होमिओपॅथी आणि पेन-किलर्स

Submitted by अमितकरकरे on 25 April, 2013 - 09:12

होमिओपॅथी आणि पेन-किलर्स

“डॉक्टर, बाहेर थंडी पडली, किंवा जरा थोडे श्रम झाले की हा गुडघा लागलाच ठणकायला. हा असा सुजतो म्हणून सांगू! अगदी जीव नकोसा होतो. मग हाडांच्या डॉक्टरांनी दिलेली ‘क्ष’ गोळी घेतली की जरा दोन दिवस बरे, पुन्हा येरे माझ्या मागल्या! तुमच्या होमिओपॅथीमध्ये नसतात का पेनकिलर्स ?” ६८ वर्षांच्या जोशीआज्जी विचारत होत्या.

“एरवी वर्षभर काहीच त्रास होत नाही या डोकेदुखीचा, पण आमची वर्षातून एकदा कॉन्फरन्स असते, त्यात सकाळपासून इतक्या गोष्टी मॅनेज करायला लागतात की नाश्ता, जेवण यांची भेटसुद्धा होत नाही. त्यात तो कामाचा ताण. त्या दिवशी नेमके माझे डोके ठणकायला लागते, मग उलटीचे फिलिंग, मळमळ, आणि उजेड किंवा आवाजाचा अतिप्रचंड त्रास. शेवटी पित्त बाहेर काढल्याशिवाय चैनच पडत नाही! त्या दिवशी घेता येईल असे काही अनाल्जेसिक औषध होमिओपथीमध्ये नाही का?” २४ वर्षाचा आयटी कंपनीत काम करणारा रोहन जाजू विचारत होता.

वेदनाशामक औषधे (पेन किलर्स)

जगात सर्वात जास्त परस्पर (ओव्हर-दी-काउंटर) खपणारी औषधे म्हणजे पेनकिलर्स, अर्थात वेदनाशामक औषधे. पित्ताने उठलेले डोके असो वा गॅसेसमुळे झालेला पोटशूळ, वयाने धरलेले सांधे असोत वा कमरेत भरलेली उसण; वेदना आणि त्यासाठी लागणारी औषधे यांचा संबंध आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी येतोच. काहींना तर या औषधांवर इतके अवलंबून राहावे लागते की त्या औषधांचाही त्रास (साईड-इफेक्ट) व्हायला लागतो, म्हणजे मग त्या औषधासाठी वेगळे औषध! अशावेळी आठवते साईड-इफेक्ट्स नसलेली होमिओपॅथी . . .

होमिओपॅथिक वेदनाशमन

होमिओपॅथिक पद्धतीमध्ये सरसकट सर्वांसाठी एक-दोन औषधाचा मारा करण्याऐवजी प्रत्येक रुग्णाची प्रकृती आणि स्वभाव-भिन्नता पाहून उपचाराची दिशा ठरवली जाते. यात वेदनेची तीव्रता, भावना (ठणका, जळजळ, आवळणे, टोचणे इ.), रुग्णाची सहनशक्ती, व सर्वात महत्वाचे म्हणजे वेदना कमी-जास्त करणारे घटक जसे चोळणे, शेकणे, मसाज करणे, इ. यांचा विशेष विचार केला जातो. वेदना कोणत्या अवयवातून-भागातून अथवा पेशींपासून होत आहे हे बरेचदा रुग्णाने केलेल्या वर्णनावरून लक्षात येते, त्याचाही डायग्नोसीससाठी व त्यानुसार औषध ठरविण्यासाठी फार उपयोग होतो. गरज पडल्यास रक्ताची (गाऊट सारख्या आजारात) तपासणी अथवा इमेजिंग (एक्सरे, एमआरआय स्कॅन) द्वारे त्यावर शिक्कामोर्तब केले जाते.

वेदनांसाठी उपचार ठरविताना त्याचे सर्वसाधारण तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते:

१. तात्कालिक वेदना:

काही वेदना या तात्कालिक (acute) स्वरूपाच्या असतात – जसे पाय मुरगळणे अथवा अपघातात ईजा होणे. अशा आजारांमध्ये काही काळासाठीच उपचार दिले जातात. होमिओपॅथिक औषधांपैकी आर्निका, ऱ्हसटॉक्स, सिम्फायटम अशी औषधे लक्षणांचा विचार करून दिली असता वेदनांवर त्वरित उतार पडतो.

२. विशिष्ठ कारणामुळे उत्पन्न होणाऱ्या वेदना:

लेखाच्या सुरवातीला दिलेल्या उदाहरणामधील रोहन प्रमाणे काही वेदना काही विशिष्ठ कारणाने अथवा काही प्रसंगानुरूप डोके वर काढतात. बऱ्याच जणांना भूक अथवा उन सहन होत नाही, किंवा काही विशिष्ठ अन्नपदार्थ खाल्ले की पोटात दुखते (जसे खवा, अंडे, काही फळे) किंवा आईस्क्रीम खाल्ले की घसा धरतो किंवा वेगवेगळ्या अॅलर्जी. अशा पेशंट्सना ते विशिष्ट कारण टाळल्यास महिनोंमहिने काहीच त्रास होत नाही, पण जरा संयम सोडला की मात्र...

