होमिओपॅथी आणि पेन-किलर्स

Submitted by अमितकरकरे on 25 April, 2013 - 09:12

होमिओपॅथी आणि पेन-किलर्स

“डॉक्टर, बाहेर थंडी पडली, किंवा जरा थोडे श्रम झाले की हा गुडघा लागलाच ठणकायला. हा असा सुजतो म्हणून सांगू! अगदी जीव नकोसा होतो. मग हाडांच्या डॉक्टरांनी दिलेली ‘क्ष’ गोळी घेतली की जरा दोन दिवस बरे, पुन्हा येरे माझ्या मागल्या! तुमच्या होमिओपॅथीमध्ये नसतात का पेनकिलर्स ?” ६८ वर्षांच्या जोशीआज्जी विचारत होत्या.

“एरवी वर्षभर काहीच त्रास होत नाही या डोकेदुखीचा, पण आमची वर्षातून एकदा कॉन्फरन्स असते, त्यात सकाळपासून इतक्या गोष्टी मॅनेज करायला लागतात की नाश्ता, जेवण यांची भेटसुद्धा होत नाही. त्यात तो कामाचा ताण. त्या दिवशी नेमके माझे डोके ठणकायला लागते, मग उलटीचे फिलिंग, मळमळ, आणि उजेड किंवा आवाजाचा अतिप्रचंड त्रास. शेवटी पित्त बाहेर काढल्याशिवाय चैनच पडत नाही! त्या दिवशी घेता येईल असे काही अनाल्जेसिक औषध होमिओपथीमध्ये नाही का?” २४ वर्षाचा आयटी कंपनीत काम करणारा रोहन जाजू विचारत होता.

वेदनाशामक औषधे (पेन किलर्स)

जगात सर्वात जास्त परस्पर (ओव्हर-दी-काउंटर) खपणारी औषधे म्हणजे पेनकिलर्स, अर्थात वेदनाशामक औषधे. पित्ताने उठलेले डोके असो वा गॅसेसमुळे झालेला पोटशूळ, वयाने धरलेले सांधे असोत वा कमरेत भरलेली उसण; वेदना आणि त्यासाठी लागणारी औषधे यांचा संबंध आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी येतोच. काहींना तर या औषधांवर इतके अवलंबून राहावे लागते की त्या औषधांचाही त्रास (साईड-इफेक्ट) व्हायला लागतो, म्हणजे मग त्या औषधासाठी वेगळे औषध! अशावेळी आठवते साईड-इफेक्ट्स नसलेली होमिओपॅथी . . .

होमिओपॅथिक वेदनाशमन

होमिओपॅथिक पद्धतीमध्ये सरसकट सर्वांसाठी एक-दोन औषधाचा मारा करण्याऐवजी प्रत्येक रुग्णाची प्रकृती आणि स्वभाव-भिन्नता पाहून उपचाराची दिशा ठरवली जाते. यात वेदनेची तीव्रता, भावना (ठणका, जळजळ, आवळणे, टोचणे इ.), रुग्णाची सहनशक्ती, व सर्वात महत्वाचे म्हणजे वेदना कमी-जास्त करणारे घटक जसे चोळणे, शेकणे, मसाज करणे, इ. यांचा विशेष विचार केला जातो. वेदना कोणत्या अवयवातून-भागातून अथवा पेशींपासून होत आहे हे बरेचदा रुग्णाने केलेल्या वर्णनावरून लक्षात येते, त्याचाही डायग्नोसीससाठी व त्यानुसार औषध ठरविण्यासाठी फार उपयोग होतो. गरज पडल्यास रक्ताची (गाऊट सारख्या आजारात) तपासणी अथवा इमेजिंग (एक्सरे, एमआरआय स्कॅन) द्वारे त्यावर शिक्कामोर्तब केले जाते.

वेदनांसाठी उपचार ठरविताना त्याचे सर्वसाधारण तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते:

१. तात्कालिक वेदना:

काही वेदना या तात्कालिक (acute) स्वरूपाच्या असतात – जसे पाय मुरगळणे अथवा अपघातात ईजा होणे. अशा आजारांमध्ये काही काळासाठीच उपचार दिले जातात. होमिओपॅथिक औषधांपैकी आर्निका, ऱ्हसटॉक्स, सिम्फायटम अशी औषधे लक्षणांचा विचार करून दिली असता वेदनांवर त्वरित उतार पडतो.

