कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी आहार

Submitted by मनू on 24 June, 2013 - 02:36

काल कोलेस्ट्रोल लेवल चेक केली तर ldl कोलेस्ट्रोल जास्त आले आहे.
तर ते कमी करण्यासाठी आहारात काय घ्यायला हवे आणि काय कमी / बंद करायला हवे याची माहिती हवी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एलडीएल १५१ , एचडीएल ४८ टोटल २१३. बीपी १४०/९० ( अँक्साइटी मुळे वाढला असण्याची एक शक्यता आहे पण आज परत चेक करीन. ) Sad
चार वर्षानंतर चेकप केले. वारंवार आता चेक करत रहायला हवे.

काल फिजिकल चे रिजल्ट आले.
टोटल को. : १९४
एल डि एलः १३४
एच डि एलः ४२.२

काल डॉ नी रिपोर्ट पाठवला त्यात नेमकं एच डि एल लिहायला विसरले. त्या निमित्तानी मग हे एक्वेशन पण शोधून काढलं.
Total Cholesterol = LDL + HDL + Triglycerides x 0.2

एल डि एल १३० च्या खाली पाहिजे, ते ४ पॉईंट वर आहे त्यामुळे निर्मल आनंद का काय म्हणतात तो अनुभवता नाही आला पण ठीक आहे. तर आनंदास कारण की वर मी एक दोन पोस्टींमध्ये उल्लेख केलाय त्याप्रमाणे माझ्या एच डि एल काही केल्या ३४ च्यावर जात नव्हते. ह्यावेळी पहिल्यांदा ४० च्या वर गेले एकदाचे. ४० ही पुरुषांकरता मिनिमम रिक्वायर्मेंट आहे. Happy
मी मागची ४-५ वर्षे वेगवगळ्या गोष्टी ट्राय करुन पाहत आहे ह्या करता त्यामुळे सध्या जे काही करत आहे ते काम करतय असं दिसतय त्यामुळे त्याची यादी इथे देतो.
व्यायामः
१) इंटरवल ट्रेनिंग : पळताना काही सेकंद खुप फास्ट पळायचे आणि नंतर साधारण १ मिनिट मिडियम पेस नी चालायचे
२) वेट ट्रेनिंग
३) रनिंग
ह्या तिन्ही गोष्टी अर्थातच एका दिवशी करत नाही. वीकडेज ना साधराण ४०-४५ मिनिटं वेट ट्रेनिंग आणि १५-२० मिनिट इंटरवल स्टाईल पळणे/चालणे. विकेंडला एकदा तरी ४-५ मैलाचा रन. दोन्ही दिवस जमले तर उत्तमच.
रनिंग आणि एच डि एल कोलेस्टेरॉल ह्याचं कनेक्श्न आहे असं मी वाचलय. ह्यावेळी मी माझ्या फिजिकल करता गेलो त्याच्या आदल्या दिवशीच ५.५-६ मैलाचा रन पुर्ण केला होता. ही एक बाब नक्कीच वेगळी होती इतर ब्ल्ड टेस्ट पेक्षा आणि त्याचा नक्की परिणाम झाला असेल एच डि एल वर.

आहार:
१) सकाळी स्टील कट ओट्स मध्ये बदाम आणि अक्रोड. ओट्स खायचा कंटाळा की त्या एवेजी व्हिट ब्रेड आणि आलमंड बटर.
२)संध्याकाळी केल आणि बीन्स सॅलड, ऑलिव ऑईल टाकून

मागच्या ब्ल्ड टेस्ट्स च्या वेळी मी ऑलिव ऑईल आणि ओट्स इतके नियमित पणे वापरत नव्हतो आणि आहाराच्या दृष्टीनी ह्या दोन्ही गोष्टी पुर्वीपेक्षा वेगळ्या होत्या म्हणजे ह्या दोन्ही गोष्टींमुळे कदाचित माझ्या एच डि एल वर चांगला परिणाम झालाय.

