गेल्याच आठवड्यात तुळजापूर ला गेलो होतो. लक्षावधी लोकांचे कुलदैवत असणारे हे गाव , लक्षावधी लोक दरवर्षी येथे भेट देतात पण गावाची अवस्था आगदी अंगावर काटा आणणारी आहे. जेथे नजर जाईल तिथे घाणीचे ढीग , ड्रेनेज मधून वाहणारे घाण पाणी आणि त्यातूनच वाट काढत चालणारे भाविक. स्थानिक लोकांना याची काही लाज वाटत नाही. घाणीतून डुकरे फिरावीत व रहावीत असे येथील लोक राहत असतात. येणाऱ्या प्रचंड उत्पन्नाचे काय करतात हे देव जाणे. पाण्याची सोय नाही , स्वछता नाही , जेवणासाठी चांगली सोडा पण बरी सुद्धा हॉटेल नाहीत, रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरे , पावलो पावली आडवे येणारे भिकारी आणि मागे लागणारे पुजार्यांचे लोंढे. अत्यंत आंगावर काटा येणारा अनुभव होता. देवळात सुद्धा स्वछता अजिबात नाही. सर्वत्र कचराच कचरा. पवित्र पणाची कुठे हि निशाणी नाही. भाविकांच्या काही नैसर्गिक गरजा असतात याचे हि कुणाला भान नाही. पिण्याचे पाणी , स्वछता गृह याची काही सोय नाही , जी आहे त्याची अवस्था नरका पेक्षा हि वाईट आहे. एवढ्या प्राचीन मंदिराचा या लोकांनी पार उकिरडा करून टाकला आहे. दक्षिणेतील मंदिराच्या पुढे येथील अवस्था फारच लाजिरवाणी आहे.आपण स्वतः हे बदलण्या साठी काहीच करू शकत नाही याची मात्र लाज वाटते.
तुळजापूर - महाराष्ट्रामधील देवळे अशी का ?
Submitted by kabhayk on 20 June, 2013 - 07:10
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला वाटत॑ चर्चेत सहभागी
मला वाटत॑ चर्चेत सहभागी झालेल्या॑नी एकदा तरी शेगावला श्री गजाननाच्या दर्शनाला आवर्जुन जाव॑च !
फारशी वर्दळ नसलेलं, शांत,
फारशी वर्दळ नसलेलं, शांत, एकांडं देऊळ बरे.
>>> +१. आमचं कर्हाटेश्वर, लक्ष्मीकेशव, सोमेश्वर, कनकादित्य ही देवळं मला मनापासून आवडतात. दोन तीन तास तरी सलग मी त्या देवळांमधे आरामात बसून राहते.
प्रचंड गर्दी असूनदेखील कोल्हापूरची अंबाबाई मात्र खूप स्वच्छ आहे.
कोकणाइतकीच मंगळूरकडची देवस्थानं स्वच्छ आणि सुंदर. कोकणापेक्षा इकडे गर्दी मात्र जास्त. पण तरी प्रत्येक देवळात दुपारी जेवण आणि प्रसाद मिळणारच. प्रसाद देतानादेखील पुजारी आपले नाव गोत्र विचारून संकल्प सोडून मग प्रसाद हातात देणार. पैश्यापाठी लागणारे पुजारीदेखील तिकडे कधी आढळले नाहीत. दक्षिणा दिलीत तर उत्तम नाही दिलीत तरी उत्तम. मुळात कोकण आणि मंगळूर हे भाग असे आहेत की इथली गावंच स्वच्छ असतात. कोकणात अगदी मागासलेल्या भागात देखील घणेरडा उकीरडा, गटारं, सांडपाण्याचे नाले वगैरे मला कधी आढळले नाहीत.
तमिळनाडूमधे अगदी छोट्या खेड्यातल्या देवळांमधेच गेलेली आहे, फार मोठ्या देवळांतून गेलेली नाही, तरी इथेसुद्धा स्वच्छता बर्यापैकी.
