होमिओपॅथी आणि पेन-किलर्स

Submitted by अमितकरकरे on 25 April, 2013 - 09:12

होमिओपॅथी आणि पेन-किलर्स

“डॉक्टर, बाहेर थंडी पडली, किंवा जरा थोडे श्रम झाले की हा गुडघा लागलाच ठणकायला. हा असा सुजतो म्हणून सांगू! अगदी जीव नकोसा होतो. मग हाडांच्या डॉक्टरांनी दिलेली ‘क्ष’ गोळी घेतली की जरा दोन दिवस बरे, पुन्हा येरे माझ्या मागल्या! तुमच्या होमिओपॅथीमध्ये नसतात का पेनकिलर्स ?” ६८ वर्षांच्या जोशीआज्जी विचारत होत्या.

“एरवी वर्षभर काहीच त्रास होत नाही या डोकेदुखीचा, पण आमची वर्षातून एकदा कॉन्फरन्स असते, त्यात सकाळपासून इतक्या गोष्टी मॅनेज करायला लागतात की नाश्ता, जेवण यांची भेटसुद्धा होत नाही. त्यात तो कामाचा ताण. त्या दिवशी नेमके माझे डोके ठणकायला लागते, मग उलटीचे फिलिंग, मळमळ, आणि उजेड किंवा आवाजाचा अतिप्रचंड त्रास. शेवटी पित्त बाहेर काढल्याशिवाय चैनच पडत नाही! त्या दिवशी घेता येईल असे काही अनाल्जेसिक औषध होमिओपथीमध्ये नाही का?” २४ वर्षाचा आयटी कंपनीत काम करणारा रोहन जाजू विचारत होता.

वेदनाशामक औषधे (पेन किलर्स)

जगात सर्वात जास्त परस्पर (ओव्हर-दी-काउंटर) खपणारी औषधे म्हणजे पेनकिलर्स, अर्थात वेदनाशामक औषधे. पित्ताने उठलेले डोके असो वा गॅसेसमुळे झालेला पोटशूळ, वयाने धरलेले सांधे असोत वा कमरेत भरलेली उसण; वेदना आणि त्यासाठी लागणारी औषधे यांचा संबंध आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी येतोच. काहींना तर या औषधांवर इतके अवलंबून राहावे लागते की त्या औषधांचाही त्रास (साईड-इफेक्ट) व्हायला लागतो, म्हणजे मग त्या औषधासाठी वेगळे औषध! अशावेळी आठवते साईड-इफेक्ट्स नसलेली होमिओपॅथी . . .

होमिओपॅथिक वेदनाशमन

होमिओपॅथिक पद्धतीमध्ये सरसकट सर्वांसाठी एक-दोन औषधाचा मारा करण्याऐवजी प्रत्येक रुग्णाची प्रकृती आणि स्वभाव-भिन्नता पाहून उपचाराची दिशा ठरवली जाते. यात वेदनेची तीव्रता, भावना (ठणका, जळजळ, आवळणे, टोचणे इ.), रुग्णाची सहनशक्ती, व सर्वात महत्वाचे म्हणजे वेदना कमी-जास्त करणारे घटक जसे चोळणे, शेकणे, मसाज करणे, इ. यांचा विशेष विचार केला जातो. वेदना कोणत्या अवयवातून-भागातून अथवा पेशींपासून होत आहे हे बरेचदा रुग्णाने केलेल्या वर्णनावरून लक्षात येते, त्याचाही डायग्नोसीससाठी व त्यानुसार औषध ठरविण्यासाठी फार उपयोग होतो. गरज पडल्यास रक्ताची (गाऊट सारख्या आजारात) तपासणी अथवा इमेजिंग (एक्सरे, एमआरआय स्कॅन) द्वारे त्यावर शिक्कामोर्तब केले जाते.

