गेल्याच आठवड्यात तुळजापूर ला गेलो होतो. लक्षावधी लोकांचे कुलदैवत असणारे हे गाव , लक्षावधी लोक दरवर्षी येथे भेट देतात पण गावाची अवस्था आगदी अंगावर काटा आणणारी आहे. जेथे नजर जाईल तिथे घाणीचे ढीग , ड्रेनेज मधून वाहणारे घाण पाणी आणि त्यातूनच वाट काढत चालणारे भाविक. स्थानिक लोकांना याची काही लाज वाटत नाही. घाणीतून डुकरे फिरावीत व रहावीत असे येथील लोक राहत असतात. येणाऱ्या प्रचंड उत्पन्नाचे काय करतात हे देव जाणे. पाण्याची सोय नाही , स्वछता नाही , जेवणासाठी चांगली सोडा पण बरी सुद्धा हॉटेल नाहीत, रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरे , पावलो पावली आडवे येणारे भिकारी आणि मागे लागणारे पुजार्यांचे लोंढे. अत्यंत आंगावर काटा येणारा अनुभव होता. देवळात सुद्धा स्वछता अजिबात नाही. सर्वत्र कचराच कचरा. पवित्र पणाची कुठे हि निशाणी नाही. भाविकांच्या काही नैसर्गिक गरजा असतात याचे हि कुणाला भान नाही. पिण्याचे पाणी , स्वछता गृह याची काही सोय नाही , जी आहे त्याची अवस्था नरका पेक्षा हि वाईट आहे. एवढ्या प्राचीन मंदिराचा या लोकांनी पार उकिरडा करून टाकला आहे. दक्षिणेतील मंदिराच्या पुढे येथील अवस्था फारच लाजिरवाणी आहे.आपण स्वतः हे बदलण्या साठी काहीच करू शकत नाही याची मात्र लाज वाटते.
तुळजापूर - महाराष्ट्रामधील देवळे अशी का ?
Submitted by kabhayk on 20 June, 2013 - 07:10
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुळात मराठी जनतेला 'कला'
मुळात मराठी जनतेला 'कला' कशाशी खातात याचा काही गंध आहे का.
तमाशा संस्कृती मध्ये वाढलेली आपली जनता मुळातच अस्वच्छ.
स्वतःच घर जिथे अस्वच्छ ठेवतात, ते सार्वजनिक ठिकाणी काय दिवे लावणार आहेत.
Kiranyake, उत्तम संदेश!
Kiranyake,
उत्तम संदेश! सुरुवातीचं वाक्य सगळं काही सांगून जातं.
>> थोड्या काळासाठी एका ठिकाणी एकत्र आलेल्या लोकांमधे (कोणत्याही कारणाने का असेना)
>> शिस्त कशी बाणवावी हा यक्षप्रश्न आहे. शिस्त ही आपल्या समाजाचा भाग कधीच नव्हती.
शिस्त जरी आपल्या समाजाचा भाग नसली तरी कुंभमेळा बर्यापैकी व्यवस्थितपणे पार पडतो. यामागचं कारण शोधायला हवं. आणि त्यानुसार शिस्तीची लागवड करायला हवी.
आ.न.,
-गा.पै.
मी या धाग्यावर फिरकायचे नाही
मी या धाग्यावर फिरकायचे नाही असे ठरविले होते.
राजसी, तुमची पोस्ट परफेक्ट मुद्याला स्पर्ष करते.
>>>बाजार मांडला तर किमान व्हॅल्यू फॉर मनी तर द्या?? नुसतंच ठग पेंढार्यांसारखं यात्रेकरूंना लुटून स्वतःच्या दातात सोने भरण्यासारखे करू नका हो! <<<< इब्लिस, (कधि नव्हे ते तुमच्या) या वाक्यास अनुमोदन.
किरण, तुमची पोस्ट चांगली आहे.
किरण, तुमची पोस्ट चांगली आहे. पटली. पटली याचं वाईटही वाटलं कारण एका अर्थी 'मग हे असंच चालायचं' असा त्याचा अर्थ होतो. असो.
