कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी आहार

Submitted by मनू on 24 June, 2013 - 02:36

काल कोलेस्ट्रोल लेवल चेक केली तर ldl कोलेस्ट्रोल जास्त आले आहे.
तर ते कमी करण्यासाठी आहारात काय घ्यायला हवे आणि काय कमी / बंद करायला हवे याची माहिती हवी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेवणातील कढीपत्ता बाजूला न काढता तो खायचा. तेलही कमीत कमी वापरायचे. तेलाच्या चपात्यां ऐवजी फुलके करुन खायचे.
आळशीही भाजून खातात असे म्हणतात पण सगळे करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात. चांगले आणि वाईट.

चांगले वाढवत जाणे हा एक उत्तम मार्ग आहे. त्याला एईरोबीक व्यायामच लागतो. सांजसकाळ धावणे हा एक सोपा आणि उत्तम व्यायाम आहे.

त्याला एईरोबीक व्यायामच लागतो. >>>> +१
सांजसकाळ धावणे हा एक सोपा आणि उत्तम व्यायाम आहे. >>> सुरुवातीला धावणे जमेलच असे नाही म्हणुनच brisk walk

डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या >> हे सगळ्यात महत्वाचे.

रक्तातल्या कॉलेस्टेरॉलची पातळी अनेक गोष्टींवर अवलंबून असते. थोडा अनुवांशिकतेचा पण भाग असतो.

आपल्या नियत्रणांत असलेले उपाय खालील प्रमाणे :

रक्तातले कॉलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आहारातले कॉलेस्टेरॉल कमी करणे हा एक भाग. अंड्यातले पिवळे, होल दूध, कलेजी, कोळंबी, चीझ इत्यादी. कुठल्याही

कॉलेस्टेरॉलचे बिल्डिंग ब्लॉक्स असलेले स्निग्ध पदार्थ कमी करणे हा अजून एक भाग - खोबरे, खोबरेल तेल, रुम टेम्परेचरला घनरुप होणारे डालडा इत्यादी

सोल्यूबल फायबर असलेले पदार्थ खाल्ल्याने त्याला लागून रक्तातले अतिरिक्त कॉलेस्टेरॉल अन त्याचे बिल्डिंग ब्लॉक्स शरीराबाहेर फेकले जातात. अशा पदार्थाचे आहारात प्रमाण वाढवणे हा तिसरा भाग पालेभाज्या , सालासकट खाल्ली जातील अशी कडधान्ये

एरोबिक + थोडे तरी वेट लिफ्टिंग / स्ट्रेन्थ ट्रेनिंग व्यायाम करुन एच डी एल कॉलेस्टेरॉल वाढवणे हा चौथा भाग.

या शिवाय सिगरेट , अतिरिक्त मद्यसेवन, सोडावे , स्ट्रेस मॅनेज करावा, मेडिटेशन करावे .
आहार, झोप नियमित असावे.

इथे हजारो पदार्थांचे न्यूट्रिशनल अ‍ॅनलिसिस आहे.

सोल्यूबल फायबर असलेले पदार्थ खाल्ल्याने >>>>> आमच्या मित्राला इसबगोल ने बराच फायदा झाला होता. आणि त्याची सवय होत नाही / साइड इफेक्ट काही नाहीत असे समजले होते. खाद्यतेल सुध्हा कमीत कमी सॅट्युरेट्स असलेले वापरावे.

निवांत, इसबगोलची सवय लागू शकते. ( पुढे पुढे बोवेल मूव्ह्मेंटस होत नाहीत. )
ओट्स हा पण एक चांगला पर्याय आहे. ते नीट शिजवूनच खावेत.

>> मेधा +१

फक्त LDL जास्त आहे की triglycerides पण वाढले आहेत आणि HDL कमी झाले आहे?

तुमचे Total Cholesterol = LDL + HDL + (triglecerides/5)

यामध्ये LDL = वाईट कोलेस्टेरॉल आणि HDL = चांगले कोलेस्टेरॉल असे म्हंटले जाते.

