पॉलिमर क्ले ची कला आणि इतरही काहीबाही

Submitted by मामी on 16 June, 2013 - 10:18

माझ्या लेकीला हस्तकला खूप आवडते. त्यातल्या त्यात क्ले तर अतिशयच प्रिय.

साध्या क्लेच्या वस्तु काही काळानं खराब होतात आणि टाकून द्याव्या लागतात. पण त्यावर उपाय म्हणून माझ्या मागे लकडा लावून तिनं पॉलिमर क्ले घ्यायला लावला. दुकानात शोधला पण मिळाला नाही. शेवटी http://www.itsybitsy.in/ वर मिळाला. तो चारच दिवसांपूर्वी घरी आला. मग काय? लेक, क्ले आणि युट्युब याचं एक त्रिकुटच जमलं. त्यातून घडलेल्या या कलाकृती. या कलाकृती अगदी छोट्या छोट्या आहेत. अशांना चेन्स लावून चार्मस किंवा कीचेन्स बनवतात. मायबोलीवर आधीही काहींनी पॉलिमर क्लेचे इअरिंग्ज, पेंडन्टस वगैरे करून फोटो टाकलेले आहेत.

तर या माझ्या लेकीच्या कलाकृती :

टाकोज :

मुलींचे चेहरे. ती तोंड आहेत, मिशा नव्हेत :

त्यातल्या पिवळीचे केस अतिशय निगुतीनं केलेत :

टोमॅटो, अननस, योगर्ट पॉट, ग्रीन अ‍ॅपल. यापैकी अननस आणि ग्रीन अ‍ॅपल क्युब्ड फ्रुट्स (फळांच्या नेहमीच्या आकाराऐवजी क्युब करून बनवलेली) आहेत.

फ्राईड एग्ज. त्यातलं एक शांत आहे म्हणून निळं आणि दुसरं रागावलंय म्हणून ऑरेंज.

१२च्या जागी आहे तो रिमोट - रंगिबेरंगी बटनांचा. त्यानंतर (घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं) हार्ट, कपकेक, फ्रेंच फ्राईज प्लॅटर, चप्पल, चीज. इतकं रँडम दुसरं काहीही सापडणार नाही कधी कुणाला! Happy

अ‍ॅलिस इन वंडरलँड मधलं 'इट मी' बिस्कीट आणि चिकन नगेटस विथ थ्री सॉस प्लॅटर. या प्लॅटरमधल्या चॉपस्टिक्सनी जरा गुळमुळीत धोरण स्विकारलंय. Happy

मी ही जरा वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले.

आता हे सगळं बेक करायचंय. आणि त्यानंतर या वस्तुंना ग्लेज लावायचंय. ते ग्लेज काही केल्या इथे कुठे मिळत नाहीये. कोणाला माहित असेल तर प्लीज सांगा.

लेकीच्या इतर काही हस्तकलेच्या वस्तु आणि थोडे चित्रकलेचे नमुने:

स्पंजचं टेडीबेअर :

फोमपासून बनवलेली पेस्ट्री. पॅकिंगमध्ये जो फोम येतो त्याचा ठोकळा कापून, त्याला रंगवून आणि वरून डेकोमेटनं आयसिंग केलं आहे.

दगड रंगवून केलेला स्नो-कॅप्ड माउंटन. त्यातून नदीही वाहताना दिसत आहे. Happy

अ‍ॅक्रिलिकनं कॅनव्हासवर 'Four Seasons'. सीझन्सच्या क्रमात घोळ झालाय मात्र.

हे आधीचे काही :
ट्रान्स्परसीवर काढलेली फुलपाखरं

पहिलंवहिलं कॅनव्हास पेंटिंग

तिला एक परीकथा लिहायची होती त्यातल्या पर्‍यांचं गावाचं स्केच

ही गेल्या वर्षीच्या समर प्रोजेक्टमधली पानं

आज ( मंगळवार, २४ डिसेंबर २०१३) लारानं बिल्डिंगमधल्या मुलांसाठी ओरिगामी वर्कशॉप आयोजित केलं होतं. (अर्थात चार्जेस वगैरे नव्हते.) सकाळी १० ते ११.३० च्या बॅचमध्ये ६ मुलं आणि दुपारी ३.३० ते ५ च्या बॅचमध्ये ७ मुलं आणि एक हौशी आई असे विद्यार्थी होते. मुलं ५ ते १० अशा वयोगटातली होती. मस्त मजा आली आम्हाला आणि मुलांनाही. लारानं त्यांना ख्रिसमस ट्री, बलून, फेस चेंजिंग मॅन, ट्युलिप, डेस्क, पक्षी, कॅमेरा वगैरे प्रकार शिकवले. त्याची काही क्षणचित्रे :

आधी दोन दिवस जोरदार प्रॅक्टिस

वर्कशॉपची जय्यत तयारी

वर्कशॉप जोरात सुरू

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे हे दिसलेच नव्हते. फारच छान. सर्वच कलाकृती आवडल्या.

ती साईट पण खुपच उपयोगी आहे.

४ सिजन्स एकदम सही.
टु थम्ब्ज अप. Happy

नाहीतर सगळा पसारा आवरणे हेच मोठे काम असते >>> वस्तु करण्यात मदत नाही पण पसारा बरेचदा मीच आवरते. यावेळी तिलाच आवरायला सांगितला पण आता तिचं क्राफ्टचं कपाट उघडण्याची भिती वाटतेय. बदाबदा गोष्टी कोसळतील त्यातून बहुतेक.