राजसी, इब्लिस आणि शेंडेनक्षत्र यांच्या पोस्ट्समधे मी लिहिले असते ते मुद्दे आलेच आहेत. पण तुमची पोस्ट वाचून नवल वाटलं.
माझ्या लेखाला प्रतिसाद दिल्या
माझ्या लेखाला प्रतिसाद दिल्या बद्दल मी सर्वांचा आभारी आहे. मला तिथे गेल्यावर जे दिसले ते मी प्रामाणिक पणे सांगायचा प्रयत्न केला. मी तिथे पर्यटनाला जाणार नसून देव दर्शनाला जाणार आहे याची जाणीव होती. या अगोदर सुद्धा मी ४ वेळेला येथे आलो होतो पण या वेळी फारच दुरवस्था जाणवली म्हणून हा लेखन प्रपंच.
मान्य आहे कि ज्या वेळी छोट्या गावात जास्त भाविक येतात त्यावेळी व्यवस्थेवर जास्त ताण पडतो, पण जर व्यवस्था जर अस्तित्वात नसेल तर की करायचे? देवळासमोर मुख्य दरवाजासमोर ड्रेनेज तुंबून वाहत असेल तर की बोलणार? रस्त्यावर कचर्याचे ढिग साठलेले , कित्येक दिवस न उचलले त्याचे काय? कधी तरी दिवसातुन २ वेळा तरी साफसफाई करावी किमान ज्या रस्त्याने भाविक जा ये करतात त्याची तरी.
हॉटेल मध्ये ज्या वेळी चहा २० रु , डोसा ४० रु आसे दर घेता त्या वेळी किमान स्वछःता असावी असे वाटणे गैर आहे का? जेवणासाठी १२० रु घेत असल्यावर किमान खाण्या सारखे आसावे असे वाटणे गैर आहे का? ज्यावेळी एवढे पैसे घेता त्यावेळी आपण इतके घाणेरडे देतो याची लाज वाटू नये हे वाईट आहे. आपण प्रवासात किती वेळचे जेवण बरोबर घेउ शकतो याला सुद्धा मर्यादा आहे. केवळ उलट सुलट प्रतिक्रिया देणे सोपे असते पण जेव्हा स्वतः याचा अनुभव घेतो त्यावेळी समजते. पंचताराकित सुविधांची अपेक्षा नाही आहे किमान स्वच्तेची अपेक्षा आहे.
देवळात २/३ तास रांगेत उभे राहताना जर तिथे स्वचातागृहाची व्यवस्था असावी असे वाटले तर ते गैर आहे का? आपल्या घरातील जेष्ट व्यक्तींना तिथे गेल्यावर काय होईल याची कल्पना करून बघा. आणि या गावात कायमच बाहेरील लोक येतात हे माहित आहे तर नगरपालिकेला याचे कायम स्वरूपी नियोजन करायला नको का?
आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मला जे दिसले जे वाटले ते मी लिहिण्याचा प्रयत्न केला, ज्यांना हे असेच चालणार किंवा देवस्थानां ठिकाणी कोणी असल्या फालतू सुविधा मागू नयेत असे ज्यांना वाटते त्यांना हि धन्यवाद. प्रत्येकाची स्वछ्तेचि आणि राहण्याची आवड वेगळी असते हे मात्र मान्य.
पटली याचं वाईटही वाटलं कारण
पटली याचं वाईटही वाटलं कारण एका अर्थी 'मग हे असंच चालायचं' असा त्याचा अर्थ होतो.
'हे असेच चालायचे'!
बिघडले कुठे? वाईट वाटून घेऊ नका हो. माझे ऐका - महर्षी मोतीलाल यांचा उपदेश आठवा! "जिंदगी ख्वाब है!......" म्हणजे मग वाईट वाटणार नाही.
नाही जमले तर म्हणा - ते सगळे तिकडे दूर भारतात आहे. आपल्याला त्याच्याशी काय देणे घेणे?