LDL कमी करण्यासाठी आहारातील बदल सगळ्यांनी वर सुचवलेलेच आहेत. सग़ळे स्निग्ध पदार्थ, तळलेले पदार्थ, पापड, लोणची इ. बंद / हळूहळू कमी करा.
पालेभाज्या, भिजवलेल्या मेथ्या, फायबरयुक्त पदार्थ वाढवा.

आपली जीवनशैली कशी आहे ते तपासा. बैठी जीवनशैली असेल तर ट्रायग्लिसराईड्स आणि पर्यायाने Total Chol लवकर वाढू शकते.

Goal is to decrease LDL and increase HDL [जे चालणे/फिरणे, धावणे, पोहणे इ असे व्यायामाने वाढू शकते]

तुमची कोलेस्टेरॉल पातळी काय सांगते

HDL/LDL माहिती

कुणाची उचकी लागली तर त्याला घरगुती इलाज इथे आहेत.
मळमळीच्या इलाजासाठी वेगळ्या धाग्यावर जावे लागेल. अ‍ॅडमिन यांनी आम्लपित्तासाठी वेगळा धागा काढलेला आहे. 'इनो' हा एक जनरल इलाज आहेच.
असो.

>>कॉलेस्टेरॉलचे बिल्डिंग ब्लॉक्स असलेले स्निग्ध पदार्थ कमी करणे हा अजून एक भाग - खोबरे, खोबरेल तेल<<

खोबरेल तेल हे कोलेस्टेरॉलचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत हे कुठे साबित झालेय आहे का? की एक धारणा आहे?

ह्याने नक्की कोलेस्टेरॉल वाढते हे कुठे वाचले व कुठले संशोधन आहे ह्याची लिंक मिळेल का? नुसती टोटल कोलेस्टेरॉल ची पातळी बघणं योग्य आहे का?

इथे लिंका दिल्या तर बर्‍या राहतील अश्या माहितीच्या....

चुकीचे समज पसरवण्यापेक्षा वा एकीव माहिती देण्यापेक्षा मूळ लिंका देणे उचित ठरेल.. कारण सल्ला विचारणा उगीच ह्या माहितीलाच प्रमाण मानून बसायचा.

Saturated fat is a bigger culprit than cholesterol in your diet. Meats, whole-fat dairy products, and other foods from animals can be loaded with it. It's also in some vegetable oils such as palm and coconut oil. But foods with cholesterol can also raise your cholesterol. So most people should cut cholesterol -- in foods such as organ meats, egg yolks, and whole milk -- to less than 300 mg a day.

हे वेब एम डी वरुन http://www.webmd.com/cholesterol-management/rm-quiz-test-smarts-13

मला नक्की ज्ञान नाहीये , पण कोकोनट ऑयल हे खूप चांगले असते असं मानणार्या खूप लिंक्स मी वाचल्या आहेत. उदा: http://gapsdiet.com/ फॉलो करणारी लोकं.. तिथे रेकमंडेड फुड मध्ये Coconut, fresh or dried (shredded) without any additives, Coconut milk ,Coconut oil हे आहे.
gaps diet फॉलो करायला आवडेल असं असल्याने मी थोडंफार प्रमाणात कोकनट मिल्क्/ऑयलचा वापर करते.

अर्थात , आधीच कोलेस्टरॉलचा त्रास असणार्यांना ते चालतं की नाही हे मला खरंच माहीत नाही. मूळ धागाकर्तीला माझ्या पोस्टचा काही उपयोग नसेल कदाचित.. Happy

मला नक्की ज्ञान नाहीये , पण कोकोनट ऑयल हे खूप चांगले असते असं मानणार्या>>>>>>>>>> माझी एक मैत्रीण सध्या एक स्पेशल डायट प्रोग्राम फॉलो करतेय. त्यात नारळ आणि नारळ दुध, बदाम आणि साजुक तुप, भाज्या, मांस यांचा मुक्त वापर आहे. तिने ते डाएट सुरु केले तेव्हा मी तिला नारळातील फॅटस वगैरेबद्दल सांगितले. पण तिने तो कार्यक्रम २ महिने राबवला. कालच ती सांगत होती की अलिकडे केलेल्या रक्त वगैरे तपासणीत तिचे कोलेस्टरॉल, आयर्न, व्हिट डी उत्तम आहे.
नारळ घालुन केलेले पदार्थ मला फार आवडतात. पण २-३ वर्षांपासून नारळ वापरणे बंद/कमी केले. तिचे ऐकुन परत थोडे वापरायला सुरुवात करावी का असे वाटून गेले.

