दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग ह्या भारताच्या बाह्य (आंतरराष्ट्रीय) गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी बहुअकुटुंबी रमन (बी रमन) ह्यांचे कर्करोगाच्या प्रदीर्घ आजाराने आज चेन्नईमध्ये निधन झाले. रामनाथ काओंच्या (R&AW चे संस्थापक) काळापासून रॉ मध्ये काम केलेल्या बी रमन ह्यांनी विवृत्त झाल्यावरदेखील विविध समित्यांवर काम केले. तसेच त्यांनी लिहिलेली तीन पुस्तके विशेषतः "'काओ'बॉइज ऑफ रॉ" ही भारतातल्या गुप्तहेरसंस्थांतल्या वरिष्ठ अधिकार्‍याने लिहिलेले पहिलेच पुस्तक. रमन ह्यांचा ब्लॉग प्रसिद्ध होताच तसे त्यांचे ट्विटर फॉलोअरही खूप होते. रेडिफवर बर्‍यापैकी नित्यनेमाने ते लिहीत असत. एक बडा इटेलिजन्स ऑफिसर आज गेला Sad

ज्येष्ठ पुराभिलेखतज्ञ आणि नाणकशास्त्रज्ञ डॉ. शोभना गोखले यांचं पुण्यात आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झालं. Sad

मटा ब्रेकिंग न्यूज...

विनोदी अभिनेते सतीश तारे यांचे मुंबईत निधन....

गुणी अभिनेता गेला Sad
श्रद्धांजली!!!

बापरे काय धक्कादायक बातमी ? सतीश तारे यांचे निधन? खळखळून हसवणारा अभिनेता गेला.
श्रद्धांजली.

सतीश तारे????

त्यांना दोन तीन नाटकामधे काम करताना पाहिलंय.... काय गुणी आणि एनर्जेटिक अभिनेता....

श्रद्धांजली....

Sad

Pages