२. विशिष्ठ कारणामुळे उत्पन्न होणाऱ्या वेदना:

लेखाच्या सुरवातीला दिलेल्या उदाहरणामधील रोहन प्रमाणे काही वेदना काही विशिष्ठ कारणाने अथवा काही प्रसंगानुरूप डोके वर काढतात. बऱ्याच जणांना भूक अथवा उन सहन होत नाही, किंवा काही विशिष्ठ अन्नपदार्थ खाल्ले की पोटात दुखते (जसे खवा, अंडे, काही फळे) किंवा आईस्क्रीम खाल्ले की घसा धरतो किंवा वेगवेगळ्या अॅलर्जी. अशा पेशंट्सना ते विशिष्ट कारण टाळल्यास महिनोंमहिने काहीच त्रास होत नाही, पण जरा संयम सोडला की मात्र...

अशा आजारावर उपचार करताना त्रास देणाऱ्या त्या व्यक्ती-विशिष्ठ कारणाची व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या लक्षणांची चिकित्सा होमिओपॅथीमध्ये केली जाते व त्यानुसार काहीकाळ औषध दिल्याने त्रास कमी होतो. त्याचसोबत प्रकृती-चिकित्सा करून औषध दिल्याने त्याचा समूळ नाश होण्यास मदत होते. प्रकृतीनुसार दिलेल्या हिपार-सल्फ, बेलाडोना, पल्सेटिला, सबाडीला, ब्रायोनिया, अर्सेनिक अल्बम, किंवा फॉस्फरस यांसारख्या औषधांचा अशा रुग्णांना खूप उपयोग होतो. बऱ्याच मुलींना मासिक पाळीच्या पहिल्या-दुसऱ्या दिवशी प्रचंड पोटात दुखते, अगदी सुट्टी घेऊन घरी बसावे लागते – अशांना मॅग फॉस, क्युप्रम मेट, कोलोसिंथ अश्या औषधांचा खुपच फायदा होतो, आणि पाळी चालू असली तरी अभ्यास अथवा काम थांबून राहत नाही.

माझे बरेचसे पेशंट्स त्यांच्या प्रकृतीनुसार दिलेले असे एखादे औषध नेहमी जवळ बाळगतात. अगदीच अचानक त्रास देणारे कारण घडल्यास किंवा दुखण्याची नुसती सुरवात होत आहे असे वाटल्यास एखादा डोस घेऊन ताबडतोब कामाला लागतात. कोणी विचारले की सांगतात, “हे माझे पर्सनल पेनकिलर आहे.”

३. अगदी रोजच्या झालेल्या वेदना:

वयोमानामुळे झीज होऊन सुजणारे-दुखणारे जोशी-आज्जींचे गुडघे मात्र तिसऱ्या प्रकारात मोडतात. या प्रकारच्या आजारांमुळे शरीरात घडलेल्या बदलांमुळे अगदी दरदिवशी वेदनांचा सामना करावा लागतो. गुडघ्यांची झालेली झीज, जास्त प्रमाणात वाढलेला संधीवात, मणक्यांच्या झिजेमुळे सुरु झालेला स्पॉन्डीलायटीसचा विकार किंवा कर्करोगाच्या अंतिम अवस्थेतील होणाऱ्या वेदना यांचा विचार या प्रकारात होतो. यातील आजारामध्ये पुन्हा फारशी भरून न येणारी झीज अथवा बदल झालेले असतात, अशा वेळी लक्षणांचा विचार करून विशिष्ठ अवयवांवर काम करणाऱ्या होमिओपॅथिक औषधांची (organ remedies) निवड करणे जास्त हितावह ठरते. हेक्ला लावा, कल्केरिया फ्लुर, मर्क्युरीयस, ब्रायोनिया, किंवा एपिस सारख्या औषधांचा वापर करणे जास्त हितावह असते. यातील काही आजारांच्या अवस्थेत वनस्पतींचे मुलार्क जास्त परिणामकारक ठरतात.

