कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी आहार

Submitted by मनू on 24 June, 2013 - 02:36

काल कोलेस्ट्रोल लेवल चेक केली तर ldl कोलेस्ट्रोल जास्त आले आहे.
तर ते कमी करण्यासाठी आहारात काय घ्यायला हवे आणि काय कमी / बंद करायला हवे याची माहिती हवी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग शेंगदाणे हि कमी करायला हवेत का?>>>>> सॉरी मनू, मी नीट लिहिलं नाही. माझ्या माहिती प्रमाणे शेंगदाण्यानी कॉलेस्टेरॉल नाही पण ट्रायग्लिसराईड्स वाढतात बहुतेक.
एल डि एल कमी करायला ज्यातून एल डि एल वाढते असे पदार्थ कमी करणे/बंद करणे आणि सिलियम हस्क (इसबगोल हस्क) घेणे हेच उपाय मला लागू पडले.

एच डि एल वाढवण्याकरता व्यायाम हाच सगळ्यात चांगला उपाय वाटतो कारण काहीतरी खाऊन एच डि एल वाढवायचे म्हणजे किचकट होऊन बसतं कारण त्या पदार्थांमध्ये इतरही काही घटक असतात ज्याचा त्रास होऊ शकतो. बदाम, आक्रोड, जवस किंवा सालमन मासा हे एका लिमिटच्या पुढे आपण जास्त खाऊ शकत नाही कारण त्यात कॅलरीही भरपूर असतात. त्यात हे पदार्थ नेमकी किती खालले म्हणजे कितीनी एच डि एल वाढेल ह्याचाही काहीच नेम नाही. सिगरेट बंद करुन (कोणी ओढत असेल तर)आणि कार्डियो व्यायाम सुरु करुन /वाढवून मात्र झपाट्यानी एच डि एल वाढतं हे मी अनुभवावरुन सांगू शकतो.

आहारात चोथा आवश्यक आहे. इसबगोल किती काळ घेणार? रोजच्या आहारातही चोथ्याचा समावेश हवा. मेथी- पालक- बीट वगैरे पालेभाज्यांचे देठ फेकून न देता त्यांचे पराठे, देठ शिजवून केलेलं सूप, देठ मिक्सरमध्ये फिरवून त्याची चटणी करता येईल. कमला सोहोनींच्या 'आहारगाथा' मध्ये याबाबत सविस्तरपणे लिहिलं आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे खाण्याचाच विचार करतात. एखादी गोष्ट खायची नाही म्हणजे नाही हे कुणालाही पाळायला नकोय. खाटल्यावर झोपून सगळं खाउन, व्यायाम न करता आरोग्य कसं मिळेल?
केमिकल्स, प्रिझर्वेटीव्ज, खायचे रंग, सोडा वगैरे गोष्टी पोटात ढकलून उत्तम आरोग्य कसं मिळेल??
मला एकाने फिरकी घेण्याच्या सूरात सांगितलं..' काही होत नाही रे.. घे तू चहा.. थोड्याशा चहाने कांय होतंय??' त्याला म्हटलं..' तुझ्या पल्सरमध्ये पाव लिटर रॉकेल टाकशील?? थोड्याशा रॉकेलने कांय होतंय?? चालेल की गाडी!!..' ....' गाडीचं समजतं, बॉडीचं नाही समजत??'

काही होत नाही रे.. घे तू चहा.. थोड्याशा चहाने कांय होतंय??' त्याला म्हटलं..' तुझ्या पल्सरमध्ये पाव लिटर रॉकेल टाकशील?? थोड्याशा रॉकेलने कांय होतंय?? चालेल की गाडी!!..' ....>>>> लै भारी सांगितलं राव. हे आता माझ रोजचं १० -१५ मि. बोलण वाचवेल. Happy

गाडीचं समजतं, बॉडीचं नाही समजत??'>>> Lol
उदाहरण पक्कं आहे पण Happy

नैसर्गिक चोथ्यासाठी नेमकं काय खावं अजून ?>>> दिप्या.
फळं वै ज्युस न करता खायची.
भात खात असशील तर विदाउट पॉलिश वाला मिळतो.
तो खायचा.
काकडी, गाजर हे ही आहारात घ्यायच.

>>
एखादी गोष्ट खायची नाही म्हणजे नाही हे कुणालाही पाळायला नकोय. खाटल्यावर झोपून सगळं खाउन, व्यायाम न करता आरोग्य कसं मिळेल?
<<
हेम, सात्त्विक संताप आलेला दिसतो आहे अगदी! Lol

>>सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे खाण्याचाच विचार करतात. एखादी गोष्ट खायची नाही म्हणजे नाही हे कुणालाही पाळायला नकोय >>> हे खूप महत्त्वाचे आहे.