डॉ सल्ल्याने आहारतज्ञाकडे जा.
ते जास्त चांगली मदत करतील.

डॉ ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड च्या गोळ्याही लिहुन देतील.

व्यायामाला मात्र पर्याय नाहीच......

मेधा आणि मनकवडा उत्तम पोस्टस.
पण नारळाबद्दल वैगेरे अगदी मेडिकल जर्नल्समधून सुद्धा नेहमी उलटसुलट बातम्या येत असतात.त्यामुळे माझे तर मत असे आहे की जर तुम्ही ट्रॅडिशनली नारळ खाणारे असाल तर चालू ठेवा.

मूळात मर्यादित आहार आणि त्यापेक्षा योग्य व्यायाम यामुळेच कॉलेस्तेरॉल कमी होणार आहे.
कॉलेस्ट्रॉल सिंथेसिसच्या चक्रातील काही एंझाईमच्या कमतरतेमुळे जेव्हा कॉलेस्टरॉल वाढते तेव्हा मात्र योग्य ते औषधोपचार करावे लागतात. होमोसिस्टीन डेफिशीयंसी हे भारतात आढळणारे याप्रकारातील ठळक उदाहरण.
विटॅमिन बी च्या कमतरतेमुळे सुद्धा कॉलेस्टरॉल सिंथेसिसवर परिणाम होऊ शकतो.

मात्र एक आहे कॉलेस्टेरॉल अति कमी करायच्या नादात शरीरात महत्त्वाचे हॉर्मोन तयार होण्याच्या कामात अडथळा येऊ देऊ नये.

सर्वाना प्रतिसादासाठी धन्यवाद.
फक्त LDL जास्त आहे की triglycerides पण वाढले आहेत आणि HDL कमी झाले आहे?>> हे मी रीपोर्ट बघुन लिहिते. डॉक्टरांना रीपोर्ट दाखवला तेव्ह त्यानि ldl वाईट कॉलेस्टेरॉल आहे अस सान्गितल, म्हणुन ते लक्शात राहील.

इथे दुसऱ्या धाग्यावर आळशी भाजून त्याची पावडर करून, रोज एक चमचा पावडर भाज्यांमध्ये मिक्स करावी असा वाचलं. मग याचा बाकीच्यांना काही side effect होत नाही ना?
मग हे चालू करेन.

चांगले कोले. वाढवणार्‍यांमधे कारळाची, जवसाची, काळ्या तिळाची चटणी कमी तिखट मिठ घालून रोज खावी. खरे तर पुर्वीचा आपला जो आहार होता ना भाजी, भाकरी, चटणी, दही, वरण, फळ हा आहार सर्वात उत्तम आहे. ह्यात सर्व काही येत. एक खूप खायच आणि एक कमी खायच ह्यानी पण प्रश्न निर्माण होतात.

>>Saturated fat is a bigger culprit than cholesterol in your diet. Meats, whole-fat dairy products, and other foods from animals can be loaded with it. It's also in some vegetable oils such as palm and coconut oil<<

फक्त कोकनट ऑयल चा उल्लेख आलाय म्हणून,
web MD वरील माहीती हि किती वेळा अपडेट होते? ती तुम्ही प्रमाण म्हणून मानत असाल तर इतरांनी मानावी म्हणून तिथून लिंका उचलून देणे फायदेशीर आहे का? एक माहीती म्हणून ती लिंक वाचणे ठिक आहे, पण त्या माहितीचा प्रसार करणं कितपत बरोबर आहे?

त्यामुळे ज्यांनी खरोखर कोकोनट ऑयल खाल्ले आहे व फॉलो केलय त्यांनी अनुभव लिहिलेल बरे. तसेही प्रत्येकाची बॉडी हि वेगळी असते. कोणाला कितपत काय चालू शकते वगैरे त्यांचे डॉक सांगितलेलं उत्तम.