अजून एक सांगायचं राहिलं. मी मध्यंतरी वाचलं की हार्ट डिसिजवर सुरु असलेल्या रिसर्च मध्ये एका ट्रायल मध्ये सब्जेक्ट्स ना औषधं (स्टॅटिन्स) देऊन त्यांचे एच डि एल वाढवण्यात आले. तसं करुन सुद्धा त्यांच्या हार्ट डिसिज होण्याच्या प्रोबॅबिलिटीत काही फार फरक नाहीच झाला. पुढे ते असंही म्हणतात की ह्याचा अर्थ एच डि एल च्या क्वांटिटी ह्याचं थेट कनेक्शन नाहीये हार्ट डिसिजशी तर एच डि एल फक्त इंडिकेटर आहे. थोडक्यात एच डि एल वाढलं म्हणजे हार्ट डिसिजच्या शक्यतेचे प्रमाण कमी होईल असे नाही. हे झालं औषधं घेऊन एच डि एल वाढवण्याबद्द्ल. तुमचं एच डि एल जर नैसर्गिकरित्या वाढलं असेल तुम्ही केलेल्या तुमच्या जीवनपद्ध्तींमधल्या बदलांमुळे तर ते उत्तमच आहे.
आता नुकत्याच आलेल्या रिसर्चबद्दलच्या माहितीमधून असं कळतय की एच डि एल च्या क्वांटिटी पेक्षा त्याची एफिकसी म्हणजे वाईट कोलेस्टेरॉलला चिकटून ते वाहून नेण्याची क्षमता किती आहे हे जास्त महत्वाचे आहे. Happy

सरते शेवटी, एच डि एल वाढो न वाढो आपण आपल्या आहाराकडे लक्ष देऊन एल डि एल आणि ट्रायग्लिसराईड्स कंट्रोल मध्ये ठेवणे अगदी गरजेचे आहे. शेवटी prevention is better than cure. Happy

ऑलिव ऑईल >>> इथे लिहलय कि नाही माहित नाही पण मला याचा प्रचंड फायदा झाला होता .

बुवा छान लिहीलं आहे (आधीची पोस्ट्स वाचली नाहीयेत) पण रोज रात्री केल अँड बीन्स् सॅलॅड खाता का ते ही (फक्त किंवा सिंपल ) ऑलिव्ह ऑईल व्हिनेग्रेट घालून ?

रोज नाही जमत पण आठवड्यातून ३-४ वेळा जमवतोच.
ड्रेसिंग नाहीच वापरत. केल, ग्रेटेड पार्मझान चीझ, एक कॅन रेड किडनी बीन्स आणि वरुन ऑलिव ऑईल.

बुवा, मीही कालच अ‍ॅन्युअल चेकअप करून आले आहे.
माझ्याकडे एल्डीएल आयडियल रेंज <=९९ सांगतायत. माझं ११५ आहे. तुमच्याकडे १३० कसं काय? नकी कुठलं बरोबर?
बाकी एचडीएल ४१ व कोलेस्ट्रॉल १७६ आहे. मात्र ट्रायग्लिसराइड्स जास्त आहेत. १६९. ते कसं कमी करायचे, चर्चा झाली आहे का? नॉन एच्डीएल कोले. असा अजुन वेगळा आकडा का दाखवतात आणि?

बस्के,
तुमचा एचडीएल व एलडीएल रेशो २.८ आहे.तो ३.५ पर्यंत ठीक आहे . (माझ्या डॉ.ने काही वर्षांपूर्वी हा रेशो ५ पर्यंत
असेल तर ठीक आहे म्हणून सांगितले होते.) पण आता रिपोर्टनुसार त्याची मर्यादा ३.५ दाखवली आहे.

बस्के, तुझं बरोबर आहे. एल डि एल १०० किंवा त्यापेक्षा कमी हवं.

ट्राय बद्दल चर्चा झालेली नाही. बघायला पाहिजे. माझेही जास्त यायचे पुर्वी.

sorry mala marathit type karayla khup vel lagel, mhanun english madhe karte aahe.

based on scientific facts and experience for my husband following diet tips help

1) 3/4 cup of oatmeal daily for breakfast : steel cuts are best but they take long time to cook and they are expensive too. you can use 100% whole grain rolled oats. make it sweet with milk, nuts, fruits and honey. OR make it spicy by adding tempering made in very little olive oil over microwaved oats. top it with cilantro, tomato and lime juice

2) 1 clove of raw garlic everyday : its hard to chew it raw, so I use 2-3 tsp of yougurt, grate the garlic clove in it, sprinkle chat masala if wanted or cubes of tomato, cucumber

3) 2 tablespoons of flax seeds daily : we can use the chutney.