अशा आजारावर उपचार करताना त्रास देणाऱ्या त्या व्यक्ती-विशिष्ठ कारणाची व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या लक्षणांची चिकित्सा होमिओपॅथीमध्ये केली जाते व त्यानुसार काहीकाळ औषध दिल्याने त्रास कमी होतो. त्याचसोबत प्रकृती-चिकित्सा करून औषध दिल्याने त्याचा समूळ नाश होण्यास मदत होते. प्रकृतीनुसार दिलेल्या हिपार-सल्फ, बेलाडोना, पल्सेटिला, सबाडीला, ब्रायोनिया, अर्सेनिक अल्बम, किंवा फॉस्फरस यांसारख्या औषधांचा अशा रुग्णांना खूप उपयोग होतो. बऱ्याच मुलींना मासिक पाळीच्या पहिल्या-दुसऱ्या दिवशी प्रचंड पोटात दुखते, अगदी सुट्टी घेऊन घरी बसावे लागते – अशांना मॅग फॉस, क्युप्रम मेट, कोलोसिंथ अश्या औषधांचा खुपच फायदा होतो, आणि पाळी चालू असली तरी अभ्यास अथवा काम थांबून राहत नाही.

माझे बरेचसे पेशंट्स त्यांच्या प्रकृतीनुसार दिलेले असे एखादे औषध नेहमी जवळ बाळगतात. अगदीच अचानक त्रास देणारे कारण घडल्यास किंवा दुखण्याची नुसती सुरवात होत आहे असे वाटल्यास एखादा डोस घेऊन ताबडतोब कामाला लागतात. कोणी विचारले की सांगतात, “हे माझे पर्सनल पेनकिलर आहे.”

३. अगदी रोजच्या झालेल्या वेदना:

वयोमानामुळे झीज होऊन सुजणारे-दुखणारे जोशी-आज्जींचे गुडघे मात्र तिसऱ्या प्रकारात मोडतात. या प्रकारच्या आजारांमुळे शरीरात घडलेल्या बदलांमुळे अगदी दरदिवशी वेदनांचा सामना करावा लागतो. गुडघ्यांची झालेली झीज, जास्त प्रमाणात वाढलेला संधीवात, मणक्यांच्या झिजेमुळे सुरु झालेला स्पॉन्डीलायटीसचा विकार किंवा कर्करोगाच्या अंतिम अवस्थेतील होणाऱ्या वेदना यांचा विचार या प्रकारात होतो. यातील आजारामध्ये पुन्हा फारशी भरून न येणारी झीज अथवा बदल झालेले असतात, अशा वेळी लक्षणांचा विचार करून विशिष्ठ अवयवांवर काम करणाऱ्या होमिओपॅथिक औषधांची (organ remedies) निवड करणे जास्त हितावह ठरते. हेक्ला लावा, कल्केरिया फ्लुर, मर्क्युरीयस, ब्रायोनिया, किंवा एपिस सारख्या औषधांचा वापर करणे जास्त हितावह असते. यातील काही आजारांच्या अवस्थेत वनस्पतींचे मुलार्क जास्त परिणामकारक ठरतात.

थोडक्यात सांगायचे तर होमिओपॅथीमध्ये सुद्धा अत्यंत परिणामकारक अशी वेदनाशामक औषधे उपलब्ध आहेत. या उपचारपध्दतीच्या तत्वाप्रमाणे आजार हळुवारपणे पण नेमका आणि कायमचा बरा करणे या औषधांच्या मदतीने अगदी सहज साध्य होते. फक्त त्यासाठी रुग्णाकडून आपल्या प्रकृतीचे आणि आजाराचे योग्य वर्णन व निरीक्षण, व त्याचप्रमाणे त्यानुसार डॉक्टरांकडून योग्य औषधाची निवड होणे महत्वाचे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बारावीला जेमतेम पन्नास टक्के घेतलेला होमिओपॅथीवाला मात्र सर्दीपासून एडस पर्यंत सारे रोग बरे करायचा दावा करतो !>>>>>>>>>>>>>>>>>>

वा !! चर्चेला मसालेदार बनवण्यासाठी लोक वाट्टेल ते दाखले द्यायला लागले आहेत. असो.. पण
थॉमस एडिसन, बिल गेट्स, वॉल्ट डिस्ने, स्टिव जॉब्स... आणि असे बरेच लोक किती शाळा शिकलेले होते???. पण तरीही त्यांना जग मानतं कारण त्यांच्यात धमक होती काही तरी करुन दाखवण्याची.
मार्कांचा संबंध लावून गुणवता तोलण्यापेक्षा गंजलेल्या तलवारीने किती किल्ले जिंकणार ते सांगा???

होमिओपथीला अड्मिशन मिळणं यासारखा दुसरा टर्निंग पॉंईंट माझ्या तरी आयुष्यात दुसरा नव्हता. मार्कांच्या भाऊगर्दीत हरवले असते तर अंतर्बाह्य माणूस कळला नसता.. जे निव्वळ होमिओपथी शिकल्यावर उमगलं.. human psychology चा इतका गहीरा अभ्यास या शास्त्रात आहे.