तुळजापूर आमच्या माहेरचे कुलदैवत असल्याने (आणि बार्शी आजोळ असल्याने) बरर्याचदा गेले आहे, पण "तीर्थक्षेत्र" असं कधी वाटलं नाही, देवाचा बाजारच वाटत राहिलाय कायम. असाच अनुभव ओरिसामधल्या देवळांचा. जगन्नाथाच्या देवळात दुपारच्या वेळेला अन्नाची प्रचंड नासाडी चालू असते. मात्र, लगेच एक दोन तासांत पूर्ण देऊळ स्वच्छ केले जाते हे मात्र खरे. तिकडे पंडे लोक पण खूप त्रास देतात.
जितकं मोठं/प्रसिद्ध मंदिर
जितकं मोठं/प्रसिद्ध मंदिर तेवढं बाजारीकरण जास्त आणि स्वच्छता कमी याची खुणगाठ मनाशी बांधुन गेलं की अपेक्षाभंग पदरी पडत नाही, त्रास व्हायचा तो होतोच. शक्य असेल तर पावसाळ्यात कुठल्याच देवस्थानाची भेट देउ नये. इतर कचरा तर सोडाच साधं प्रसादाची फुलं पण कुजुन त्याचा त्रास होतो. दुसरं म्हणजे त्या देवतेचा वार/ स्पेशल उत्सव/जत्रा/तिथी चुकवुन ऑड दिवशी दर्शनाला जावं.मोठ्या देवस्थानाच्या बाबतीत तर शनिवार्-रविवार तर टाळावाच टाळावा.
बाकी स्वच्छतेच्या बाबतीत अष्टविनायकातली जवळपास सगळीच देवळं पण चांगली आहेत.
काहीही झाले सोई सुविधा दिल्या
काहीही झाले सोई सुविधा दिल्या नाही तरी तुम्ही येणारच हे त्यांना माहित आहे म्हणूनच फ़क़्त पैसे काढणे हा येथील धंदा आहे.
अगदी बरोबर. नि काही लोकांनी जाणे बंद केले तरी त्याच्या शंभरपट लोक येतच रहातील, याची खात्री आहे. हा धंदा आहे. श्रद्धा, भक्ति, देव वगैरे चा अर्थ न कळणारे लोक जोपर्यंत आहेत तो पर्यंत हा धंदा चालूच रहाणार.
हिंदू देवालये.. बोलती बंद.
श्रद्धा, भक्ति, देव वगैरे चा
श्रद्धा, भक्ति, देव वगैरे चा अर्थ न कळणारे लोक जोपर्यंत आहेत तो पर्यंत हा धंदा चालूच रहाणार.
@ झक्की- १००% भिडलेल विधान.
मी कट्टर अस्तिक आहे पण देवळांची वारी, पूजा-अर्चा, उपास्-तापास, नवस, होम्-हवन वगैरे अजिबात म्हणजे अजिबात करत नाही. रादर पळूनच जाते. देव देवळात नाही हे पूर्णपणे उमगल आहे. आणि पूजा-अर्चा, उपास्-तापास, नवस, होम्-हवन असल्या गोष्टींनी तो मुळीच इंप्रेस होत नाही हे सुद्धा पक्क कळून चुकल आहे.
महाराष्ट्रातच काय बर्याच
महाराष्ट्रातच काय बर्याच देवस्थानांची हीच अवस्था आहे. खुप वर्षांपूर्वी मी जगन्नाथपुरी, भुवनेश्वर या ठिकाणी हेच पाहिलं होतं. दक्षीणेत पूर्वी नव्हतं पण आता असच होऊ लागलय.
फारशी वर्दळ नसलेलं, शांत, एकांडं देऊळ बरे.>>>
>>> +१. आमचं कर्हाटेश्वर, लक्ष्मीकेशव, सोमेश्वर, कनकादित्य ही देवळं मला मनापासून आवडतात. दोन तीन तास तरी सलग मी त्या देवळांमधे आरामात बसून राहते>>>
अगदी मलाही असच ठिकाण आवडतं.
