तुळजापूर - महाराष्ट्रामधील देवळे अशी का ?

Submitted by kabhayk on 20 June, 2013 - 07:10

गेल्याच आठवड्यात तुळजापूर ला गेलो होतो. लक्षावधी लोकांचे कुलदैवत असणारे हे गाव , लक्षावधी लोक दरवर्षी येथे भेट देतात पण गावाची अवस्था आगदी अंगावर काटा आणणारी आहे. जेथे नजर जाईल तिथे घाणीचे ढीग , ड्रेनेज मधून वाहणारे घाण पाणी आणि त्यातूनच वाट काढत चालणारे भाविक. स्थानिक लोकांना याची काही लाज वाटत नाही. घाणीतून डुकरे फिरावीत व रहावीत असे येथील लोक राहत असतात. येणाऱ्या प्रचंड उत्पन्नाचे काय करतात हे देव जाणे. पाण्याची सोय नाही , स्वछता नाही , जेवणासाठी चांगली सोडा पण बरी सुद्धा हॉटेल नाहीत, रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरे , पावलो पावली आडवे येणारे भिकारी आणि मागे लागणारे पुजार्यांचे लोंढे. अत्यंत आंगावर काटा येणारा अनुभव होता. देवळात सुद्धा स्वछता अजिबात नाही. सर्वत्र कचराच कचरा. पवित्र पणाची कुठे हि निशाणी नाही. भाविकांच्या काही नैसर्गिक गरजा असतात याचे हि कुणाला भान नाही. पिण्याचे पाणी , स्वछता गृह याची काही सोय नाही , जी आहे त्याची अवस्था नरका पेक्षा हि वाईट आहे. एवढ्या प्राचीन मंदिराचा या लोकांनी पार उकिरडा करून टाकला आहे. दक्षिणेतील मंदिराच्या पुढे येथील अवस्था फारच लाजिरवाणी आहे.आपण स्वतः हे बदलण्या साठी काहीच करू शकत नाही याची मात्र लाज वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तरी माझ्या आयुष्यांत आजवर अस्पृश्यता बघितलेली नाही, घरांत, देवळांत किंवा इतरत्र; त्यामुळे मी त्याबद्द्ल बोलणे योग्य नव्हे.

मी पाहिली आहे.

आमच्या गावात विशिष्ट लोकांना देवळात वर्षातून एकच दिवस प्रवेश असतो. दुसर्‍या दिवशी मंदिराचे शुद्धीकरण केले जाते.

Bigger forces at work and they want you to stop going to Temples. They are creating circumstances that you might stop, you are just making their jobs easier. Thats all.

राजसीकाकू
इथं धर्माला कुणीच झोडपत नाहीये. साउथ मधे जाऊन पहा, गोव्यात जाऊन पहा. या देवळातली स्वच्छता पहा. त्या तुलनेत तीर्थक्षेत्र असलेल्या आपल्या प्रांतात देवळं स्वच्छ का नसावीत असा साधा प्रश्न आहे हा. तुम्ही कुठून कुठे गेलात.

मी इथे कोणाचेही नाव घेऊन भांडत नाहिये, फक्त माझा मुद्दा मांडते आहे. कृपया नाव घेणे टाळावे.

terence tao,

>> त्या तुलनेत तीर्थक्षेत्र असलेल्या आपल्या प्रांतात देवळं स्वच्छ का नसावीत असा साधा प्रश्न आहे हा.

सरकारी व्यवस्थापनातील भ्रष्टाचार हे प्रमुख कारण आहे. जे व्यवस्थापन चालवायचा अधिकार भक्तांना नाही, त्याचे उत्तरदायित्व भक्तांवर (म्हणूनच सामान्य हिंदूंवर) येत नाही. मात्र असं असलं तरी देवळे सुधारण्याचा हक्क भक्तांना आहे. भक्तांनी व्यवस्थापन पाहिलं तर शेगावसारखं आदर्श व्यवस्थापन निर्माण होतं.