विशेषतः भारतात मी इतक्या नातेवाईकांकडे हे पाहिलंय की चहाचं भांडं सतत उकळतच असतं. सकाळी ७ चा एक डे स्टार्ट चहा, ९ ला चहा-नाष्टा, परत ४चा चहा, ६वाजता कुणाकडे भेटायला गेलं की चहा-खाणे... इतक्यावेळा हे चहा-कॉफी प्रकरण असते की त्याचा तिटकाराच येतो. आणि हा चहा व्यवस्थित गोड, आणि भरपूर फॅट असलेल्या दुधाचा असतो. रोज रोज असेच केल्यावर काय होणार त्या कोलेस्ट्रॉलचं!! त्याशिवाय कुणी आलं की त्यांच्याबरोबर अर्धा कप, बाहेर गेल्यावर अमृततुल्य वगैरे वगैरे, रात्री खूप उशीरा जेवण. भारतवारी नकोच वाटते यामुळे. Sad

नातेवाईकांकडे काही खायला-प्यायला नकार दिला की पुन्हा त्यांचे बोलणे, शेरे इ. इ. असतंच.

>>नैसर्गिक चोथ्यासाठी नेमकं काय खावं अजून>>>>>>
बटाटा सालीसकट खाल्ला तर उत्तम असतो. अर्थात तळून नाही. Biggrin
बटाट्यामधे अनेक वाईट गोष्टी जरी असल्या तरी सोल्युबल फायबर पण असतं. मी तर सालीसकट भाजी करते, कणीक न चाळता वापरणं, शक्य तितका ब्राऊन राईस, पालेभाज्यांची देठे चिरून भाजीत घालणे, कोशिंबीरी भाजीच्या प्रमाणात करणे आणि खाणे. Happy असे काही लाईफस्टाईल चेंजेस केले आहेत. सहज शक्य आहेत.

अजून एक गोष्ट म्हणजे उसगावात HDL चे आकडे ४० च्या वर असावेत असंच सांगतात. मग भारतात ३०-६० नॉर्मल का मानतात? ही शंका आहे. तुलना नाही. स्टॅन्डर्डायझेशन नसते का?

मी आत्तापर्यंत माझ्या माहितीतल्या एकाही पुरुषाचं कोलेस्ट्रोल नॉर्मल आहे असं ऐकलं नाही, असं का?

@हेम
भारी आहे उदाहरण...

>>नॉर्मल आहे असं ऐकलं नाही, असं का?
अगदीच असे नाही पण स्त्रियांमध्ये नैसर्गिकरित्या HDL [चांगले] कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात तयार होते त्यामुळे तसा धोका कमी असतो.

त्याचप्रमाणे वर कोणीतरी लिहल्याप्रमाणे प्रत्येकाच्या शरिराबरोबर तयार होणारे कोलेस्टेरॉल, शरिराला लागू पडणारा आहार/विहार वेगळा असू शकतो. LDL कोलेस्टेरॉल, जे शरिरात नैसर्गिकरित्या तयार होते आणि जास्तीचे फायबर सोबत निघून जाते, असे LDL गाळणारे रिसेप्टर, प्रत्येकाच्या शरिरात कमी/जास्त असल्याने काही जणांचे LDL जास्त असू शकते.

>>मग भारतात ३०-६० नॉर्मल का मानतात?
+१
आजकाल भारतातले बरेच डॉक्टर, बदलत्या जिवनशैलीचे प्रमाण देऊन हि पातळी योग्य आहे असे सांगतात, आणि तसे असेल तर "बॉर्डर" वर आहे असे सांगतात..त्यामुळे लोकांना पण तसेच वाटते.

भारतात ३०-६० नॉर्मल का मानतात>>>>>>>

अभय बंगांनी साक्षात्कारी हृदयरोगमध्ये कोलेस्टेरॉलच्या पातळीबद्दल लिहीले होते तसं काही असेल का? 'नॉर्मल' हा शब्द आहे हा चांगला, निरोगी या अर्थाने नाही तर संख्याशास्त्रीय अर्थाने वापरला गेला आहे. अमेरिकन समाजामधील १०० माणसं तपासली तर त्यातल्या ९५% लोकांची कोलेस्ट्रॉलची पातळी १५०-२४०मिग्रॅ असते. या अर्थाने नॉर्मल. याचा अर्थ ही पातळी सुरक्षित निरोगी आहे असं नाही. पेशंटला आम्ही सांगणार की तुमचं कोलेस्टेरॉल १५०-२४० या दरम्यान पाहीजे (म्हणजे तुम्हाला अमेरिकन लोकांइतकेच हार्टअ‍ॅटॅक येतील.)

