४ मोठे बटाटे (उकडल्यावर चिकट न होणारे. Russett किंवा बेकिंग पोटॅटोज चालतील. जुने असावेत.)
५-६ मोठ्या लसूण पाकळ्या.
१ इंच आले
५-६ हिरव्या मिरच्या (आवडीनुसार मिरच्यांचे प्रमाण कमी-जास्त करु शकता.)
८-१० कोंथिबीरीच्या काड्या (देठासह. जून असतील तर खालचे थोडे काढा.)
५-६ कडिपत्त्याची पाने
मीठ
हळद
दीड वाटी साधे बेसन
अर्धी वाटी लाडू बेसन (हे रवाळ असते, याने कव्हर चांगले होते. घालायचे नसल्यास साधे बेसन दीड ऐवजी २ वाटी घ्यावे)
१ मोठा चमचा मैदा (ऐच्छिक. कव्हर जाडसर होण्यासाठी.)
१ छोटा चमचा ओवा (ऐच्छिक)
पाणी (पीठ भिजवण्यासाठी. साधारण १ वाटी.)
तेल
- बटाटे उकडून गार झाल्यावर मॅश करावे. अगदी गुळगुळीत करु नयेत. थोडे तुकडे राहू द्यावे.
- आले, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर पाणी न घालता वाटायचे, फार बारीक करायचे नाही.
- हे वाटण, मीठ, हळद बटाट्यात घालून नीट मिसळून घ्यावे. १ मोठा चमचाभर तेल तापवून त्यात हळद घालून ते तेल बटाट्यावर ओतले तरी चालेल.
- कडिपत्त्याची पाने हाताने तुकडे करुन मिश्रणात घालावी.
- मीठाच्या अंदाजासाठी मिश्रणाची चव घेऊन पहावी.
- मिश्रण तयार झाल्यावर त्याचे हव्या त्या आकाराचे गोळे तयार करुन ठेवावे. तळव्यात दाबून थोडा चपटा आकार दिला तरी चालेल. आकारावर अवलंबून आहे पण दिलेल्या प्रमाणात साधारण १० गोळे होतील.
- साधे बेसन, लाडू बेसन आणि मैदा एकत्र करुन घ्यावा.
- त्यात मीठ आणि ओवा घालावा. (हळद ऐच्छिक)
- चमचाभर तेल तापवून पीठात ओतावे मग १ वाटी पाणी आणि नंतर लागेल तसे हळूहळू पाणी घालून हाताने मिसळत पीठ तयार करावे. गुठळ्या मोडाव्यात.
- फार पातळ होता कामा नये. (२ वाट्या पीठ असेल आणि २ वाट्या पाणी घातले तर पातळ होईल.)
- कढईत तेल चांगले तापवून घ्यावे.
- पिठाचा थेंब टाकून तापल्याची खात्री करुन घ्यावी. पीठ लगेच वर आले पाहिजे.
- बटाट्याच्या मिश्रणाचा एकेक गोळा पिठात नीट बुडवून तेलात सोडावा. पिठातून बाहेर काढल्यावर लगेच तेलात टाकावा. टाकण्यापूर्वी पीठ फार निथळून काढू नये. गोळ्याला चिकटलेलेच रहावे.
- वडे सोनेरी रंगावर तळावे, फार लाल करु नयेत.
- एकावेळी खूप वडे तळू नयेत, प्रत्येकाला कढईत नीट जागा मिळेल असे पहावे.
- दुसरा घाणा टाकण्यापूर्वी तेल पुन्हा नीट तापले आहे याची खात्री करावी कारण एक तळण झाले की तापमान कमी झालेले असते.
- तळून झालेले वडे पेपर टॉवेल, कागदावर काढावे.
- पिठाच्या दिलेल्या प्रमाणात सगळे तळून व्हावेत, नाहीतर अर्ध्या प्रमाणात पुन्हा पीठ बनवता येईल.
- वडे शक्यतो ताजे/गरम खावेत.
- वड्याबरोबर पाव तळलेल्या मिरच्या, चिंच-खजूर आंबटगोड चटणी, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, कच्चा कांदा इ. घेता येईल.
- उपाहार असेल तर बरोबर चहा द्यावा.
- जेवण म्हणून असेल तर नंतर काहीच नाही किंवा दही-भात, सोलकढी- भात चालतो.
फोटो मधे वडा छान दिसतो आहे
फोटो मधे वडा छान दिसतो आहे तोंपासु, येत्या शनिवारी करुन बघणार...
लोला: ही अजरामर रेसिपी दिसते.
लोला:
ही अजरामर रेसिपी दिसते. थोड्याथोड्या दिवसांनी वर येतच असते.
वडे जबरदस्त होतात हे खरे.
लोला, तुझ्या रेसिपीने
लोला, तुझ्या रेसिपीने बटाटेवडे केले .. मस्तच झाले .. धन्यवाद रेसिपीकरता ..
मामी , तुमची कविता महान
मामी , तुमची कविता महान आहे....मझी हसुन हसुन पुरेवाट!!!
इथले फोटो बघुन वडे करणे अनिवार्य आहे!!
