होमिओपॅथी आणि पेन-किलर्स

Submitted by अमितकरकरे on 25 April, 2013 - 09:12

होमिओपॅथी आणि पेन-किलर्स

“डॉक्टर, बाहेर थंडी पडली, किंवा जरा थोडे श्रम झाले की हा गुडघा लागलाच ठणकायला. हा असा सुजतो म्हणून सांगू! अगदी जीव नकोसा होतो. मग हाडांच्या डॉक्टरांनी दिलेली ‘क्ष’ गोळी घेतली की जरा दोन दिवस बरे, पुन्हा येरे माझ्या मागल्या! तुमच्या होमिओपॅथीमध्ये नसतात का पेनकिलर्स ?” ६८ वर्षांच्या जोशीआज्जी विचारत होत्या.

“एरवी वर्षभर काहीच त्रास होत नाही या डोकेदुखीचा, पण आमची वर्षातून एकदा कॉन्फरन्स असते, त्यात सकाळपासून इतक्या गोष्टी मॅनेज करायला लागतात की नाश्ता, जेवण यांची भेटसुद्धा होत नाही. त्यात तो कामाचा ताण. त्या दिवशी नेमके माझे डोके ठणकायला लागते, मग उलटीचे फिलिंग, मळमळ, आणि उजेड किंवा आवाजाचा अतिप्रचंड त्रास. शेवटी पित्त बाहेर काढल्याशिवाय चैनच पडत नाही! त्या दिवशी घेता येईल असे काही अनाल्जेसिक औषध होमिओपथीमध्ये नाही का?” २४ वर्षाचा आयटी कंपनीत काम करणारा रोहन जाजू विचारत होता.

वेदनाशामक औषधे (पेन किलर्स)

जगात सर्वात जास्त परस्पर (ओव्हर-दी-काउंटर) खपणारी औषधे म्हणजे पेनकिलर्स, अर्थात वेदनाशामक औषधे. पित्ताने उठलेले डोके असो वा गॅसेसमुळे झालेला पोटशूळ, वयाने धरलेले सांधे असोत वा कमरेत भरलेली उसण; वेदना आणि त्यासाठी लागणारी औषधे यांचा संबंध आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी येतोच. काहींना तर या औषधांवर इतके अवलंबून राहावे लागते की त्या औषधांचाही त्रास (साईड-इफेक्ट) व्हायला लागतो, म्हणजे मग त्या औषधासाठी वेगळे औषध! अशावेळी आठवते साईड-इफेक्ट्स नसलेली होमिओपॅथी . . .

होमिओपॅथिक वेदनाशमन

होमिओपॅथिक पद्धतीमध्ये सरसकट सर्वांसाठी एक-दोन औषधाचा मारा करण्याऐवजी प्रत्येक रुग्णाची प्रकृती आणि स्वभाव-भिन्नता पाहून उपचाराची दिशा ठरवली जाते. यात वेदनेची तीव्रता, भावना (ठणका, जळजळ, आवळणे, टोचणे इ.), रुग्णाची सहनशक्ती, व सर्वात महत्वाचे म्हणजे वेदना कमी-जास्त करणारे घटक जसे चोळणे, शेकणे, मसाज करणे, इ. यांचा विशेष विचार केला जातो. वेदना कोणत्या अवयवातून-भागातून अथवा पेशींपासून होत आहे हे बरेचदा रुग्णाने केलेल्या वर्णनावरून लक्षात येते, त्याचाही डायग्नोसीससाठी व त्यानुसार औषध ठरविण्यासाठी फार उपयोग होतो. गरज पडल्यास रक्ताची (गाऊट सारख्या आजारात) तपासणी अथवा इमेजिंग (एक्सरे, एमआरआय स्कॅन) द्वारे त्यावर शिक्कामोर्तब केले जाते.

वेदनांसाठी उपचार ठरविताना त्याचे सर्वसाधारण तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते:

१. तात्कालिक वेदना:

काही वेदना या तात्कालिक (acute) स्वरूपाच्या असतात – जसे पाय मुरगळणे अथवा अपघातात ईजा होणे. अशा आजारांमध्ये काही काळासाठीच उपचार दिले जातात. होमिओपॅथिक औषधांपैकी आर्निका, ऱ्हसटॉक्स, सिम्फायटम अशी औषधे लक्षणांचा विचार करून दिली असता वेदनांवर त्वरित उतार पडतो.

२. विशिष्ठ कारणामुळे उत्पन्न होणाऱ्या वेदना:

लेखाच्या सुरवातीला दिलेल्या उदाहरणामधील रोहन प्रमाणे काही वेदना काही विशिष्ठ कारणाने अथवा काही प्रसंगानुरूप डोके वर काढतात. बऱ्याच जणांना भूक अथवा उन सहन होत नाही, किंवा काही विशिष्ठ अन्नपदार्थ खाल्ले की पोटात दुखते (जसे खवा, अंडे, काही फळे) किंवा आईस्क्रीम खाल्ले की घसा धरतो किंवा वेगवेगळ्या अॅलर्जी. अशा पेशंट्सना ते विशिष्ट कारण टाळल्यास महिनोंमहिने काहीच त्रास होत नाही, पण जरा संयम सोडला की मात्र...

अशा आजारावर उपचार करताना त्रास देणाऱ्या त्या व्यक्ती-विशिष्ठ कारणाची व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या लक्षणांची चिकित्सा होमिओपॅथीमध्ये केली जाते व त्यानुसार काहीकाळ औषध दिल्याने त्रास कमी होतो. त्याचसोबत प्रकृती-चिकित्सा करून औषध दिल्याने त्याचा समूळ नाश होण्यास मदत होते. प्रकृतीनुसार दिलेल्या हिपार-सल्फ, बेलाडोना, पल्सेटिला, सबाडीला, ब्रायोनिया, अर्सेनिक अल्बम, किंवा फॉस्फरस यांसारख्या औषधांचा अशा रुग्णांना खूप उपयोग होतो. बऱ्याच मुलींना मासिक पाळीच्या पहिल्या-दुसऱ्या दिवशी प्रचंड पोटात दुखते, अगदी सुट्टी घेऊन घरी बसावे लागते – अशांना मॅग फॉस, क्युप्रम मेट, कोलोसिंथ अश्या औषधांचा खुपच फायदा होतो, आणि पाळी चालू असली तरी अभ्यास अथवा काम थांबून राहत नाही.

माझे बरेचसे पेशंट्स त्यांच्या प्रकृतीनुसार दिलेले असे एखादे औषध नेहमी जवळ बाळगतात. अगदीच अचानक त्रास देणारे कारण घडल्यास किंवा दुखण्याची नुसती सुरवात होत आहे असे वाटल्यास एखादा डोस घेऊन ताबडतोब कामाला लागतात. कोणी विचारले की सांगतात, “हे माझे पर्सनल पेनकिलर आहे.”

