पॉलिमर क्ले ची कला आणि इतरही काहीबाही

Submitted by मामी on 16 June, 2013 - 10:18

माझ्या लेकीला हस्तकला खूप आवडते. त्यातल्या त्यात क्ले तर अतिशयच प्रिय.

साध्या क्लेच्या वस्तु काही काळानं खराब होतात आणि टाकून द्याव्या लागतात. पण त्यावर उपाय म्हणून माझ्या मागे लकडा लावून तिनं पॉलिमर क्ले घ्यायला लावला. दुकानात शोधला पण मिळाला नाही. शेवटी http://www.itsybitsy.in/ वर मिळाला. तो चारच दिवसांपूर्वी घरी आला. मग काय? लेक, क्ले आणि युट्युब याचं एक त्रिकुटच जमलं. त्यातून घडलेल्या या कलाकृती. या कलाकृती अगदी छोट्या छोट्या आहेत. अशांना चेन्स लावून चार्मस किंवा कीचेन्स बनवतात. मायबोलीवर आधीही काहींनी पॉलिमर क्लेचे इअरिंग्ज, पेंडन्टस वगैरे करून फोटो टाकलेले आहेत.

तर या माझ्या लेकीच्या कलाकृती :

टाकोज :

मुलींचे चेहरे. ती तोंड आहेत, मिशा नव्हेत :

त्यातल्या पिवळीचे केस अतिशय निगुतीनं केलेत :

टोमॅटो, अननस, योगर्ट पॉट, ग्रीन अ‍ॅपल. यापैकी अननस आणि ग्रीन अ‍ॅपल क्युब्ड फ्रुट्स (फळांच्या नेहमीच्या आकाराऐवजी क्युब करून बनवलेली) आहेत.

फ्राईड एग्ज. त्यातलं एक शांत आहे म्हणून निळं आणि दुसरं रागावलंय म्हणून ऑरेंज.

१२च्या जागी आहे तो रिमोट - रंगिबेरंगी बटनांचा. त्यानंतर (घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं) हार्ट, कपकेक, फ्रेंच फ्राईज प्लॅटर, चप्पल, चीज. इतकं रँडम दुसरं काहीही सापडणार नाही कधी कुणाला! Happy

अ‍ॅलिस इन वंडरलँड मधलं 'इट मी' बिस्कीट आणि चिकन नगेटस विथ थ्री सॉस प्लॅटर. या प्लॅटरमधल्या चॉपस्टिक्सनी जरा गुळमुळीत धोरण स्विकारलंय. Happy

मी ही जरा वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले.

आता हे सगळं बेक करायचंय. आणि त्यानंतर या वस्तुंना ग्लेज लावायचंय. ते ग्लेज काही केल्या इथे कुठे मिळत नाहीये. कोणाला माहित असेल तर प्लीज सांगा.

लेकीच्या इतर काही हस्तकलेच्या वस्तु आणि थोडे चित्रकलेचे नमुने:

स्पंजचं टेडीबेअर :

फोमपासून बनवलेली पेस्ट्री. पॅकिंगमध्ये जो फोम येतो त्याचा ठोकळा कापून, त्याला रंगवून आणि वरून डेकोमेटनं आयसिंग केलं आहे.

दगड रंगवून केलेला स्नो-कॅप्ड माउंटन. त्यातून नदीही वाहताना दिसत आहे. Happy

अ‍ॅक्रिलिकनं कॅनव्हासवर 'Four Seasons'. सीझन्सच्या क्रमात घोळ झालाय मात्र.

हे आधीचे काही :
ट्रान्स्परसीवर काढलेली फुलपाखरं

पहिलंवहिलं कॅनव्हास पेंटिंग

तिला एक परीकथा लिहायची होती त्यातल्या पर्‍यांचं गावाचं स्केच

ही गेल्या वर्षीच्या समर प्रोजेक्टमधली पानं

आज ( मंगळवार, २४ डिसेंबर २०१३) लारानं बिल्डिंगमधल्या मुलांसाठी ओरिगामी वर्कशॉप आयोजित केलं होतं. (अर्थात चार्जेस वगैरे नव्हते.) सकाळी १० ते ११.३० च्या बॅचमध्ये ६ मुलं आणि दुपारी ३.३० ते ५ च्या बॅचमध्ये ७ मुलं आणि एक हौशी आई असे विद्यार्थी होते. मुलं ५ ते १० अशा वयोगटातली होती. मस्त मजा आली आम्हाला आणि मुलांनाही. लारानं त्यांना ख्रिसमस ट्री, बलून, फेस चेंजिंग मॅन, ट्युलिप, डेस्क, पक्षी, कॅमेरा वगैरे प्रकार शिकवले. त्याची काही क्षणचित्रे :

आधी दोन दिवस जोरदार प्रॅक्टिस

वर्कशॉपची जय्यत तयारी

वर्कशॉप जोरात सुरू

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुड जॉब लारा Happy
टॅकोज सही आहेत अगदी !

