आयपीएल-६ (२०१३)

Submitted by स्वरुप on 4 March, 2013 - 12:07

आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.

हा धागा आयपीएल-६ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज 'ऑफ' दिवस. म्हणून उद्यापासूनच्या आयपीएलच्या अंतिम सत्रासाठी जरा खेळपट्टीची मशागत -

उदयनजी, वरच्या डॉटेड लाईन ऐवजी सलग रेषा मारा हो; नाही तर ते मधले स्पॉट मुद्दाम फिक्सींगसाठी ठेवलेत म्हणूनही बोंबाबोंब व्हायची ! Wink
spotting2.JPG

चला आज चे सामने

चेन्नई विरुध्द मुंबई.............चेन्नई जिंकणार
.
.
चालणारे प्लेअर्स :- मुंबई तर्फे. :- दिनेश कार्तिक, पोलार्ड, मलिंगा, धवल कुलकर्णी..........
चेन्नई तर्फे : सुरेश रैना, धोनी, ब्राव्हो,

किमान १७० बनवणार पहिली बॅटींग करणारी टीम... आणि शेवटच्या षटका पर्यंत चेसिंग चालु असेल..
.
.
.
चला .......................अजुन काय सांगु ??????? Wink

पुणेकरांसाठी वाईट बातमी................ पुढच्या आयपीएल मधुन पुणे वॉरिअर्स बाहेर......सहाराने टिम मधुन बाहेर पडले ........टिम इंडीयाची स्पॉन्सरशीप सुध्दा सोडली

चेन्नई विरुध्द मुंबई. >> MI चे play off मधे खराब सुरूवात करण्याचे सत्र यंदा तरी बदलेल का ? मुनफ पटेलचे नाव पाहून शंका वाटतेय. विजय नेहमीप्रमाणे पूर्ण IPL खराब खेळल्यावर play off मधे दणका देण्याचे काम सुरू ठेवेल का ?

धवल ने संपुर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केलेली त्याला चांस द्यायला हवा होताच.......मागची मॅच मधे देखील त्यांनी चांगली कामगिरी करुन सामना जिंकुन दिला

मुंबई खरच ढेपाळली.... स्मिथने करुन दिलेली चांगली सुरुवात वाया घालवली..... चेन्नई परत एकदा फायनलला Happy

चेन्नई परत एकदा फायनलला <<<< येस्स.... कालच्या मॅचमधे आमची लॉयल्टी सासर माहेर सारखी होती. माहेर हरलं, सासर जिंकलं. Proud

<< माहेर हरलं, सासर जिंकलं >> जुनीच परंपरा ! माहेराने पडतं घेण्याची, निदान सुरवातीला ! परत भेट नक्की आहेच, सासरचं नाक टिच्चायला !!! Wink

राजस्थान अडचणीत. ६ विकेट गेल्या आहेत १०० च्या आंत ! ७.५ च्या सरासरीने धांवा करायच्या आहेत , स्टेनच्या ओव्हर्स शिल्लक असताना !!

>>आता.... राजत्थान आणि मंुबई..... मंुबई जिंकणार..

मला तर वाटतेय उद्या वॉटसन जबरा मॅच विनिंग खेळी खेळून मुंबईत पोलार्ड आणि मुंबईच्या संघाने डिवचल्याचे उट्टे काढेल Happy

<< राहुल द्रवीडची कालची पोस्ट मॅच प्रेस कॉन्फरन्स: >> One should not have an iota of doubt; Dravid meant every word he said about 'fixing' !
कालच्या सामन्यानंतरच्या बक्षिससमारंभात मांजरेकरला द्रविडच्या ' ऑफ मूडचा' चा जरासा फटका बसला असावा. आपल्याला 'अंडरडॉग ' समजत असूनही आमचा संघ इथपर्यंत आला हें आम्हाला अभिमानास्पद वाटतं, या द्रविडच्या विधानावर मांजरेकर कांहीशा गंमतींत म्हणाला,"You seem to enjoy this 'underdog ' label ; it helps putting pressure on MI, isn't it!" त्यावर अजिबात न हंसता द्रविड गंभीरपणे एवढंच म्हणाला," There is no question of my liking or otherwise; Look at big names MI has ! "

मांजरेकर हा एक अतिशय कुजकट, जळाऊ लाकडाची वखार माणूस (?) आहे. १९९६ साली द्रविड ने त्याची संघातली जागा घेतल्याचा त्याचा गैरसमज अजुनही कायम असल्यासारखा द्रविड विषयी अकारण हिणकस बोलत असतो.

(द्रविड च्या टी-२० मधल्या धावा सुद्धा मांजरेकरच्या कसोटी मधल्या धावांपेक्षा जास्तं आहेत.)

रिची बेनो आणी संजय मांजरेकर हे दोघ कॉमेंट्री करायला आले, कि क्रिकेट नुसतं बघावं, ऐकू नये.

खर तर playoff मधे MI underdogs आहेत, त्यांना अजूनही भोज्याला शिवता आलेले नाहिये Happy

उद्या टॉस जिंकून जर पहीली बॅटींग घेतली तर वॉटसन ला सलामीला ठेवा.. रहाणेला 4 था... 3रा याद्निक... कारण मॅच कोलकता मधे आहे... जिंकण्या साठी जॅक कॅलिस व मॉर्गन सारखा खेळ हवा....

उद्या च्या मॅच मधे...सचिन तारे ची जागा घेणार...धवल मुनाफची...

मुंबई जिंकणार... Happy
.
पोलार्ड आणि रोहीत की प्लेअर्स... मॅच फिरवतील....
.
वॉटसन पेक्शा द्रविड आणि हॉग चालेल....

बेनॉ तोपर्यंत ठीक आहे जोपर्यंत त्याचं ऑस्ट्रेलिया प्रेम उफाळून येत नाही. पण तरी मान्य आहे की तो चालतो. मांजरेकर बहुदा स्वत:च्या (?) आणी वडिलांच्या एकत्रित रेकॉर्ड्स च्या पुण्याई वर जे नासके-कुचके बोलतो, ते ऐकुन (जर कधी-मधी ऐकलं तर) कान बेचैन होतात.

धवल ६ आठवडे खेळू शकणार नाहीये. सचिन चं नक्की नाहीये.

कोलकत्त्याच्या फिरकी खेळपट्टीवर बद्री किंवा हॉगला आत घ्यायचे म्हंटले तर बाहेर कुणाला बसवायचे हा मोठा प्रश्न असेल.... कूपरला बाहेर बसवले नाही म्हणजे मिळवली
पण तांबे फिट झाला नसेल तर आर आर समोर दुसरा ऑप्शन नसेल..... हॉज आणि द्रवीडची ऑफस्पिन बघायला मिळेल का? Happy

सुरु झाली एकदाची मॅच Happy
राजस्थान आणि राहुल द्रवीडला एका आवश्यक विजयासाठी शुभेच्छा!

राहुल व रहाणे अप्रतिम खेळताहेत. द्रविडने दोन सुंदर फटके मारल्यावर जॉनसनमधला 'ऑसी' जागा झालाच ! द्रविडने जळजळीत कटाक्ष टाकल्यावर तो नरमला.

Pages