३. अगदी रोजच्या झालेल्या वेदना:

वयोमानामुळे झीज होऊन सुजणारे-दुखणारे जोशी-आज्जींचे गुडघे मात्र तिसऱ्या प्रकारात मोडतात. या प्रकारच्या आजारांमुळे शरीरात घडलेल्या बदलांमुळे अगदी दरदिवशी वेदनांचा सामना करावा लागतो. गुडघ्यांची झालेली झीज, जास्त प्रमाणात वाढलेला संधीवात, मणक्यांच्या झिजेमुळे सुरु झालेला स्पॉन्डीलायटीसचा विकार किंवा कर्करोगाच्या अंतिम अवस्थेतील होणाऱ्या वेदना यांचा विचार या प्रकारात होतो. यातील आजारामध्ये पुन्हा फारशी भरून न येणारी झीज अथवा बदल झालेले असतात, अशा वेळी लक्षणांचा विचार करून विशिष्ठ अवयवांवर काम करणाऱ्या होमिओपॅथिक औषधांची (organ remedies) निवड करणे जास्त हितावह ठरते. हेक्ला लावा, कल्केरिया फ्लुर, मर्क्युरीयस, ब्रायोनिया, किंवा एपिस सारख्या औषधांचा वापर करणे जास्त हितावह असते. यातील काही आजारांच्या अवस्थेत वनस्पतींचे मुलार्क जास्त परिणामकारक ठरतात.

थोडक्यात सांगायचे तर होमिओपॅथीमध्ये सुद्धा अत्यंत परिणामकारक अशी वेदनाशामक औषधे उपलब्ध आहेत. या उपचारपध्दतीच्या तत्वाप्रमाणे आजार हळुवारपणे पण नेमका आणि कायमचा बरा करणे या औषधांच्या मदतीने अगदी सहज साध्य होते. फक्त त्यासाठी रुग्णाकडून आपल्या प्रकृतीचे आणि आजाराचे योग्य वर्णन व निरीक्षण, व त्याचप्रमाणे त्यानुसार डॉक्टरांकडून योग्य औषधाची निवड होणे महत्वाचे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टण्या,

पण एखाद्या आजारावर अमूक एक औषध/पद्धती काम करते पण का करते ते माहिती नाही पण काम करते म्हणुन वापरली जाते असे आधुनिक वैद्यकात घडते का?

नाही.

की कुठलाही उपचार हा आधी संपूर्णपणे सिद्ध झाल्याशिवाय वापरला जात नाही? भले मग तो काम करत का असेना?

बरोबर....

आणि कर्करोग का होतो याचे ठाम उत्तर माहीत आहे की...त्यामुळे

उदा: एखाद्या प्रकारचा कर्करोग एखाद्याला का होतो ह्याचे ठाम उत्तर सध्या माहिती नाही पण त्यावर किमोथेरपी हा उपचार काम करतो व कश्याप्रकारे करतो हे माहिती आहे व वापरले जाते.

हे आपले विधान योग्य नाही.

उदा: एखाद्या प्रकारचा कर्करोग एखाद्याला का होतो ह्याचे ठाम उत्तर सध्या माहिती नाही पण त्यावर किमोथेरपी हा उपचार काम करतो व कश्याप्रकारे करतो हे माहिती आहे व वापरले जाते.>> मी काही डॉक्टर नाही पण घरात ३ लोकांचे कर्करोग जवळून पहिले आहेत. तिन्ही ठिकाणी ह्या होमिओपॅथीचा काहीही फायदा झाला नाही. उलट बरेच वेळेला ह्यातून सुटका कशी करावी ह्याचीच घालमेल लागून राहिले. म्हणजे डॉक्टर लोकांपेक्षा आजूबाजूचे अहो ह्याचे साईड इफेक्ट्स काही नसतात. घेवून बघा. अमक्याला गुण तमक्याला गुण आला वगैरे गोष्टी सांगून भरीस पडतात. वरती पुजातैंनी जशी करणे दिली आहेत. तशीच करणे डॉक्टर देत होते. समूळ बारा करतो काट्याने काटा वगैरे. हे काय आहे ज्याचा त्याचा विश्वास आहे. आणि तसेही आपल्याकडे भरपूर अंधश्रधा आहेतच त्यात हि पण एक. ती इतकी खोलवर रुजली आहे कि ज्याचे नाव ते. आता जर का सध्याच्या प्रगत संशोधनपर कर्करोग कसा होते ते सांगू शकत नाही तर मग होमिओपॅथीद्वारे बारा होतो हे कसे काय कळते बुवा? आणि जर बर्या झालेल्या लोकांच्या टेस्टस आधुनिक alopathy प्रमाणे करणार असतील तर काहीतरी गल्ली चुकली असे का नाही वाटत?

बाकी ते सोडून सोडा हो पण त्या लोकसंखेच्या विधानाचे काय झाले बुवा? आमच्या नवीन माहितीत भर आहे पण त्याचे प्रूफ मिळाले तर बरे होईल.

टण्या,
चांगला प्रश्न.
मूळात कॅन्सर का होतो याचे कारण थेअरीज अ‍ॅलोपथीला माहिती आहेत. मोलेक्यूलर्,सेल्युलर लेवलवर काय बदल होतो ते माहिती आहे. हो मात्र प्रत्येक कॅन्सर अमुक एका व्यक्तीला/च का झाला याचे उत्तर प्रत्येकवेळी देता येईलच असे नाही.
एखादे औषध कसे काम करते हे कळलेय असे जेव्हा आम्ही तेव्हा त्या मोलेक्यूलचा सेल्युलर लेवलवर प्रत्यक्ष काय इफेक्ट होतो ते कळले तरच.
उदा. एखादे औषध मलेरियात देतात तेव्हा ते मलेरियाच्या पॅरासाईटला मारते एवढेच कळणे उपयोगी नसते तर त्या औशाधातील कुठला मोलेक्यूल मलेरियाच्या पॅरासाईटच्या पेशीतील कुठल्य भागावर हल्ला करतो काय केमिकल प्रोसेस मुळे काय सेल्युलर इफेक्ट होतो ते कळाले तरच. मग त्याचा लिदल डोस, त्याचा टॉक्सिक डोस, त्याचे फारमॅको कायनेटिक डायनेमिक सगळे कळल्यावर आणि डबल ब्लाईंड ट्रायलमध्ये त्याचे पूरेसे उपचारातील महत्त्व सिद्द झाल्यावरच ते वापरात येते.
लई किचकट आहे. बाकीचं नंतर तुमच्या विपूत लिहिते.

>>मूळात कॅन्सर का होतो याचे कारण थेअरीज अ‍ॅलोपथीला माहिती आहेत. मोलेक्यूलर्,सेल्युलर लेवलवर काय बदल होतो ते माहिती आहे.
साती, इथे 'अंशतः' माहिती आहे म्हणणं योग्य ठरेल असं नाही का वाटत? 'कॅन्सर का होतो' यावर संशोधन अजूनही चालूच आहे. नेमकं एकच कारण नसल्यामुळे (अत्यंत ढोबळमानानं म्हणायचं तर Apoptosis = programmed cell death न होणं) अनेक शक्यता आणि कारणं पडताळून बघितल्या जाताहेत.

उदा: त्यातल्या एका भागावर डॉ. डाफना बर-सागी यांचा ऑनगोइंग रीसर्च. सेल बायलॉजी/आँकोजेनेटिक्सचे काही क्लासेस त्यांनी शिकवल्यामुळे त्यांच्या रीसर्चशी अगदी थोडाफार परिचय..

रार (बहुतेक) याच प्रांतात संशोधन करते किंवा करायची. ती सांगू शकेल.

