माझ्या लेकीला हस्तकला खूप आवडते. त्यातल्या त्यात क्ले तर अतिशयच प्रिय.
साध्या क्लेच्या वस्तु काही काळानं खराब होतात आणि टाकून द्याव्या लागतात. पण त्यावर उपाय म्हणून माझ्या मागे लकडा लावून तिनं पॉलिमर क्ले घ्यायला लावला. दुकानात शोधला पण मिळाला नाही. शेवटी http://www.itsybitsy.in/ वर मिळाला. तो चारच दिवसांपूर्वी घरी आला. मग काय? लेक, क्ले आणि युट्युब याचं एक त्रिकुटच जमलं. त्यातून घडलेल्या या कलाकृती. या कलाकृती अगदी छोट्या छोट्या आहेत. अशांना चेन्स लावून चार्मस किंवा कीचेन्स बनवतात. मायबोलीवर आधीही काहींनी पॉलिमर क्लेचे इअरिंग्ज, पेंडन्टस वगैरे करून फोटो टाकलेले आहेत.
तर या माझ्या लेकीच्या कलाकृती :
टाकोज :
मुलींचे चेहरे. ती तोंड आहेत, मिशा नव्हेत :
त्यातल्या पिवळीचे केस अतिशय निगुतीनं केलेत :
टोमॅटो, अननस, योगर्ट पॉट, ग्रीन अॅपल. यापैकी अननस आणि ग्रीन अॅपल क्युब्ड फ्रुट्स (फळांच्या नेहमीच्या आकाराऐवजी क्युब करून बनवलेली) आहेत.
फ्राईड एग्ज. त्यातलं एक शांत आहे म्हणून निळं आणि दुसरं रागावलंय म्हणून ऑरेंज.
१२च्या जागी आहे तो रिमोट - रंगिबेरंगी बटनांचा. त्यानंतर (घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं) हार्ट, कपकेक, फ्रेंच फ्राईज प्लॅटर, चप्पल, चीज. इतकं रँडम दुसरं काहीही सापडणार नाही कधी कुणाला!
अॅलिस इन वंडरलँड मधलं 'इट मी' बिस्कीट आणि चिकन नगेटस विथ थ्री सॉस प्लॅटर. या प्लॅटरमधल्या चॉपस्टिक्सनी जरा गुळमुळीत धोरण स्विकारलंय.
मी ही जरा वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले.
आता हे सगळं बेक करायचंय. आणि त्यानंतर या वस्तुंना ग्लेज लावायचंय. ते ग्लेज काही केल्या इथे कुठे मिळत नाहीये. कोणाला माहित असेल तर प्लीज सांगा.
लेकीच्या इतर काही हस्तकलेच्या वस्तु आणि थोडे चित्रकलेचे नमुने:
स्पंजचं टेडीबेअर :
फोमपासून बनवलेली पेस्ट्री. पॅकिंगमध्ये जो फोम येतो त्याचा ठोकळा कापून, त्याला रंगवून आणि वरून डेकोमेटनं आयसिंग केलं आहे.
दगड रंगवून केलेला स्नो-कॅप्ड माउंटन. त्यातून नदीही वाहताना दिसत आहे.
अॅक्रिलिकनं कॅनव्हासवर 'Four Seasons'. सीझन्सच्या क्रमात घोळ झालाय मात्र.
हे आधीचे काही :
ट्रान्स्परसीवर काढलेली फुलपाखरं
पहिलंवहिलं कॅनव्हास पेंटिंग
तिला एक परीकथा लिहायची होती त्यातल्या पर्यांचं गावाचं स्केच
ही गेल्या वर्षीच्या समर प्रोजेक्टमधली पानं
आज ( मंगळवार, २४ डिसेंबर २०१३) लारानं बिल्डिंगमधल्या मुलांसाठी ओरिगामी वर्कशॉप आयोजित केलं होतं. (अर्थात चार्जेस वगैरे नव्हते.) सकाळी १० ते ११.३० च्या बॅचमध्ये ६ मुलं आणि दुपारी ३.३० ते ५ च्या बॅचमध्ये ७ मुलं आणि एक हौशी आई असे विद्यार्थी होते. मुलं ५ ते १० अशा वयोगटातली होती. मस्त मजा आली आम्हाला आणि मुलांनाही. लारानं त्यांना ख्रिसमस ट्री, बलून, फेस चेंजिंग मॅन, ट्युलिप, डेस्क, पक्षी, कॅमेरा वगैरे प्रकार शिकवले. त्याची काही क्षणचित्रे :
आधी दोन दिवस जोरदार प्रॅक्टिस
वर्कशॉपची जय्यत तयारी
वर्कशॉप जोरात सुरू
अरे वा ! मस्तच ..... माशे
अरे वा ! मस्तच ..... माशे ज्यु. साठी पोट्यांशीयल कॅन्डीडेट आहे
आमच्या घरीही असलेच प्रयोग चालू असतात.... सेम एजग्रुपच्या आहेत वाटत आपल्या लेकी
आमच अजून प्ले डो वरच भागतय.... :सुटकेचा श्वास सोडणारी बाहुली:
विनार्च माशेबद्दल काही बोलूच
विनार्च
माशेबद्दल काही बोलूच नकोस. भाग घ्यायचाय भाग घ्यायचाय म्हणून डोकं उठवलं होतं. पण एवढी काही तिची तयारी आहे (आणि तिच्यापेक्षाही माझी तयारी आहे) असं वाटलं नाही त्यामुळे समजूत घालावी लागली. पण पुढे शेफ होण्याचीच मनिषा बाळगून आहे.
