पॉलिमर क्ले ची कला आणि इतरही काहीबाही

Submitted by मामी on 16 June, 2013 - 10:18

माझ्या लेकीला हस्तकला खूप आवडते. त्यातल्या त्यात क्ले तर अतिशयच प्रिय.

साध्या क्लेच्या वस्तु काही काळानं खराब होतात आणि टाकून द्याव्या लागतात. पण त्यावर उपाय म्हणून माझ्या मागे लकडा लावून तिनं पॉलिमर क्ले घ्यायला लावला. दुकानात शोधला पण मिळाला नाही. शेवटी http://www.itsybitsy.in/ वर मिळाला. तो चारच दिवसांपूर्वी घरी आला. मग काय? लेक, क्ले आणि युट्युब याचं एक त्रिकुटच जमलं. त्यातून घडलेल्या या कलाकृती. या कलाकृती अगदी छोट्या छोट्या आहेत. अशांना चेन्स लावून चार्मस किंवा कीचेन्स बनवतात. मायबोलीवर आधीही काहींनी पॉलिमर क्लेचे इअरिंग्ज, पेंडन्टस वगैरे करून फोटो टाकलेले आहेत.

तर या माझ्या लेकीच्या कलाकृती :

टाकोज :

मुलींचे चेहरे. ती तोंड आहेत, मिशा नव्हेत :

त्यातल्या पिवळीचे केस अतिशय निगुतीनं केलेत :

टोमॅटो, अननस, योगर्ट पॉट, ग्रीन अ‍ॅपल. यापैकी अननस आणि ग्रीन अ‍ॅपल क्युब्ड फ्रुट्स (फळांच्या नेहमीच्या आकाराऐवजी क्युब करून बनवलेली) आहेत.

फ्राईड एग्ज. त्यातलं एक शांत आहे म्हणून निळं आणि दुसरं रागावलंय म्हणून ऑरेंज.

१२च्या जागी आहे तो रिमोट - रंगिबेरंगी बटनांचा. त्यानंतर (घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं) हार्ट, कपकेक, फ्रेंच फ्राईज प्लॅटर, चप्पल, चीज. इतकं रँडम दुसरं काहीही सापडणार नाही कधी कुणाला! Happy

अ‍ॅलिस इन वंडरलँड मधलं 'इट मी' बिस्कीट आणि चिकन नगेटस विथ थ्री सॉस प्लॅटर. या प्लॅटरमधल्या चॉपस्टिक्सनी जरा गुळमुळीत धोरण स्विकारलंय. Happy

मी ही जरा वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले.

आता हे सगळं बेक करायचंय. आणि त्यानंतर या वस्तुंना ग्लेज लावायचंय. ते ग्लेज काही केल्या इथे कुठे मिळत नाहीये. कोणाला माहित असेल तर प्लीज सांगा.

लेकीच्या इतर काही हस्तकलेच्या वस्तु आणि थोडे चित्रकलेचे नमुने:

स्पंजचं टेडीबेअर :

फोमपासून बनवलेली पेस्ट्री. पॅकिंगमध्ये जो फोम येतो त्याचा ठोकळा कापून, त्याला रंगवून आणि वरून डेकोमेटनं आयसिंग केलं आहे.

दगड रंगवून केलेला स्नो-कॅप्ड माउंटन. त्यातून नदीही वाहताना दिसत आहे. Happy

अ‍ॅक्रिलिकनं कॅनव्हासवर 'Four Seasons'. सीझन्सच्या क्रमात घोळ झालाय मात्र.

हे आधीचे काही :
ट्रान्स्परसीवर काढलेली फुलपाखरं

पहिलंवहिलं कॅनव्हास पेंटिंग

तिला एक परीकथा लिहायची होती त्यातल्या पर्‍यांचं गावाचं स्केच

ही गेल्या वर्षीच्या समर प्रोजेक्टमधली पानं

आज ( मंगळवार, २४ डिसेंबर २०१३) लारानं बिल्डिंगमधल्या मुलांसाठी ओरिगामी वर्कशॉप आयोजित केलं होतं. (अर्थात चार्जेस वगैरे नव्हते.) सकाळी १० ते ११.३० च्या बॅचमध्ये ६ मुलं आणि दुपारी ३.३० ते ५ च्या बॅचमध्ये ७ मुलं आणि एक हौशी आई असे विद्यार्थी होते. मुलं ५ ते १० अशा वयोगटातली होती. मस्त मजा आली आम्हाला आणि मुलांनाही. लारानं त्यांना ख्रिसमस ट्री, बलून, फेस चेंजिंग मॅन, ट्युलिप, डेस्क, पक्षी, कॅमेरा वगैरे प्रकार शिकवले. त्याची काही क्षणचित्रे :

आधी दोन दिवस जोरदार प्रॅक्टिस

वर्कशॉपची जय्यत तयारी

वर्कशॉप जोरात सुरू

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त जमलीये पॉलिमर क्ले कला. गेल्या वर्षी कधीतरी गणपतीत बहुतेक माझ्या लेकीची पॉलिमर क्ले कला टाकली होती.
गेल्या वर्षीपर्यंत तिलाही असं काय काय बनवायची आवड होती खूप.

मामे, मस्त...
होममेड (फेक) पॉलीमर क्ले करता येतो. मीठ, कॉर्नस्टार्च अशी काहीतरी रेस्पी आहे. शोधून देते गं थांब.

ग्लेझिंग मिळते. प्रोफेशनल आर्ट मटेरियल वाल्या दुकानात जाऊन बघ. किंवा जिथे कोल्ड सिरॅमिक वगैरेसाठी वस्तू मिळतात तिथेही मिळेल.

गजानन, सायो, sonalisl, चिनूक्स, शुगोल .....धन्यवाद.

बर्‍याच फोटोत ते रुपयाचं कॉइन आहे, का बरं? >> गजानन आणि नीधपनं उत्तर दिलंय.

एव्ही, भाऊ ... धन्यवाद.

नी, धन्स. बघते. वाचली पण ती रेग्युलर मॉडेलिंग क्लेची आहे. हा प्ले डो वाला क्ले घरी करता येतो पण नंतर खराब होतो.

सायो, तुझ्या लेकीच्या कलेची लिंक दे ना.

हो का? पण त्याला शॅलॅकने सील केले की टिकतो तो ना?
मी जी स्पेसिफिक पाह्यली होती ती लिंक मिळत नाहीये आत्ता. सापडली की देते गं.

मामी
आई आणि लेक दोघींच्याही उत्साहाला सलाम. खूपच सुंदर कला आहे तिची. मला सगळंच आवडलं. माझ्या लेकीला दाखवलं तर ती खूष झाली.

वॉव.

मस्त Happy

मामी, http://www.maayboli.com/node/38186
या आधी तिथे पिझ्झा, पास्ता वगैरे बनवलेलं मजा म्हणून.
>>> हो आठवलं. हे बघितलं होतं. मस्त बनवलंय.

या आणखी काही आधीच्या कलाकृती. प्ले डो पासून बनवल्या आहेत. तीन चार वर्षांपूर्वीच्या आहेत. :

डान्सर :

बुजगावणं :

गर्ल विथ अ बलून :

अरे वा ! मस्तच ..... Happy
आमच्या घरीही असलेच प्रयोग चालू असतात.... सेम एजग्रुपच्या आहेत वाटत आपल्या लेकी Happy
आमच अजून प्ले डो वरच भागतय.... :सुटकेचा श्वास सोडणारी बाहुली:

Pages