थोडक्यात सांगायचे तर होमिओपॅथीमध्ये सुद्धा अत्यंत परिणामकारक अशी वेदनाशामक औषधे उपलब्ध आहेत. या उपचारपध्दतीच्या तत्वाप्रमाणे आजार हळुवारपणे पण नेमका आणि कायमचा बरा करणे या औषधांच्या मदतीने अगदी सहज साध्य होते. फक्त त्यासाठी रुग्णाकडून आपल्या प्रकृतीचे आणि आजाराचे योग्य वर्णन व निरीक्षण, व त्याचप्रमाणे त्यानुसार डॉक्टरांकडून योग्य औषधाची निवड होणे महत्वाचे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहहहह!

>>कृतीनुसार दिलेल्या हिपार-सल्फ, बेलाडोना, पल्सेटिला, सबाडीला, ब्रायोनिया, अर्सेनिक अल्बम, किंवा फॉस्फरस यांसारख्या औषधांचा अशा रुग्णांना खूप उपयोग होतो.<<

अर्सेनिक अल्बम!
क्या बातै.

हे होम्योपथीवाले ,लोकहो, तुम्हाला सांगत असतात, की अ‍ॅलोपथीला साईड इफेक्ट आहेत.

ते आहेत, कारण आम्हीच बोम्ब मारून सांगतो की हो, आहेत. पाणी, ऑक्सीजनलाही साईड इफेक्ट आहेत.

या होम्योपथीवाल्यांचे कोणतेही औषध गूगलून पहा हो. मी मूर्ख अन हलकट असलो तरी तुम्हाला गूगल दिलंय देवाने Happy सगळेच गूगलून इथे लिंकत बसलो तर धंदा बुडेल माझा..

नताशा,
त्या कशा काम करतात(?) हे प्रूव्ह करणे त्यांचे काम आहे. अनेक देशांत ही 'पॅथी' चालत नाही, याचे कारण मी नव्हे.
फुल मार्केटात काम करणार्‍या हमालांना कस्लेच आजार होऊच नयेत ना?? Wink

इब्लिसभाऊ, तुमचा त्रागा समजु शकतो पण माझ्या पाहाण्यात एक उदाहरण आहे...

आमच्या परिचयाचे, मुंबईच्या केइएम (जी एस मेडिकल) हॉस्पीटल मधले प्रतिथयश सर्जन, हेड ऑफ द डिपार्टमेंट, भारतात मशहुर, काहि काळ भारतीय क्रिकेट संघाचे अधिकृत डॉक्टर, तुम्ही म्हणता त्या साबुदाण्याच्या गोळ्या देत असत, गरजु रुग्णांना.

काय कारण असेल बरं? Happy

आमच्या परिचयाचे, मुंबईच्या केइएम (जी एस मेडिकल) हॉस्पीटल मधले प्रतिथयश सर्जन, हेड ऑफ द डिपार्टमेंट, भारतात मशहुर, काहि काळ भारतीय क्रिकेट संघाचे अधिकृत डॉक्टर, तुम्ही म्हणता त्या साबुदाण्याच्या गोळ्या देत असत, गरजु रुग्णांना.

होतं असं कधी कधी. माझ्याही ओळखीतले एक प्रतिथयश सर्जन उतारवयात होमिओपथीच्या भजनी लागले होते. त्यांच्या एका मित्राच्या मुलीला बरे नव्हते तर फेरम फॉस फेसम फेस वगैरे साबुदाण्याच्या गोळ्या देऊन तिला बरे करायला निघाले होते. ताप फारच वाढला तेव्हा नशिबाने त्या मुलीचा आईने धीर करून खराखुरा डॉक्टर गाठला.

जगातली दुसऱ्या क्रमांकाची, सर्वात लोकप्रिय उपचार पध्धती म्हणजे होमिओपॅथी !!!

एक मुलगा आपल्या आईला म्हणतो " आई मी शर्यतीत दुसरा आलो"
"अरे वा ! किती मुले होती शर्यतीत ? "
"दोन"

एखाद्या उपचार पद्धतीचे महत्व लोकप्रियतेवर नाही तर संशोधनावर असते. होमिओपथीने आम्ही यंव बरं केलं, त्यंव बरं केलं अशा फुशारक्या मारणार्‍या डॉक्टरांना अमेरिकेतील जेम्स रँडीने दहा लाख डॉलर्स च बक्षीस लावले आहे. सिद्ध करा आणी घेऊन जा.