देउळ असे असावे कि जिथे
देउळ असे असावे कि जिथे नास्तिक माणुस देखील मंत्रमुग्ध होइल. ज्या ठिकाणी स्वच्छता, मुलभूत सुविधा, निसर्गसौंदर्य आहे अशी देवळे असावीत. मला तर असे वाटते कि चपला / बूट घालून पण देवळात जाता आले पाहिजे. देव ही आपल्या मनातील संकल्पना असल्याने त्याला हवे तेव्हा ठेवता येते नको तेव्हा घालवता येते. कशाला ती गर्दी गोंगाट अस्वच्छता गैरसोय पत्करुन तथाकथीत प्रसिद्ध देवळांत जा?
लोकहो, तुळजापूर मंदिराचे
लोकहो,
तुळजापूर मंदिराचे व्यवस्थापन सरकारी आहे. अधिक सांगणे नलगे. पंढरपुराचे व्यवस्थापन अंशात: सरकारी आहे. तिथेही बजबजपुरी मजली आहे.
शेगावचे संस्थान भक्तांच्या ताब्यात आहे. शिरडी आणि मुंबईचे सिद्धिविनायक यांवर सरकारी नियंत्रण आहे. ही दोन्ही भ्रष्टाचाराबद्दल कुप्रसिद्ध आहेत.
मंदिरे चालवायला कोण लायक आहे हे कळायला अडचण नसावी.
आ.न.,
-गा.पै.
पूरक वाचन :
१. http://www.dainikekmat.com/detailnews?id=50239&cat=Mainpage&start=2191
२. http://navshakti.co.in/editorial/5758/
http://tuljabhavanimandir.org
http://tuljabhavanimandir.org/english/feedback.html
प्रकाश घाटपांडे, >> मला तर
प्रकाश घाटपांडे,
>> मला तर असे वाटते कि चपला / बूट घालून पण देवळात जाता आले पाहिजे.
अशाने देऊळ खराब नाही का होणार?
आ.न.,
-गा.पै.
<<अशाने देऊळ खराब नाही का
<<अशाने देऊळ खराब नाही का होणार?>>
मग ते चर्च वाले कसे काय जातात?
देवाला गाभाऱ्यात ठेवला पाहिजे
देवाला गाभाऱ्यात ठेवला पाहिजे का? गाभार्याच्या बाहेर ठेवल्यावर त्याच देवत्व निघून जाईल का.?
मला तर वाटत देवाला गाभार्यातून बाहेर काढा, जर मोकळा श्वास घेवू द्या, 'त्याला पण आणि भक्तांना सुद्धा'.
गाभार्यात घुसण्यासाठी जिकडे तिकडे धक्का बुक्की चालू असते.
आणि मी त्याला / तिला ढकलून देव दर्शन घेतलं म्हणून केव्हढ समाधान.
'ईथे लिहिणारे सगळे
'ईथे लिहिणारे सगळे लालभाई/कम्युनिस्ट्/नक्षली/स्युडो-सेक्युलर आहेत' अशी बोलणारी 'लिंबुटिंबु' मंडळी जुठे राहिली बरं??
शेगांव मंदिरात छान स्वच्छता
शेगांव मंदिरात छान स्वच्छता आहे.... फक्त गांवाच्या स्वच्छ्ते कडे लक्ष द्यायय्ला हवे...
मला कर्णेश्वरच देऊळ फार आवडलं
मला कर्णेश्वरच देऊळ फार आवडलं होतं. अजीबात गर्दी नाही शांत. संगमेश्वरला आहे ते कोकणात.
मला तर वाटतं आपल्याला
मला तर वाटतं आपल्याला आवडलेल्या शांत, बिनगर्दीच्या देवस्थानांची माहिती देऊच नये नेटवर.. सगळे शांतता आणि बिनगर्दीचे स्थान म्हणून तिथे गर्दी करायला लागले तर वाटच लागेल.

(हे सेमीसिरीयसच घ्या..)
सगळे शांतता आणि बिनगर्दीचे
सगळे शांतता आणि बिनगर्दीचे स्थान म्हणून तिथे गर्दी करायला लागले तर वाटच लागेल.
गर्दी झाली तरी तिथे अद्याप उत्तम स्वच्छता राखली आहे तरीपण आधीचं शांत देऊळ वेगळंच भासायचं. म्हणून आता पुळ्यापेक्षा गणेशगुळ्याला जावंसं वाटतं आम्हाला.
>> हो. आम्ही अजूनही पुळ्याला गेलो की आधीचं कौलारू देऊळ किती मस्त होतं हे एकदातरी म्हणतोच.