मामी लमाशा ची रेसिपी वापरून ती रंगित बनवुन दे लेकीला. स्वस्त पडेल आणि टिकेलही. लहान मुलांना ती चांगली पडते. थोडी सॉफ्ट असते म्हणून छान आकार देता येतात. ग्लेझिंग साठी रेझिन आणि हार्डनर अशी दोन केमिकल्स मिक्स करुन कोटिंग करता येते. पण हे तिला नाही करता येणार मोठ्या कुणितरी करुन द्यावं लागेल. कोटींग करून वस्तु सुकायला एक दिवस लागतो. तसेच एक हॉट नावाचे ग्लेझिंग केमिकल पण मिळते.

माझ्या 'क्ले'कारीमध्ये मी वॉल म्युरल्स साठी वापरलेय बघ ग्लॉसीनेस् करण्यासाठी रेझिन

मुंबईत माहित नाही पण तुला हवे तर पुण्यात हे रेझिन कुठे मिळते ते मी सांगु शकेन Happy

Light 1 पेटला....अजुन एक आठवलं सध्या तिला तु थिक क्लियर वॉर्निश देउ शकतेस. एशियन पेन्ट्स चा १०० मिली चा डबा मिळेल. लारा ला ते ब्रश ने लावता येईल क्ले च्या वस्तूंवर. तीव्र वासांची अ‍ॅलर्जी असेल तर सांभाळा फक्त.

लईच मोठ्ठी पोस्ट झाली. असो तुम्हा मायलेकींना हॅप्पी 'क्ले'कारी. Happy

माशा, मृण्मयी, सायो, दिनेशदा, डॅफोडिल्स, नीरजा (मंजूडीची),पाषाणभेद, बस्के, स्वाती_आंबोळे ...... धन्यवाद सगळ्यांनाच.

टाकोज आवडलेल्या सगळ्यांना तेच टाकोज खायलाही मिळतील. Proud

डॅफो तुझ्या टिप्स खूप उपयोगी आहेत. त्याकरता विशेष धन्यवाद. Happy

मस्तं. अशी रंगीत माती मिळते की रंगही आपण मिसळायचे?
आम्ही मागे आणली होती ती ऑलरेडी रंगीत होती. बाळ्याने सगळुआ एकमेकात मिसळून एकच करडा गोळा केला शेवटी. Happy

नवी भरपण आवडली. फुलपाखरांच्या पंखांवरचे डीटेल्स भारी आहेत! फेदरआर्टपण सुंदर! सीझन्सचं पेंटिंग फार आवडलं. अशी गडबड चालते. ब्लेम इट ऑन ग्लोबल वॉर्मिंग! Happy

वॉव मामी! भारी आहे!
मला ते फोर सिजन्सचे चित्र फार आवडले, म्हणजे ते जसं काढलय ती कल्पना, सुंदर! Happy
आणि ते शेवटच्या चित्रात एवढी रंगीत पिसं कुठून आणली? मस्त दिसतयं,
क्लेच्या वस्तु पण छान. पण एकदा बनवल्या की पुन्हा तो क्ले वापरता येतो?

नवी भर आवडली. समर प्रोजेक्टच्या आयड्या तो एक लहान मुलांच्या क्राफ्ट्साठी धागा आहे तिथे लिहाल का ?

अरे व्वा.. नवे नमुने सह्हिच आहेत Happy

मला ते ४ सिझन्स चं पेंटिंग खुप आवडलं Happy परीचं गाव, पंखास्कर्ट वाली डॉली पण मस्त आहेत एकदम!

मामी, लारा ला स्पेशल शाबासकी दे Happy

अरे व्वा! नविन कलाकृती ही एकदम भारी आहेत Happy
तुमच्या लेकीला शाब्बासकी विथ डेअरी मील्क सिल्क माझ्यातर्फे Happy

धन्यवाद मंडळी.

माधवी, फोर सीझन्सची कल्पना तिच्या ड्रॉइंग टीचरची आहे. बाकी पेंटिंग लेकीनं केलंय.

रंगित पिसांच एक पॅकेटच हॉबी आयडियामध्ये मिळालं.

सिंडी, हो. त्या धाग्यावर टाकते.

लाजो, Happy

लाराला शाब्बासकी.. आणि मामीलाही.. एव्हडे सगळे ती करते तेव्हा तुझी मदत भरपुर असणार... हाताखाली करावे लागत असेल ना Happy

Pages