साध्या आस्पिरिन वरही कायम संशोधन सुरु असतं. उलट होमिओपॅथीवर आजतगायत एकही Controlled Double Blind संशोधन झालेलं नाही. होमिओपॅथी आणी पुटापर्थी साईबाबांची उदी यात फरक नाही.

> मुळात आपल्या शरीराची रचना विधात्याने इतकी विचार पूर्वक केली आहे की बहुतांश आजारांमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती बखूबी आपलं काम निभावते.

तुम्हाला इव्हॉल्युशन म्हणायचे असेल अशी आशा आहे

> पण ज्याप्रमाणे आग लागली तर वेळीच पाण्याचा मारा केला तर नुकसान कमी होतं तसंच वेळीच योग्यं आणि विचारपूर्वक उपाय केले आणि आवश्यकते नुसार औषध घेतलं तर आपण आपल्या आरोग्याला निट सांभाळू शकतो.

मुळात औषध त्यात असायला हवे ना! साखर (आणि अल्कोहोल) असते फक्त त्यात.

हा एक चांगला धागा सुरू केलात .होमि. डॉक्टर रोग्याला वेगवेगळे एकावेळी एकच औषध देतात आणि बरे करतात हे त्यांच्या शास्त्राला धरूनच आहे .ओवर द काउंटर मिळणारी होमि औषधे( ज्यामध्ये वेगवेगळ्या शक्तिच्या तीनचार औषधांचे मिश्रण असते)ही परिणामकारक आहेत .माझा अनुभव १.अंग ,स्नायुदुखीसाठी डॉ विल्मर श्वॉबचे अल्फा एम पि .२.पायाच्या भोवरिसाठी डॉ वक्नालीचे वॉरटेक्स ३टॉन्सिलस् साठी बक अॅंड कोलचे टॉन्सिलॉन .@सुमेधा फक्त होमि मध्ये शरिरातील गाठी(नोडयुलस्) गायब करण्याची औषधे आहेत ज्याकरिता आयुर्वेद आणि अॅलो निष्फळ ठरते (त्रिभुवनकीर्ति आणि एरिथरोमायसिन).आयुर्वेद पोटाच्या रोगांसाठी आणि अॅलोपथि व्हायरल प्रभावासाठी वापरावे .ज्यावर पूर्ण विसंबून राहाता येते तेच औषध .शास्त्रांची विनाकारण विवंचना सामान्य रोग्यांनी कशाला करायची ?

अॅलोपथि व्हायरल प्रभावासाठी वापरावे - आयुर्वेदातही पारिजातक वटी म्हणजेच तापवरचे त्रिभुवन किर्ती जर पारिजातकाच्या कोवळ्या पानांच्या रसाच्या मात्रा दिल्यास व्हायरल फिवर साठी अत्यंत गुणकारी असते असा माझा अनुभव आहे.

इब्लिसराव, आपला तुमच्या 'पॅथी' बद्दलच्या तळतळाटाला फार विरोध नाही, पण

"पेन किलर" हा शब्द एका तरी "अ‍ॅलोपथीच्या" पुस्तकात दाखवता का मला? >>

हा त्रागा म्हणावा की काय कळाले नाही. पेन किलर च्या ऐवजी अ‍ॅनालजेसिक म्हणत असतील पण त्याचाही अर्थ वेदनेपासून सुटका असाच होतो. मग नक्की काय म्ह्णायचे आहे?

अमुक औषध अमुक प्रकारे काम करतं हे मॉडर्न मेडिसिनमधला प्रत्येक डॉक्टर छातीठोकपणे सांगू शकतो.....जसं अ‍ॅनाल्जेसिक कसं काम करतात ते मी लिहीले आहे..... होपॅ असं सांगते का???? अमुक गोळी अमुक आजारात उपयोगी पडते हे सांगतात पण त्याचा मेकॅनिझम ऑफ अ‍ॅक्शन सांगा की राव........

आणि अमूक पेशंट बरे झाले हे सांगीतले जाते.... पण बरे न होणार्‍यांची संख्या कित्येक पटीत आहे त्याचे काय?

