बागकाम (अमेरिका) सीझन २०१३

Submitted by सीमा on 11 March, 2013 - 11:50

अमेरिकेतील बागकामासाठीचा यावर्षीचा (२०१३ चा )धागा.

गेल्यावर्षीचा (२०१२ चा)धागा

अमेरिकेत कडिपत्ता लावण्याविषयी माहिती

अमेरिकेत मोगरा लावण्याविषयी माहिती

भारतीय बीया ऑर्डर करण्यासाठी http://www.seedsofindia.com/

तुमच्या झिप कोड एरिया मध्ये सध्या कोणती झाडे, बीया रुजवावीत यासाठी ही साईट पहा

http://sproutrobot.com/

वेळ होईल त्याप्रमाणे अधिक लिंक्स देवून धागा अपडेट करेन.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे जवळ एक भाज्या, फळं , फुलं अन झाडं विकणारं दुकान आहे. भारतीय , मेक्सिकन भाज्या, फळे स्वस्त मिळतात. फुलं अन झाडं पण बर्‍यापैकी स्वस्त असतात.
तिथून एका वर्षी ५ डॉलर्सना तीन अशा लिलीज असलेल्या कुंड्या आणल्या होत्या. एकेका कुंडीमधे ५-६ रोपं होती. बहर होता तोवर घरात ठेवली झाडं अन फुलं सुकल्यावर ती रोपं पुढच्या दारापाशी लावली होती.
दरवर्षी या दिवसात मस्त फुलतात ती रोपं.

हळदी कुंकु घ्यायला या
IMG_1340.JPG

गेल्यावर्षी लावलेलं रोप हिवाळ्यात पूर्ण गोठून गेलं होतं पण मार्च पासून परत पालवी यायला लागली.
मेमधे एकदा एक दीड जुडी भरेल एवढा चुका मिळाला, आज जवळपास तीन जुड्या
IMG_1342.JPG

डेकच्या पायर्‍यांपाशी एक छोटा कोपरा आहे , दोन बाजूंनी घराची भिंत आहे, मोठ्या मेपलची सावली असते दुपारी १-२ वाजे पर्यंत. तिथे फुलझाडं काही तगली नसती म्हणून पुदिना, पार्सली असं काही बाही लावते. हळूहळू त्या कोपर्‍यां हर्ब गार्ड्न झालंय. हे तिथलं प्रोड्यूस.

IMG_1339.JPG

अनियन चाइव्ह्स, टॅरॅगॉन, मरवा , दोन प्रकारचे सेज, रोझमेरी, ओरेगानो, फ्लॅट पार्सली, पुदिना, मधे दोन प्रकारचे थाईम आहेत. हे सर्व बारीक चिरून रुम टेम्प ला आलेल्या लोण्यात मिसळून परत ते लोणी फ्रीझ करणार. मस्त होम मेड हर्ब बटर!
क्रीमचीझ मधे घालून पण मस्त लागतात.

तरी लॅव्हेंडर, लॉरेल लीव्ह्स, गवती चहा, लसणीची पात, साधं अन थाय बेझिल यात नाहीत.

आले असते पण कंपुने मला अजून गराजचा कोड पाठवलेला नाही Proud

जोक्स अपार्ट, पुढल्या वर्षी नाही मिळाला तर येइन. यंदा उत्साहात खूप फुलझाड लावलीत आणि आता त्यांची निगराणी राखणं म्हणजे मोठच काम झालं आहे.

तुम्ही अमेरीकेत आहात ना? इथे लेमन ग्रास म्हणून हर्ब सेक्शन मध्ये जे मिळते, तोच गवती चहा. कुठल्याही मोठ्या कुंडीत लावा. भराभर वाढतो.

मेधा, तो चुका मस्त दिसत आहे.

ह्या आमच्या बागेतल्या भाज्या, विकांताला छान हवा होती पावसाळी Happy

स्वाती, मटाराच्या २,३ च शेंगा आहेत मधे, सिझन संपला Happy
मटाराच्या बाजूला, काकडीच्या समोर आहेत त्या मुळ्याच्या शेंगा आहेत.

सहीच आहे की भाजी मीपु.
लांब ग्रोइंग सीझन असलेल्यांचा णिषेध असो Wink आमच्याकडे दुधी अन गिलक्याची रोपं वीतभर असतील अजून Sad

>> मुळ्याच्या शेंगा
ओह, मुळ्याला शेंगा असतात? ही नवीन माहिती आहे माझ्यासाठी.

>> स्वाती, त्यालाच डिंगर्‍या म्हणतात.

मुंबईला "डिंगर्‍या" नावाने ज्या शेंगा खाल्ल्या होत्या त्या अतिशय सडपातळ होत्या ..

मीपु च्या फोटोत आधी मला एडमामे आहे असं वाटलं ..

मुंबईला "डिंगर्‍या" नावाने ज्या शेंगा खाल्ल्या होत्या त्या अतिशय सडपातळ होत्या >> +१ फक्त मी डिंगर्‍या पुण्यात आणि सातार्‍यात खाल्ल्या होत्या असं आठवतं.

मीपुणेकर, मस्त वाटलं भाज्या बघून.

आमच्याकडे लसणाची पात सोडल्यास अजून कशाचा पत्ता नाही. लसूण मात्र विंडो बॉक्समध्ये लावलेत तरी आवरा म्हणावं इतकी पात येतेय.

त्या मुळ्याच्याच शेंगा, सागर्‍या आणि डिंगर्‍या आहेत. इकडे अश्याच येतात ढब्बुडक्या. Happy
भारतात साधारण लांबड्या आणि बारिक असतात त्या हायब्रीड असतात. माझ्या मामाकडे शेतातल्या मिळाय्च्या Happy

मीपु, मस्त भाजी!
मुळ्याच्या शेंगा बेश्ट. त्या दही-मीठ लावून वाळवून तळायच्या.

या कुंडीतल्या शोभेच्या मिरच्या-
purp1.jpg

Pages