प्रकाश घाटपांडे, >> मग ते
प्रकाश घाटपांडे,
>> मग ते चर्च वाले कसे काय जातात?
देवळात जाणार्या भाविकाला अध्यात्मिक लाभ व्हावा अशी अपेक्षा आहे. याचसाठी देवदर्शनाआधी हातपाय धुण्याची व चूळ भरण्याची पद्धत आहे. चर्चवाल्यांना तशी काही आवश्यकता वाटत नसावी.
आ.न.,
-गा.पै.
आपण आपल्या घरात बाहेरच्या
आपण आपल्या घरात बाहेरच्या चपला घालून वावरता का? स्वयंपाकघरात, बेडरूममधे वै. तसे असल्यास कृपया देवळात सुद्धा चप्पल घालूनच जावे, संकोच नसावा.
सहसा चर्च आणि त्यांची दफनभूमी एकत्रच असते ... देवळांच्या बाबतीत तसे नसते.
कोणीही कुरकुर्या मंडळींना "माझ्या दर्शनाला या हो" असे गूळ-खोबरे देऊन आमंत्रण केलेले नाही ... इथे गळा काढून काहिहि उपयोग आहे का .... किंवा जगजाहीर करून कि मी कसा/शी आस्तिक्/नास्तिक ते? कसे ह्यापुढे तीर्थक्षेत्राच्या नावाने कान धरले ते ? अरे! ते गाव किती मोठे? त्याची मूळ लोकसंख्या काय? येणारे भाविक प्रचंड संख्येने येणार, पण माणशी आयुष्यात्/वर्षात एकदा आणि त्यांच्या रहिवासाला नाव ठेवून जाणार? ... प्रवासाला निघताना अडाण्यासारखे निघून कस चालेल? .... आधीच माहिती काढायला नको निवासाची, भोजनाची इ. काय व्यवस्था आहे ते? त्यानुसार प्लानिंग करावे. मोठ्या शहरातल्या सोयी-सुविध्या आडगावात कश्या मिळतील? मी भारतात जन्मलेली आणि वाढलेली असल्याने प्रवास म्हंटला कि बर्याच गोष्टी गृहीत धरल्या जातात.
मला व्यक्तीशः आतापर्यंत सर्वच देवस्थान-दर्शनाला काहिही त्रास झालेला नाही. आपण आनंद/समाधान मिळवायचा ठरवला तरच आनंद/समाधान मिळणार, ते काही कितीही पैसे आहेत् म्हणून आणि टाकलेत म्हणून मिळणार नाहिये.
राजसी, तुमच्या पोस्टमधे काहीच
राजसी, तुमच्या पोस्टमधे काहीच पटण्यासारखे नाहीये.
देवदर्शनाला जायचे असेल तर अस्वच्छता, बाजारूगिरी हे झेललेच पाहिजे अन्यथा तुम्ही कुरकुरे असा अप्रोच दिसतो...
कोणीही कुरकुर्या मंडळींना
कोणीही कुरकुर्या मंडळींना "माझ्या दर्शनाला या हो" असे गूळ-खोबरे देऊन आमंत्रण केलेले नाही>>>>> +१
धार्मिक ठिकाणेच कशाला, आपल्या सर्वच शहरात सर्वच infrastrcuture ची फजिती उडालेली आहे आणी नेहमीच असते. त्यामुळे धार्मिक ठिकाणी काहि वेगळे असेल अशी अपेक्षा कशी काय ठेवता ?
पावसाळ्यात पाउसामुळे रस्ते तुंबुन होणारी गैरसोय, उन्याळ्यात पाणी नसल्यामुळे, वीज नसल्यामुळे होणारी गैरसोय, कोलमडलेली वहातुक व्यवस्था, अस्वच्छता, उघडी गटारे हे कोणत्याहि शहरात गेले तरी तेच प्रश्न आहेत - प्रमाणात कमी जास्तीचा फक्त फरक आहे.