वेदनांसाठी उपचार ठरविताना त्याचे सर्वसाधारण तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते:

१. तात्कालिक वेदना:

काही वेदना या तात्कालिक (acute) स्वरूपाच्या असतात – जसे पाय मुरगळणे अथवा अपघातात ईजा होणे. अशा आजारांमध्ये काही काळासाठीच उपचार दिले जातात. होमिओपॅथिक औषधांपैकी आर्निका, ऱ्हसटॉक्स, सिम्फायटम अशी औषधे लक्षणांचा विचार करून दिली असता वेदनांवर त्वरित उतार पडतो.

२. विशिष्ठ कारणामुळे उत्पन्न होणाऱ्या वेदना:

लेखाच्या सुरवातीला दिलेल्या उदाहरणामधील रोहन प्रमाणे काही वेदना काही विशिष्ठ कारणाने अथवा काही प्रसंगानुरूप डोके वर काढतात. बऱ्याच जणांना भूक अथवा उन सहन होत नाही, किंवा काही विशिष्ठ अन्नपदार्थ खाल्ले की पोटात दुखते (जसे खवा, अंडे, काही फळे) किंवा आईस्क्रीम खाल्ले की घसा धरतो किंवा वेगवेगळ्या अॅलर्जी. अशा पेशंट्सना ते विशिष्ट कारण टाळल्यास महिनोंमहिने काहीच त्रास होत नाही, पण जरा संयम सोडला की मात्र...

अशा आजारावर उपचार करताना त्रास देणाऱ्या त्या व्यक्ती-विशिष्ठ कारणाची व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या लक्षणांची चिकित्सा होमिओपॅथीमध्ये केली जाते व त्यानुसार काहीकाळ औषध दिल्याने त्रास कमी होतो. त्याचसोबत प्रकृती-चिकित्सा करून औषध दिल्याने त्याचा समूळ नाश होण्यास मदत होते. प्रकृतीनुसार दिलेल्या हिपार-सल्फ, बेलाडोना, पल्सेटिला, सबाडीला, ब्रायोनिया, अर्सेनिक अल्बम, किंवा फॉस्फरस यांसारख्या औषधांचा अशा रुग्णांना खूप उपयोग होतो. बऱ्याच मुलींना मासिक पाळीच्या पहिल्या-दुसऱ्या दिवशी प्रचंड पोटात दुखते, अगदी सुट्टी घेऊन घरी बसावे लागते – अशांना मॅग फॉस, क्युप्रम मेट, कोलोसिंथ अश्या औषधांचा खुपच फायदा होतो, आणि पाळी चालू असली तरी अभ्यास अथवा काम थांबून राहत नाही.

माझे बरेचसे पेशंट्स त्यांच्या प्रकृतीनुसार दिलेले असे एखादे औषध नेहमी जवळ बाळगतात. अगदीच अचानक त्रास देणारे कारण घडल्यास किंवा दुखण्याची नुसती सुरवात होत आहे असे वाटल्यास एखादा डोस घेऊन ताबडतोब कामाला लागतात. कोणी विचारले की सांगतात, “हे माझे पर्सनल पेनकिलर आहे.”

३. अगदी रोजच्या झालेल्या वेदना:

वयोमानामुळे झीज होऊन सुजणारे-दुखणारे जोशी-आज्जींचे गुडघे मात्र तिसऱ्या प्रकारात मोडतात. या प्रकारच्या आजारांमुळे शरीरात घडलेल्या बदलांमुळे अगदी दरदिवशी वेदनांचा सामना करावा लागतो. गुडघ्यांची झालेली झीज, जास्त प्रमाणात वाढलेला संधीवात, मणक्यांच्या झिजेमुळे सुरु झालेला स्पॉन्डीलायटीसचा विकार किंवा कर्करोगाच्या अंतिम अवस्थेतील होणाऱ्या वेदना यांचा विचार या प्रकारात होतो. यातील आजारामध्ये पुन्हा फारशी भरून न येणारी झीज अथवा बदल झालेले असतात, अशा वेळी लक्षणांचा विचार करून विशिष्ठ अवयवांवर काम करणाऱ्या होमिओपॅथिक औषधांची (organ remedies) निवड करणे जास्त हितावह ठरते. हेक्ला लावा, कल्केरिया फ्लुर, मर्क्युरीयस, ब्रायोनिया, किंवा एपिस सारख्या औषधांचा वापर करणे जास्त हितावह असते. यातील काही आजारांच्या अवस्थेत वनस्पतींचे मुलार्क जास्त परिणामकारक ठरतात.