एखाध्या टॉप मेडिकल स्कुलचे प्रोफेसर, हॉस्पीटल मध्ये कार्यरत असणारे प्रॅक्टीसिंग सर्जन, अ‍ॅलोपथीने बरा न होणार्‍या रुग्णाला होमिओपथीचं औषध देतात आणि बरा करतात. का? कारण त्यांना अ‍ॅलोपथीच्या मर्यादा माहित आहेत. त्यांनी कुठलाहि इगो न कुरुवाळता, वेगळी उपचार पद्धती अवलंबली - रुग्णाच्या भल्याकरता. आणि ती सुद्धा कायदेशीर पणे.
<<
राज भाऊ, तुम्हाले काब्रं भाव देऊन र्‍हायलो माले ठाऊक न्हाई, कदाचित तुम्ही ड्रिंक ऑफर केली म्हणून असेल.

हे कोण अ‍ॅलोपथी सर्जन व अ‍ॅलोपथीने बरा न होणार्‍या नक्की कोणत्या रुग्णाला होमिओपथीने बरा करतात याचा सत्य विदा दिलात तर त्याचे उत्तर मी नक्कीच देऊ शकेन. अन ते उत्तर तुम्हाला अन त्या महोदयांनाही अडचणीत आणेलच याची इन अँटिसिपेशन ग्यारंटी देतो. कुठला इगो कोण कुरवाळते आहे ते बघूच जरा. केव्हाचं लावून धरले आहेत त्यांचे नांव जरा सांगाच. मग कायदेशीरपणे पुढे बोलतो.

जर या साहेबांनी होमिओपथी त्या विषयाच्या कालेजात जाऊन शिकली नसेल अन त्यांच्या काऊन्सिलकडे रजिस्ट्रेशन नसताना ती औषधे वापरत असतील, तर भारतातल्या आजच्या कायद्यानुसार ते अगदि एम्सीएच सर्जन असलेत तरीही त्याक्षणी 'क्वॅक' आहेत, अन बोगस डॉक्टर म्हणून जेलीत पाठवता येतील Wink हे लै कायदेशीर सांगतो आहे. एक शब्दही खोटा नाही. तुमच्या हव्या तितक्या वकील मित्रांना विचारा.

याचाच कॉन्व्हर्स : होमिओपथीवाल्यांनी मॉडर्न मेडिसिनची औषधे लिहून नयेत, असा कायदा आहे. परवाच मेडिकल स्टोर्स बंद होती, ती का? त्याची कारणे आपापल्या ओळखीच्या मेडिकलवाल्यांना जरा विचारून पहा.

रच्याकने. शब्द झिलतोड्या असा आहे. झिलकर असाही वापरत असतील तर मला ठाऊक नाही, पण माझा शब्द 'झिलतोड्या' हाच. तेच तुमचे काम, असे पुन्हा एकदा सुचवितो.

मृ, व कॅन्सरविषयी प्रतिसाद लिहिणार्‍या सर्वांसाठीच.

हा अवांतर प्रतिसाद आहे, धागाविषयाशी संबंध नाही. मा. संपादकांनी उडवावा किंवा नव्या धाग्यात परिवर्तित करावा हे विनंती.

**

कॅन्सरबद्दल थोडे. अगदी सामान्य भाषेतले. थोडे अर्धशास्त्रीय भाषेत, ते आधी सांगतो, अन नंतर थोडं लिहितो.
पेशन्स लागेल. वाचून पहा.

१. जीव जन्मतो, तेव्हा तो दोन अर्ध पेशींच्या संयोगाने बनतो. स्पर्म, एग. दोघे मिळून एक पेशी बनते, ती एकाची दोन दोनाचे चार चाराचे आठ अशा एक्स्पोनेन्शिअली वाढू लागते.
मग अचानक त्या पैकि काही पेशींत एक प्रेरणा उत्पन्न होते, त्या अमुक प्रकारच्या पेशींत उत्क्रांत होऊ लागतात.
मग जर्मिनल लेयर्स, मग त्यातून अनेक उती, ऑर्गन्स (अवयव) उत्पन्न होतात. यातलं थोडं आपल्याला स्टेम सेल म्हणून पेपरात वगैरे वाचून ठाऊक आहे. टोटीपोटंन्सी असं याला म्हणतात. म्हणजे त्या पेशीमधे असलेली न्यूरॉन किंवा मसल किंवा स्किन किंवा काय वाट्टेल ते बनण्याची क्षमता.
अल्टिमेटली ती पेशी एक स्पेसिफिक काम करणारी पेशी बनते.
जसे,
मुंग्यांच्या वारूळात अंड्यांतून बाहेर आलेली मुंगी कामकरी, सैनिक, की राणी वा राजा मुंगी बनेल हे नक्की नसते, तसेच. पण शेवटी त्या पेशी तशा बनतात. मुंगी/पेशी "डिफरन्शिएट" होते. हे "नक्की" का होते ते आज ठाऊक नाही. म्हणजे अमुक ट्रिगर, तमुक प्रॉक्झिमिटी इ. इ. थेअर्या आहेतच. तरीही, माझ्या हातात अमुक बटण घेऊन दाबले तर त्या पेशीचा मी न्यूरॉन बनवीन, अशी ग्यारंटी असलेला स्विच शोधणे सुरू आहे.

२. आपल्याला जखम होते. स्किन, मसल, बोन फाटते, तुटते. किंवा जंतूंचा हल्ला होतो. मेंदूत अ‍ॅब्सेस होतो. लिव्हर मधे होतो. तिथले स्ट्रक्चर नष्ट होते. जणू बिल्डिंगचा अमुक मजला बाँब पडून फुटतो.

मग आजूबाजूच्या पेशी, रिपेअरिंग सुरू करतात. आधि रक्ताची गुठळी ती जखम सील करते. मग त्यात हळूहळू व्र्ण बनू लागतो. अनेक पेशी वाढून वाढून ति गॅप भरली जाते. शेवटी केव्हातरी, .'जखम भरली' असे सांगणारी काही शिट्टी वाजते, अन अन ह्या पेशी वाढायच्या थांबतात. काहिंदा व्रण बिनकामाचा असतो. काहिंदा तो मूळ अवयवाचे संपूर्ण काम करू शकत असतो. जसे जुळलेले हाड. कधी अर्धवट काम. त्वचा तर सांधली, पण त्यावर केस नाहीत, किंवा घाम येत नाही. इ.

काही लोकांचे व्रण फार मोठे व कुरुप असतात. भेग बुजवताना नवख्या गवंड्याने जास्तीचे सिमेंट थापावे तसे. keloids. पण व्रण असतात. जखम भरणार्‍या पेशींची वाढ थांबलेली असते.

-

समजा, ही वाढ थांबलीच नाही तर?
मला स्नायू बनायचंय हे ठरवून जन्माला आलेली पेशी मसल बनलीच नाही, अन तिथे जखम नसली तरी अनेक पेशी स्नायू बनायला जन्माला येतच राहिल्यात, अन कुणीच स्नायू बनलेच नाही तर?

तर याला कॅन्सर म्हणतात.

जितक्या पेशी मसल सारख्या जास्त, तितका कॅन्सर कमी स्ट्राँग. जितक्या जास्त अन-डिफरन्शिएटेड, तितका तो बेक्कार.

आता ती शिट्टी कोणती, जिला ऐकून पेशी पूर्ण डिफरन्शिएट होतील, अन वाढणे थांबवतील, अन ती का अन कशी वाजते, तेहि प्रत्येकच ठिकाणी, अन तशी शिट्टी बनवून कशी वाजवायची, हे सापडेल त्या दिवशी, आम्ही म्हणू की आम्हाला कॅन्सरचे कारण व उपचारही सापडले.