आणि महत्वाचं म्हणजे आमच्या मर्यादा आणि आमची बलस्थानं आम्हाला ठाऊक आहेत.
आता जर चांगला रिझल्ट देऊन आमची प्रक्टिस चालते आणि आपलं दुकान चालत नाही तर मायबोली वर का बोली लावत आहात.???
तुमची एनर्जि वाया जाते लोकांना समजावण्यात... कारण तेच ते मेडिसीनल फोर्मुले देऊन तुमची मती ही गंजत चालली आहे.

राहीला प्रश्न क्लासिकल होमिओपथीचा तर.. हो !! हजारो मेडिसीन मधून एक अचूक मेडिसिन शोधताना गफलत होऊ नये म्हणून मटेरिआ मेडिका सोबत एक रेपर्टरी नावाचं साधन असतं. पूर्वी जे काम manually होत असे ते आता संगणक वापरून होतं. म्हणून लोक लावत असतीलही कंपुटराईस्ड क्लिनिक ची पाटी. तुम्ही हि लावा की !! तुमचा हात धरलाय का कोणी.....

शांत चिताने आपलं काम करा ओ इब्लिस ..!! रक्त गरम करून रिझल्ट नाही मिळ्णार पण मनस्ताप जरूर होईल. देव करो तुमच्यावर होमिओपथी घेण्याची वेळ न येवो. तुमच्या एकंदर विधानांवरुन तुमची फार च मानसिक खच्चिकरण झाल्यचे दिसत आहे. हिमिओपथीत स्कोप आहे हो.. मुळात स्वभावाला औषध आहे... आणि स्वभाव हेच बहुतंश आजारंच मुळ आहे. काळजी घ्या Happy

शुभम भवतु !!

होमिओपथी आयुर्वेद पुष्पौषधी, निसर्गोपचार,चुंबकचिकित्सा, अक्युपंक्चर,अक्युप्रेशर,युनानी इ. गोष्टी या पर्यायी उपचार पद्धती आहेत. त्या शास्त्रीय की अशास्त्रीय हा भाग वादग्रस्त आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे कि ऍलोपॅथी ही राजमान्य पद्धत ही सर्वसामान्य रुग्णाला सहज उपलब्ध, परवडणारी आहे का?
रुग्णाला इलाज हा उपायकारक आहे कि अपायकारक हे जास्त महत्वाचे. मला एका डॉक्टर मित्राने सांगितले एखादा रुग्ण येतो त्याला तपासुन झाल्यावर आम्ही सांगतो कि तुला बायपास करावी लागेल. त्याला परवडत नाही. मग तो बाबा बुवाकडे जातो तो एखादी जडीबुटी देतो. रुग्ण ती घेउन खूप वर्षे जगतो. याठिकाणी बायपास सांगणारा डॉक्टर हा आधुनिक वैद्यकीय ज्ञानानुसार वैज्ञानिक दृष्टी ठेउनच सांगत असतो. ते चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. तो वाचतो ते जडीबुटीमुळे नसेल ही शरीरात बायपासेस नैसर्गिक रित्या तयार होत असतात. त्याला जर बायपासचा खर्च परवडत नाही त्याला तुम्ही काय पर्याय देता? तो त्याचे पर्याय शोधुन जडीबुटी घेतो व वाचतो. समजा नाही वाचला तो म्हणत असतो नशीब! त्याने एक चान्स घेतलेला असतो. जगलो तर जगलो.
तु अंधश्रद्ध आहेस, अशास्त्रीय उपचार घेतोस. तुम्ही अज्ञानी लोक असेच मरणार असे म्हणुन हिणवणे हे कितपत उचित आहे?

human psychology चा इतका गहीरा अभ्यास या शास्त्रात आहे.>>> एकदम मान्य, त्याशिवाय सतत इतकी वर्षे लोकांना गंडवणे अवघड आहे!

डॉ. इब्लिस,
याबाबत मी अजून आग्रही आहे. मायबोलीसाठी तूम्ही वेळ देताच त्यामूळे मायबोलीकरांना गरज पडल्यास सल्लामसलतीसाठी उपलब्ध राहिलात तर फार आवडेल. डॉ, कैलास असतात तसेच. त्याने व्यावसायिक आचारसंहीतेचा भंग होणार नाही हो.

आमचे फॅमिली डॉक्टर, डॉ. शहा हे होमिओपाथ आहेत पण ( त्यांच्या ज्ञानाच्या मर्यादा त्यांना माहीत असल्यानेच ) त्यांना गरज वाटल्यास ते ताबडतोब योग्य त्या डॉक्टरकडे जायचा सल्ला देतात. या विश्वासामूळेच ते गेली ४५ वर्षे आमच्या कॉलनीत लोकप्रिय आहेत.

मला स्वतःला टॉन्सिल्ससाठी, होमिओपथीचा उपयोग झाला. ऑपरेशन करावे लागले नाही आणि नंतर कधी त्रासही झाला नाही. केसगळतीवर बहीणीला होमिओपथीच्या गोळ्यांचा फायदा झाला.
किडनी स्टोनसाठी अलोपथीचा फायदा झाला नाही, ( ३ दिवस अ‍ॅडमिट होतो ) आयूर्वेदीक गोळ्यांनी खडा पडला.
काविळीसाठी, अलोपाथ डॉक्टरांनीच लिव्ह ५२ या गोळ्या घ्यायचा सल्ला दिला.
दातांच्या रुट कॅनलसाठी आणि कानाच्या स्टॅपेडोक्टॉमी साठी अर्थातच डेंटीस्ट आणि ई एन टी सर्जन यांची ट्रींटमेंट घेतली.

