बागकाम (अमेरिका) सीझन २०१३

Submitted by सीमा on 11 March, 2013 - 11:50

अमेरिकेतील बागकामासाठीचा यावर्षीचा (२०१३ चा )धागा.

गेल्यावर्षीचा (२०१२ चा)धागा

अमेरिकेत कडिपत्ता लावण्याविषयी माहिती

अमेरिकेत मोगरा लावण्याविषयी माहिती

भारतीय बीया ऑर्डर करण्यासाठी http://www.seedsofindia.com/

तुमच्या झिप कोड एरिया मध्ये सध्या कोणती झाडे, बीया रुजवावीत यासाठी ही साईट पहा

http://sproutrobot.com/

वेळ होईल त्याप्रमाणे अधिक लिंक्स देवून धागा अपडेट करेन.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुगोल, जंक मेल श्रेड करून घातली तर ते कॉम्पोस्ट ओरगॅनिक होणार नाही हे मान्य पण ते कॉम्पोस्ट तर होइलच. मी क्लास मध्ये स्पेसिफिकली विचारलं होतं की जंक मेल श्रेड करून टाकलेली चालेल का म्हणून तेव्ह ते चालेल म्हणाले.नेट वर थोडं सर्च केलं असता हा (कोणत्या प्रकाराचे पेपर वापरावे किंवा वापरू नये) वादाचा मुद्द्दा आहे असे समजले.
http://forums2.gardenweb.com/forums/load/soil/msg0612121020298.html

नुस्तच किचन वेस्ट घातले तर ते फक्त ग्रीन्स(नायट्रोजन) असणार. कॉम्पोस्ट मध्ये ब्राइन्स (कार्बन) पण हवच. तुम्ही काय वापरत ब्राउन्स ची चणचण असेल तर?

शुक्रवारी अन शनिवारी बरीच रोपं बागेत लावलीत अन आज इथे फ्रॉस्ट वॉर्निंग आहे Sad

कुंड्यांमधे लावलेले हर्ब्स सगळे गराजमधे हलवतेय, पण बाकीच्यांचं कठीण आहे

मेधा, आमच्याकडे काल होती वॉर्निंग. मी काही रोपांना कव्हर म्हणून रिकाम्या कुंड्या टोपीसारख्या घातल्या. काही रोपं यार्ड वेस्ट्च्या ब्राऊन बॅग्ज असतात त्यांनी कव्हर केली.

Whew! Dodged that one :). No frost after all. Now I have to move everything out of the garage and uncover all the stuff in the yard.

आज इथे डिलिजंट डिगर्सचा सेल होता. कोलंबाइन आणि हिसप मिळाले. माझ्या कोलंबाईनच्या बिया सध्या फ्रीज्मधे चिल होतायत.

सीमा, सिडीने लिंक दिलेय तेच. मी दोन सिंगल गुलाबी आणि एक ड्बल गुलाबी असे आणले. साईड यार्ड मधे दोन होस्टा आहेत त्याच्या मधे लावणार. हिसप मेलबॉक्स जवळ कोरीऑप्सिस आहे त्याला सोबती म्हणून.

Columbine is a great perennial. Once established, it spreads nicely as we'll. I have had no luck starting any with seeds though. I have bought seeds and tried to plant seeds from the plants I have. I have deep purple ones. Finally, this year I brought two plants of a different color. Once those are established, I hope to add a the dual color ones in a year or two.

I had bought two clematis last year from clearance rack in Loew's. not only did they bloom last year, they are back, bigger plant and lots of flowers!
Swati, please share pictures of your columbine when it blooms

मैत्रीणींनो मला एक सांगा.. मी लसुण पाकळ्या लावल्या होत्या एक महिना होत आला. फुट्भर उंचीची पात आली आहे. मस्त सुगंध आहे लसणाचा. परवाच्या पावसानंतर सगळी लसूण पात झोपली आहे (आडवी पडलीये) एक उपटली तर खाली छोटुकले बल्ब्ज बनले आहेत.. पाकळ्या बिकळ्या कुछ नही. झोपे हुए लहसुन को कैसे जगाउ ? किती दिवस लागतात पूर्ण लसुण बनायला ? एक युट्युब वर विडिओ सापडला त्यात दाखवलय की पात गोलसर वळून सुकली की खाली लसूण पूर्ण बनलेला असतो.