थोडक्यात सांगायचे तर होमिओपॅथीमध्ये सुद्धा अत्यंत परिणामकारक अशी वेदनाशामक औषधे उपलब्ध आहेत. या उपचारपध्दतीच्या तत्वाप्रमाणे आजार हळुवारपणे पण नेमका आणि कायमचा बरा करणे या औषधांच्या मदतीने अगदी सहज साध्य होते. फक्त त्यासाठी रुग्णाकडून आपल्या प्रकृतीचे आणि आजाराचे योग्य वर्णन व निरीक्षण, व त्याचप्रमाणे त्यानुसार डॉक्टरांकडून योग्य औषधाची निवड होणे महत्वाचे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला होमिओपथीचा उपयोग झाला आहे असे सांगणारे लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत होमिओपथी हद्दपार होणार नाही. अंधश्रद्धा हद्दपार झाल्यात का?

एवढा विश्वास ना स्वतःच्या पथीवर मग आमच्या औषधांवर का डोळा?
>>
नामवंत होमिओपॅथीच्या दवाखान्यांची साखळी चालवणारे केस गळतीवर "हेअर ट्रान्सप्लांट" नावाची सर्जरीदेखील करतात.

अरे!
त्या मॅडमचं अभिनंदन! पूजाएस बहुतेक. असं नांव असावं..
प्रवान्गी मिळाली बर्का अ‍ॅलोपथीची Wink अभिनंदन.
नेक्ष्ट बटन घड्याळाचं दाबा Happy

अरेरे काय हा अत्याचार, आता होमिओपथिक डॉक्टरांना ती घाणेरडी,साईडइफे़क्ट्वाली वाईट्ट अ‍ॅलोपथी औषधे देता येणार? सरकारचा निषेध!

मी आत्ताच डॉ. शंतनु अभ्यंकरांचा होमिओपॅथी वरील लेख वाचला. त्यात प्लॅसिबो इफेक्टवर भर दिलेला आढळला. तो इफेक्टजरी धरला तरी बरीच लोकं जी इतर ट्रीटमेंट घेऊन थकली होती पण त्यांना होमिओप्याथीने फरक पडला अशी माहित आहेत. मग त्यांना आधीच्या उपचारात या इफेक्टने मदत का नाही मिळाली?
त्या औषधांत मुळ औषधाचे किती रेणू शिल्लक असतात इथपासून बऱ्याच शन्का आहेत मला. मग फरक पडला तरी कशाने पडतो लोकांना? एवढ्यात कोरोनामुळे राजीव बजाज, त्यांचे ते डॉक्टर शन्करन, ते चिंचवडचे निकम , अर्सेनिक अल्बम, कॅम्फोरा अशी नावे ऐकू येतात. राजीव बजाज तर छातीठोकपणे दावा करतात कि त्यांच्या कर्मचाऱ्यांना कॅम्फोरा दिल्याने स्वाईनफ्लूच्या साथीत कोणी आजारी नाही पडला. मला स्वतःला काहीच अनुभव नसल्याने मी स्तुती किंवा टीका नाही करू शकत. मला काही आजार नाही तसा पण या प्याथीच काही एखादं मदर टिंक्चर आहे का ज्याने काही प्रयोग करता येतील?

आर्सेनिक अलबम हे preventive म्हणून वापरायचे आहे. इलाज नाही. लस कशी आपण प्रेव्हेंटिव्ह म्हणून वापरतो. तरी कांजिण्या येतात पण intensity कमी असते कारण रोगप्रतिकार शक्ती तयार झालेली असते. समजा कोविद चा संसर्ग झालाच तरी आर्सेनिक अल्बम मुळे complication व्हायची शक्यता कमी असावी. (मी डॉक्टर नाही किंवा औषधांबद्दल काहीही ज्ञान नाही)

Pages