नाहीतरी आपण इथे बसून भारताबद्दल लिहून काही उपयोग नाही.
किरण, तुमची पोस्ट पटली.
किरण, तुमची पोस्ट पटली. सरकारने कर जरी आकारला नाही तरी त्यांच्याकडच्या उपलब्ध सोर्सेसमधून त्यांना काही आवश्यक गोष्टी करवून घेणे शक्य आहे. उदाहरणार्थ पोलिस दल. एखादा पोलिस ऑफिसर खरी तळमळ असेल तर कायकाय करू शकतो हे माहित झाले डॉ. अनिल अवचटांच्या "पाटीलसाहेब" या लेखातून.( पुस्तक : आप्त )
पुलंनी "वंगचित्रे" या पुस्तकात "एइ रोकम चोलबे" म्हणजे " हे असंच चालायचं" हेच आपल्या देशाचं ब्रीद वाक्य का करत नाहीत असा प्रश्न विचारला होता. त्यावेळेला संदर्भ नक्षलचळवळीच्या नावाखाली चालणार्या विध्वंसाशी होता. आज तो त्याबरोबरच अनेक बाबतीत तो लागू पडतो.
प्रत्येक देवस्थानाने एक
प्रत्येक देवस्थानाने एक सिस्टीम बसवायची, देवस्थानचे नंबर पब्लिश करायचे(कालनिर्णय वगैरेच्या पानांवर) तिथे मेसेज अथवा मिसकॉल केल्यास मेसेजद्वारे काही ऑप्शन येतील, किती माणसे आहेत ,गाडी आहे का ,थांबायचा वेळ इत्यादी. त्याचा योग्य रिप्लाय पाठवला कि ठराविक दिवसात विनाशुक्ल येऊ शकतील अश्या तारखा द्यायच्या. उदा जुलै १३ ते जुलै १८ वगैरे जेणेकरुन गर्दीवर नियंत्रण आणि शिस्त ठेवता येईल. मोबाईल नंबर रेकॉर्ड होतील ,तिथे प्रवेशद्वाराशी आपला नंबर सांगितल्यास चेक करुन आत सोडतील.
बिनबुलाए, अंगठाछाप,बेशिस्त ,कचराफेके विदायट परमिशन येऊ द्यायचे, पण घसघशीत दंड लावायचा, माणशी पन्नास वगैरे.
बिबु लोक जास्त आले तरी ट्रस्टचे उत्पन्न वाढुन सुविधा पुरवायला फायदाच होणार आहे.
निदान मध्यमवर्गीय तरी या सेवेचा लाभ घ्यायच्या पात्रतेचे आहेत.
अँटीमॅटर भारी आयडिया....
अँटीमॅटर भारी आयडिया.... न.प./ म.न.पा. ला तुमच्यासारखे अधिकारी हवेत
इब्लिस, >> (खरंतर मा.
इब्लिस,
>> (खरंतर मा. गापैंच्या अध्यक्षतेखाली भारतातली तमाम देवळे चालवायला वेगळी व्यवस्था निर्माण
>> केली पाहिजे. खरंच दांडगा अभ्यास हो त्यांचा! पहा कशा थुप्फो लिंका डकवतात ते!)
खरंच चांगली सूचना आहे. त्याबद्दल आभार! देवळे चालवण्यास माझ्यापेक्षाही लायक माणसे आहेत. उदाहरण म्हणून शेगाव संस्थानाच्या व्यवस्थापनाचं नाव घेता येईल. सेवाभावी भक्तांच्या हाती देवस्थानांचा कारभार हवा.
आ.न.,
-गा.पै.
आज महाराज हवे
आज महाराज हवे होते.
अफझलखानापेक्षा हिंदु भक्तानीच मंदिराची अधिक विटंबना केली आहे, हे पाहून ते दु:खी झाले अस्ते.