प्रवासाला निघताना
प्रवासाला निघताना अडाण्यासारखे निघून कस चालेल? .... आधीच माहिती काढायला नको निवासाची, भोजनाची इ. काय व्यवस्था आहे ते? त्यानुसार प्लानिंग करावे. मोठ्या शहरातल्या सोयी-सुविध्या आडगावात कश्या मिळतील? मी भारतात जन्मलेली आणि वाढलेली असल्याने प्रवास म्हंटला कि बर्याच गोष्टी गृहीत धरल्या जातात.
<<
अग्दी अग्दी!
अश्या आडाणी अन हेकेखोर हौश्या यात्रेकरूंमुळेच खरी वाट लागलेली आहे. कैच्याकैच एक्स्पेक्टेशन्स यांची. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे अन बरी हॉट्ले हवीत म्हणे. या साठी देवस्थानी का जाता? यासाठी का देवस्थानी जाता? लंडन प्यारिसला जाऊन जिवाची मुंबई करा म्हणावं.
खस्ता खाल्ल्याशिवाय देव भेटत नाही हे सांगायला हवे कुणीतारी यांना.
भिकारी आडवे आल्याबद्दल कंठशोष करतात हे! बापरे! देव नेहेमी तशाच रूपात समोर येत असतो हे कुणीच शिकवलं नाही काय यांना?(संदर्भः भिकार्याच्या वेषात जखमेवर तेल मागणारा देव. मा.शनिदेव यांची कहाणी.) तुम्ही त्याला हाकलून दिलात, नाके मुरडलीत तर तुम्हाला तो भेटला नाही यात काय नवल?
पुजारी फसवतात?? अहो ते तर तुम्हाला देव भेटावा म्हणून प्रयत्न करीत असतात. ऐपत नसेल तर थांबा की लायनीत. कुणी नाही म्हटलंय? तुमचा वेळ वाचावा म्हणून वेगळ्या दारातून नेले, जास्त मोठी पूजा, अभिषेक केला तर जास्त दक्षिणा नको द्यायला?
अन शिवाय हे सगळं त्या देवळांच्या सरकारी म्यानेजमेंटमुळे आहे. त्या लोकल लोकांची काऽही चूक नाही. दक्षिणेच्या पेटीतले पैसे डायरेक्ट सरकारच्या खिशात जात असतात! (खरंतर मा. गापैंच्या अध्यक्षतेखाली भारतातली तमाम देवळे चालवायला वेगळी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. खरंच दांडगा अभ्यास हो त्यांचा! पहा कशा थुप्फो लिंका डकवतात ते!)
शिर्डी, तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूर, कित्ती कित्ती आडगावांची नांवे सांगू म्हणता? अहो, वर्षानुवर्षे हजारो लाखो असे हेकेखोर येतात, म्हणून तर तिथे सुविधा मिळत नाहीत. उलट मूलभूत जगणे मुष्किल होते लोकलाईट्सचे. सुविधा कुठून निर्माण करणार बिच्चारे? त्या बिचार्या लोकलाईट्सना नाईलाजाने या असल्या आडाणी हौशी यात्रेकरूंसाठी पानबिडीगुटख्याची दुकाने अन दारूचे गुत्ते चालवावे लागतात. देवाच्या दारी असले अलाऊडच नसल्याने या हलकट यात्रेकरूंना सेवा देण्यासाठी ते सगळे तिप्पट किमतीत विकावे लागते, म्हणून सवय लागते, अन अन्न पाणी देखिल दुप्पट किमतीत विकतात ते बिचारे. शेवटि बझिनेस सेन्स म्हणून काही असतो की नाही? केदारनाथलाच बघा! २५० रुपयांत १ पराठा अन २०० रुपयांत १ बाटली पाणी झालंय. भारतात जन्मलो अन मोठे झालो की हे 'अॅडजस्ट' केलेच पाहिजे. हेच्च शिकायला तर त्या देवाने या आडाणी यात्रेकरूंना बुद्धी दिली ना यात्रा करायची!
भारतात जन्माला येऊन पहा म्हणावं. काय काय गृहित धरून जगावं लागतं ते समजेल! उग्गं यांचे थिल्लर चाळे. म्हणे स्वच्छता हवी अन पाणी हवे प्रगती हवी अन फसवणूक नको. उद्या उठून मोकळी हवा देखिल मागतील हे!
