गेल्याच आठवड्यात तुळजापूर ला गेलो होतो. लक्षावधी लोकांचे कुलदैवत असणारे हे गाव , लक्षावधी लोक दरवर्षी येथे भेट देतात पण गावाची अवस्था आगदी अंगावर काटा आणणारी आहे. जेथे नजर जाईल तिथे घाणीचे ढीग , ड्रेनेज मधून वाहणारे घाण पाणी आणि त्यातूनच वाट काढत चालणारे भाविक. स्थानिक लोकांना याची काही लाज वाटत नाही. घाणीतून डुकरे फिरावीत व रहावीत असे येथील लोक राहत असतात. येणाऱ्या प्रचंड उत्पन्नाचे काय करतात हे देव जाणे. पाण्याची सोय नाही , स्वछता नाही , जेवणासाठी चांगली सोडा पण बरी सुद्धा हॉटेल नाहीत, रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरे , पावलो पावली आडवे येणारे भिकारी आणि मागे लागणारे पुजार्यांचे लोंढे. अत्यंत आंगावर काटा येणारा अनुभव होता. देवळात सुद्धा स्वछता अजिबात नाही. सर्वत्र कचराच कचरा. पवित्र पणाची कुठे हि निशाणी नाही. भाविकांच्या काही नैसर्गिक गरजा असतात याचे हि कुणाला भान नाही. पिण्याचे पाणी , स्वछता गृह याची काही सोय नाही , जी आहे त्याची अवस्था नरका पेक्षा हि वाईट आहे. एवढ्या प्राचीन मंदिराचा या लोकांनी पार उकिरडा करून टाकला आहे. दक्षिणेतील मंदिराच्या पुढे येथील अवस्था फारच लाजिरवाणी आहे.आपण स्वतः हे बदलण्या साठी काहीच करू शकत नाही याची मात्र लाज वाटते.
तुळजापूर - महाराष्ट्रामधील देवळे अशी का ?
Submitted by kabhayk on 20 June, 2013 - 07:10
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>> तिथे स्वच्छता असो अगर नसो,
>> तिथे स्वच्छता असो अगर नसो, तुम्ही जायचे थांबवणार आहात का?
आम्ही थांबवलं.
>>तिथे स्वच्छता असो अगर नसो,
>>तिथे स्वच्छता असो अगर नसो, तुम्ही जायचे थांबवणार आहात का? >> आम्ही आधीही गेलेलो नाही आणि आता मुलांना इथून तिथे नेऊन, अशा बकाल ठिकाणी भेट देऊन आजारपणांना आमंत्रणं देण्याइतकं वर्थ नक्कीच वाटत नाही.
(माझ्यामते मनात भाव असेल तर घरच्या देवाला मनापासून केलेला नमस्कारही पुरतो. त्यामुळे सिद्धीविनायकाची लाईन असो किंवा आणखी कुठचं तिर्थक्षेत्र असो, वाकडी वाट करुन जायची गरजच वाटत नाही)
भारतीय लोकांना "भावनांचा
भारतीय लोकांना "भावनांचा बाजार " मांडायची सवयच आहे.
कुठल्याही देवळात अशीच अवस्था अस्ते( वरती म्हटल्याप्रमाणे), हे कसे कळले तर , इतर भकत गण आहेत ना त्यांच्या कडून. देव दर्शन करून परतले की आजारी.... वगैरे..
सुदैवाने, घरी कोणालाच आवड नसल्याने देवळं प्रकरण केली नाहीत.
.
इथे दिवसभर कुटाळक्या करायच्या मग देव देव करत फिरायचे, काय अर्थय?
उत्तराखंडात काय हाल झाले प्रवाशांचे शेवटी? पावसा पाण्यात लहान मुलांना घेवून काय देव पावणार?
( कोणाच्या भावना दुखल्यास काही करु शकत नाही, देव ,पूजापाठ, असले प्रकार नकोसेच आहेत पहिल्यापासून).
भारतीय लोकांना "भावनांचा
भारतीय लोकांना "भावनांचा बाजार " मांडायची सवयच आहे.
<<
यार बाजार करा ना! नाही कुणी म्हटलंय? साऊथला स्वच्छ देवळं आहेत ना? पुण्याशेजारी हायवेवर भोर/कोल्हापुर्/सोलापुर कडेजाताना मधेच एक प्रति तिरुपती आहे. स्वच्छता आहे की नाही? अन तिथे कमी कमर्शिअल आहे का?