तसेही पहाता, आजकाल टीवी वर कोकोनट ऑयल, दूध वगैरे फायदेशीर सांगतात आणि ते हि अलिकडच्या संशोधनानुसार पण तरीही ते संशोधन शिक्कामोर्तब झालेले एकलेले नाही. त्यामुळे किती अंमलात आणावं हे ज्याच्या त्याच्या डॉक ने सांगितलेल बरं,

ण नारळाबद्दल वैगेरे अगदी मेडिकल जर्नल्समधून सुद्धा नेहमी उलटसुलट बातम्या येत असतात.त्यामुळे माझे तर मत असे आहे की जर तुम्ही ट्रॅडिशनली नारळ खाणारे असाल तर चालू ठेवा.कोकण्यांचे खाद्यपदार्थ नारळयुक्त असतात. काही मासे खोबरेल तेलात तळले जातात.देशावर
दाण्याचे कूट असते. हे सारे वंगण म्हणून आवश्यक असते.अति सर्वत्र वर्जयेत हे तर आहेच!

येळेकर अगदी बरोबर.
एवढे नारळ खाऊन आम्हा कोंकण्याना काही होत नाही.;)

पण एक आहे कुणी म्हणाल मी नारळ घालून फिश करी खाणार त्याबरोबर च बटर चिकन आणि दुसर्‍या दिवशी चमचमीत शेंगदाणे कूट घालून भरली वांगी तर ते चूक.
एकंदर किती फॅट पोटात जातंय मग ते सॅच्युरेटेड असो की कसं हे पण पाहिलं पाहिजे.
आजकाल ग्लोबलायजेशनच्या नादात आपण सगळीकडचेच ट्रॅडिशनल पदार्थ दररोजच्या आहरात घ्यायला लागलोय. त्यातही चमचमित जास्त. म्हणजे असं की कोंकणातून आपण कोंबडी वडे उचलणार पण पातोळ्या घेणार नाही. असंच अन्य प्रदेशांबाबत . मग एकंदर फॅट वाढत जातं.

पण एक आहे कुणी म्हणाल मी नारळ घालून फिश करी खाणार त्याबरोबर च बटर चिकन आणि दुसर्‍या दिवशी चमचमीत शेंगदाणे कूट घालून भरली वांगी तर ते चूक.
<<
ते देखिल खा,
पण खाऊन पचवायची ताकत ठेवा मग.
ते खाऊन, खांद्यावर वजन धरून ४-४ मैल पायी डोंगर तुडवून, भर पावसात शेतीची कामे करून घरी या. आल्यावर शेणगोठा करा, अन परत हाणा की दुसर्‍या दिवशी तिसर्‍याचं कालवण? इथं एसीत बसून बटणं दाबायची असलीत तर मग कठीणेय..

रक्तातील कॉलेस्ट्रॉलचा मोठा भाग (८०%) स्वता: शरीरच बनवत असते. कॉलेस्ट्रॉल चा अगदी छोटा (२०%)
भाग खाण्यातुन येत असतो. हा २०% कॉलेस्ट्रॉल चा भाग दररोजच्या खाण्यातील दु ग्ध जन्य पदार्थ, मांस,
अंडी आणि तेलातुन येते. याचा अर्थ आपल्या खाण्याचा आणि कॉलेस्ट्रॉलचा तसा फारसा संबंध नाही,

http://www.disabled-world.com/artman/publish/body-cholesterol.shtml

भरपूर व्यायाम, लसुण खाणे, वगैरे सुचले. मी करतोही हे! (व्यायाम भरपूर करत नसलो तरी बर्‍यापैकी करतो).

रिपोर्ट मध्ये
Cholesterol = 213 (H*) (Desirable value <200)
triglecerides = 139 (Desirable value <150)
HDL Cholesterol = 38.30 (Desirable value 30-60)
LDL Cholesterol = 146.90 (Desirable value < 130)
VLDL Cholesterol = 27.80 (Desirable value 5-51)

Total Chol: HDL Chol ratio = 5.56

या value आहेत.

माझ्या अळशी च्या प्रश्नाच उत्तर द्याना कुणीतरी.

मनू, अळशीचा काही साईड इफेक्ट वाईट होत नाही.
फायदाच होतो.
तुम्ही दिलेल्या प्रमाणात घालू शकता कुठल्याही भाजीत.

Pages