मला वाटते हे सापडेल त्याच दिवशी मी चुटकी वाजवून पेशंटच्या तोंडातून काही पेशी घेऊन त्याला नवे हृदय बनवून देवू शकेन Wink पण ते आजतरि सायन्स फिक्शन आहे.

आज आम्हाला ठाऊक आहे, की अनेक कारणे आहेत, किंवा असू शकतात असे स्ट्राँगली दिसते आहे. उदा. तंबाखू खाण्याने तोंडाच्या त्वचेला होणारी वारंवार इजा. पण कॅन्सर मधे नव्या पेशी जन्माला येतात अन त्यांच्यावर कोणताच कण्ट्रोल नसतो. इतके आम्हाला ठाऊक आहे.

मग आजची औषधे त्या नव्याने जन्माला येणार्‍या पेशी मारण्याचे काम करतात. किमो, रेडिओ, सर्जरी, अनेक प्रकारांनी आम्ही ही अनियंत्रित नवी वाढ थांबवायचा, जाळून, कापून, मारून टाकायचा यत्न करीत असतो. नव्या जन्मणार्‍या पेशी मारण्यासाठी मार्ग शोधले जातात. पण, ते मार्ग अजुनही पुरेसे टार्गेटेड नाहित. अनेक ठिकाणी रिसर्च सुरू आहे. टार्गेटिंग सुरू आहे. ट्रिगर शोधणे.... इ. असो.

म्हणुनच कीमोच्या पेशंट्ला "साईड इफेक्ट" येतात. कोणते? तर नॉर्मली रोज वाढणार्‍या पेशी : आतडि, पचनसंस्थेचे आतील आवरण. केसाची मुळे. नखांची मुळे, हीदेखील गाड्याबरोबर नळ्याच्या यात्रेप्रमाणे मारली जातात..

***

मला ठाउक असते की तोंडाच्या कॅन्सरवाल्याचा अर्धा चेहरा, अर्ध्या जिभेसकट, कापून फेकून द्यावा लागला, तरी माणिकचंद चघळणारा 'राजा' जिवंत राहू शकतो. कधी कधी मरूही शकतो, म्हणून आम्ही कमांडो ऑपरेशन बंद करीत नाही.

नुसत्या कीमोवर किंवा मॅरो ट्रान्स्प्लाण्टवर कधी कधी ल्युकेमिया बरा होऊ शकतो, कधी कधी बिना ट्रीटमेंटनेही नुसताच रेमिशनमधेही जाऊ शकतो. ल्युकेमियासाठी दर्द का रिश्ता अन रेटिनोब्लास्टोमासाठी श्वास सारखे पिक्चर पाहिलेत ना?

स्किन चे कित्येक कॅन्सर तर इन्शुरन्स पॉलिसीत देखिल कॅन्सर रिस्क रायडरमधे धरत नाहीत इतकी त्यांच्या बरे होण्याची ग्यारंटी असते.

तरीही, कित्येकदा, मला माझा पेशंट "जाणार" हे स्कोप टाकताच कळलेले असते.

तरीही प्रयत्न सोडता येत नाहीत, "साईड इफेक्ट" असले तरी रिस्क बेनिफिट रेशो मला पहायचा असतो, अन बेनिफिट जास्त अस्ला तर रिस्क मला घ्यायचीच असते.

एक ब्रेस्ट कापून टाकलेली, किमो घेऊन तळमळणारी, विग लावून किंवा रुमाल बांधून फिरणारी, ओकार्‍यांनी बेजार झालेली, तरीही जगायचंय म्हणून हसतमुखाने सगळं सोसत तिच्या बाळांशी खेळणारी पेशंट तुम्हाला दिसते, तशी त्या सर्जनलाही दिसतच असते हो. तो काय दगडाचा नसतो बनलेला... त्यानेच तर कापलेले असते रिस्क घेऊन. का?? का कापले? अन का दिले "साईड इफेक्ट"??

सिंपल रिझन.

इट्स माय जॉब.

माय पेशंट पेज मी टू डू माय जॉब.

आय मस्ट ट्राय टु डू टू द बेस्ट ऑफ माय कॅपॅबिलिटीज!

<<केव्हाचं लावून धरले आहेत त्यांचे नांव जरा सांगाच. मग कायदेशीरपणे पुढे बोलतो. >>
छान! आता कसं पहिल्यांदाच मुद्ध्याचं बोललात.

त्यांचं नांव, इतर माहिती नक्की देतो, पण थोडासा प्रॉब्लेम आहे. आतापर्यंत तुम्ही दडुन आहात, इब्लिस आय्डीमागे. तुमची खरी आयडेंटीटी ध्या, इथेच - अ‍ॅट लीस्ट खरं नांव आणि दवाखान्याचं नांव, पत्ता वगैरे. म्हणजे तुम्ही दिलेली माहिती पडताळुन मला तुम्ही मागितलेली माहिती देता येइल. फेअर इनफ?

<<कदाचित तुम्ही ड्रिंक ऑफर केली म्हणून असेल. >>
"यु नीड अ ड्रिंक", म्हटलं म्हणजे ड्रिंक ऑफर केली असं होत नाहि भाऊ. इट वॉज ए सजेशन/इन्फरंस आफ्टर सिइंग योर फ्रस्ट्रेशन... परत मिसइंटरप्रिटेशन, पण जाउध्या आता आम्हालाहि सवय झाली आहे... Happy

IT-B team shows how homeopathy works:-

http://articles.timesofindia.indiatimes.com/2010-12-16/mumbai/28261112_1...

इट्स माय जॉब.

माय पेशंट पेज मी टू डू माय जॉब.

आय मस्ट ट्राय टु डू टू द बेस्ट ऑफ माय कॅपॅबिलिटीज! >>>>>>>>>>>>

exactly ईब्लिस !! do your job honestly. If you really do it well then इतकं आरडा ओरडा करून सांगण्याची गरजही भासणार नाही. तुमचे पेशंटच तुमची जाहीरात करतील. & this is applicable for each & every dr... not just Iblis.

राहीला प्रश्न कॅन्सरचा आणी होमिओपॅथीचा...

१) ज्या धाग्यावर आपण चर्चा करत आहोत तिथे कोणीही कॅन्सर क्युअर करण्याचा दावा केलेला नाही. जे करत असतील त्यांच्याशी तुम्हाला पंगा घ्यायचा असेल तर खुशाल घ्या. शिवाय तुम्हाला काय आणि किती येतं याचं प्रदर्शनही करा.. !!

२) पण मुळात कॅन्सर या विषयावर जितकं संशोधन अ‍ॅलोपॅथीमध्ये सुरू आहे तितकंच बाकी alternative pathy मध्ये पण सूरु आहे. होमिओपॅथीच म्हणाल तर बरेच प्रथितयश होमिओपॅथ फर्स्ट स्टेज कॅन्सर क्युअर केल्याचा दावा करतात. मी अजून तितकी उंची गाठली नाही म्हणून मी तरी असा दावा करत नाही. पण विद्यार्थीदशेत पाहिलं आहे की होमिओपॅथी अशा ठराविक केसेस मध्ये खूप चांगला रिझल्ट देते.

आता उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं नसतं ना इब्लिस सगळीकडे. आणि इतका मोकळा वेळही नसतो. पण तरीही या कॅन्सर क्युअर फंडा मागचं लॉजिक आधी सांगते.

