बागकाम (अमेरिका) सीझन २०१३

Submitted by सीमा on 11 March, 2013 - 11:50

अमेरिकेतील बागकामासाठीचा यावर्षीचा (२०१३ चा )धागा.

गेल्यावर्षीचा (२०१२ चा)धागा

अमेरिकेत कडिपत्ता लावण्याविषयी माहिती

अमेरिकेत मोगरा लावण्याविषयी माहिती

भारतीय बीया ऑर्डर करण्यासाठी http://www.seedsofindia.com/

तुमच्या झिप कोड एरिया मध्ये सध्या कोणती झाडे, बीया रुजवावीत यासाठी ही साईट पहा

http://sproutrobot.com/

वेळ होईल त्याप्रमाणे अधिक लिंक्स देवून धागा अपडेट करेन.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतात आमच्या घरी केशरी, भडक गुलाबी, फिक्या गुलाबीवर पांढर्‍या रेघा आणि स्वच्छ पांढरा एवढे प्रकार होते.

पुन्हा एकदा काकडीचं रोप. सिंडीने सांगितलं म्हणून फक्त दिवसाच्या पूर्वार्धातलच उन मिळेल आणि नंतर सावली अशा जागी हलवलं. फुलं आलीत पण रोपाचा आकार काही वाढेना.
मा का चु?

cucumer.jpg

सीमाने अंबाडीच्या बीया पाठवल्या होत्या त्या पाण्यात १ दिवस भिजवून मग पेरल्या आणि आता त्यातल्या अगदी थोड्याच उगवल्यात. पूर्ण वाढ होउन भाजी तोडायला किती आठवडे?
ambadi.jpg

ती कुठली तरी वेल आहे. दुधी, घोसाळं ?

अंबाडीची भाजी ५ सांडग्यांपेक्षा कमी होणार असं दिसतंय Proud

सदाफुलीची रोपं आणली होती. ३ अचानक जळून गेली. कशाने असं झालं असेल ?

कायपण काय सिंडे. अगं अख्ख्या नेबरहुडला पुरेल ती अंबाडीची भाजी. ही जात जवळ जवळ ४/५ फुट वाढते. आमच्याकडे १०० F वर गेल्यावर तर आणखीच बहरते. Happy
वेल , बहुदा दुधीचा असेल. दोडका पण असु शकेल. Let us see. Happy

काकडीला अत्यंत प्रखर उन्हं लागतं. येईल जुन/ जुलै पर्यंत. फुल खुडली तरी चालतील बहुदा.
स्वाती / अंजली सांगा प्लिज.

शुम्पी , अगं जुन/ जुलै/ऑगस्ट/ sept येतील सगळ्या भाज्या. तण काढ आता ते.

ओक्के.
काकडीचं घर परत उन्हात बांधणार.
विकेंदला तण काढणार
आणी जॅस्मिन मोठ्या कुंडीत हलवणार.

हा धागा रॉक्स!

Lol अगं शुम्पीला धीर येईल असंच बोलायच ठरवलयं मी. Proud भाज्या तिच्या ताटात पडुपर्यंत आपल्याला गप्प बसणार नाहीये ती. शुम्पी दिवा.

सीमा, हो काकडीला प्रखर उन लागतं. (तू पग्याच्या भितीनं पूर्ण मराठीत लिहीलंस का? :फिदी:). फुलं काढायची गरज नाही. pollination झालं नाही तर गळून पडतील.

कुठाय अंबाडी? त्या होझजवळची की काय? देवा!!! शिजवून चमचाभर होईल. फोडणीकरता तेल, लसूण, मिरच्या वाया घालवू नकोस Proud

शूम्पी Proud

आमच्याकडे गेल्या समरला लावलेले गुलाब मस्त बहरलेत. होम डिपो तून गेल्या वर्षी आणलेला मोगरा मरता मरता वाचला. तो मोठ्या कुन्डीत शिफ्ट केलाय. जाईचे वेल बहरलाय, आता नवीन अ‍ॅडीशनल आधार कसा द्यावा/ फेन्सवर सोडावाया विचारात.
एका बाजूला वाफे करून पुदिना, भे न्डी, बेल पेपर आणि कलिन्गडाचा वेल आहे. बिया पेरायला एप्रिल उजाडल्याने या सीझनला काय्काय येइल याची शन्काच आहे.

अंबाडीच्या बिया मला मिळाल्या नसल्याने तयार भाजी खायला जाईन आता. Proud
आता घाबरून मला बिया पाठ्वाल तर बघा !!

काल घरच्या बागेतले सॅलड मिक्स अन अरुगुला खुडले.
लसणीच्या पाकळ्या लावल्या होत्या त्या बहुतेक माती असशी मातीत मिळशी म्हणाल्या असाव्यात. या वीकांताला परत लावीन म्हणतेय. शिवाय मोगरा कढीपत्ता जास्वंद यांचं ट्रांझिशन सुरु करणार.