"आमच्यात हे अस्संच असतं. अन अस्संच राहील! आमच्या देवळांबद्दल अजिब्बात ब्र काढायचा नाही!! कारण इथे देवळात थडगी किंवा समाध्या नसतात."
जिथं श्रद्धा आहे तिथं प्रश्न
जिथं श्रद्धा आहे तिथं प्रश्न पडत नाहीत. जिथं मानसं जमा होतात तिथ प्रॉब्लेम येनारच. ते पाहणं सरकारचं काम आहे. सरकार काहि करत नाही तर सरकारला जाब विचारायला पाहिजे. तीर्थशेत्रांची यात काहि चुक नाहि. मक्का मदिना, अजमेरचा दर्गा अशा सगळ्याच धार्मिक ठिकाणी गैरसोय होते. त्याबद्दल तिथले लोक तक्रार करतात का ?
सोयीसुविधा पाहिजेत म्हणून
सोयीसुविधा पाहिजेत म्हणून अडून बसलेला वारकरी कधी पाहीलाय का ?
<<सोयीसुविधा पाहिजेत म्हणून
<<सोयीसुविधा पाहिजेत म्हणून अडून बसलेला वारकरी कधी पा।इलाय का >>
नाहि ना? पण त्याला सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत कि नको? त्याला त्या मिळाल्या तर काय वाईट वाटणार आहे का त्याला? खर तर वारीतले खरे भाविक किती ? हा प्रश्न आहे. बाकी इब्लिस च्या मताशी सहमत.
सार्वजनिक स्वच्छातागृहे मधला
सार्वजनिक स्वच्छातागृहे मधला "सार्वजनिक" म्हणजे व्यक्तिगत नाही. सार्वजनिक मग तुळजापूर काय किंवा कल्याण रेल्वे स्टेशन काय किवा भिवंडी बस स्थानक काय सर्वत्र परिस्थिती तीच असणार. ज्यांना त्यातून मार्ग काढायचा आहे त्यांना मार्ग मिळतात, नुस्तेच नाकाने कांदे सोलायचे असतील तर नरकयातनांना पर्याय नाही. कृपया ह्या सार्वजनिक ची तुलना INOX/PVR च्या ठिकाणांशी करू नका, those are for priviledged few. भारताचे per capita income अजुन 5700-5800 आहे आणि 25% पेक्षा जास्त जनता दारिद्र्यरेषेखालिल जीवन जगते आहे.
समजा, so-called सुयोग्य पिण्याचे पाणी त्यांनी जरी उपलब्ध करून दिले तरि ते ही out station प्रवाश्याला पचायला पण हवे ना? "बारा गावचे पाणी प्याय्लेले" अस शब्दप्रयोग उगिचचच आलाय का? सबब, आपण आपल kinley/aquafina/घरचे प्यायचे पाणी असा पुरेसा पाणी साठा बरोबर बाळगायला नको का? हाच युक्तीवाद जेवणाच्या सोयीसाठी वापरता येईल. तीर्थक्षेत्र किन्वा प्रवास आपापली शिदोरी, फळे, काकडी, गाजर सारखे सलाद item जवळ बाळगायला काहिच हरकत नसावी.
भिकार्यांसाठी मला तुळजापूरला जायची गरज नाही ते मला माझ्याच गावात पाच पावलावरच्या trafic signal शी भेटतात.
आम्ही business करणार , हवा तसा आणि मिळेल तेवढा पैसा कमावणार पण तसाच business, तोच पैसा पुजार्यांनी कमावला, देवळाबाहेरया बाहेरच्या दुकानदारांनी कमावला तर मात्र आमच्या पोटांत दुखणार हा कोणता न्याय. आम्ही हवे तसे श्रीमंत होणार, स्वतःच्या भारी गाड्या उडवत तीर्थक्षेत्री जाणार, पुजार्यांनी मात्र आम्ही स्वेच्छेनी दिलेल्या दक्षिणेवर जगावे. आम्हाला मिळाले तर फुकटातच नाही तर शे-दहा रुपयात पापमुक्ती, झाल्यास तर पुण्य हवे देवस्थानांनी, स्थानिकांनी मात्र आम्ही आयुष्यांत एकदा येणार म्हणून पायघडया घालून तयार पाहिजे.