होमिओपॅथी मुळात आपली रोगप्र्तिकारक शक्ती बळकट करण्यावर काम करते. पण केमोथेरपी, कॅन्सर सेल्स सोबत आपल्या पांढर्‍या पेशींना सुध्दा नष्ट करते. अशी रोगप्रतिकारकशक्ती जी आपल्या शरीराला प्रत्येक आजारापासून संरक्षण देते तिलाच धोका पोहोचला की शरीर आपलं अवसान गमावून बसते.
मुळात कॅन्सर हा आजार लोकल नाही. तो सिस्टिमिक आहे. म्हणजे काय तर भले कॅन्सर ची गाठ ठराविक ठिकाणाहून सर्जरीने काढून टाकली तरी एकाचे दोन, दोनाचे चार , चाराचे आठ अशा गुणाकाराची प्रक्रिया शरीरात खूप आधिच सुरू झालेली असते. मग अ‍ॅलोपथीमध्ये सर्जरी नंतर केमो, रेडिएशन, टार्गेटेड किंवा लागल्यास हार्मोनल थेरपी देऊन उरल्या सुरल्या कॅन्सर सेल्सवर आपण मात केली अशा भ्रमात बरेच जण राहतात. आणी इतकं सगळ्ं करुनही बर्‍याच्दा रिकरन्स हा होतोच.

३) आपल्या सार्‍यांना हेही ठाऊक आहे की रेडिएशन आणी केमिकल्स खरं तर कार्सिनोजेनिक आहेत. म्हणजे कॅन्सर निर्माण करणारे आहेत. आता याला आपण थेराप्युटिक डोस म्हटलं तरी शेवटी रेडिएशन हार्मफुल च की हो.!! कॅन्सर होण्यामागे बर्‍याच कारणमिमांसा आहेत. ते कारण जर का तिथेच राहीलं तर रिकरन्स हा होणारच. होमिओपॅथी कारणांच्या मुळाशी जाते म्हणून रिकरन्स टाळण्यामध्ये तिचं योगदान आहे.

आता तर शास्त्र्ज्ञांनी सिद्ध्ही केलं आहे की आपली जीवन्शैली आणी आहार यामध्ये बदल घडवले तरीही कॅन्सर टाळता येऊ शकतो आणी कॅन्सर झाला असल्यास रिकरन्स टाळता येतो. होमिओपॅथीमध्ये डीटेल केस टेकींग मधून जीवन्शैलीचा मूळ अभ्यास केला जातो आणि त्याच्याशी साधर्म्य असलेलं औषध दिलं जातं.

४) आता खरच होमिओपॅथी क्युअर करते का?

मुळात कॅन्सर डायग्नोज होइ पर्यंत वेळ निघून गेलेली असते. आणी जिथे स्ट्र्क्चरल चेंजेस झालेले आहेत अशा so called irreversible पॅथोलोजीमध्ये होमिओपॅथी निव्वळ पॅलिएशन् देऊ शकते क्युअर नाही.
सुरुवातीच्या स्टेजेस मध्ये होमिओपॅथी रिझल्ट देते कारण रोगप्रतिकारक शक्ती शाबूत असते.
पण अॅडवान्स स्टेज मध्ये तर कुठ्लीही पॅथी क्युअर नाही देऊ शकत. रिकरन्स ची पॉसिबिलिटी असतेच. पण आपलं माणूस चार दिवस जास्त जगणार म्हणून प्रत्येक जण धडपडतोच.

५) कॅन्सर च्या लक्षणांपेक्षा केमोथेरपीने बेजार झालेले लोक ही आहेतच की हो. बरं त्यात ज्यांना परवडतात हे उपचार घेतातही. पण ज्यांना नाही परवडत ते होमिओपॅथीचा आधार घेतात. त्यामुळे असे पेशंट जर होमिओपॅथी कडे डायवर्ट होत असतील तर काय बिघडलं...

बट मॉरल ऑफ द स्टोरी इज.. निदान माझ्या अनुभवात तरी केमोथेरपीचे साईड इफेक्ट कमी करण्यात होमिओपॅथी खूप उत्तम प्रतिसाद देते. आणी रिकरन्स टाळण्यातसुद्धा.
हा दुवा हे सिद्ध ही करतो.

http://www.cancerresearchuk.org/cancer-help/about-cancer/treatment/compl...

बाकी कॅन्सर आणी क्युअर इज अ लाँग वे टू गो.... फॉर एवरी पॅथी.
वुई जस्ट कॅन कंट्रोल इट !!

आता पेशंट्लाही माहीत आहे की केमोथेरपी चे साईड इफेक्ट किती सीवीअर आहेत. भले मग टार्गेटेड थेरपी द्या किंवा आणखी काही. सोबत काउन्सिलींग आणी डाएट हे सगळ कंबाईन केलं तर कुठे पेशंट दोनाचे चार दिवस जगतो. ही वस्तुस्थीती आहे. फार्मा कंपनी तर आपलं प्रोडक्ट विकलं जावं म्हणून डॉक्टरांवर पाण्यासारखा पैसा ही ओतते. टूर काय नि पार्ट्या काय !!

पण या सगळ्या झटापटीत जगण्याची उमेद जे पेशंट गमावून बसतात त्यांना कुठ्लीही उपचार पद्धती द्या ती तित्कीशी इफेक्टीव नाही ठरत.

तरीही केवळ पॅनिक सिचुएशन चा फायदा घेऊन प्रिस्क्राइब करणारे डॉक्टरही आहेत्..!!
कित्तीतरी सेकंड ओपिनिअन होऊनही ठोस उपचार न मिळाल्याने फ्रस्ट्रेट झालेले पेशंट ही आहेत.
मग खरं तर ही पंण माल्प्रॅक्टिस होऊ शकतेच की..??

बाकी.. सरतेशेवटी हा एक दुवा नकी पहा. माझ्याच एका कॅन्सर पेशंटने माझाशी शेअर केला. कितपत तथ्य माहीत नाही. पण शेवटी रिझल्ट महत्वाचा.

http://www.youtube.com/watch?v=76819p5OIJY

आणि हो.. लास्ट बट नॉट द लिस्ट..

इथेच - अ‍ॅट लीस्ट खरं नांव आणि दवाखान्याचं नांव, पत्ता वगैरे. द्याच हो इब्लिस.
आम्ही पडलो अडाणी !! तुम्हाला पेशंट रिफर करु अहो अडलो नडलो तर.. कॅन्सर म्हंजे काय तेही माहीत नव्हतं बुवा आपल्याला... मग ब्रॅकिअल प्लेक्सस कसा बरं माहिती असणार.. सगळं काय ते अगाध ज्ञान आमच्या इब्लिस भाउंनाच हो !! keep educating us. मंडळ आभारी.

विषयांतर म्हणून नाही, पण आयुर्वेदाबद्दल काय मत आहे तुमचं? आजार बरा करण्याची क्षमता, साईड इफेक्ट्स इत्यादी मुद्द्यांसंबंधित.

मी इथून निवृत्ती घेत आहे.
धन्यवाद!
***
पूजाताई, तुमच्या जगात आनंदी रहा, अशाच तुमच्या पेशंट्स ना 'बरे' केले असे समजत रहा..
अरे हो,
ते माय्ग्रेन, त्याची पेन किलर्स, व्हर्टायगो, त्याची काय ती नक्क्ष व्होमिटा
महान आहात.
अशी गेंड्याची कातडी हवी तरच तुमची 'पॅथी' चालवता येते Wink
चालू द्या!
***
राज,
तुम्हाला गिफ्टः

<<इब्लिस | 14 May, 2013 - 12:20
मी इथून निवृत्ती घेत आहे.
धन्यवाद!
*** >>

अरेच्च्या! इतक्या लवकर शेपुट घातलीस? वाटलंच होतं कि तु शेपुट घालणार किंवा मिस्टर इंडिया होणार. असो.