बाजार मांडला तर किमान व्हॅल्यू फॉर मनी तर द्या?? नुसतंच ठग पेंढार्यांसारखं यात्रेकरूंना लुटून स्वतःच्या दातात सोने भरण्यासारखे करू नका हो!
सॉउथला कुठली स्वच्छ देवळ
सॉउथला कुठली स्वच्छ देवळ पाहिलीत? तिरूपती सारखे अपवाद वगळता ,आतील भागातील पण देवळात कुबट वासच असतो....
कलकत्याला जा, बजबज्पूरी आहे.
म्हणून म्हटले जे काही एकलेय व इतरांचे फोटो पाहून असे प्रकार असतातच. फमहाराष्टाश्ट्रात नाही असे नाही.
झंपी, मी नास्तिक आहे. कमीत
झंपी,
मी नास्तिक आहे.
कमीत कमी देवळे पहातो. तिथेही बाहेर बसून चपला सांभाळतो. दुरून पाहिले ते बोलतो आहे. चुकले तर माफ करा.
तुळजापूर हे निव्वळ
तुळजापूर हे निव्वळ प्रातिनिधीक ऊदाहरण आहे.. थोड्या फार फरकाने व काही अपवाद वगळता बर्याचश्या तत्सम तीर्थक्षेत्री सगळा असाच कारभार आहे.
शिस्त, स्वच्छता, सार्वजनिक जाणिव, आरोग्य, सुव्यवस्था, सुरक्षा, यासारख्या ईतर सर्व मुलभूत गोष्टींना, दैनंदीन आयुष्यात, देव्हार्यातील देवापेक्षा जास्त मह्त्व देण्याची बुध्दी व शिक्षण दिले जात नाही, व जोपर्यंत तशी मानसिक व सामाजिक संस्कृती रुजत नाही तोपर्यंत हे सर्व आहे तसेच राहणार आहे. बद्री केदार ची सद्य परिस्थिती यामागे निसर्गप्रकोप बरोबर वरील सर्व नमूद केलेल्या गोष्टींबद्दलची असलेली भयंकर समाजिक व राजकीय ऊदासीनता हेही कारणीभूत आहेच. चार दिवस ठळक मथळे, आकडेवारी येईल, मग पुन्हा सर्व जैसे थे... असो. विषय व व्याप्ती फारच मोठे आहे..
चार दिवस स्वच्छता अभियाने वगैरे राबवून काहीच होत नाही... सर्वच तीर्थक्षेत्रांचे कमरेचे सोडून डोक्याला बांधले गेलेले महात्म्य व अवडंबर संपूर्णपणे बंद करायला हवे असे माझे स्पष्ट मत आहे. एकीकडे देव आपल्या आत आहे, दुसर्या माणसात आहे असली संतप्रवचने गायची, ऐकायची आणि दुसरीकडे मात्र सर्व व्यवहार व विवेक गहाण ठेवून कुठल्याश्या दगडातल्या देवासाठी सगळा धार्मिक, सामाजिक, राजकीय व नागरीक अनाचार व अनागोंदी माजवायची या असल्या दुभंगलेल्या संस्कृतीत आपण आजही जगतो आहोत.
आताशा केदारनाथानेही यापूढे हात टेकले आहेत हे ऊघड आहे!
"बये दार ऊघड... पेक्षा बये या सर्वांचे डोळे ऊघड.." असे म्हणावेसे वाटते.
[नेहेमीप्रमाणे ही गाडी देखिल भारत वि. अमेरिका असल्या मार्गावर जाण्या आधीच थांबतो.]
most of our social issues and pains are mainly caused by the failure of the governance and disrespect of law and order.
अलिकडे सं. अमिरातीत ४ वर्षे काढून स्वताच्या डोळ्याने सर्व पाहिल्यावर असा विचार येत रहातो की कुठल्याही देशाचा विकास व पर्यायाने त्याच्या समाजाची सर्वांगीण उन्नती ही त्या देशाच्या नेतृत्वाच्या कुशलतेवर, देश भावनेवर, व दूरदृष्टिवर अवलंबून असते हेच सत्य आहे. मग तिथे लोकशाही, राजेशाही, हुकूमशाही काही का असेना... मुळात करोडोंच्या समुदायाला एकत्रीत 'हाकण्यासाठी' या सर्वाचा एकत्रीत वापर करावाच लागतो. फरक नेतृत्वात असतो. आज आपल्याकडे 'नेता' हा शब्द एखाद्या शिवी सारखा झालेला आहे.. बाकी पुढे बोलणेच संपले.