सरतेशेवटी..... ह्या सगळ्या पॅथी क्रॉनिक आजारांवर आपल्या औषधांचे होणार्‍या चांगल्या परिणामांचे गुण गातात........ अ‍ॅक्युट इमर्जन्सीजचे काय?????

आपल्या जवळच्या नातेवाईकास एम. आय. (हार्ट अटॅक )आला किंवा विषारी साप चावला तर हे होमिओपथीच्या गोळ्या देत बसतील की आयसीयुत अ‍ॅडमिट करतील ??????

हा अत्यंत हलकट प्रतिसाद लिहितोय. कारण एकच. अ‍ॅनॉन नसला, तर कोणताही मॉडर्न मेडिसिनचा डॉक्टर पब्लिकमधे इतक्या ऑनेस्टली बोलूच शकणार नाही. वर कैलासजींनी प्रयत्न केला आहेच ऑनेस्टीचा. तस्मात, पेशन्स असेल तर वाचा.>>>>>>>>>>>>>>>

वाचलं !!!

मॉडर्न मेडिसिनचे ग्रॅज्युएट्स अन पोस्ट ग्रॅज्युएट्स काय झक मारत असतात का १०-१२ वर्षे? >>>>>>

मी इतकच म्हणेन.. हा एक आत्मचिंतनाचा विषय होऊ शकतो !!

या होम्योपथीवाल्यांचे कोणतेही औषध गूगलून पहा हो. मी मूर्ख अन हलकट असलो तरी तुम्हाला गूगल दिलंय देवाने सगळेच गूगलून इथे लिंकत बसलो तर धंदा बुडेल माझा..>>>>>>>>

बाप रे........... केवढा तो त्रागा !!!

नक्की प्रोब्लेम काय आहे???

होमिओपथी रिझल्ट देते म्हणून इतका हा तळतळाट??? की अलोपथी मधे वयाची १० ते १२ वर्षे घालवून ही डॉक्टर या नात्याने आजार मुळापासून उपटण्यामधे आपण कमी पडतो याचं फ्रस्ट्रेशन ???

मुळात आपल्याला होमिओपथीच 'ह' ही माहीत नाही आणि त्याचं अक्खं व्याकरण स्पष्ट करणारे लोक हो.. दिवसेंदिवस होमिओपथीला सुगीचे दिवस येत आहेत आणि गेली २२० हून अधिक वर्ष सगळे टक्के टोणपे खाऊन ही तग धरून आहे ती "होमिओपथी" निव्वळ त्यातून मिळणार्‍या रिझल्ट मुळे !!

आणि कुठली उप्चार पध्हती चांगली की वाईट हे समजण्या इतके पेशंट सूज्ञ आहेत.
निव्वळ औषधाची mode of action तोंडपाठ असली आणि उत्तम डयग्नोसिस करता येत असलं तर उत्तम डॉक्टर होता येतं का??
अहो आज काल पेशंट स्वतः सांगत येतात, डॉक्टर मला मायग्रेन झालाय, वर्टिगो होतोय नाही तर फ्रोझन शोल्डर झालाय. बोला.... आता गाडी अनाल्जेसिक किंवा मसल रिलक्संट वगैरेच्या पुढे जाइल का?

मग या सगळ्याला कंटाळून जर एखादी व्यक्ती होमिओपथी किंवा आयुर्वेदाचा आधार घेते आणि बरी होते तर याला विरोध का ??

कुणाच्या कोंब्याने का होईना.. उगवले तर खरे !!!

आणि मुळात फार्मा कंपनीचा फायदा करून देण्यासाठी का आपण डॉक्टर झालोय.??
आपली सद्सद विवेक बुद्धी वापरून जे मनाला पटेल ते करावं. बाकी कंपाउंडर ही १५ दिवसात अलोपथी शिकू शकतो. निदान जी. पी. तरी करता येण कठीण नाही..!!
माझा विरोध सर्रस वापरण्यात येणार्‍या प्रतिजविकांवर आहे. राहीला प्रश्न acute emergency चा... जसे की एम. आय....तर आम्ही सुद्धा मनापसून मान्य करतो.. व्हा अड्मिट आय. सी. यु मधे..

आम्हाला आमचा स्कोप आणि लिमिटेशन चांगले ठाऊक आहेत.

http://homoeopathyjaipur.wordpress.com/healthcare/scope-and-limitations-...