तर तात्पर्य हे रुग्णाला आराम पडणे गरजेचे.
ज्या अर्थी भारतात हि उपचारपद्धती बेकायदेशीर नाही, त्या अर्थी त्या डॉक्टरांना रुग्णांना तपासण्याची आणि
औषधे देण्याची मुभा आहेच. त्यांनी दावे केल्यावर ते कुठल्या आधारावर केलेत हे सांगण्याची जबाबदारी त्यांची
आणि त्या दाव्याची पडताळणी करण्याची जबाबदारी रुग्णाची.
ती ट्रींटमेंट घेऊन काही आराम पडत नसेल तर पुनर्विचार करायची जबाबदारी रुग्णाची(च). पण दुर्दैवाने जर
आराम पडला नाहीच, तर त्याची जबाबदारी त्याच्यावर उपचार न करणार्‍या डॉक्टरची नक्कीच नाही Happy

आता बहुतेक सर्व डॉक्टर्स, मोठ्या आजारात दुसर्‍याचे मत घ्यायचा सल्ला देतातच. त्यामूळे मला वाटतं
उपचार पद्धती निवडण्याचे, त्या पद्धतीचा आढावा घेण्याचे काम हे रुग्णाचेच आहे.

दाव्यांचा मारा होतच राहणार. वैद्यकीय उपचारच का, धार्मिक / तांत्रिक उपाय पण सूचवले जातात.
ज्यांचा त्यावर विश्वास असतो, ते तो मार्ग अनुसरतात. कुठल्याही कारणाने त्यांना आराम पडला, तर
चारजणांना ते सांगणारच... परत शेवटी काय, तर रुग्णाचा निर्णय आणि त्या निर्णयाची जबाबदारी, केवळ त्याचीच. म्हणून तर कंसेंट घेतात ना ?

हमरीतुमरी नाही ओ...

विषय साधा होता- होमिओपथी आणि पेनकिलर्स.. !!

आता लेखकाने जे लिहिलं आहे ते प्रत्यक्ष क्लिनिकल प्रेक्टिस मधे आम्हि अनुभवतो.... लेख उत्तम जमला अहे.. आणि या रेमेडि काम करतात हे एक होमिओपथिक डॉक्टर म्हणून मी मान्य ही करते..

पण.. विषयाला वेगळं वळण देण्यासाठी अलोपथी विरुद्ध होमिओपथी हा वाद सुरु झाला...
कोणीही यावे आणि टपली मारुन जावे... यासाठी हा काय खेळ आहे का?
जबाबदार डॉक्टर्स ना हे कळालं पाहिजे.
लेखकाने उल्लेख तरी केला आहे का.. की हे सर्व पर्यायी उपाय आहेत अलोपथीला... तर नाही.
its patients choice.. whatever mode of treatment they want to prefer they wl choose it.
पण उगाच वेळ जात नाही म्हणून contradictory विधानं करायची. !!

ज्ञानाची कवाडं उघडली तर कळतं की अजून कीत्ती काही शिकायचं आहे. " आहार" म्हणजे dietics वर सर्वात जास्त प्रश्ण पेशंत विचारतात. आणि दुर्दैव असं की हे ज्ञान खूप कमी डॉक्टर्सना असत. कारण हा विषय अभ्यास्क्रमात नाहीच मुळी. पण वाचन, रिसर्च आणि अनुभवातून कळतं की डायबिटिस , ब्लडप्रेषर सारख्या आजारात डाएट चांगलं असेल तर संपूर्ण कंट्रोल साधता येऊन औषध बंद ही होऊ शकतं.
हे स्विकारण्यासाठी सगळ्यात आधी acceptance हवा. कुठल्च शास्त्र परिपूर्ण नाही. म्हणूनच होलिस्टिक शास्त्र हे एक अप्कमिंग शाखा उदयास येत आहे.

शेवटी पेशंट सूज्ञ आहेत. पण मायबोलीसारख्या दर्जेदार फोरम चा हेल्दी डिस्कशन साठी उपयोग केल्यास उत्तम.

घाटपांडे, बायपास सुचविणारा त्यावेळी अ‍ॅवेलेबल असणारी त्याच्या दृष्टीने बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट सुचवित असतो.
समजा नसतील बायपासला पैसे तर आम्ही पेशंटला वार्यावर सोफत नाही.
इतर गोळ्या चालूच ठेवतो.
बायपासला पैसे नाहित तर मर अ से म्हणणारा सीवीटीएस मी तरी पाहिला नाहीये.

<<बायपासला पैसे नाहित तर मर अ से म्हणणारा सीवीटीएस मी तरी पाहिला नाहीये.>>
अगदी हे टोक नसले तरी अप्रत्यक्षरित्या तसे सूचित करणारे डॉक्टर्स असतातच की! जागृती / प्रबोधनाच्या नावाखाली भय पसरवून शोषण करणारे सर्व क्षेत्रात असतातच की! मुळ मुद्दा असा कि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेउन उपचार करणे हे सर्वसामान्यांना शक्य होतेच असे नाही. तो त्याच्या आवाक्यातले पर्याय निवडत असतो.पैशाअभावी उपचार देउ न शकल्याने कितीतरी मृत्यु होत असतातच ना?