या विषयावर माबो अनेक वेळा दुथडी भरून वाहिलेली आहे.. सद्य अतीवृष्टी परिस्थिती पाहता अधिक काही लिहायची गरज दिसत नाही. नेहेमीप्रमाणे आपापल्या छत्र्या ऊघडून व रेनकोट घालून चला.. मग भेटूच याही पावसाळ्यावर बोलायला.
अहो मी सुधा नास्तिक आहे , मला
अहो मी सुधा नास्तिक आहे , मला कसला राग येतोय..
मी सुद्धा ग्रूप मधल्या आस्तिकांमुळे चपला सांभाळा, बॅगा सांभाळायची कामं केलीत... खास देव दर्शन करायला म्हणून हे देवळं नाही पाहिलीत.
हॉटेल वाले स्वतः च्यात
हॉटेल वाले स्वतः च्यात सुधारणा कधी करणार जर लोक येण्याचे प्रमाण कमी झाले तर , पण येथे स्थानिक लोक फारच कमी हॉटेल मध्ये जाणारे , ९९% प्रमाण बाहेरील लोकांचे , एकदा आलेले लोक परत कमीत कमी १ वर्ष तरी गावात परत येणार नाहीत त्या मुळे काहीही विका, कसेही विका आणि कितीही किमतीला विका , कोण विचारणार ? साधा डोसा ४० रु , चहा २० रु , पाण्याची बाटली २० रु, आपल्याकडे फुकट दिले तरी कोणी खाणार नाही अशी क्वालिटी. कुलाचार म्हणून जायचे असेल तर काहींनी सुचवल्या प्रमाणे सोलापुरात मुक्काम करावा , पाहते लवकर उठून ६ वाजता तुळजापूर ला पोचावे ,७ वाजता अभिषेक सुरु होतात , तो करून दुपारी परत . सोबत कोरडा खाउ आणि पाणी जवळ ठेवावे हा सगळ्यात चांगला मार्ग.
श्या! देवपूजेत शॉर्टकट, किंवा
श्या!
देवपूजेत शॉर्टकट, किंवा देवाच्या द्वारी "सेल्फ प्रोटेक्शन"साठी कोरडा खाऊ अन पाणी..
वाईट आहे परिस्थिती.
कोल्हापूरचे महालक्ष्मीचे
कोल्हापूरचे महालक्ष्मीचे देऊळही याला अपवाद आहे.
तुळजापूरलाच जाऊन आल्यावर
तुळजापूरलाच जाऊन आल्यावर याउप्पर कोणत्याही देवस्थानाला जायचे नाही असं ठरवलंय.
वाराणसीचा असाच अनुभव आला.
वाराणसीचा असाच अनुभव आला. चुकुन गेलो असं वाटलं.
tulja bhavani sasarache
tulja bhavani sasarache kuldaivat aahe mhanun jayache chalale hote.. ata baghu...
kokanatali, govyatali devale tyamanane khupach changli mhanayala havit.
southmadhalya devalanbaddal mhanayacha tar rameshwar che deul ha sthapatyashastracha uttam namuna aahe pan aat devalatun firatana naak daabun firave lagate. aatamadhe thikthikani tupache tile lavalele aahet. (ha anubhav panchvis varshanpurvicha).
जसे हॉटेलना ग्रेड असतात तसे
जसे हॉटेलना ग्रेड असतात तसे मंदिरांनाही ग्रेड द्यायला हवेत.
तेथील स्वच्छता आणि सोयीसुविधांना निकष ठेऊन.
त्यानंतर जो ग्रेड तसाच दक्षिणा, हारफुले, अभिषेक यांचा रेट.
मग होईल आपोआप सुधारणा
अवांतर - फार पूर्वी ऑर्कुटवर एक धागा काढला होता - "एक मंदीर बांधायचा विचार करतोय" नावाचा - तो आठवला.. बिजनेस म्हणून खरेच फार चांगले आहे हे क्षेत्र.
मी कट्टार नास्तिक आहे. मंदीरे पर्यटनस्थळे म्हणून फिरतो, पण कोणाच्या भावना दुखावायला आवडत नाही, तरीही कधीकधी काही आस्तिकांची लाचारी बघून वाईट वाटते.. वाईट वाटते कारण ते भक्तीरसात इतके डुबले असतात त्यांना समजावून सांगायला गेलो तरी ते नाही समजणार उलट आपणच वाईट ठरणार.