तुणतुणं घेउन तुझा फोटो टाक, फ्रेम करुन लावता येइल, माबोकरांसाठी - इथेच.
Happy

साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण !!!

बाकी...

गेंड्याची कातडी ..अगदी समर्पक उपमा दिली कि हो भौ !!

गेड्याची कातडी निसर्गाने इतकी भारी डिझाईन केलिये.. की पाण्याबाहेर त्याला घाम येत नाही म्हणून वार्‍याने त्याची कातडी पटकन सुकते पण पाण्यात त्याच्या स्वेदग्रंथीतून एक गुलाबीसर तेलकट द्रव स्रवतो जो नॅचरल सनस्क्रीन्चं तर काम करतोच पण तो द्रव अँटीबॅक्टेरिअल पण असतो. म्हणूनच गढूळ पाण्यात लोळून सुद्धा गेंड्याला स्किन इन्फेक्शन होत नाही. आणि गेंडा ठ्णठणीत राहतो. ::) आहे की नाय मज्जा !!

तर सांगायचा मुद्दा असा..
प्रत्येक प्राणीमात्र असा विचारर्पूर्वक निसर्गाने बनवला आहे.
आपण तर बुद्धीजीवी.. थोडं ज्युडिशीअसली प्रॅ़क्टीस करु आणि आपापल्या उपचार पद्धतीचे कंगोरे शोधून काढू.
उपचार महत्वाचे.. अपप्रचार घातक !!

बाकी इथे आमच्या जगात नेहमीच आनंन्दाचे डोही आनंद तरंग असतो.!! आम्ही पेशंटला "बरे" करताच, पेशंटच आम्हाला "बरे"च पेशंट आणून देतो. आणि मग आमच्या जगात पुन्हा आनंद पसरतो.
आमचे तुटपुंजे ज्ञान कुणाला उपयोगी पडले तर सोनेपे सुहागा...

बाकी सचिन तरी प्रत्येक मॅच मध्ये सेंचुरी मारतो का? मग आंम्ही बापुडे तर अगदीच सामान्य.
पण प्रयत्न नेहमीच राखेतून फिनिक्स सारखी भरारी मारण्याचा राहील.

कोणी निंदो अथवा वंदो !!!

शुभम भवतु Happy

पूजाजी,

१ तुम्ही दिलेल्या IITB विषयक लिंकचे शीर्षकच दिशाभूल करणारे आहे. केवळ डायल्यूट केलेल्या औषधात मूळ औषधाचे काही कण सापडले म्हणजे तेवढ्यावरून IITB Team shown how Homeopathy works असे म्हणणे पराचा कावळा करण्यासारखे आहे. शिवाय IITB चे हे तथाकथित संशोधन कुठेही replicate झालेले नाही. Control Group नसलेले हे पोरकट संशोधन इतर कुठेही मान्य होणार नाही. त्या IITB च्या टीमने हे संशोधन केमिकल इंजि च्या जर्नल मध्ये का प्रसिद्ध केले नाही? Avogadro Number च्या कल्पनेलाच छेद देणारे हे संशोधन इतके भारी आहे कि त्यांना नोबेल मिळेल.

पण मुळात कॅन्सर या विषयावर जितकं संशोधन अ‍ॅलोपॅथीमध्ये सुरू आहे तितकंच बाकी alternative pathy मध्ये पण सूरु आहे.

अजिबात नाही. मेडिकल सायंस मध्ये हे संशोधन जितक्या शिस्तीने आणी काटेकोरपणे सुरु आहे तसे इतर कोठेही नाही.

होमिओपॅथीच म्हणाल तर बरेच प्रथितयश होमिओपॅथ फर्स्ट स्टेज कॅन्सर क्युअर केल्याचा दावा करतात.

वचने किं दरिद्रता. प्रथितयश म्हणजे 'फेमस' असे म्झणायचे आहे का? बरेच बुवा आपल्या मंतरलेल्या ताईताने रोग, विवाह, परदेशगमन, H1B stamping इ सर्व समस्या सुटतात असा दावा करतात. गावोगाव एस टी स्टँड परिसरात दवाखाना थाटणारे डॉ. 'अनेक' आजार बरे करण्याचा दावा करतात. जोपर्यंत एखादा होमिओपॅथ आपले कँसरवरील उपाय शास्त्रिय कसोट्यावर पारखू देत नाही तोपर्यंत ते पोकळ दावेच होत.

पण विद्यार्थीदशेत पाहिलं आहे की होमिओपॅथी अशा ठराविक केसेस मध्ये खूप चांगला रिझल्ट देते.

Anecdotal Evidence. सांगोवांगीच्या कथा.

कँसर वरचे आपले विचार वाचून मात्र हसावे कि रडावे कळत नाही. केमोथेरपीमुळे पांढर्‍या पेशी मरतात ही साधी गोष्ट एमडी डॉक्टरांना कळत नाही असे आपणास वाटते का? सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजती पंडितः या उक्तीप्रमाणे साईड इफेक्ट चा पुरेपूर विचार करूनच हे केले जाते. कँसर च्या रोग्यांनी केमो वगैरे न करता फेरम फॉस आणी सिलिका च्या साबुदाणा गोळ्या घ्याव्यात की काय?

होमिओपॅथी कारणांच्या मुळाशी जाते म्हणून रिकरन्स टाळण्यामध्ये तिचं योगदान आहे.

आणकी एक शेंडा बुडखा नसलेले वाक्य.

सुरुवातीच्या स्टेजेस मध्ये होमिओपॅथी रिझल्ट देते कारण रोगप्रतिकारक शक्ती शाबूत असते

या विधानाला काहीही पुरावा नाही.

पण ज्यांना नाही परवडत ते होमिओपॅथीचा आधार घेतात. त्यामुळे असे पेशंट जर होमिओपॅथी कडे डायवर्ट होत असतील तर काय बिघडलं...

ज्यांना परवडत नाही ते बुवा, नवस, देवाला कोंबडे कापणे वगैरे गोष्टेकडे वळले तर काय बिघडलं? कँसरचे उपाय गरीबांना परवडण्यासारखे नाहीत ही खरी समस्या आहे. पण म्हणून 'तुम्हाला परवडेल त्या भोंदुकडे जा' असे त्यांना सांगणे योग्य नाही.

In a report published in February 2010, the UK Science and Technology Committee recommended that the NHS should stop funding homeopathy because there is no evidence that it works beyond the placebo effect

वरील वाक्य तुम्ही दिलेल्या दुव्यातच आहे.

कॅन्सर क्युअर करण्याचा दावा मी करत नाही. आणि दिशाभूल ही नाही. मॅलिग्नंट्ग ग्रोथ रिग्रेस करण्यात केमो, रेडिएशन इ. चा सिंहाचा वाटा आहे हे मी ही मानते. पण कॅन्सर मध्ये होमिओपॅथीची भुमिका पुढीलप्रमाणे असते.

I repeat,

1) as far as cancer is concerned Homeopathic medicines can also be administered along with the conventional medication serving as a complementary treatment for Cancer management.

2) It must be remembered that homeopathy is not a substitute or alternative for conventional medication or surgery wherever these are indicated.