लेकीच्या शाळेत हिंदी विषयांतर्गत एक स्कीट सादर करायचे होते. त्यातल्या प्रॉप्समध्ये काही टी-बॅग्जची गरज होती. साधं सोपं असेल तर ते आयुष्य कसं म्हणता येईल बरं? त्यामुळे हिंदी टीचरनं खर्‍या बॅग्ज न वापरता त्या घरी बनवाव्यात असा सल्ला दिला. कारण खर्‍या बॅग्ज वापरल्या तर वाया जातील. म्हणून मग लेक आणि तिची मदतनीस (म्हणजे मी), थोडे कागद, थोड्या स्टेपरल पीन्स आणि दोघींचे मिळून विमेन-आवर्स = ९० मिनिटे अशी घसघशीत बचत करत आम्ही हा प्रोजेक्ट पार पाडला. अर्थात तक्रार नाहीच. नाहीतर टी-बॅग्ज बनवायचा प्रसंग तर दूर विचारही कधी मनाला शिवला नसता. तर त्याची झलक :

टी-बॅग्ज करता पेपर नॅपकीन्सच्या आतील लायनिंग वापरलं आहे. आणि कव्हर करता तो पेपर नॅपकीन वापरला आहे. एका ब्राऊन कलरच्या जाडसर कागदाचे लहान तुकडे करून ते चहा पावडर म्हणून वापरले. जास्त वेळ लागला असेल तर हे तुकडे करायलाच बाकी काम सोपं होतं.

टी-बॅग्जचे दोरे आणि टॅग्ज बनवले.

ग्लू न वापरता स्टेपलच करायचं असा फतवा लेकीनं काढल्यानं पातळ टिश्यु योग्य आकारात कापून घेतल्यावर त्याला असं स्टेपल केलं.

मग आतला भाग बाहेर काढला (inside out). शेजारी खरी टी-बॅग आकाराकरता ठेवली आहे.

त्यात कागदी चहा भरला.

डिप-डिप चहा तय्यार!

काही अगम्य कारणास्तव कव्हर्सना बाहेरून स्टेपल करण्याचंच लेकीनं ठरवलं होतं. त्यामुळे ते तसं

मामी, आता इतर काहीबाही मध्ये सगळं टाकू नका. शोधायला अवघड जाईल
छान चहा केला आहे, तो छानपैकी धागा उघडून टाका बरं. Happy

मिलिंदा, असं जाता येता धागे काढणं बरं न्हवं. Happy

अल्पना, छे गं. अगदीच पुचाट आहे हा प्रोजेक्ट. पण अशा टी-बॅग्ज करण्याचं कधी डोक्यातही येणार नाही म्हणून केल्यावर इथे टाकल्या. तशाही या बघूनही कोण कशाकरता टी-बॅग्ज करतील. फारतर 'एप्रिल-फूल' करायला ही आयडिया वापरता येइल. Proud

सगळं घरी करा म्हणणार्‍यांना उलटं टांगून मिरच्यांची धुरी द्यायला हवी >>> सायो, नशिब की बात ये है की हमरे इस्कूल मे घरवालों को कधीकधीच तकलीप देते है|

धन्यवाद लोक्स. Happy

मागे ती गणेशोत्सवातली स्पर्धा होती ना खोटे खाद्यपदार्थ बनवायची, तसं काही असेल तर चालतिल अश्या टीबॅग्ज.

तसंही शाळेतून मागवले जाणारे बरेच प्रोजेक्ट्स असेच कशासाठी करावं कॅटेगिरीमधलेच असतात. Happy

त्यापेक्षा टीबॅग्ज वापरून उन्हात वाळवून वापरल्या असत्या तुमच्या कलेला तर ? Uhoh
काल अख्खा दिवस अंतराळवीरा(वीरीणी) चे शीरस्त्राण बनवण्यात काढलाय Sad

त्यापेक्षा टीबॅग्ज वापरून उन्हात वाळवून वापरल्या असत्या तुमच्या कलेला तर ? >>> मीही हा शॉर्टकट सुचवला होता पण खर्‍या नाही म्हणजे कोणत्याही स्वरूपात नाही असं लेकीचं म्हणणं पडलं. तसंही एका दिवसात हव्या होत्या.

काल अख्खा दिवस अंतराळवीरा(वीरीणी) चे शीरस्त्राण बनवण्यात काढलाय

>>> मिलिंदा, धागा काढून टाक की त्यात. Happy नाहीतर इथे टाक.

भारी! Happy
ती स्वतः या गोष्टी हौशीने करते याचं कौतुक आहेच, पण आणखी पोराथोरांना सामिल करून घेते हे आणखी कौतुकाचं! Happy

खूप मस्त बनविले. आहे आजकाल मुलांना ख्रिसमस ट्री बनव णे हा ही एक प्रो जेक्ट असतो. काल मी परत येताना लिफ्ट मध्ये एक बाळ व ताई यांचे संभाषण चालू होते. हातात थर्माकोलचा हिरवा कागद चिकटवलेला ट्री.

ताई: मग काय म्हणाली टीचर. व्हेरीगूड? गुड?
बाळः काहीच नाही !
ताई: तू हिरवा पेपर चिकटवला होतास ना?
बाळ : हो.

तसेच हे ओरिगामीचे ट्री वाटत आहे. ते छोटे टिट्बीट्स डेकोरेशन आयटेम्स मस्त आहेत.

शाळेत लेकीच्या वर्गाला 'सीझन्स ट्री' असा विषय दिला आणि सगळ्यांनी आपापल्या कल्पनेप्रमाणे चित्रं काढली. लेकीनं आधी या विषयावर चित्रं काढलेलं आहे ( हेडरमध्ये आहे) पण त्यापेक्षा अगदी वेगळं चित्रं तिनं शाळेत काढलं. हे तिचं चित्रं शाळेतल्या आर्ट एक्झिबिशनकरता सिलेक्ट झालं.

Pages