नाहीतरी सरकार सर्व स्थावरांचे व आस्थापनांचे (कंपन्यांचे) खाजगीकरण करण्याच्या मागे आहे. तर मग मंदिरांचे सरकारीकरण कशाला? केवळ पैशासाठीच ना? मंदिर अधिग्रहण कायदा का म्हणून निर्माण केला आहे? अनाठायी सरकारी हस्तक्षेपास हिंदू विरोध करणारच. अन्यथा देवळे नीटनेटकी ठेवण्याच्या प्रयत्नांवर मर्यादा येतील.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान

सरकारने मंदिर ताब्यात घेतले म्हणजे नक्की काय केले आहे हो? जरा समजवून सांगता का मला?
तिथे पुजारी, झाडुवाले इ. सगळे सरकारी नोकर असतात का??
अशा सरकारी नोकरीच्या जाहिराती कुठे येतात? काय निकष असतात त्यांसाठी?

सरकारी आहे म्हणून कर घाण, अशी तुमची मानसिकता आहे का?

देवळांचे व्यवस्थापन सरकारकडे पूर्वीपासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्वकाळापासूनच आहे का, की पूर्वी खाजगी व्यवस्थापन होते आणि त्यांच्या गैरकारभाराला आवर घालण्यासाठी सरकारी विश्वस्त/कारभारी नेमले गेले; याविषयी कोणाला काही माहिती आहे का? असे झाले असावे असे वाटते पण नक्की माहिती नाही. कुणीतरी यावर प्रकाश टाकावा.

पैलवान,
सरकार भ्रष्टाचारी आहे यात इथे कुणाचेच दुमत नाही. पण तेवढा एकच मुद्दा आहे का? आपलीच देवळं अन गावं घाण करणारे "हिंदु" भक्त कुठल्या लायकीचे आहेत? (हिंदु सोडून सगळे स्वच्छ असतात असं म्हणत नाहिये, पण देवळात जाणारे सगळे हिंदुच असतात म्हणून हिंदु डबलकोट्स मध्ये लिहिलेय.)
मुख्य प्रश्न लोकांच्या मानसिकतेचा आहे. एकुणच (मेजॉरिटी) भारतीयांना स्वच्छतेसाठी थोडी जास्त मेहनत घेण्याची तीव्र नावड आहे अन जबाबदारी तर कुठेच घ्यायला नको. त्यात सरकारही आलं अन जनताही.

खालील माहिती बद्री-केदारच्या ऑफिशियल साइट्वर मिळाली.

Committtee

The number of committee members is 17. They comprise:
Members selected by the Uttaranchal Legislative Assembly 3
Member selected by the Zilla Parishad of Zilla Garhwal 1
Member selected by the Zilla Parishad of Zilla Tehri 1
Member selected by the Zilla Parishad of Zilla Chamoli 1
Member selected by the Zilla Parishad of Zilla Uttarkashi 1
Members nominated by the State Government 10
President and Vice chairman of the committee is nominated by the State Government.

POWER STRUCTURE

The administrative structure of the Shri Badarinath - Shri Kedarnath Temples committee is as follows :-

Chief Executive Officer : Sh. B.D. Singh

The main responsibility of the Chief Executive Officer is to carry out the instructions issued by the State Government and The Temple Committee and to be faithful to the duties of the Temple Committee.

खालील माहिती तुळजापूरच्या ऑफिशियल साइट्वर मिळाली.

श्री तुळजापूर मंदिर संस्थान
मंदिराचे व्यवस्थापन श्री तुळजापूर मंदिर संस्थान यांचे कडे आहे. संस्थानची नोंदणी मुंबई सार्वजनिक कायदा, १९५०, अन्वये विश्वस्त संस्था म्हणून १९६२ साली झाली. मंदिराच्या व्यवस्थापनासाठी मा. जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांच्या अध्यक्षतेखाली पदसिद्ध विश्वस्त समिती असून त्यामध्ये विश्वस्त सदस्य म्हणून

मा. उप-विभागीय अधिकारी, उस्मानाबाद,
मा. आमदार, तुळजापूर,
मा. नगराध्यक्ष, तुळजापूर
आणि तहसीलदार, तुळजापूर

>>> मा. उप-विभागीय अधिकारी, उस्मानाबाद,
मा. आमदार, तुळजापूर,
मा. नगराध्यक्ष, तुळजापूर
आणि तहसीलदार, तुळजापूर <<<<

अहो ह्यांना इतर ठिकाणी घाण करण्याचे पवित्र कार्य असते. त्या मुळे मंदिराचे काम ग्रामस्थ आणि दर्शनार्थींवर सोपवलेले आहे.