3) One of the most distressing complaints associated with some varieties of Cancer is the agonizing pain. Conventional medicines can provide pain relief but there is always a restriction to the dosage that can be safely administered to the patient. The advantage of administering Homeopathic medicines in such cases is that there can be effective pain control without inducing any side effects.

4) Homeopathy can help in improving the general well being and vitality of the patient.

5) Conventional treatment options for cancer (chemotherapy, radiotherapy, etc) are associated with distressing side effects and homeopathy can play a definitive role to counter these side effects.

6) The diagnosis of cancer often leaves the patient with a sense of depression, anxiety and fear. The treatment may induce additional irritability, impatience and mood fluctuations. Homeopathy can influence the psyche of the patient and help him to deal with these emotions in a better way.

7) Homeopathic medicines also have a role to play in controlling the speed at which the disease increases and spread to other organs. That is how controlling the recurrence.

आणि फेरम फॉस आणी सिलिका किंवा साबुदाणा गोळ्या म्हणजेच होमिओपॅथी नाही कुलकर्णी काका !!

आणि कॅन्सर च्याच चौकटीत बसवून तिची पात्रता तापासायची असेल तर तुम्हीच पुन्हा सी.ई.टी देऊन होमिओपॅथी ला अॅड्मिशन घ्या. संशोधन करा. प्रूव्ह करा की ती युसलेस आहे सगळ्याच विकारांमध्ये. नॉट जस्ट कॅन्सर !!

डायल्युशन वरील संशोधन, तसेच बारावीतल्या नव्वद टक्क्यांपासून नोबेलपर्यंत चं म्हणाल तर हा दुवा वाचा.

http://www.huffingtonpost.com/dana-ullman/luc-montagnier-homeopathy-take...

आणि दुसर्‍याच्या डोळ्यात्लं मुसळ काढण्या मागचा तुमचा आणखि एक फेल प्रयत्न...

In a report published in February 2010, the UK Science and Technology Committee recommended that the NHS should stop funding homeopathy because there is no evidence that it works beyond the placebo effect.

पुढलं वाक्यं कोण लिहिणार काका.....

" However, the UK Government responded that patient choice is an important factor to consider. It has decided to continue to allow NHS homeopathic hospitals and homeopathic treatments where local doctors recommend them.

आणि त्याच्या पुढे अगदी महत्वाच जे लिहिलं त्यातिल म्हत्त्वाचे मुद्दे असे..

A review in 2009 looked at the effectiveness and safety of homeopathic medicines used to prevent or treat side effects of cancer treatments.

8 trials were reviewed and two reported positive results. One trial of 254 people showed that calendula cream worked better than trolamine (a commonly used non steroid cream) for preventing skin soreness due to radiotherapy.
A very small trial of 32 people showed that a homeopathic mouthwash called Traumeel S (containing belladonna, arnica, St John's wort and echinacea) worked better than a placebo to prevent a sore mouth due to chemotherapy.

2 small studies have suggested that homeopathy help women with breast cancer to cope with menopause symptoms.

A trial in 2000 showed that homeopathic medicine seemed to help to reduce skin soreness during radiotherapy in breast cancer patients.

A very small study was carried out in Germany in 2011. It found that patients with cancer treated with classical homeopathy had better quality of life and less tiredness (fatigue) than patients who did not have homeopathy.

A study of 9 patients took place in Chile in 2010. It looked at using a homeopathic injection therapy called Traumeel to reduce pain in patients after breast cancer treatment. The patients had a high level of pain even though they were taking painkillers. The researchers found that all patients had less pain after the injection. They also reported a better quality of life. But this was a very small study and bigger studies are needed to show whether Traumeel really works to reduce pain in breast cancer patients.

Homeopathy for children with cancer:
An Australian study in 2012 looked at the use of complementary and alternative medicines (CAMs) in children with cancer at the end of their life. They found that a third of parents used CAMs for their children. The most commonly used therapies were organic foods, faith healing, and homeopathy. Most parents felt that the therapies had helped their child.

A large German study in 2011 looked at the use of homeopathy in children with cancer. It found that the children who used homeopathy were very satisfied with the therapy and most said that they would recommend it to others.

आणि म्हणून च सांगते की संशोधन सुरु आहे. त्यालाही नकार घंटा वाजवणार असाल तर वाजवा !

afterall Coins always make sounds...but paper moneys are silent.

Cheers !!!

होमिऔपॅथी तत्वावर चालते, घटकावर नाही .माइंड बॉडी मेडीसीन हा एक चांगला पर्याय आहे. मॉडर्न मेडीसीनच्या चमच्यांनी या प्रश्नाची उत्तरे द्यावीत.
1. primary hypertention चा Cause हा unknown असतो, डॉक्टरलापण ठाऊक नसते hypertention का सुरु झाले आहे.इब्लिसने सांगावे.

2.मनुष्याची जाणिव( human subjective consciousness) हा काय चमत्कार आहे? हे मॉडर्न मेडीसीनला ठाऊक आहे का?
3 qualia हा चमत्कार मटेरीअरीलीस्टीक कसा आहे, हे सिद्ध करावे.(ईभ्लिशने)
4.तुमचे शास्त्र प्रगत आहे तर एखादी तरी पेशी प्रयोगशाळेत तयार का करु शकला नाहीत?

अमितकरकरे, तुम्ही अजुन या धाग्यावर आहात असं गृहित धरुन लिहितो. थोडाकाळ तुमचा हा धागा हायजॅक केला त्याबद्धल दिलगीर आहे. नाइलाज होता आणी काहि कलाकारांना फटकारणं आवश्यक होतं. अजुन काहि नमुने आहेत (जे मागच्या पानांवर साफसफाई करुन गेले - यु नो व्हु यु आर), त्यांचा समयोचीत, साग्रसंगीत जाहिर सत्कार करण्यात येइल. स्टे ट्युन्ड.

यापुढील चर्चा सुरळीत चालेल अशी आशा बाळगुया. Happy

(जे मागच्या पानांवर साफसफाई करुन गेले - यु नो व्हु यु आर), त्यांचा समयोचीत, साग्रसंगीत जाहिर सत्कार करण्यात येइल. स्टे ट्युन्ड. >>>>>> हे बहुतेक माझ्या करता होतं. मी केली साफसफाई. तुमच्या नावानी बडबड केली होती पण नंतर वाटलं शेवटी तुम्हीही तुमचा मुद्दाच मांडत आहात आणि मी लिहिलेलं मलाच अस्थानी वाटलं म्हणून काढून टाकलं.

नमस्कार,
चर्चा वाचली !

युरोपात होमिओपथिस- वैद्यक शास्त्र म्हणून मान्यता नाही पण सर्वदूर वाढता प्रभाव जरूर आहे.
विद्यापीठातील प्राध्यापकांशी बोललो तेव्हा समजले कि इथे होमिओपथि औषधे रुग्णास देण्यासाठीसुद्धा आधुनिक वैद्यकशास्त्राचे अधिकृत शिक्षण असावे लागते.

धन्यवाद !

थोडक्यात, इंग्लंड मध्ये होमिओपथीला मान्यता आहे ती तिच्या मेरिट मुळे नसून लोकाग्रहास्तव.

तुम्ही दिलेल्या दुसर्‍या दुव्यात एका नोबेल विजेत्याने होमिओपथीला पाठिंबा दिला असे आहे. त्याला appeal to authority असे म्हणतात. तो पुरावा होऊ शकत नाही. बाकी तुम्ही संदर्भ दिलेली इतर सर्व संशोधनेही अशीच गचाळ आहेत. या सर्व संशोधनाचा अभ्यास करून होमिओपथी बोगस आहे हा निष्कर्ष Lancet ने काढला आहे. शिवाय जेम्स रँडीचे आव्हान आहेच. तुम्ही वारंवार संदर्भ देता त्या Dana Ullman चा खोटेपणा बीबीसी वर आहे.