डॅफो,

माझ्याकडे पूर्ण लसूण तयार व्हायला जवळ्पास ४ महिने लागले होते. पण ४ महिन्यांनंतर सुरेख पाकळ्या असलेला लसूण तयार झाला होता. तो मी गराज मध्ये टांगून वाळवला (एअर ड्राय). फोटो सापडला तर बघते. मी ती वरची पात वरचेवर कापून घेऊन चटणीत वगैरे वापरायचे. गावाकडच्या एका शेतकरीदादांनी पात कापत राहिलं तर लसूण चांगला होतो असं सांगितलं होतं.

हो मी पण दोन तीन वेळा पात कापून वापरली होती नूडल्स वगैरे मध्ये. बरं मग ठेवते तसेच उपटून काढत नाही लसूण. वाट बघते. Uhoh

अंजली मस्ट आणि मस्त माहिती.
मी आता आहे त्या पाती वापरायला लागते. लसूण आला तर बरंच माझ्याकडच्या काही लसणांना मोड आले तेव्हा तेकुंडीत खोचून ठेवलेत..पात तर मस्त येतेय

डॅफो DFW मध्ये लसणाचा सिझन संपला. पात झोपली आहे म्हणजे हार्व्हेस्टींगची वेळ. आता परत fall मध्ये लाव. स्पिनॅच पण तेव्हाच लावायचा.
आपल्याला खुप कमी टाईम स्पॅन मिळतो कुल व्हेजिटेब्ल्स ग्रो करायला.

सीमा, अगं पावसामुळं पात झोपली आहे.
इथे बघ. नॉर्दन भागात जुलै-ऑगस्ट हार्वेस्टींग म्हणतात. साऊथला कधी लसूण लावलाय त्यावर हार्वेस्टींग अवलंबून आहे म्हणतायत. महिनाच झाला असेल लावून तर अजून काही दिवस राहू दे असं वाटतंय.

अंजु, लिंक वाचली, पण अगं इथे ऑक्टोंबर पासून पुढे केव्हाही लसूण पेरायचा . पण मे एंड , जुनला हार्वेस्टिंग असं साधारण चक्र मी पाहिलय. तापमान ९० च्यावर गेल कि लसूण पिवळा पडु लागतो.
पण तु म्हणतेस ते बरोबर आहे . पॉटमध्ये ठेवायला काहीच हरकत नाही.
मी परवा चार गड्डे आलेले ते काढले. प्रचंड मोठा लसून तयार झालाय.

काल सगळी झाडं घराबाहेर हाकलली. चाफ्याच्या दोन्ही रोपांना कोंब फुटले आहेत. तीन वर्ष झाली पण अजून फुलं आलेली नाहीत.

चिनी गुलाबाचं इंग्रजी नाव सांगणार्‍याची बाग फुलोफलो Happy

आपल्याला खुप कमी टाईम स्पॅन मिळतो कुल व्हेजिटेब्ल्स ग्रो करायला >>>> खास हे वाक्य वाचण्यासाठी झक्कींना बोलवा.. Proud

बादवे हा धागा मस्त आहे एकदम.. मी अगदी नेहमी वाचतो.. Happy
जमतील तसे फोटो टाका सगळ्यांनी...

पग्या Proud
सिंडी, ते चिनी गुलाब लहानपणी आम्ही दिवाळीच्या किल्ल्याभोवती लावायचो. पण भारतात मी फक्त "हॉट पिंक" कलर बघितलेला. इथं केशरी, पिवळा वगैरे कलर दिसले.

Pages