एकदम खतरा!

समरसाठी माझा चॉइस - पास्ता सॅलड
गाजर, काकडी, टोमॅटो, बेल पेपर, वाफवलेली ब्रोकोली, ऑलिव्ज, शिजवून घेतलेला रोटीनी पास्ता, परमेझान चीज आणि इटालियन सॅलड ड्रेसिंग एकत्र करुन फ्रीज मधे एक दीड तास ठेवायचे.

छान आहेत सॉसेस. भारतात अजून विविध प्रकार सहज मिळत / दिसत नाहीत. पण पास्ताबरोबर भरपूर भाज्या असाव्यात असे मला वाटते. त्यामूळे प्रथिने आणि चोथा यांचा तोल राखला जातो.

स्वाती२ +१०० मात्र वाफवलेली ब्रोकोली ऐवजी केपर्स ... आता राष्ट्रपती जेवायला आले तर घालेन ब्रोकोली पण तोवर केपर्स Wink Happy

http://allrecipes.com/recipe/pasta-with-yogurt-sauce/

हा माझ्या तमिळ मैत्रिणीचा दही-पास्ता. मी ह्याला कढी-पास्ता म्हणते आणि कढीपत्ता घालूनही करते. पण मुळात म्हणे हे टर्किश आहे.

मस्त फोटो एकदम. फ्युजन पास्ते ट्राय करेन की नाही माहित नाही. मला पास्त्यात कलर्ड पेपर्स, झुकिनी लागतेच लागते. बाकी पालक, ब्रॉकोली, कॉलीफ्लावर, गाजर वगैरे नको वाटतं.

लोला , कातिल फोटो! काही तर स्टायलिंग केल्यासारखे वाटतात. बर्‍याच नव्या नव्या कल्पना मिळाल्या. यथावकाश करुन बघण्यात येतील.

धन्यवाद.
मृ, बदललं. धन्यवाद.

मामी, लाजोचा धागा लक्षातच नव्हता. भाज्या जास्त घालायच्या म्हणजे वाढत्या प्रमाणात वैताग Lol
पास्ता सॅलड आवडलं.
कढी पास्त्याची कल्पना छान आहे. Happy करुन बघणार.

मस्तच! नारळाच्या दुधातला/क्रीममधला पास्ता करुन बघायचं फार दिवसांपासून मनात होतं. आता करुनच बघते!
हा आजचा व्हेजी पास्ता!

pasta.jpg

मस्त प्रकार. पास्ता आमच्याही खूप आवडीचा. भरपूर भाज्या घालून पास्ता बनवायला मला आवडतो. मुलींना रेड-व्हाईट ग्रेव्हीमधला जास्त आवडतो.

मी थाई ग्रीन पेस्ट (घरी) करुन नारळाच्या दुधातली (अर्थातच भरपूर भाज्या), हर्ब्ज घालून ग्रेव्ही करते दाटसर. पास्ता किंवा ब्राऊन/ रेड राईस दोन्हींकरता ही ग्रेव्ही कम सॉस छान लागतो. व्हीट पास्ता वापरते हल्ली मी. त्यातल्या त्यात जास्त हेल्दी असं वाटून.

ऑरेंज सॉसमधला, आणि व्हाईट वाईन- कॅरमलाइज्ड ओनियन सॉसमधला पास्ता करुर बघीन आता.

वर मृण्मयीने दिलेल्यातला गार्लिक फ्लेव्हर्ड पास्ताही इंटरेस्टींग दिसतो आहे खूप. मिळतो का पहाते.

फोटो सगळेच टेम्प्टींग. तुझी आहे का फूड फोटोग्राफी? ग्रेट काढलेत. फूड ब्लॉग काढ आता एक.

बरेच नविन प्रकार कळले पास्त्याचे.
आम्ही आपलं नेहेमीचेच टॉमॅटो बेस्ड सॉस, व्हाइट सॉस, मेयॉनि़जचं ड्रेसिंग घालून पास्ता सलाड इ. करायचो पूर्वी.

ह्ल्ली लेकाच्या पोटात पालक जावा म्हणून हिरवा पास्ता जास्त केला जातो. ऑऑ मध्ये बारिक चिरलेला लसूण परतून त्यात मश्रुमचे काप परतते. ऑरगॅनो किंवा घरात असल्यास पिझ्झाबरोबर येणारे सिझनिंग, मिर्‍याची पुड इ घालते. (कधी कधी कांदा उभा किंवा बारिक चिरून पण घालते. पण कांदा ऑप्शनल आहे)त्यात भरपुर पालक प्युरी घालून सॉस शिजवून घेते. पास्ता घालून मग वरून चीझ.
(सध्या दिराने इटलीहून आणलेले ४-५ व्हीट पास्त्याचे प्रकार आहेत. इथे दिलेले सगळे सॉस वापरुन एक एक प्रकार करायला हवा. )

फोटो खूपच सुरेख आलेत.

भारी !!!

अवनमध्ये ग्रिल केलेल्या भाज्या आणि स्मोक्ड चीज घालून केलेला पास्ता आमच्याकडे नेहेमी होणारा प्रकार. भाज्या अवनमध्ये टाकल्या की पास्ता उकळायला ठेवायचा. शिजलेल्या पास्त्याबरोबर भाज्या आणि चीज टॉस केलं की झालं. ही मूळ जिआडाची रेसिपी. मला नुसता टोमॅटो बेस्ड सॉस आवडत नसल्याने मी थोडं टोमॅटो सॉस आणि थोडं क्रीम चीज, सारखं करायला किंचित दूध असा बदल करते.

मी ऑऑ वर बारीक चिरलेला कांदा आणि गार्लीक स्प्रेड (साध/ टॉमेटो फ्लेवर ) घालून परतुन घेते आणी त्यावर हव्या त्या भाज्या आणि उकडलेला पास्ता, बेसिल, मिरपुड आणी हॅलेपेनो चीज छान मिक्स करुन घेते.
वरचे बरेच प्रकार छान वाटत आहेत. करुन बघेन.
फोटो मस्तच.

वा मस्त माहिती लोला. पास्ता म्हणजे एकदम उपयोगी पदार्थ, झटकन होणारा आणि काहिही घालून चालणारा. हे सगळे वरचे पास्ते प्रयत्न करण्याइतपत सोपे आहेत

Pages