सध्याच्या उत्तरेकडील परिस्थीतीबद्दल ह्या बीबी वर बोलायला नको. महाराष्ट्राल्या देवळात निदान देव भेटतो तरी, शक्य असल्यास गाभार्यात नाहितर पाच फुटांवरून मूर्तीचे दर्शन होते. दक्षिणेत देव कुठेतरी दूर अंधार्या कोनडयात दिवे लावून बसवलेला असतो, आपण ५०-१०० फुटांवरून देव शोधून नमस्कार करायचा.
असा गळेकाढू, चिखलफेक करणार्या बीबी पेक्षा देवस्थान दर्शन : पुर्वतयारी, Do's and Don'ts असा बीबी जास्त योग्य झाला नसता का?
राजसी, तुमचा आक्षेप काय आहे
राजसी,
तुमचा आक्षेप काय आहे कळत नाही.
सर्वप्रथम तुमची काही विधाने अतर्क्य वाटतात. स्वच्छ पाणी उपलब्ध करुन दिले तरी ते लोकांना पचेलच असे नाही असे आपण म्हणता ते कशाच्या आधारावर? स्वच्छ पाणी ह्याची व्याख्या काटेकोर आहे. जंतूंचे, घातक रसायनांचे प्रमाण अमुक इतक्याहून कमी असलेच पाहिजे असा त्या व्याख्येत उल्लेख आहे.
पुजार्याने, दुकानदाराने वा अन्य स्थानिक व्यापार्यांनी पैसा मिळवला म्हणून लेखकाच्या पोटात दुखते असा आपण निष्कर्ष कसा काढला बरे? लेखकाचे म्हणणे इतकेच आहे की ज्या यात्रेकरूंच्या भक्तीभावामुळे त्या देवस्थानाच्या लोकांना इतका पैसा मिळतो त्यांच्या मूलभूत सोयीकरता (आयनॉक्स, मॉल, मल्टिप्लेक्स छाप चैन नव्हे) काहीतरी केले गेले पाहिजे. आणि त्यात चूक काय?
प्रत्येक प्रवाशाने काकडी, गाजर, फळे वगैरे ताज्या भाज्या बाळगाव्यात अशी अपेक्षा करता. कुणी मुंबई, नागपूर अशा लांबच्या शहरातून तुळजापूरला भर उन्हाळ्यात जात असेल तर अशा भाज्या ताज्या राहाव्यात म्हणून एक फ्रीझही घेऊन हिंडायचा का? आपली अपेक्षा अत्यंत अवाजवी आहे. लेखकाची खूप चांगले नव्हे तर एखादे बरे रेस्टॉरंट उपलब्ध असावे ही अपेक्षा आपल्याला का सलते हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे.
भिकार्यांकरता तुळजापूरला जायची गरज नाही वगैरे वगैरे. हे विधानही अचाट आणि अतर्क्य आहे. लेखक भिकार्यांना भेटायला तुळजापूरला गेला होता असा आपण समज करुन घेतला आहे का?
मूळ मुद्दा हा असा आहे की देवदर्शनाला जेव्हा एखादा भक्त जातो तेव्हा मूलभूत सुविधा, स्वच्छता, भिकार्यांच्या उपद्रवाचा अभाव ह्या गोष्टी त्या स्थळी असाव्यत अशी अपेक्षा आहे. कल्याण आणि भिवंडी ह्या जागांची ह्या तीर्थक्षेत्रांशी तुलना का करायची? अशी तुलना साफ अप्रस्तुत आहे.
पिण्याजोगे पाणी, स्वच्छता, डुकरे हिंडत नसणे, भिकारी भीक मागत नसणे, वापरता येतील अशी स्वच्छतागृहे इतक्या मूलभूत सुविधा आपल्याला आय नॉक्स आणि पीव्हीआर ह्यांच्या जातकुळीच्या, प्रिव्हिलेज्ड फ्यू लोकांनाच उपलब्ध असणार्या आहेत असे वाटते ही मानसिकता अत्यंत दुर्दैवी आहे. कदाचित ही मनोवृती असल्यामुळेच अशी बजबजपुरी बहुतेक तीर्थक्षेत्री बोकाळली असावी.