It must be remembered that homeopathy is not a substitute or alternative for conventional medication or surgery wherever these are indicated

हे अतिशय महत्वाचे वाक्य होमिओपॅथी वाल्यांच्या ध्यानात आले तरी पुरे. दुर्दैवाने अनेक होमिओपथ ( विशेषतः ग्रामीण भागातले) पेशंटच्या जिवाशी खेळत असतात. वर उदयन यांनी दिलेले चित्र असलेच उद्दाहरण. एका गरोदर स्त्रीला थायरॉईड चा प्रचंड त्रास होत असतानाही पल्सेटिला सारख्या साबुदाण्याच्या गोळ्या देणारेही पाहिलेत.

मी डॉक्टर नाही त्यामुळे मला होमीओपेथी वाल्यांचा मत्सर वगैरे वाटत नाही.

उदयन ,आपल्या मेडिकल व्यवसायाची अशी जाहिरात करणे भारतात कायदेशीर आहे कि नाही माहित नाही. इकडे अमेरिकेत अजमेरी बाबाच्या जाहिराती पाहून मी तक्रारही केली होती. काही दिवस बंद होती पण आता परत सुरु झाली असावी.

विकु, मस्त आहेत तुमच्या पोस्टस.
भारतात मेडिकल व्यावसायिकांना जाहिराती करणे कायदेशीर आहे की नाही माहिती नाही पण एम सी आय च्या एथिक्समध्ये ते बसत नाही. ज्या व्यावसायिकांवर एम सी आय चा होल्ड आहे ते अश्या जाहिराती करताना दिसत नाहित.
पण हल्ली कार्पोरेट हॉस्पिटल्स सर्र्रास जाहिराती करतात. त्यात डॉक्टरच्र नाव मात्र कधीच लिहिले नसते.
आम्हीही इथे माबोवर जेव्हा लेख लिहितो तेव्हा स्वतःचे खरे नाव क्लिनिकचा पत्ता यापैकी काही उघड होऊ देत नाही. अ‍ॅज पार्ट ऑफ एथिक्स(काही लोकाना तो भ्याडपणा वाटतो Happy )
पण शेवटी एथिक्स हे एथिक्स आहेत . ते तुमच्या नैतिकतेवर अवलंबून आहेत. कायद्याने तुम्हाला त्याकरिता फोर्स करू शकत नाही. एम सी आय कडे तक्रार गेली तरच ते कारवाई करू शकतात.

>>>> हा अत्यंत हलकट प्रतिसाद लिहितोय. <<<<<
त्यात नविन काये इब्लिसराव? अहो ज्योतिष"शास्त्रा" सारख्या पुरातन शास्त्रावरही हलकट प्रतिसाद देणारे इथे कमी नाहीत, होमिओप्याथी तर मागल्या शतकातील निर्मिती, ती कशी सुटेल तुमच्या तडाख्यातून? नै का?
अन होमिओप्याथीवाल्यान्ना आमच्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे नै धर्मशास्त्राची साथ की नै एखाद्या खमक्या लिम्ब्याची साथ! Wink त्यामुळे तुमचे चालतय, चालूद्यात! आनन्द आहे.

<<अन होमिओप्याथीवाल्यान्ना आमच्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे नै धर्मशास्त्राची साथ की नै एखाद्या खमक्या लिम्ब्याची साथ!>>
आवडलच निरिक्षण!

जगण्यातली अनिश्चितता पचवायला कुठलीच पॆथी उपयोगाची नाही. कधी विज्ञानाचा आधार तर कधी श्रद्धा-अंधश्रद्धेचा आधार घेत लोक जीवनाची मार्गक्रमणा करीत असतात. आपद्प्रसंगी अ‍ॅलोपॅथी व क्रॉनिक आजारात पर्यायी उपचार पद्धती या पूरक म्हणुन वा पर्याय म्हणुन वापरतात. झाला तर झाला फायदा. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. असो.....

विषयांतराविषयी माफी पण सातीचा मुद्दा कळला नाही.

आम्हीही इथे माबोवर जेव्हा लेख लिहितो तेव्हा स्वतःचे खरे नाव क्लिनिकचा पत्ता यापैकी काही उघड होऊ देत नाही. अ‍ॅज पार्ट ऑफ एथिक्स

हे कळले नाही. मायबोलीवर आजवर आरोग्यासंबंधित जेवढे लेख मी वाचलेत ते सगळे लिहिणा-याने त्याला माहित असलेली माहिती + पुस्तके/नेटमधली चित्रे व माहिती यावर आधारुन लिहिलेले होते. स्वतःचे स्वतंत्र संशोधन वगैरे कोणी लिहिल्याचे मी तरी वाचलेले नाहीय. मग असे लेख लिहिण्यात (ज्यातली माहिती आधीच इतरत्र उपलब्ध आहे) एथिकल/अनएथिकल काय आहे?

कोणी त्याच्या नाव-पत्त्यासकट मायबोलीवर लेख लिहिला म्हणुन लगेच त्या माणसाची जाहिरात कशी काय होते? इथे स्वतःचे स्वयंपाकातले प्रयोग्/विणकामातले प्रयोग्/प्रकाशचित्रातले प्रयोग इ.इ. ढिगानी गोष्टी प्रकाशित होतात. इतर माबोकर लगेच त्यांच्याकडे रात्रीच्या जेवणासाठी/ विणकामाच्या नमुन्यासाठी/खास पोर्टफोलियो बनवण्यासाठी ऑर्डर्स देतात का? मग केवळ लिहिणारा डॉक्टर आहे म्हणुन त्याच्या दवाखान्यात धाव घेतील का?

आम्हीही इथे माबोवर जेव्हा लेख लिहितो तेव्हा स्वतःचे खरे नाव क्लिनिकचा पत्ता यापैकी काही उघड होऊ देत नाही. अ‍ॅज पार्ट ऑफ एथिक्स(काही लोकाना तो भ्याडपणा वाटतो स्मित )

>>>>>> ह्यात एथिक्सचा काय संबंध? आणि तुम्हाला असलेलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविणे, शेअर करणे ह्यात अनेथिकल काय आणि का असतं म्हणे?

साधनाला अनुमोदन, विषयांतराबद्दल क्षमस्व!

मी जितके साती ह्यांचे लेख वाचले त्याच्यामध्ये आपल्या शरीराची माहिती होती. करकरे ह्यांचे धागे माहिती स्वरुपाखाली असले तरी स्वतःची छुपी जाहिरात आहे. हे झाले अनएथीकल. पण हे जर का समजत नसेल तर वेड पांघरणे झाले. वरती ईब्लिस ह्यांचे नाव पत्ता वगैरे विचारले आणि त्यांनी निवृत्ती घेतली. मला हे बरोबर वाटले निदान आपण माहितीपुर्वक लिहून फारसा आधार नसलेल्या गोष्टीचा प्रचार करून ते स्वतःची प्रसिद्धी तरी मिळवत नाहीयेत. त्यांचे सगळेच मला पटते असे अजिबात नाहीये. पण बाकीच्या ठिकाणी काय झाले ह्याचा इथे काहीच संबंध नाहीये.

Pages