उत्तराखंडात काय हाल झाले
उत्तराखंडात काय हाल झाले प्रवाशांचे शेवटी? पावसा पाण्यात लहान मुलांना घेवून काय देव पावणार? >>> +११११
तुळजापूरलाच जाऊन आल्यावर याउप्पर कोणत्याही देवस्थानाला जायचे नाही असं ठरवलंय. >>>>
अस सगळीकडेच आहे असं नाही. शेगावचे संत गजानन महाराज मंदीर बघा (एक उदाहरण) आणि आनंद-सागर सुद्धा.
आमचे कुलदैवत आहे तुळजापुरची
आमचे कुलदैवत आहे तुळजापुरची आई
लग्नानंतर लगेचच आईचे दर्शन घ्यायची सासरी रीत आहे. पण काही कारणास्तव आमचे दर्शन लांबलेच..
शेवटी ४-५ महिन्यांपुर्वी जाउन आलो दर्शनास.
तुळजापुरला जाण्या आधी १-२ महीने आधी श्रीशेलम ला जाउन आलो होतो. तिथे शिवाजी महाराजांचे ही मंदिर होते. निजामांच्या काळात इथल्या मंदिरास राखण म्हणुन महाराजांनी त्यांचे काही सैन्य तेथे ठेवले होते.
त्यात महाराष्ट्राच पण कुलदैवत म्हणुन अजुन उत्सुकता 
एकदम अभिमान वाट्ला. डोक्यात हेच तुळजाईच्या दर्शनाला तर शिवाजी महाराज बर्याच वेळा यायचे म इथे तर काय भारी सोयी-सुविधा असतील... मंदिर कसल सुंदर असेल..
पण हा सगळा भ्रमाचा फुगा तुळजापुरला पोहचल्या पोहचल्या लगेचच फुट्ला. अतिशय गचाळ नि अस्वच्छ असा परीसर. मंदिरा पर्यंत पोहचेसतोवर सगळीकडे घाणच घाण. खुप वाईट वाट्ले. मनात दर्शन झाल्याचे किंचितहि समाधान नाहि लाभले.
याआधी नाशिक चे असल्याने सप्तश्रुंगी , त्र्यंबकेश्वर,शिर्डी.. अश्या देवस्थानास जाउन आले होते तिथेही गर्दी असते, पुजा-अभिषेक चालता पण अशी अस्वच्छता नसते.
हे वाचून राहवलं
हे वाचून राहवलं नाही.
तुळजापूर ला २००७ मध्ये गेलो होतो. असाच अनुभव. महाअभिषेक किंवा तत्सम पॅकेज घेतल्याने एका अरुंद दारातून 'स्पेशल' प्रवेश होता. (त्या अरुंद दारापाशी भरपूर धक्काबुक्की होती.पुजारी 'प्रीमीयम पॅकेज' वाल्यांना पटकन दार उघडून आत ढकलत होते.देवीपाशी गेल्यावर देवीकडे पाहून मनात नमस्कार करणार तोच पुजार्याने दूध लोण्याने माखलेला हात खांद्यावर ठेवून पुढे ढकलले.(रेशमी साडी ड्रायक्लीन हा फक्त एक मुद्दा, पण इतक्या दूर येऊन देवीला नीट नमस्कार केला नाही याचे वाईट वाटतेच, खरंतर देवीची मूर्ती कशी दिसते हेही आठवत नाही. बाहेर दुकानात देवीच्या छोट्या प्रतिमा घेऊन घरी ठेवणे हे काम मात्र ईमानेइतबारे केले जाते.))
लहान असताना शनी शिंगणापूर ला गेले होते तिथेही तसेच.वाटेवर भरपूर चिखल आणि तेल होते. देवळापाशी तेल आणि नारळाच्या शेंड्या आणि करवंट्या.चिखलाचेही काही वाटत नाही पण स्वच्छतागृहे आणि सोयी नीट हव्यात (याचा दुसरा भागः येणार्यांनीही त्या नीट ठेवाव्यात.)