पुढच्या गटगला सशल काय आणणार
पुढच्या गटगला सशल काय आणणार आहे ते ठरलं
सशल, फोटो टाक. आम्हालापण चान्स मिळू दे की कधीतरी
राखी दुर्दैवानी फोटो नाही
राखी दुर्दैवानी फोटो नाही माझ्याकडे .. पण तू काल्पनिक फोटो नजरेसमोर आण आणि सुरू कर कशी .. :p
खिडकी वडा व त्याकरता लागणारा
खिडकी वडा व त्याकरता लागणारा त्याचा मसाला(पेस्टच्या रूपात)पुण्यात दिनानाथ हॉस्पिटलजवळ मिनल गार्डन समोर खिडकी वडा असेच नाव असलेल्या दुकानात मिळतो!मस्त अन् खमंग आहे,मसाला पेस्टही झणझणीत आहे!
लोलाची पोस्ट वाचून ट्राय
लोलाची पोस्ट वाचून ट्राय केला!
जीव जळ्ला पुन्हा एकदा.
जीव जळ्ला पुन्हा एकदा.
भूक लागलेली असताना हा बाफ वर
भूक लागलेली असताना हा बाफ वर आणणार्याचा णिशेध!!!
नानबा, उपास सुरु होत असताना
नानबा, उपास सुरु होत असताना असे पदार्थ कशाला वर आणायचे????
:
खूप छान रेसिपी. कव्हर थोडे
खूप छान रेसिपी.
कव्हर थोडे जाड करण्यासाठी मैदा वापरायचा .......या टीप साठी थॅंक्स
‘खिडकी वडा’ कल्याणच्या ‘वझे
‘खिडकी वडा’ कल्याणच्या ‘वझे बंधू’ ह्यांचा आहे. माहेरगावचा असल्यामुळे फार प्रेमाचा विषय! त्यांची मसाला पेस्ट खूप वेळा वापरली आहे. मस्त चव येते.
वाढणी/प्रमाण: १० वडे ३
वाढणी/प्रमाण:
१० वडे ३ लोकांना पुरतील बहुतेक. >>>> चुक
अनया, कुठे मिळते ही मसाला
अनया, कुठे मिळते ही मसाला पेस्ट? काय नावाने?
हा घ्या आमचा वडापाव मस्त
हा घ्या आमचा वडापाव
मस्त पावसाळी ह्वा आहे आज ईथे सो लगेचच केला. मजा येतेय चहाबरोबर खायला.
सायो, सदाशिव पेठ (कल्याण) वडा
सायो, सदाशिव पेठ (कल्याण)
वडा मिळतो, पेस्ट्पण मिळत असेल.
अनया, माहितीबद्द्ल धन्यवाद. मला "वझे बंधू" लक्षात नव्हते.
नीशी, सकाळी सकाळी वडे का? वा, वा!
स पे कल्याणात ही आहे? नवीनच
स पे कल्याणात ही आहे? नवीनच कळलं. येत्या भारतवारीत स पेला भेट देण्यात येईल.
पुण्यात पण मिळते. दिनानाथ
पुण्यात पण मिळते. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जवळ त्यांचे दुकान आहे. ब\वडे पण मिळतात & पेस्ट्पण मिळते
सायो, खिडकी वडा ठाण्यातही
सायो, खिडकी वडा ठाण्यातही आहे. मल्हार टॉकिजच्या ओळीत तीन हात नाक्याच्या दिशेकडे.
मस्त ! एकदम तोंपासु
मस्त ! एकदम तोंपासु
लोला, अग हो, सुट्टी असली की
लोला,
अग हो, सुट्टी असली की असच काहीतरी केले की जरा ह्टके करावे वाटते.
रेसिपी पण सही आहे.
नुसत्या लाडू बेसनाचे कव्हर
नुसत्या लाडू बेसनाचे कव्हर चांगले होईल का?
माहीत नाही. करुन बघ आणि
माहीत नाही. करुन बघ आणि लिही.
(टेक्स्चर बदलेल. फार रवाळ असल्यास कुरकुरीत/कडक होण्याची शक्यता आहे)
व्बिल्वा, लाडू बेसन भिजवलेस
व्बिल्वा, लाडू बेसन भिजवलेस की त्यातले थोडे बाजुला काढुन ठेव आणि बाकीचे ब्लेंड करुन गुळगुळीत करुन घे आणि मग दोन्ही एकत्र कर
लोला लाजो, ही आयडिया
लोला
लाजो, ही आयडिया चांगलीये. करते आणि रिपोर्ट देते.
Apratim recipe... khup khup
Apratim recipe... khup khup dhanyawad...
याच बटाटेवड्यांवरुन राजकारण
याच बटाटेवड्यांवरुन राजकारण सध्या तापले
मस्त झालेत बव. थँक यू! मी
मस्त झालेत बव. थँक यू!
मी सारणात थोडे धणे आणि पुदिन्याची पाने तोडून घातली. पुढच्या वेळेस लिंबू पिळून पाहीन. तसेच कव्हरसाठी एक च. तांदळाचे पीठ घातले.
मस्तच ! तोंडाला पाणीच सुटलंय
मस्तच !
तोंडाला पाणीच सुटलंय फोटो पाहून. आता खावेसे वाटू लागलेत म्हणजे करावेच लागतील.
Pages