तिथे स्वच्छता असो अगर नसो,
तिथे स्वच्छता असो अगर नसो, तुम्ही जायचे थांबवणार आहात का>>>
आम्ही थांबवले...... आमचं कुलदैवत... पण घाणी मुळे आम्ही तिकडे जाणं सोडलं.... ठाण्यात पाच पाखाडीला कौशल्या हॉस्पिटल जवळ तुळजाभवानी मंदिर आहे. तिकडेच जातो नाहीतर आमची गावदेवी आहेच..... शांत बसायला मिळते. प्रसन्न वाटतं..... बाकी नवरा कुठेच येत नाही फारसा... देवळात जायची फारशी परंपरा नाही आमच्या कडे......
वरील चर्चा वाचुन ओएमजी मधल्या सारखे म्हणावेसे वाटते " वी आर नॉट गॉड लव्हींग पीपल, वी आर गॉड फीअरींग पीपल". एकंदरच आपला " सीव्हीक सेंन्स" कोशंट नाहीतरी वीकच आहे..... कोल्हापुर नीट आहे म्हणजे ते अजुनही संस्थानच्या ट्रस्ट च्या मेंटेनन्स खाली आहे......
मोकिमी, >> ..... आमचं
मोकिमी,
>> ..... आमचं कुलदैवत... पण घाणी मुळे आम्ही तिकडे जाणं सोडलं....
नेमकं हेच हवंय निधर्मी आणि अधर्मी सरकारला. भक्त लोक कंटाळून येईनासे व्हायला हवेत. आज तुळजापुरात हे झालं. उद्या पाचपाखाडीला होऊ शकतं.
सरकारने पंढरपूरचं विठ्ठलमंदिर ताब्यात घेऊन काय दिवे लावले ते पहा इथं. असला भ्रष्टाचार केल्यावर बजबजपुरी माजेल नाहीतर काय!
आ.न.,
-गा.पै.
ओ पैलवान. सुधरा हो. इथे
ओ पैलवान.
सुधरा हो.
इथे भारतीय हिंदू लोक त्यांच्या देवळांमधे माजलेल्या भ्रष्टाचाराबद्दल अन ओंगळपणाबद्दल बोलताहेत. तुम्ही ते तुमचं हिंदुत्ववादी तुणतुणं नका चालू करू परत.
सरकारच्या ताब्यात नसलेल्या देवळांत अन मठांत काय अभद्र धंदे चालतात ते बोलायला लावू नका.
इब्लिस, १. >> सुधरा
इब्लिस,
१.
>> सुधरा हो.
बिघडलो कधी होतो?
२.
>> सरकारच्या ताब्यात नसलेल्या देवळांत अन मठांत काय अभद्र धंदे चालतात ते बोलायला लावू नका.
बोला की बिनधास्त! कोणी अडवलंय? फक्त पुरावे देऊन बोला.
३.
>> तुम्ही ते तुमचं हिंदुत्ववादी तुणतुणं नका चालू करू परत.
का बरं? काय अडचण आहे? भ्रष्टाचार थांबायला नको?
आ.न.,
-गा.पै.
भ्रष्टाचार? भाजपच्या लोकांनी
भ्रष्टाचार? भाजपच्या लोकांनी भ्रष्टाचार केला नाही वा करीत नाहीत असे तुमचे म्हणणे आहे का?
देवळात व आजूबाजूला घाण करणे, रस्त्यावर भिकारी बसवणे, अव्वाच्या सव्वा भावात भाविकांना अन्न पाणी विकणे हे व अशी काम "सरकार" करते असे तुमचे म्हणणे आहे का?
अजूनही वाव आहे सुधरायला. बघा प्रयत्न करून.
कोणी अडवलंय? फक्त पुरावे देऊन
कोणी अडवलंय? फक्त पुरावे देऊन बोला.
<<
सनातन प्रभातच्या लिंका म्हणजे पुरावे??
अर्रर्रर्रर्र!
पैलवान, तोंडघशी पडणे म्हणजे काय हो?