जेव्हा घरातली मोठी माणसे 'छान दर्शन झालं, आरती मिळाली, प्रसन्न वाटलं' इ.इ. म्हणतात तेव्हा 'आपल्याला हे का वाटत नाही आणि हे वाटत नाही म्हणून आपल्याबरोबर काही वाईट घडेल का' अशी पाल चुकचुकतेच. महाराष्ट्र असेच नाही, इतर गर्दीच्या देवस्थानीही हे अनुभव आले आहेत. शिर्डी, शेगाव सारखी ठिकाणे आता 'पॉप्युलर अँड प्रीमीयम' आहेत आणि त्यांना पैशाची चांगली मदत मिळते आणि त्यातली बरीच ती ठिकाणे सुधारायला वापरली पण जाते. कोल्हापूरचेही तेच. तिरुपती हून येणारे भाविक अंबाबाई करुनच जातात. स्थानिक लोकांची ईच्छाशक्ती आणि ती पूर्ण करायला लागणारे फंडींग हे मोठे मुद्दे आहेत.
आपली पूजेची प्रोसेस घरात वेगळी आणि सार्वजनिक देवळांत वेगळी असे काही करता येईल का? नारळ फोडणे, बकरा बळी (किंवा कोंबडी इ.), दही दूध तूप मध अभिषेक हे सर्व प्रकार नंतर किड्यामुंग्याना आमंत्रण देणारे आहेत. ते फक्त 'दाखवून' घेऊन गेले असे काहीतरी करावे लागेल.'देव' सेक्शन वेगळे आणि 'देव फूड' सेक्शन वेगळे आणि नीट स्वच्छ असे काही तरी.
मनापासून देव भेटला तो फक्त घरातला आणि आजूबाजूच्या शांत देवळांतला. 'मेन देव हेड ऑफीसेस' ला गेले पण 'टीकमार्क' करायला. ('वर्षातून एकदा क देव, लग्नानंतर ख देव, मूल पायावर ठेवायला ग देव हे झालेच पाहीजेत, तुम्ही लोक असा नास्तिकपणा करता आणि मग मी काम करुन पण नोकरीच्या जागी चीज का होत नाही म्हणून रडता. देवासाठी तुम्हाला एक दिवस गैरसोय सहन करता येत नाही प्रवास, गर्दी, अस्वच्छता याची? ट्रेकिंगला जाता ना सकाळी सकाळी उठून?' इ.इ. मनातले आणि आजूबाजूचे विचार.)
खरोखर ही देवस्थानं सुधारायची असतील तर त्यांची स्टार व्हॅल्यू वाढवून ती शिर्डी शेगाव मुंबई सिद्धीविनायक इतकी करणे गरजेचे आहे म्हनजे पैशाचा ओघ इथे पण वाढेल.(पैसे लोकांकडे भरपूर आहेत, देवाला सोन्याचा हार करायला, मुकुट करायला. पण ते योग्य ठिकाणी वळवायला त्यांना प्रवृत्त करणे गरजेचे. 'क देवाने स्वप्नात येऊन दॄष्टांत दिला की १०० स्वच्छतागृहे, १०० रस्ते आणि १०० दवाखाने तुझ्या हातून झालेच पाहिजेत' अशी स्वप्ने श्रीमंताना पडणे किंवा त्यांच्यावर ज्यांचा प्रभाव आहे त्या बाबांना पडणे गरजेचे.)
'क देवाने स्वप्नात येऊन
'क देवाने स्वप्नात येऊन दॄष्टांत दिला की १०० स्वच्छतागृहे, १०० रस्ते आणि १०० दवाखाने तुझ्या हातून झालेच पाहिजेत' अशी स्वप्ने श्रीमंताना पडणे किंवा त्यांच्यावर ज्यांचा प्रभाव आहे त्या बाबांना पडणे गरजेचे.)
<<<<<<<<<
हो आता त्या त्या तिर्थक्षेत्रातील देवांनाच कामाला लागले पाहिजे. असे दृष्टांत त्यांनी रोजच्या रोज भक्तांच्या किंवा जे कोणी स्वच्छतेची कामे अडविणारे लोक आहेत त्यांना देत राहिले तर बरे होईल. पण जे निगरगट्ट लोक आहेत त्यांना देवाने देखील स्वप्न दृष्टांत दिला तरी काही फरक पडणार नाही म्हणा.
माहुरचे रेणुका मातेचे मंदिर
माहुरचे रेणुका मातेचे मंदिर ह्याला अपवाद आहे...तसेच राहण्याची सोय पण चांगली आहे.