व्वॉव!! मस्तच केलय सगळं
व्वॉव!! मस्तच केलय सगळं
टाकोज तर लागला
ऑल द बेस्ट लारा
वा !!! कला आहे बोटांत
वा !!!
कला आहे बोटांत
वा !!! कला आहे बोटांत
वा !!!
कला आहे बोटांत
शाब्बास$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
शाब्बास$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
मामी. लाराला शाबासकी. टाकोज
मामी. लाराला शाबासकी.
टाकोज भारी मस्त झालेत.
जयु, श्री, kiranyake, अन्जू,
जयु, श्री, kiranyake, अन्जू, रूनी पॉटर, सिंडरेला, स्वाती२, वर्षू नील, सुमेधाव्ही, झकासराव, विनार्च, लाजो, जाई, वर्षा_म, नंदिनी ...... सगळ्यांना धन्यवाद.
बुजगावणं, गर्ल विथ अ बलुन
बुजगावणं, गर्ल विथ अ बलुन मस्त. टाकोज लैच भारी झालेत. आवडेश.
व्वा! मस्त बनवलयं.. टॉकोज
व्वा! मस्त बनवलयं.. टॉकोज अप्रतिम
सहिये हे
सहिये हे
सर्व फोटो पान्ढरे चौकोन दिसत
सर्व फोटो पान्ढरे चौकोन दिसत असल्याने नो कॉमेण्ट!
डान्स करणारी आणि त्याच्या
डान्स करणारी आणि त्याच्या बरोबरच्या सर्व कलाक्रुती खुपच सुदर.
सर्व फोटो पान्ढरे चौकोन दिसत
सर्व फोटो पान्ढरे चौकोन दिसत असल्याने नो कॉमेण्ट! >>> बिचारे लिंबूभाऊ
मस्त. आम्ही सहावी का सातवीत
मस्त. आम्ही सहावी का सातवीत ती असताना प्लेडो ची अक्खी डायजेस्टिव सिस्टिम बनविलेली शाळेच्या प्रॉजेक्ट साठी. एक एक्स्ट्रा पॅक कायम रिझर्व मध्ये ठेवून द्यावा अडीनडीला कामी येतो.
चिंटुल्या गोष्टी बार्बीच्या घरासाठी बनवायचे खूप व्हिडिओज आहेत मजा येते.
मामी मस्तच. लाराला शाबासकी दे
मामी मस्तच. लाराला शाबासकी दे माझ्याकडून.
मस्त!!
मस्त!!
मस्त
मस्त
मामी लेकीला शाब्बासकी. मस्तच
मामी लेकीला शाब्बासकी. मस्तच जमलय सगळं.
ग्लेझसाठी ट्रान्स्परंट नेलपॉलिश वापरता येईल का गं? त्यात चमकी वालं पण मिळतं. प्रयोग करून पहायला काय हरकत आहे?
मामी, सुप्पर बनवल्यात सगळ्या
मामी, सुप्पर बनवल्यात सगळ्या गोष्टी! मला लयच आवड्ल्या.....
फारच मस्त!
फारच मस्त!
अय्या कसलं मस्त आहे मला पण
अय्या कसलं मस्त आहे
मला पण ऑफिसातुअन घरी जाऊन क्ले आणून असलं काही तरी करुन बघावसं वाटायला लागलय
कांदापोहे, चनस, अश्विनी के,
कांदापोहे, चनस, अश्विनी के, limbutimbu, पिन्कि, अश्विनी के, अश्विनीमामी, जागू, मंजूडी, प्रितीभुषण, दक्षिणा, अखी, पौर्णिमा, रिया ... धन्यवाद.
लिंबूभाऊ, ऑफिसात प्रचि दिसत नाहीत हे माहित असूनही दरवेळी तुम्ही जी चिकाटी दाखवता त्याबद्दल तुम्हाला दंडवत!
दक्षे, नेलपेंटच्या टॉप कोटिंगची आयडिया बाद केली गेली आहे. लावेन तर ग्लेझच लावेन अशी प्रतिज्ञा त्यांनी केली आहे.
>>>> ऑफिसात प्रचि दिसत नाहीत
>>>> ऑफिसात प्रचि दिसत नाहीत हे माहित असूनही दरवेळी तुम्ही जी चिकाटी दाखवता त्याबद्दल तुम्हाला दंडवत! <<<<<
अहो मला कशाला दन्डवत?
मायबोलीवर दिलेली चित्र चिकटवायची सुविधा काही निवडक मोजके महाभाग जरुर जरुर वापरतात त्यान्ना शोधत अस्तो बापडा मी, त्या महाभागान्ना खरतर दन्डवत घातला पाहिजे! नै का?
मस्त. मामी, क्राफ्ट आणी रंग,
मस्त.
मामी, क्राफ्ट आणी रंग, पेंटींगचं सामान मिळणार्या दुकानात ग्लेझ मिळेल. मला परवा औरंगाबादच्या माझ्या नेहेमीच्या क्राफ्ट स्टोअरमध्ये ग्लेझ, कोटींग स्प्रे असं बरंच सामान दिसलं होतं. गेल्यावर्षी तर तिथे पॉलिमर क्ले पण दिसली होती.
धन्स अल्पना.
धन्स अल्पना.
मामी खूप सुंदर. मी लेकीलाही
मामी खूप सुंदर. मी लेकीलाही दाखवले फोटो.
सगळ्या गोष्टी खूप सुंदर जमल्यात.
फारच क्यूट कलाकृती. टाकोज खूप
फारच क्यूट कलाकृती. टाकोज खूप आवडले.
डान्सर गोड आहे एकदम.
डान्सर गोड आहे एकदम.
सुंदर.. लाराकडून मी काही
सुंदर.. लाराकडून मी काही वस्तू मागून घेणार आता !
Pages