नेमकं हेच हवंय निधर्मी आणि
नेमकं हेच हवंय निधर्मी आणि अधर्मी सरकारला. भक्त लोक कंटाळून येईनासे व्हायला हवेत. >>
कै च्या कै!! अहो लोक देवळात गेली नाही तरी धर्म सोडून देत नाहीयेत. प्रश्न भ्रष्टाचाराचा आणि अनास्थेचा आहे. विनाकारण भलते फाटे फोडू नका.
डेलिया, >> कै च्या कै!! अहो
डेलिया,
>> कै च्या कै!! अहो लोक देवळात गेली नाही तरी धर्म सोडून देत नाहीयेत. प्रश्न भ्रष्टाचाराचा आणि
>> अनास्थेचा आहे.
नेमकी हिंदूंचीच देवळे का ताब्यात घेतली आहेत? मुस्लिम वा ख्रिश्चनांची का नाहीत? या भेदभावामुळे सरकारला केवळ हिंदू धर्म नष्ट व्हायला हवाय असा सुस्पष्ट अर्थ निघत नाही का?
देवळे हा हिंदू धर्माचे महत्त्वाचे अंग आहे. शिवाय भक्तांनी अर्पण केलेले पैसे आणि वस्तू धर्मकार्यासाठीच वापरल्या जाव्यात. त्याऐवजी व्यवस्थापन भ्रष्टाचार करतंय आणि सरकार त्याला पायबंद घालण्यात पार अयशस्वी ठरलंय. ज्या कुठल्या उदात्त हेतूंसाठी शासनाने मंदिरांचं व्यवस्थापन ताब्यात घेतलं, ते साध्य होताहेत का? नाही ना? मग सरकारच्या ताब्यातून व्यवस्थापन काढून घ्यायला हवं.
आ.न.,
-गा.पै.
इब्लिस, १. >> भाजपच्या
इब्लिस,
१.
>> भाजपच्या लोकांनी भ्रष्टाचार केला नाही वा करीत नाहीत असे तुमचे म्हणणे आहे का?
भाजप हे काय आहे? मी त्यांना ओळखत नाही. मी केवळ भ्रष्टाचारी आणि स्वच्छ अशा दोनच प्रकारच्या लोकांना ओळखतो.
२.
>> देवळात व आजूबाजूला घाण करणे, रस्त्यावर भिकारी बसवणे, अव्वाच्या सव्वा भावात भाविकांना
>> अन्न पाणी विकणे हे व अशी काम "सरकार" करते असे तुमचे म्हणणे आहे का?
देवळाबाहेर जे काही चाललंय ते देवळात चालणार्या कुकृत्यांची पडछाया आहे.
३.
>> सनातन प्रभातच्या लिंका म्हणजे पुरावे??
दुव्यातील लेख नीट वाचला असतात तर तुम्हाला कळलं असतं की हिंदु विधिज्ञ परिषदेने माहितीचा अधिकार वापरून सरकारी भ्रष्टाचार उघड केला आहे. याकरिता त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. तीस हिंदी, मराठी आणि इंग्रजीतील कित्येक वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच अनेक वृत्तवाहिन्यांनी या परिषदेचे वृत्तचित्रणही केले आहे. सनातन प्रभात वृत्तपत्राने केवळ बातमी प्रसारित केली आहे. आजून कसले पुरावे पाहिजेत?
४.
>> अजूनही वाव आहे सुधरायला. बघा प्रयत्न करून.
एकदा सांगितलं ना, की बिघडलो कधीच नव्हतो म्हणून!
असो.
बरं ते सरकारच्या ताब्यात नसलेल्या देवळांत अन मठांत काय अभद्र धंदे चालतात ते सांगणार होतात ना, त्याचं काय झालं?
आ.न.,
-गा.पै.