आम्ही केवळ शेगावला नियमीत जातो. मंदीर परिसर व भक्तनिवास सोडता इतरत्र आनंद आहे स्वच्छतेचा. ह्यावर्षी गेलो तेंव्हा मंदीरपरिसराच्या पुढचे (बाहेरचे) अतिक्रमण घालववेचे काम चालू होते. तिथे गेल्यावर दरवर्षी काही ना काही सुधारणा दिसते. तिथले पाणी पिता येते, तरीही लेकीसाठी घरून आम्ही पाणी नेतो. जेवणाची/प्रसादाची उत्तम सोय आहे.

आमच्या कोकणात मी तरी शिवाशिव पाहिलेली नाही. प्रत्येकाचे नेमलेले काम असते आणि लोक ते मनोभावे करतात. बरिचशी देवळे ट्रस्टची आहेत. गुरुव काही मागत नाहीत. आमच्याकडे देवळाला सोन्याचा कळस वै देण्याची ऐपतच नसते. Proud कोकणात कोणाच्या ना कोणाच्या ओळखीत जेवण्याची, उतरण्याची सोय होतेच. त्यामुळे देवस्थानात हे नाही नि ते नाही असे होत नाही.

आम्ही इतर कुठच्याही देवस्थानात, आंगणेवाडीच्या जत्रेत वै. हौसेने जात नाही.

रच्याकने - आता मस्त पाऊस पडत असेल. सगळे कोकण हिरवं लालं झालं असेल. देवळाच्या कठड्यावर बसून कौलावरून वाजणारं, ओघळणारं पाणी, अंगावर पाऊस झेलत पहायला जाम मज्जा येईल. Happy

देवळांची दुर्दशा येणार्‍या तथाकथित भाविकांनीच केलेली आहे.
आमच्या इथल्या शनि-मारुतींच्या देवळाचे उदाहरण. शनिवारीच काय हे मंदिर थोडे गजबजलेले असते. मारुतीचा शेंदूर कपाळी लावून झाला की लोक सरळ भिंतीला बोटे पुसतात. सगळ्या देवळाला अश्या शेंदराच्या टिकल्या लागलेल्या आहेत.
ज्या शनिदेवाच्या पीडेला घाबरुन लोक त्याला तेल, उडीद वाहतात, त्याच शनीच्या मूर्तीसमोर तेल वाहुन झाले की रिकामी तेलाची पाकिटे, उडीदाच्या पुड्यांचे कागद तसेच टाकून त्या शनिदेवालाच पीडा देवून जातात. Happy
ही तर एका छोट्याश्या देवळातली बाब मग तुळजापूर, पंढरपूर इ. प्रसिद्ध स्थळांची अवस्था काय असावी.

मूळात येणारे लोकच अशी घाण करणार असतील तर काय करायचे?

मूळात येणारे लोकच अशी घाण करणार असतील तर काय करायचे?
<<
ते सरकारच्या माथी मारायचे. Wink
हे सरकार हिंदू विरोधी आहे ना? म्हणून. दुसरं कै नै.
गा पैं नी उकरून काढला धागा. सोबत त्या एक ताई आहेत. तुम्हाला 'धार्मिक मनोवृत्तीने' यात्राच करता येत नाही म्हणणार्‍या. त्यांचं नाव घ्यायचं नाही अशी तंबी त्यांनीच दिलेली आहे. या दोघांचे म्हणणे एकच आहे.