म्हणजे इकडे जसं १५० किंवा त्याच्या खालीच पाहीजे कोलेस्टेरॉल, तसं एचडीएल ३०-६० नॉर्मल असलं तरी ते सुरक्षित नाहीये. ते जास्तीत जास्तच पाहीजे.

हेम,

उत्कृष्ट उदाहरण दिलस, आणि आकडेवारी सुद्धा दिलीस,

आपल चुकत कुठे ? हे स्वता:ला विचाराव. जर हेम च उदा घेतलत तर आपल ट्राडीशनल खाणच योग्य.

..' तुझ्या पल्सरमध्ये पाव लिटर रॉकेल टाकशील?? थोड्याशा रॉकेलने कांय होतंय?? चालेल की गाडी!!..' ....' गाडीचं समजतं, बॉडीचं नाही समजत??'>>>>>> भारी Lol

एक छोटी टिप माझ्याकडुन... माझ्या आत्याला तिच्या डॉ. ने सांगितली होती. आपण जेव्हा फोडणी करतो तेव्हा तेलाचा धुर होवु द्यायचा नाही. आधीच मोहरी, जिरे व मेथी नुसत पातेल्यात भाजुन घ्यायच मग ते तडतडत... मग तेल घालायच लगेच हळद व हिंग... मग लगेच जे व्यंजन घालायचे आहे ते घालायचे. आम्ही घरी त्यामुळे मोहोरी, जिरे, मेथी, बडीशोप सगळ पक्क भाजुन ठेवतो व रोज साठी वापरतो.

स्नेहश्री - धन्यवाद तुमच्या टीपेबद्दल.
हेम - फारच उत्तम दृष्टांत. लक्षात राहीलच.

प्रीति - माझ्या बाबांचे को. - एकूण १४५, एच डी ल - ५५ वय - ६७ (प्रथम केले तेंव्हा) (tri-gl माहीत नाहीत)
दिनचर्या (गेली ६० वर्षे) - ४.३० आधी उठणे, रोज ४० मिनिटे व्यायाम (२० एक सुर्यनमस्कार), दिवसभर काम (अंगमेहनतीचे नाही तरी बैठे नाही).सगळीकडे सायकलने जाणे (दिवसा किमान १५-२० किमी)
खाणे - फार वर खाणे नाही, व्यसन नाही, चहा नाही, कॉफी नाही, मांसाहार नाही, तळलेले नाही, लोणचे नाही, फक्त एक भाकरी-पोळी, थोडा भात, व गोड पदार्थ दोन जेवणात, दूध-तूप-ताक भरपूर, दरोरोज मूठभर शेंगदाणे मुखशुद्धी म्हणून जेवणानंतर. केवळ गोड खाणे प्रचंड आवडायचे व खायचे देखील पण पन्नाशीनंतर तेही कमी केले.
अनुवांशिकता - आजी/आजोबा/काका यांना मधुमेह, एका आत्याची बाय-पास चाळीशीतच झालेली.

ता. क. केवळ तुलनेसाठी - माझ्या वयाच्या २८ वर्षी माझे को. एकूण १५०, एच डी ल - २८. त्यावेळी मी दरोरोज किमान १ तास व्यायाम न चुकता करत असे, खाण्यावर पूर्ण नियत्रण होते फक्त दिनचर्येवर नव्हते.

आज यिअरली फिजिकलचे रिजल्ट आले. वाईट को. आणि ट्रायग्लिसराईड दोन्ही एकदम नॉर्मल आहेत पण मुख्य म्हणजे एच डि एल ५ प्वाईंट वाढलय. ही माझ्या करता खुप मोठी उडी आहे कारण माझ्या वरच्या डिटेल्वार पोस्टीत दिल्याप्रमाणे माझे एच डि एल काही केल्या वाढत नव्हतं. सध्या २९ हुन ३४ वर आलय. ४० वर गेलं की मोहिम फत्ते.

मी आधी लिहिलय तसं एच डि एल वाढवायला खाण्यातून काही घेऊन मला तरी फारसा फरक जाणवला नाही कधी त्यामुळे व्यायामप्र्कार बदलून पाहाणे हाच एक उपाय उरला होता तर माझ्या मते सध्या मी करत असलेला व्यायाम इंटरवल ट्रेनिंग सदरात मोडतो. गूगल मारुन बघा पण सोप्या शब्दात सांगायचे तर कुठलाही व्यायाम करताना साधारण ३० सेकंद एकदम फास्ट (झेपेल तसा) करायचा आणी पुढे ४५-६० सेकंद सवकाश.

Pages