अहो लोक देवळात गेली नाही तरी
अहो लोक देवळात गेली नाही तरी धर्म सोडून देत नाहीयेत. प्रश्न भ्रष्टाचाराचा आणि अनास्थेचा आहे. >>> +१
नेमकं हेच हवंय निधर्मी आणि
नेमकं हेच हवंय निधर्मी आणि अधर्मी सरकारला. भक्त लोक कंटाळून येईनासे व्हायला हवेत. आज तुळजापुरात हे झालं. उद्या पाचपाखाडीला होऊ शकतं.
सरकारने पंढरपूरचं विठ्ठलमंदिर ताब्यात घेऊन काय दिवे लावले ते पहा इथं. असला भ्रष्टाचार केल्यावर बजबजपुरी माजेल नाहीतर काय!
नेमकी हिंदूंचीच देवळे का ताब्यात घेतली आहेत? मुस्लिम वा ख्रिश्चनांची का नाहीत? या भेदभावामुळे सरकारला केवळ हिंदू धर्म नष्ट व्हायला हवाय असा सुस्पष्ट अर्थ निघत नाही का?
देवळे हा हिंदू धर्माचे महत्त्वाचे अंग आहे. शिवाय भक्तांनी अर्पण केलेले पैसे आणि वस्तू धर्मकार्यासाठीच वापरल्या जाव्यात. त्याऐवजी व्यवस्थापन भ्रष्टाचार करतंय आणि सरकार त्याला पायबंद घालण्यात पार अयशस्वी ठरलंय. ज्या कुठल्या उदात्त हेतूंसाठी शासनाने मंदिरांचं व्यवस्थापन ताब्यात घेतलं, ते साध्य होताहेत का? नाही ना? मग सरकारच्या ताब्यातून व्यवस्थापन काढून घ्यायला हवं.>>> अनुमोदन
'नेमकी चीड' सुस्प्ष्टपणे मांडल्याबद्दल धन्यवाद. झोपलेल्याला जागं करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याना नाही. त्यांची पण चूक नाही .."कॉन्व्हेंट सुशिक्षितांकडून" अजून काय अपेक्षा करणार ? आणि "नॉन-कॉन्व्हेंट सुशिक्षितांनी" सहिष्णुतेचे झापड ओढले आहे
शिक्षण क्षेत्रांत ज्याप्रकारे घूसखोरी झालेली आहे, अल्पसंख्यकांची, किती सोप आहे impressionable age मध्ये विशिष्ट्प्रकारे विचार करायची सवय लावणे. लोकांना कळत सुद्धा नाही what hit them and where?
परत एकदा अधोरेखित करू इच्छिते, भारतांत असलेली हिंदू प्रजा आणि उपलब्ध देवळे ह्यांचे गुणोत्तर व्यस्त नाही का इतर धर्मीय आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांपेक्षा ...? शिवाय त्याच्या construction, upkeep, maintenance, converting people for money इत्यादींचा खर्च परदेशांतून येतो, एक डॉलर = नेहमी ५० रुपयांपेक्षा जास्तच सरासरी दर राहिला आहे.
अल्पसंख्यांकाच्या नावाखाली स्वस्तांत जमिनी, अनुदान सगळेच मिळते, आपण शाळा काढायला जाव तर कळते ..... म्हणून प्रायवेट शाळा महागड्या आहेत पण तिथे कोण मुलांना पाठवेल पदरचे लाखभर रुपये दरसाल खर्च करून जेव्हा अर्ध्या किमतीत तेच शिक्षण foreign-funded, government-aided schools द्यायला तयार आहेत तेव्हा.
हाही धागा ध्वस्त धागेमध्ये
हाही धागा ध्वस्त धागेमध्ये जाणार असं दिसतय....
आवरा ... आणि मुद्देसुद लिहा की हो. आम्ही पामर वाचतोय.
पंढरपुरबाबत हा लेख http://dainiksanatanprabhat.blogspot.co.uk/2013/07/blog-post_4981.html
वाचला. पुढे काय? त्यावर न्यायालयात याचिका दाखल केली आहे का? आजकाल तसही सरकारपेक्षा न्यायालयच काम करित आहेत. त्यांच्याकडुनच आता अपेक्षा आहे, बाकी आनंदीआनंद आहे.
rajasee, प्रकरण व्यापक आहे
rajasee,
प्रकरण व्यापक आहे याची जाणीव ठेवल्याबद्दल धन्यवाद!