"हिंदू देवस्थाने व हिंदूंना संपविण्यासाठी लै मोठ्ठे कारस्थान चालू हाये. कित्तीबी घाण असली, कित्ती बी वंगाळ वाटलं, तरी थितं जायाचं. नैतं तुम्ही हिंदू न्हाई! देवस्थान सुद्रायचा प्रेत्न केलात तर याद राखा!! तसं बोल्ले तं तुम्ही कांग्रेसवाले, सोनियाभक्त, स्युडोसेकुलर, लांगुलचालनवाले, समाजवादी, विचारवंत! ;)"

जौद्या. या गामा पैलवानाला भाजप म्हंजे काय ते ठावं न्हाय म्हणे. कोन समझवनार या पैलवानाला? पैलावानाची कुटं असते ठावं हाये ना समद्यास्नी?

जै घुटनेश्वर!

नताशा,

१,
>> भारतीयांना स्वच्छतेसाठी थोडी जास्त मेहनत घेण्याची तीव्र नावड आहे अन जबाबदारी तर कुठेच
>> घ्यायला नको. त्यात सरकारही आलं अन जनताही.

अगदी बरोबर. म्हणूनच जे लोक ही जबाबदारी घ्यायला लायक आणि उत्सुक आहेत त्यांनाच केवळ व्यवस्थापनात स्थान मिळायला हवं. सरकारी व्यवस्थापनात असे लोक असतील तर उत्तम. अन्यथा व्यवस्थापन बदलायला हवं.

२.
>> सरकार भ्रष्टाचारी आहे यात इथे कुणाचेच दुमत नाही. पण तेवढा एकच मुद्दा आहे का?

हा वाद महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थानांबद्दल चालला आहे. बरीचशी तीर्थस्थाने सरकारी व्यवस्थापन चालवतं. त्यामुळे हा एक मुद्दा बराच महत्त्वाचा ठरतो.

आ.न.,
-गा.पै.

इब्लिस,

आपला इथला प्रतिसाद वाचला.

१.
>> सरकारने मंदिर ताब्यात घेतले म्हणजे नक्की काय केले आहे हो? जरा समजवून सांगता का मला?

सांगतो की! थोडक्यात सांगायचं झालं तर सरकार मंदिरावर आपलं व्यवस्थापन नेमतं.

२.
>> तिथे पुजारी, झाडुवाले इ. सगळे सरकारी नोकर असतात का??

सरकारी नोकर वा वहिवाटदार असू शकतात. नक्की माहीत नाही. पण व्यवस्थापन मात्र सरकारी असतं.

३.
>> अशा सरकारी नोकरीच्या जाहिराती कुठे येतात? काय निकष असतात त्यांसाठी?

अशी एखादी जाहिरात वाचल्याचं आठवत वा ऐकिवात नाही. निकष असू शकतात, मात्र पारदर्शकतेच्या अभावामुळे लागू न केलेले असण्याची शक्यता अधिक.

४.
>> सरकारी आहे म्हणून कर घाण, अशी तुमची मानसिकता आहे का?

नाही. खाजगी व्यवस्थापन असतं आणि बजबजपुरी माजली असती तरीही असाच कंठशोष केला असता.

आ.न.,
-गा.पै.

इब्लिस,

>> मूळात येणारे लोकच अशी घाण करणार असतील तर काय करायचे?

शेगावला का घाण होत नाही? संभाव्य कारणे सांगतो :

१. एकंदर परिसराची स्वच्छता आणि टापटीप बघून लोकांना घाण करावीशी वाटत नाही.
२. तरीही घाण झालीच तर संस्थानाचे सेवक चटकन साफ करतात.

असा सेवाभाव सरकारी व्यवस्थापनात आढळून येतो का?

आ.न.,
-गा.पै.

इब्लिस,

>> या गामा पैलवानाला भाजप म्हंजे काय ते ठावं न्हाय म्हणे. कोन समझवनार या पैलवानाला? पैलावानाची
>> कुटं असते ठावं हाये ना समद्यास्नी?

भाजपला तुम्ही चर्चेत आणलंत! तुम्हीच सांगा भाजप काय आहे ते. आणि त्याचा या धाग्याशी असलेला संबंधही विशद करून सांगा!

आ.न.,
-गा.पै.