Have the garlic for dinner and flax seed chutney for lunch, whichever is easy

use these tips along with your medication and exercise to help lower the cholesterol

वाचनात आलं आणि मला फायदा झाला रोज एक सफर्चंद खाल्याचा. हवं तर गुगलून पहा. अर्थात मी रोज व्यायाम करते आणि जनरल लाईफ स्टाईल पण हेल्दी आहे.

परत वाचली चर्चा .
चेकप केले टोटल १६६ , एलडीएल १०६ , एचडीएल ३३ (गेल्या वेळेपे़षा कमी) आहे.
बुवांच्या पोस्टस एकदम मोटीवेशनल आहेत.
दीड वर्षात नियमित जवस खाल्ले , इसबगोल कधी कधी घेतले , वॉक रोज एक तास न चुकता. हार्ड व्यायाम केले नाहीत काही. आहारावर बराच कंट्रोल केला म्हणून कोले. कमी झाले पण एचडीएल ४८ वरुन ३३ वर आले ते परत वाढवले पाहीजे. बीपी आहेच १४०/९० गोळी सुरु केलीय. आता एकच गोल आहे ते म्हणजे वजन अजुन ५ किलो कमी करणे.

कोलेस्टेरॉल मध्ये रस असणार्‍यांसाठी नवी उपयुक्त माहिती:
गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या रक्तावर 'लिपिड प्रोफाइल' ही चाचणी करतात. त्यासाठी आपल्याला उपाशी पोटी जावे लागते. हे बर्‍याच जणांना गैरसोयीचे असते. तपासणीमध्ये Total Cholesterol, LDL-C, HDL-C, TG इ. घटक मोजले जातात.

नवीन संशोधनानुसार आता तपासणीत सुधारणा करता येते ती अशी :

अ). उपाशी पोटी असण्याची गरज नाही. ( कित्ती सुखकारक !)
ब) रक्तातले फक्त २ घटक मोजायचे : १)Total Cholest & २) HDL-C आणि मग ,
१ वजा २ = Non HDL-C ह्या घटकाची पातळी कळते जी हृदय् विकाराचे दृष्टीने अधिक उपयुक्त आहे.

@ बी विजयकुमार
नविन पध्दत अजून सगळीकडे सुरू झालेली दिसत नाहीये. २८ जानेवारीला रक्ततपासणी केली तेव्हा १२ तास काहीही खाऊ पीऊ नका असेच सांगितले होते.

तर सांगायचा मुद्दा म्हणजे त्यात प्रथमच कोलेस्टेरॉल निघाले. म्हणून माहिती मिळवण्यासाठी हा धागा शोधून काढला.
एकूण कोलेस्टेरॉल २५५.८
ट्रायग्लिसेराईड २५३.५
एचडीएल ३१.९
नॉन एचडीएल २२३.९
एलडीएल १८२.२

शिवाय डी व्हिटॅमिन फक्त ३.७ (३० पुरेसे समजले जाते)
बी१२ फक्त २४९.७ (रेंज १९७ ते ७७१)

तीन महिन्यासाठी ज्युपिरॉस १० व BioD3Max च्या गोळ्या जिवनसत्वांसाठी सुरू केल्या आहेत.

पण बीपी नॉर्मल, शर्करा नॉर्मल, वजन नॉर्मल ( पोट अजून सुटलेले नाही.:))

तर मला एवढेच विचारायचे आहे की ही औषधे आता आयुष्यभर घ्यावी लागतील का? अर्थात डोस कमी करणे हेच पहिले उद्दिष्ट्य निश्चित केले आहे.

माझ्या २ टिप्स :
#१ उपाशी पोटी सब्जा पाण्यात टाकून ५-१० मिनीटांनी ते पाणी पिणे
#२ मांसाहार आणि डेअरी थांबवणे किंवा शक्य तेवढे कमी करणे , तूप वैगेरे प्रकार पूर्वी इतक्या सहज उपलब्ध नसायचे हल्ली फार सहज उपलब्ध
आहेत त्यामुळे फार सहज खाल्ले जातात. मला स्वतःला ह्या दोन्ही गोष्टींचा खूप फायदा झाला (मांसाहार आणि डेअरी दोन्ही बंद केले).

majhe total 236 varun 188 ani ldl 158 varun 117 var aanale, by following Dr biswroop chaudhary- DIP diet for 4/5 months. tyanche diet videos you tube var available aahet.

Pages