आ.न.,
-गा.पै.
<परत एकदा अधोरेखित करू
<परत एकदा अधोरेखित करू इच्छिते, भारतांत असलेली हिंदू प्रजा आणि उपलब्ध देवळे ह्यांचे गुणोत्तर व्यस्त नाही का इतर धर्मीय आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांपेक्षा ...>
आँ?
<शिवाय भक्तांनी अर्पण केलेले पैसे आणि वस्तू धर्मकार्यासाठीच वापरल्या जाव्यात<> म्हणजे नक्की कशाला? देवळाला सोन्याचे कळस वगैरे बांधायला? जे जन्मभर लाकडाच्या एका फळीवर झोपायचे, फाटकी वस्त्रे ल्यायचे त्या साईबाबांसाठी सोन्याचे सिंहासन, मुकुट इ. साठी?
आवरा ... आणि मुद्देसुद लिहा
आवरा ... आणि मुद्देसुद लिहा की हो>>>
१. फक्त देवळांना target करण्याआधी, (मूलभूत व इतर कारणांनी) जाणे थांबवण्याआधी क्षणभर विचार करा 'हे असे का?'
मी आजवर बजबजपुरी माजलेलं,
मी आजवर बजबजपुरी माजलेलं, अस्वच्छ चर्च पाह्यलं नाही.
मशिदीत जायची गरज आणि इच्छा कधी झाली नाही त्यामुळे तिथले माहित नाही. ज्यांना गरज आणि इच्छा असते मशिदीत जायची ते बघून घेतील.
देवळातल्या अस्वच्छतेबद्दल बोलायचं नाही, हिंदुधर्मातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल बोलायचं नाही हे सांगणारे तुम्ही कोण? तुम्हाला मक्ता दिलाय का हिंदु धर्माचा?
आम्हीही हिंदुच आहोत आणि आमचा धर्म, देवस्थाने स्वच्छ असावीत असा आमचा आग्रह आहे. याने आमचे हिंदु असणे मोजताय का काय? हे मोजमाप कुठे मिळते?
आँ? >> आमच्या पूर्वजांच्या
आँ? >> आमच्या पूर्वजांच्या गावांत, जेथे प्रत्येक गावकरी एक्मेकांना ओळखतो सर्वच हिंदू आहेत, तिथे सुद्धा चर्च बांधलय ..... एक गांव, एक देऊळ, समजा शंभर गावकरी (हिंदू) .... एक एक गांव, एक चर्च , समजा शंभर गावकरी (अजूनतरी एकही धर्मांतरीत नाही) का स्वच्छता नसेल त्या चर्चमध्ये?
मी फक्त देवळांबद्दल (जिथे दगडाचा देव आहे तीच) बोलते आहे, विभूतीपूजेबद्दल नाही.
तुमच्या गावातलेच चर्च मी
तुमच्या गावातलेच चर्च मी पाह्यलेय आणि फक्त तेवढ्यावरूनच म्हणतेय याची तुम्हाला खात्री आहे ना नक्की?
उत्तम.
त्या तुमच्या पूर्वजांच्या
त्या तुमच्या पूर्वजांच्या गावावरून जनरलायझेशन करता आलं असतं तर फार सोपं होतं. सेन्ससमध्ये प्रार्थनास्थळांचीही संख्या मोजली जाते का हे पाहायला हवं.
एक गाव, एक देऊळ : असं गाव पाहण्यात नाही. एक गाव एक सार्वजनिक गणेशोत्सव, एक गाव एक सार्वजनिक होळी हेही होत नाही.
दुसरा मुद्दा : गावात १०० हिंदू असतील, तर त्यातल्या किती हिंदूंना देवळात येऊच दिले जात नाही? त्यांना देवळाची गरज नसते नाही का?
Pages