व्यक्तीशः मला वाटते इतकी असह्य घाण सहन करून देवदर्शनाला जायची गरज नाही. अशा तीर्थक्षेत्रांना आपल्यापुरते रिटायर करून टाकावे हेच ठीक. देव असलाच तर तो अशा उकिरड्याजवळ भेटणे शक्य नाही.
थोड्या काळासाठी एका ठिकाणी
थोड्या काळासाठी एका ठिकाणी एकत्र आलेल्या लोकांमधे (कोणत्याही कारणाने का असेना) शिस्त कशी बाणवावी हा यक्षप्रश्न आहे. शिस्त ही आपल्या समाजाचा भाग कधीच नव्हती. त्याला कारणे अनेक आहेत. आधी पोटोबा नंतर विठोबा हे एक मुख्य कारण आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी कसंही राहणं, तडजोड करणं असं आयुष्य नशिबी असलेला समाजाचा मोठा हिस्सा कुणाच्या खिजगणतीत नाही. पण ज्यांचं उत्तम चाललं आहे, दारात बीएमडब्ल्यू सारख्या कार्स आहेत. आठ दहा ट्रॅक्टर्स, मुबलक पशुधन, गावातला भला मोठा वाडा असा दबदबा ज्यांचा आहे त्यांच्याकडे ही घरात शौचालय नसावं याचं समर्थन कसं करता येईल ?
एकंदरीतच स्वच्छतेविषयीच्या सवयी बदलल्या नाहीत तर सार्वजनिक स्वच्छता या विषयी न बोललेलं बरं. त्यातून पर्यटनावर कर लावता येतो, पण धार्मिक पर्यटनावर कर लावल्यास राजकारण होण्याची मोठीच शक्यता असल्याने सरकार कधीच काही करणार नाही. त्यातून परंपरेने चालत आलेल्या यात्रांच्या बाबतीत यात्रेककरूंकडून कर वसूल करणं आणि सुविधा पुरवणं हे अशक्य आहे. सरकार निधी पुरवतं, ब-यापैकी सोयी पुरवतं पण एकाच वेळी पंढरपूरसारख्या ठिकाणी दहा ते पंधरा लाख वारकरी एकत्र आल्यानंतर कुठल्याही यंत्रणेचा फज्जा उडाल्याशिवाय राहणार नाही. यात्रेकरूंची याबाबतीत काहीच तक्रार नसते हे सर्वांच्याच पथ्यावर पडतं. पण पंढरपुरातल्या स्थानिकांचं काय याच विचार होत नाही. माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे स्थानिक लोक कुटुंबियांना नातेवाईकांकडे पाठवून देतात आणि घरात पथारी पसरण्यासाठी वारक-यांकडून घसघशीत भाडं वसूल करतात. अगदी पायरीवर झोपण्याचेही पैसे मिळतात. दोन दिवस कमाईचे असतात. त्यामुळं होणा-या घाणीबाबत कुणाची तक्रार नसते.
हे कुठल्याही एका धर्माबाबत नसून जिथं जिथं लोक एकत्र येतात अशा भारतातल्या कुठल्याही ठिकाणाबद्दल आहे. उत्तराखंडमधे बद्रीनाथ-माना-व्यासगुहा-भीमपूल- स्वर्गाच्या शिड्या असा ट्रेक केला होता. त्या वेळी येताना जे काही पाहीलं त्याबाबत न बोललेलंच बरं. आताच्या प्रलयाची मूळं त्यात आहेत. त्याबद्दल एकदा ऑर्कूटवर लिहीलं होतं, ज्यावर अनेक वाद झाले होते. आता दुर्घटना घडूनही काही फरक पडणार नाही यात शंका नाही. आज आपण यात्रेकरुंचा विचार करतो, पण एरव्ही उत्तराखडातल्या स्थानिकांसाठी सरकार अस्तित्वात आहे किंवा नाही अशीच परिस्थिती असते. पर्यटकांमुळे दोन पैसे मिळतात इतकंच... कठीण आहे.
किरण, चांगली पोस्ट.
किरण, चांगली पोस्ट.
Pages