नीधप,

देवळात जाणे थांबवू नका या आवाहनाला आपण असं का म्हणून प्रतिप्रश्न केला आहे. मला काय वाटलं ते एक उदाहरण देऊन सांगतो.

असं बघा की निवडणुकांतून केवळ पैसेवाले लोकप्रतिनिधी निवडून येतात. पण तरीही मतदान हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य मानलं जातंच ना? भ्रष्ट लोक निवडून येतात म्हणून आपलं मतच देऊ नये का? मतदान करणं कर्तव्य आहे, अगदी तसंच लोकप्रतिनिधींना जाब विचारणं हेही एक कर्तव्यच आहे.

याच न्यायाने देवळात जाणे आपल्याला बरे वाटत असेल तर जावे. परंतु अप्रसन्न वातावरण आढळल्यास मंदिराच्या व्यवस्थापनास जाब विचारायला हवा.

आ.न.,
-गा.पै.

एक अवांतर अनुभव :-

दिल्ली मेट्रो सुरु होउन फार फार तर ६ महिने झाले असावेत, त्यावेळी गेलो होत, तेव्हा सिटचे कुशन फाडलेले, कुठेही स्टेशनवर थुंकलेले, असे दिसले. त्यानंतर पुन्हा एकदा ६-७ महिन्यांनंतर गेलो, तर सगळीकडे स्वच्छ दिसले. कुशनसुद्धा व्यवस्थित. कारण विचारले (प्रवाश्यांना) तर कळले की यासाठी दिल्ली मेट्रोने कॅमेरे आणि दंड यासोबतच स्वच्छतेविषयी केलेली जागरुकता कळले. बाकी दिल्ली कशीही असो, मेट्रो अजुनही झकास आहे.

नवी मुंबईचे काही स्टेशन्स आणि विशेषतः छ. शिवाजी टर्मीनस चांगले वाटले. सिएसटीला कितीतरी लोकं रोज येतात-जातात, पण तिथली प्रसाधनगृह नेहमीच स्वच्छ दिसतात.

त्यामुळे मनात आणले तर सगळेच होऊ शकते. मंदीरात जागोजागी कचराकुंडी का नसावी ?

मी तुळजापुर ला नेहमी जातो
पुर्वीपेक्षा आता बर्‍यापैकी सुधारणा आहे, दर्शनाची रांग पुर्वी मंदिर परीसरातच फिरवली होती आता जमीनीखालून चांगला दर्शनमार्ग केला आहे, मंदिराभोवती टाकला जाणारा कुंकवाचा सडा बंद झाल्या पासून परिसर जरा ठिक ठाक वाटतो आहे.

तुळजापूर मंदिरात देवी साठी काम करणारा सेवक वर्ग हा व्यवस्थापनाचा नोकरवर्ग नसून त्यांना त्या साठी कोणतेही मानधन / पगार / दक्षिणा ट्रस्ट मार्फत दिली जात नाही. त्यांचे रोजचे उत्पन्न मिळवण्यासाठी भाविकांकडून मिळणार्या पैश्यावर अवलंबून आहे, सहाजीकच तुम्ही तेथे गेल्यावर ते त्यांच्या मार्फत पुजा करण्यासाठी तुमच्या मागे लागतात. देवीचे मुख्य पुजार्याला सुद्धा देवस्थान ला पैसे भरून वार विकत घ्यावे लागतात मग त्या वारी / त्या काळात मिळणारे उत्पन्न त्या पुजार्‍याचे. हाच प्रकार पंढरपूर / गांणगापुर येथे सुद्धा पहायला मिळेल.

हे घ्या:
पंढरपूर मंदिरातील करोडोंचा घोटाळा:
http://www.loksatta.com/maharashtra-news/the-malpractices-of-pandharpur-...

(आता लोकसत्तवाले देखिल हा बाफ वाचतात की काय...? चांगलेच आहे...!)

छे घोटाळा कुठला ही फक्त तांत्रिक अनियमितता आहे. करु दुरुस्त आहे काय आन नाही काय? असे आता म्हणतील.

Pages