घाटपांडे तुमचं खरय.
पण हेल्थ सर्विसेसच्या बाबतीत ओपन मार्केट अ‍ॅटिट्यूड तेव्हाच शक्य होईल जेव्हा घेणारा,निवड करणारा पेशंट सुजाण/ वेल इनफॉर्म्ड असेल.
मला सांगा, कुठल्यातरी इंशुरन्स क्लेममध्ये बिलींग क्लेममध्ये अल्टरनेतिव मेडिसीन क्लेम होतं का? भारतात/ यू एस मध्ये होतं का?
सरकारने एक 'आयुष' नावाची ओपिडी सगळ्या सरकारी डिस्ट्रीक्ट हॉस्पिट्लात चालू केलीय निदान इथे कर्नाट्कात तरी. ज्यात आयुर्वेद, युनानी, सिद्धा आणि होमिओपथीचे लोक पोस्टेड असतात . फ्री असूनही तिकडे कुणी फिरकत नाही.
हेच डॉक्टर संध्याकाळी आपल्या प्रायवेट ओपिड्यांत मॉडर्न मेडिसीन प्रिस्क्राईब करतात.

मला तर कुठल्याही पॅथीविषयी काही म्हणणे नाही अ‍ॅज लाँग अ‍ॅज ते न शिकलेल्या,परमिशन नसलेल्या गोष्टी वापरून मालप्रॅक्टीस करत नाहीत तोपर्यंत.आणि उगाच आमच्यास्ट्रीमला नावे ठेवत नाहित तोपर्यंत. Wink

साती, ( तूम्ही लोकं निदान इथल्या नावामागे तरी डॉ. लिहा हो. नुसती नावं लिहायला बरं नाही वाटत. ) हा मुद्दा
फार महत्वाचा. म्हणजे पेशंटला बरीच माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे.
पण ती कुठे मिळणार ? बहुतेक सर्व तज्ञ आपल्या क्षेत्राबद्दलच लिहिणार आणि पेशंट आपल्याला उपयोगी पडलेल्या उपचारांबाबत. या सर्वाचे नि:पक्षपाती विश्लेषण कोण करणार ?

आणि त्यासाठी परत एकदा फॅमिली डॉक्टरकडे लोकांनी वळावे असे वाटते.

आणि त्यासाठी परत एकदा फॅमिली डॉक्टरकडे लोकांनी वळावे असे वाटते.

अनुमोदन!
अगदी आमच्या एका पॅथीतही नेमक्या कुठल्या स्पेशालीस्ट डॉक्टरकडे जावे हे साम्गायला फॅमिली डॉक्टर हवेत.

बाकी दिनेशदा डॉ साती म्हणायची गरज नाही , अगदी 'अगं साती 'असंही तुम्ही हक्काने म्हणू शकता.

आभार साती,
सध्या पेशंटस्ची संख्या जास्त आणि डॉक्टर कमी असे झालेय असे नाही वाटत ? ( हे तर सगळ्या क्षेत्राबाबत झालेय. शिक्षक-विद्यार्थी... ) त्यामूळे पेशंटच्या सर्व शंकांना उत्तरे देणे शक्य होत नाही, हे खरे का ?

माझा स्वत:चा गोव्यातील डॉ. प्रिती वळवईकर यांचा अनुभव तर कायम लक्षात राहण्याजोगा आहे. पहिल्याच भेटीत नेमके काय झालेय, काय ट्रींटमेंट करायची आहे, किती सेशन्स लागतील, किती खर्च येईल याचा पूर्ण अंदाज दिला होता.

मग प्रत्येक सेशनच्या वेळी आज काय ट्रीटमेंट देणार आहे, ( त्या तर हत्यारे पण मला दाखवत असत. ) शिवाय जी औषधे तोंडात टाकणार आहे त्याची चव कशी आहे. जी अँटीबायोटीक्स दिली होती, त्याचे साईड इफेक्ट्स काय होतील.. हे पण सांगत असत. मला अवघडल्यासारखे झाले तर ट्रिटमेंट थांबवण्यासाठी मी काय खूण करायची.. हे पण सांगितले होते.. हे उदाहरण अत्यंत दुर्मिळ आहे याची मला कल्पना आहे.

हा संवाद महत्वाचा आहे असे मला वाटते. सर्वच पथीच्या डॉक्टरांनी त्यांच्या उपचार पद्धतीबाबत अवास्तव दावे न करता, मर्यादांसकट पूर्ण कल्पना देणे महत्वाचे. आणि बहुतेक डॉक्टर्स सध्या तरी हे करतातच.