शेगावचे संत गजानन महाराज मंदीर बघा (एक उदाहरण) आणि आनंद-सागर सुद्धा.+११११
ए आता हा विषय फारच बोअर झालाय
ए आता हा विषय फारच बोअर झालाय तुम्ही लोक फारच डोकं फिरवून घेताय
इतक त्रास होत असेल तर देवळातच न जाणे हाच एक सोप्पा उपाय आहे
हरी हरी करत बसा घरीच !!!
देवदर्शनाचं पुण्य मिळायला
देवदर्शनाचं पुण्य मिळायला कष्ट, प्रयास पडलेच पाहिजेत अशी जनसामान्यांत जाणवणारी भाबडी पण पक्की समजूत तर या देवळांच्या परिसरातल्या अनावस्थेला पोषक ठरत नाही ना, असंही कधीं कधीं मनात येतं.
असेल माझा हरी तर देईल
असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.:फिदी:
ते गाणे आठवले कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत ....:स्मित:
शेगावमध्ये मंदिर परिसर आणि
शेगावमध्ये मंदिर परिसर आणि भक्त निवास अगदी स्वच्छ आहेत. पण गाव बकालच आहे. खुली गटारं आणि कचरा ठिकठिकाणी आहेच.
'स्टार' देवळात जाऊन मनःशांती घालवून बसण्यापेक्षा घरच्या देवांना मनोभावे नमस्कार करावा या निष्कर्षाप्रत आम्ही तरी आलो आहोत.
देवस्थानात येणारा पैसा
देवस्थानात येणारा पैसा स्वच्छतेसाठी वापरावा हे मान्य!
शिर्डी, शेगाव सारखी देवस्थाने ते करीतही आहेत, पण महाराष्ट्रात अनेक देवस्थाने आहेत जिथे कमी निधी येऊनही स्वच्छता, सुव्यवस्था राखली जाते.
गोंदवल्याचे उदाहरण घ्या. तुळजापूर, कोल्हापुर, जेजुरी इ. स्थळांपेक्षा कितीतरी कमी प्रमाणात लोक येतात. येणार्या भाविकांची विनामूल्य राहण्याची, जेवण्याची सोय होते. अभिषेक, पूजा, आरती सगळे कसे व्यवस्थित होते. प्रसन्नतेचा, शांतीचा, ईश्वरी अस्तित्वाचा अनुभव येतो.
फारशी वर्दळ नसलेलं, शांत,
फारशी वर्दळ नसलेलं, शांत, एकांडं देऊळ बरे.
अश्या ठिकाणी कुठलीही पुजाअर्चा, हारतुरे, नारळ, प्रसाद असलं काहीही न करता शांत बसून राह्यल्यानेही शांत, आश्वस्त वाटते.. देव भेटण्यासारखंच म्हणायला हरकत नाही ते.
असा आपला माझा अनुभव.
फारशी वर्दळ नसलेलं, शांत,
फारशी वर्दळ नसलेलं, शांत, एकांडं देऊळ बरे.
अश्या ठिकाणी कुठलीही पुजाअर्चा, हारतुरे, नारळ, प्रसाद असलं काहीही न करता शांत बसून राह्यल्यानेही शांत, आश्वस्त वाटते.. देव भेटण्यासारखंच म्हणायला हरकत नाही ते.
असा आपला माझा अनुभव.
<<<<<<< प्रचंड अनुमोदन
नीधप, अगदी सहमत!!
नीधप,
अगदी सहमत!!
फारशी वर्दळ नसलेलं, शांत,
फारशी वर्दळ नसलेलं, शांत, एकांडं देऊळ बरे.
अश्या ठिकाणी कुठलीही पुजाअर्चा, हारतुरे, नारळ, प्रसाद असलं काहीही न करता शांत बसून राह्यल्यानेही शांत, आश्वस्त वाटते.. देव भेटण्यासारखंच म्हणायला हरकत नाही ते.
असा आपला माझा अनुभव.<<<<<
मला महड्च्या गणपती मंदीरात असे वाटले होते. (२००० ची गोष्ट), आता माहीती नाही. त्यावेळी अथर्वशीर्ष म्हणताना अगदी समाधी लागली की काय असं झालं होतं.
नीधप, अगदीं खरंय. छान,सुबक व
नीधप, अगदीं खरंय. छान,सुबक व स्वच्छ असलेल्या आमच्या कुलदैवतेच्या देवळातही मीं वार्षिक सोहळ्याचे गर्दीचे दिवस टाळूनच जातो. खूप बरं वाटतं.
Pages