ज्ञाती , बिया हव्यात का ? पत्ता कळव . तुमचा ग्रोइंग सीझन मोठा आहे , येइल सुद्धा अंबाडी अजूनही.

पुढच्या वर्षाकरता विशलिस्ट वर बिअर्डेड आइरिस, क्रोकस , अ‍ॅलियम, पॉपीज, हायसिंथ.

या वर्षी जमल्यास थोडे कॉरिऑप्सिस लावायचेत , पण अजून एखादी देखणी व्हरायटी सापड्ली नाहीये कुठेच.

बार्क्या स्ट्रॉबेर्‍या लागल्यात बर्‍याच, त्याच्या खाली सुके गवत घालावे लागेल काय ?

>>बार्क्या स्ट्रॉबेर्‍या लागल्यात बर्‍याच, त्याच्या खाली सुके गवत घालावे लागेल काय ?>> हो.

शुम्पी, .काकडीची कुंडी पुरेशी मोठी आहे ना? बरेचदा रुट बाउंड झाल्याने वाढ खुंटते. पण तुझ्या काकडीला फुले आल्येत म्हणजे ठीक आहे. उन्हाळा वाढला की वाढेल छान.

>>स्वाती२ कडची स्लग्ज अपचनाने मरतील>> थॅक्स सिंडी.
नवरा स्लग्जना बिअरचा नैवेद्य दाखवणार होता. Proud मी कॉर्नमिल ठेवलय.

हो हो काकडीची कुंडी चांगलीच वाढत्या मापाची घेतली आहे पण माप काही वाढायला तयार नाही. तुम्ही सगळे म्हणताय तसं मला घाईच फार असं दिसतय. वाढेल हळूहळू Happy

होम डिपोमध्ये चिनी गुलाब मिळाले. सगळे रंग एकत्र असलेली रोपं आहेत. २ गुच्छ जमिनीत आणि चार कुंड्यांमध्ये लावलेत. झेंडुची रोपं आणलीत. आणखी काही रँडमली मिक्स फुलझाडं आणली. कडिपत्त्याची माती आणि कुंडी दोन्ही बदललं आहे. चाफा आणि कडिपत्त्याचा इतका पुअर शो असतो आमच्या दारात. खत घातलं, ऊन, पाणी, माती, कुंडी सगळं बदललं तरी मेले मरतुकडेच राहातात Sad

स्वाती, अनंताचे रोप आरतीने दिले मला. तुझ्याकडचे कुणाला हवे असल्यास देऊन टाकले तरी चालेल. आदित्यने दिलेल्या बर्‍याच बिया लावल्यात काल. पानं-फुलं आली की फोटो पाठवेन.

होम डिपोमध्ये जुईचे झाड/वेल बघितले काल. लाल जास्वंद मात्र नाही मिळाली.

आमचा अनंत अनंतात विलीन झाला केव्हाच.

कढीपत्त्याची स-ग-ळी पानं गळून गेली होती, पण आता शेंड्यापाशी नवीन पालवी दिसते आहे. मदनबाण आणि मोगर्‍याला कळ्या आल्या आहेत, रातराणीलाही एक कळ्यांचा झुबका दिसला.

पोएट्स जॅस्मिन (जाईचा प्रकार आहे - गुलबट फुलं) नुसतीच वाढते आहे. खरंतर अर्ली स्प्रिंग फुलायला हवी ती. (तिला ब्लूमर्स ब्लॉक आला असावा. :P)

चाँद पॅलेसजवळच्या सब्जी मंडीत सहा डॉलरला कृष्णतुळशीचं रोप मिळालं. आणखी कोणाला हवं असेल तर सांगा - घेऊन ठेवेन.

जास्वंद शॉपराइटमधे पाहिली - बरेच प्रकार होते.

माझ्याकडे 'tulas- unknown' अशी एक जात आहे. रोपं उतरली की पाठवु का ? Happy

रातराणीच्या फांद्या छाटल्यावर ती जरा रुसली आहे. थोडी पालवी दिसते आहे पण आधी जशी जोमाने वाढली होती तशी वाढ नाही आता.

होऽ! (आमच्यात रोपांना नाही म्हणत नाहीत. :P)

तू दिलेल्या बिया प्लान्ट करायचा विचार होता, पण जमलं नाही. आता नेक्स्ट वीकेन्ड नक्की.

रच्याकने, मिंट इज मिंट आणि बेझिल इज बेझिल असं मी इतके दिवस समजत होते. काल चॉकोलेट मिंट, ग्रीक मिंट, स्वीट मिंट, स्वीट बेझिल आणि अशा काय काय जाती बघितल्या. मी त्यातल्या त्यात ओळखीची पानं बघून दोन रोपं घेऊन आले.

Pages