बाकी पुजातैंनी काही प्रश्नांना मस्त बगल दिली. एक एक विधाने म्हणजे जोरदार होती इतकी प्रगती होवून ------------ वगैरे वगैरे. बाकी आता एकदम गडी मानसोपचाराकडे वळली. म्हणजे सर्व गोष्टी होमिओपॅथीने बऱ्या होतात असा दावा आहे काय? बाकी ह्यांचे दुकान बाकीच्यांना दुषणे देवूनच चालते. म्हणजे तिकडे साईड इफेक्ट्स होतात आणि आमच्याकडे तसे होत नाही. बाकी धागकार्त्यांची प्रसिद्धी आपसूक झालेली आहे आणि आता पुजातैंची पण झाली आहे त्यामुळे मार्केटिंग उत्तम जमले आहे असे म्हणण्यास वाव आहे.

दिनेशदा,
तुमचे बरेचसे अनुभव Aneccdotal Evidence मध्ये मोडतात. टॉन्सिल सारख्या साध्या आजारात असे प्रयोग करायला हरकत नाही. पण गंभीर आजार असेल तर तेथे पाहिजे जातीचे..

होमिओपॅथी ( किंवा इतर कोणतीही पर्यायी उपचार पद्धत) वर असलेला अतिरेकी विश्वास कधी कधी महागात पडतो.

http://www.guardian.co.uk/world/2009/sep/28/homeopathy-baby-death-couple...

“like cures like”=काट्याने काटा <<<<< तसे नसते हो
एकास असे झाले तेव्हा असे औषध दिले तर इतके बरे वाट्ले मग दुसर्‍यास तसे झाले तर असे औषध देवू त्यासही बरे वाटेल असे काहीसे असते होपॅत

नक्की काम कसे करते <<<<<<

एखादा शेर नेमका कसा सुचतो कसा पूर्ण होतो असे म्हट्ल्यासारखे आहे हे ज्याचे उत्तर "नक्की सांगताच येत नाही हो..... " हे आहे

होपॅ एक शास्त्रच आहे माझा विश्वास आहे
ज्याला समजले त्यास समजते नाही त्याला काहीच नाही
(ज्याला अनुभव आला त्याला आला नाही त्याला नाही हेही खरेच आहे )

मी विठ्ठलाचा भक्त आहे मी गणपतीच्या पाया पड्णार नाही या भूमिकेतून हे अ‍ॅलोपॅथी वाले आयुर्वेदिक ला होपॅ ला व व्हाईस व्हर्सा एकमेकांचा हे लोक विरोध करत असतात बाकी काही नाही !!!!

विजय, होमिओपथीचा माझा केवळ एकच अनुभव लिहिलाय मी, दुसरा बहिणीचा आहे.
आणि बाकिच्या औषधोपचारांच्या पद्धतीबद्दलही लिहिलेय.

पुढच्या पोस्ट्स बघाच.

मला वाटतं आता मुद्दे संपले असावेत. (माझे तरी संपले ) धागाकर्ते नवीन धागा काढतील, त्यावेळी परत बोलू.

पूजाएस, आवडले तुमचे सगळे प्रतिसाद.

आकांडतांडव करणार्‍या सगळ्या डॉक्टर (अ‍ॅलोपॅथ) मंडळींनी माझ्या वरील प्रश्नाचं उत्तर देण्याचे कष्ट घ्यावेत. मॅलप्रॅक्टीस करणारे होमीओपथी डॉक्टर या विषयाकडे न घसरता (मॅलप्रॅक्टीस कोण करत नाहि?), प्रॅक्टीस करणारे अ‍ॅलोपॅथ, होमीओपथी कडे का वळतात याचा खुलासा आपापल्या माहितीनुसार करावा.

poojas - अतिशय अप्रतीम पोस्ट्स. चांगला दणका दिलाय. माबोच्या भाषेत तुत्तरफोड का काय म्हणतात तसे उत्तर. Happy

-----

अवांतर: मॅलप्रॅक्टीस करणारे डॉक्टर >> हा विषय तर सत्यमेव जयतेच्या एका धाग्यावर चर्चिला गेला होता आणी त्या वेळी देखील यांपैकीच डॉक्टर महाशयांनी भयानक थयथयाट केला होता ते आठवले. Wink

प्रश्न किती ट्क्के हा आहे कि मुळात वळतातच का, हा आहे?

आणि वळणारे अ‍ॅलोपथीचे दिग्गज असुन सुद्धा?

गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे...

अहो,अ‍ॅलोपथीत सर्जरी केलेले फेक बुवा बापूसुद्धा होतात. शिक्षणाने आयुर्वेदाशी संबंध नसलेले तांबे आयुर्वेदाचार्य होतात. जैसे जिसकी सोच.
एखाद गवंडी रंगारी झाला म्हणजे बिल्डिंग बांधण्यापेक्षा रंगकाम महत्त्वाचे असे नाही.
बिल्डिंग बांधणे मिथ्या असून रंगकाम एकच काय ते खरे असे तर अज्जिबातच नाही.

असा, तुमचे एकमेव जीवितकार्य त्या डॉक्टरांविषयी आदळाआपट करण्याचे असल्याने तुम्हाला गेट वेल सून शिवाय काही इतर प्रतिसाद देणे योग्य नव्हे. Happy

प्रश्न हा सुद्धा आहे की इतकी वर्षे टिकून सुद्धा होमियोपथी मेजर मेडिकल सायन्स का समजले जात नाही? इथे वर पेशंट सुज्ञ आहेत असं पुजाएस म्हणत आहेत आणि तेच नेमकं नाहीये. शेवटी कुठलाही रुग्ण डॉक्टर बरोबर सांगतील ह्या विचारानेच त्यांच्या कडे जातो. त्या डॉक्टरांनी जर आपल्या उपचाराचे/पथीचे लिमिटेशन लक्षात योग्य त्यावेळी मागे नाही सरकले तर पेशंटची वाट लागू शकते. इथे पुजाएस ह्यांनी लिहिलेल्या पोस्टींमध्ये सुद्धा कुठेही त्यांच्या उपचार पद्ध्तींना लिमिटेशन्स आहेत ह्याचा पुसटसा सुद्धा उल्लेख दिसत नाही उलट अ‍ॅलोपथी ची झक पडली आणि त्यामुळे लोकं होमियोपथी कडे वळतात असं म्हणत आहेत. स्वतः घेतलेल्या शिक्षणाला कोणी कमी लेखत असेल तर राग येणे सहाजिक आहे पण ह्या उदाहरणात खरच होमियोपथी ला लिमिटेशन आहेत आणि ते विचारात न घेऊन कोणी प्रॅक्टिस करत असतील तर पेशंटच्या जीवाशी खेळच म्हणावा लागेल.
कोणी दिग्गज काही कारणांनी होमियोपथी कडे एक्स्पेरिमेंट किंवा आवड म्हणून वळले तर ठीक आहे पण जेव्हा वेळ येइल तेव्हा स्वतःची जवाबदारी ओळखून पुढे योग्य सल्ला देतीलच पण असल्या लोकांचे दाखले देऊन होमियोपथी लगेच होलियर दॅन होली झाली असा निष्कर्ष आपण मेडिकल सायन्सची माहिती नसलेल्या लोकांनी कसा काय काढायचा?

इथे पुजाएस ह्यांनी लिहिलेल्या पोस्टींमध्ये सुद्धा कुठेही त्यांच्या उपचार पद्ध्तींना लिमिटेशन्स आहेत ह्याचा पुसटसा सुद्धा उल्लेख दिसत नाही >>>>>>>>>>>>>>>

वैद्य बुवा...
मराठीत लिमिटेशन ला मर्यादा आणि स्कोप ला बलस्थान असे म्हणतात. जर लक्षपूर्वक चर्चेत सहभाग असेल तर हे वाक्य तुम्हाला नक्की सापडेल.

बाकी धागकार्त्यांची प्रसिद्धी आपसूक झालेली आहे आणि आता पुजातैंची पण झाली आहे त्यामुळे मार्केटिंग उत्तम जमले आहे असे म्हणण्यास वाव आहे.>>>>>>>>>>>>

पोटतिडकीने आपण जे शिकलो त्या बद्दल लिहिलं तर ही जाहीरात होत असेल तर उद्यापासून दुकान बंद करून इथेच मुक्काम ठोकते.
साईड बिझनेस करायाला हरकत नाही... माझ्यामुळे होमिओपॅथी चालणार असेल तर भारी पर्याय आहे की ओ चैतन्य !!

शुगोल, राज आणि असा... धन्यवाद !!
मी जे शिकले तेच शेअर करतेय.. वेगळं काही नाही अहो. !!!
पण अभिमान आहे होमिओपॅथ असल्याचा. Happy

राज,
>>आणि वळणारे अ‍ॅलोपथीचे दिग्गज असुन सुद्धा?<<

जे अर्धा पाव टक्का अर्धशिक्षित "अ‍ॅलोपॅथ्स" साबुदाणे विकून जास्त पैसे मिळतात असे म्हणून तिकडे वळले ते अ‍ॅलोपथीचे दिग्गज. अन रोज उठून टेट्रा/वोवेरान्/डेक्सा प्लस एनेस, आरेल, डी५ मिळून किती नोटा पाडता येतात या विवंचनेत आलेले ९९% डीएच्चेमेस डबडे त्यांच्या पॅथीतले दिग्गज होतात का हो??

विरोधासाठी विरोध हे बरे नव्हे.

आपण काय बोलतो आहोत याचाही विचार करावा बोटे उचलून कीबोर्डला लावण्या आधी.

आजपासून तुम्हाला होणार्‍या पुढील सर्व आजारांसाठी तुम्ही कोणती उपचारपद्धती स्वीकारणार ते सांगा, मग पुढचा पेग मारू आपण. Wink
तुम्हाला थोडेफार गुगल, देवाने दिले असावे असा माझा अंदाज आहे. कुणीही केलेला कोणताही दावा स्वतः तपासून पहाता का? की फक्त अमुक ग्रंथात असे लिहिले आहे इतपत स्पष्टीकरण ऐकले की खुश रहाता? की अमुक आयडीने काही बोलले, तर त्याच्या विरोधी कुणीही बोलत असेल त्याला जी रं रं रं जी रं रं जी जी अशी झील तोडता?
असो. तुम्हाला देवाने गूगलपेक्षा अधिक काही दिले असावे, व तुम्ही त्याचा वापर करूनच टंकत असणार असे म्हणून हे अवांतर संपवतो, चिअर्स!
*
अरे, हो! हे राहिलं म्हणून संपादित केला प्रतिसादः
>.(मॅलप्रॅक्टीस कोण करत नाहि?)<<
उत्तर "मी" असे आहे.
धन्यवाद.

मॅडम,

मायग्रेन बद्दल काही प्रश्न विचारले होते.

व्हर्टायगो.

मिडल व इनर इयर ची अ‍ॅनाटॉमी सांगता का जरा?
वर्टायगो अन गिडिनेस मधे काही फरक असतो का? व्हेस्टिब्युलर व नॉन वेस्टिब्युलर व्हर्टायगो मधे काय फरक आहे? मानवी शरीराचा तोल सांभाळण्याचे काम नक्कि कसे होते? काही लोकांना बस लागते. इतरांना नाही, ते का? वेस्टिब्युलर सिडेटिव्ह्ज म्हणजे काय? व्हर्टायगो ची खरी ट्रीटमेंट काय असते? पेन किलर्स, की स्टिरॉईड्स? की फक्त व्यायामानेच तो बरा होऊ शकतो? व्हर्टायगो साठीचे व्यायाम अ‍ॅलोपथीत आहेत की योगा मधे? Wink
डेड इअर कसा बनवतात? का? कधी?

फ्रोजन शोल्डर.
म्हणजे नक्की काय हो? त्याला सर्जरीने काही करता येते का? ही सर्जरी म्हणजे भूल देऊन नक्की काय करतात?? की व्यायाम हाच अल्टिमेट प्रकार असतो?.. असो.

मॅडम, २-४ मेडिकल टर्म्स ठाऊक असल्या म्हणजे अ‍ॅलोपथीची धाव डिफाईन करता येते का?

तुमच्या रेपर्टरी अन मटेरिआ मेडिका, अन होमपॅथ सॉफ्टवेअरचे काऊंट्स मला २८६ काँप्युटर्सच्या जमान्यापासून ठाऊक आहेत. अभ्यास नसला तर मी तोंड उघडत नाही अन बोटे कीबोर्डला लावत नाही..

इतर प्रतिसादक नॉन मेडिको आहेत.त्यांच्याशी बोलतो तसे तुमच्याशी बोलणार नाही. डॉक्टरकी किती येते तुम्हाला ते पहातोय विचारून. उत्तर द्या. नैतर शांत बसा. होम्योपथिक उत्तर देखिल चालेल. कोणत्या ह्युमरचा ब्यालन्स कोणत्या व्हर्टायगोत किती गेला, ते कसे मोजले, अन त्यामुळे व्हर्टायगोचे प्रकार कसे ठरले, अन त्यावरून कसे सो कॉल्ड "पर्सनल" औषध ठरवले ते तरि सांगा? आम्हा बिचार्‍या अ‍ॅलोपॅथ्सना हे एकमेकांना सांगावेच लागते. नाहीतर चारचौघांत वस्त्रहरण होते. कसे कुठे ते तुम्हाला ठाउक आहे.

मी ज्या दिवशी स्वतःला हीलर समजू लागलो त्या दिवशीपासून मला ठाऊक आहे, की मी परमेश्वर नाही. मी एक साधा मेकॅनिक आहे, अन फक्त बिघडलेली शरीरे दुरुस्त करण्याचा फक्त प्रयत्न करू शकतो. फक्त प्रयत्न. अन अधिक स्किल जमा करायचादेखिल प्रयत्न.

ऑन अदर हँड, तुम्ही महान होम्योपॅथ दिसता, अन तुमचे पेशंट सूज्ञ. ऐश करा Wink

रच्याकने. स्कोप = आवाका. बलस्थाण नव्हे. अन स्ट्रेंग्थ ही नव्हे.

दिनेशदा,
तुमच्याबद्दल मनात आलेल्या स्नेहभावाला स्मरून तुम्हाला वेगळा प्रतिसाद दिलाच पाहिजे.
तुम्ही उदाहरने सांगितलीत, अन वि.कु. वर म्हणतात तसा तो किस्सारूपी पुरावा आहे.

आजकाल टॉन्सिलची ऑपरेशने खूपच कमी झालीत असा माझा अनुभव आहे. हे ऑन टोन्सिल गोळ्यांनी होते आहे असे तुम्हाला वाटते का? Wink

मॉडर्न मेडिसिन हे बंद दारे असलेल्या धर्मा सारखे नाही. (धर्माची दारे बंद असतात. : टण्या यांच्या सूचनेवरुन अ‍ॅडेंडम) मूळ धर्मग्रंथात बदल करता येणारच नाही असे आमच्यात अजिब्बात नसते. नवी उपचारपद्धती जर उपयुक्त असेल तर ती नक्कीच स्वीकारली जाते, पण त्याआधी तिची पूर्ण चीरफाड केली जाते. काय कसे कधी केव्हा कुणामुळे कुठे होते, हे पाहून त्याचा अर्क काढून मग हजारदा धोपटून ते स्वीकारतात.

तुम्ही पडला शाकाहारी. लिव्ह ५२ मधे काय आहे ठाऊक आहे का तुम्हाला? Wink नसेल तर जौन्द्यात.. फक्त, काविळीचे किती प्रकार असतात ते एकदा गूगलून पहाच. अन कुठे कुठे लिव्हर एक्स्ट्रॅक्ट खाऊन बरे वाटू शकेल ते ही पहा..

Pages