बाकी "अलोपथीची धाव steroid पर्यंत..." हे धाधांत सत्य आहे..
तरीही अनुभवातून आलेलं शहाणपण महत्वाचं.!!

ईब्लिस आणि घाटपांडे ह्यांना पूर्ण अनुमोदन. थोड्या फार गोष्टींना हे लागू होत असेल. आजीबाईचा बटवा जसा घरगुती ईलाज करतो तसा. पण ज्या प्रमाणात आव आणून आह्मी कॅनसर बरा करतो वगैरे बता मारतात तेंव्हा हे सगळे ज्योतिष लोकांप्रमाणे सल्ले आणि धीर देतात. माझ्या पहानितले ७०% लोक कधीच बरे झालेले नाहीयेत. मी स्वतः अनेक वर्ष उपचार करून बघितले काहीही फरक नाही. माझ्या बरोबर तिकडे जनता होती त्यांच्यावर पण काहीही फरक पडलेला दिसला नाही. पण आपण गंडलो आहोत हे मान्य करायला माणसाचे मन तयार होत नाही आणि एखादा निघतो ज्याचावर परिणाम झालेला असतो त्याच्याकडे बघून आपण पण कधीतरी बरे होऊ ह्या आशेने लोक होमिपदी देणाऱ्यांना श्रीमंत करतात राहतात.

मनुष्य पर्यायी चिकित्सा पद्ध्तीकडे केव्हा जातो? जेव्हा त्याला मूळ प्रवाहातील चिकित्सा पद्धती गुणकारक ठरत नाही तेव्हा किंवा ती त्याला सोयीची वा परवडणारी नसते तेव्हा. औषधं जान्हवी तोयं म्हणुन काहींना पाणी देखील परिणामकारक ठरते. मात्र सर्वच बाबतीत हे शक्य नसते.जर उद्या एखाद्या वटहुकूमाने होमिओपॅथी उपचार अवैज्ञानिक असुन तो करणे हे बेकायदेशीर आहे असे ठरले तर काय होईल? लोक बेकायदेशीर रित्या उपचार घेतील. ज्योतिषाचेही तसेच आहे.
लोकांच्या गर॑जेतून हे चालू आहे, काहींना गुण येतो काहींना नाही. संभवनीयतेचा नियमानुसार हे होतच असते. काही लोक उपाय नसू देत अपाय तर नाही ना मग करुन बघु म्हणुन होमिओपॅथीचे उपचार घेतात. त्यांची किती श्रद्ध असते? हे त्यांचे त्यांना ठाउक.

homeopathy आणि hope या दोन वेगवेग़ळया गोष्टी आहेत. बर्‍याच लोकांना उगाचच वाटतं की विश्वास असेल तरच होमिओपथी लागू पडते. लक्षणं आणि औषध याच मेळ साधला तर विश्वास ठेवा किंवा नको रिझल्ट येतोच.

आजीबाईचा बटव्याचा उल्लेख इथे केल्या बद्दल अत्यंत आभारी..!!
कारण आपल्या पिढीची पूर्वीच्या पिढीशी तुलना केल्यावर कळून येतं की मेडिकल सायन्स इतकं प्रगत होऊन सुद्धा वयोमर्यादा दिवसेंदिवस का घटत जात आहे???
उत्तर साधं सरळ आहे. उठ सुट वाट्टेल तशी अलोपथी औषधांची खुराक घेऊन आजार दाबून टाकण्यात स्वारस्य असलेल्यांना आरोग्याची हेळ्सांड होतेय हे लक्षातच येत नाही. उलट पटकन बरे होऊन कामाला लागलो म्हणजे मस्त औषध हा जो गैरसमज आहे तोच एक दिवस नकळत आपला बळी घेतो.

असो.... ससा कासवाच्या गोष्टीत शेवटी कासवच जिंकले होते..!!
देर सही पर दुरुस्त.. कळेलच.. फक्त तोवर वेळ निघून गेलेली असेल.

समाधान इतकंच आहे.. आपल्या उपचार पद्धतीची हार पत्करुन पेशंट्च्या जीवाशी न खेळता अखेर होमिओपथी औषध घेण्यासाठी उद्युक्त करणार्‍या अलोपथी डॉक्टरांची संख्या वाढत आहे.

ultimately रुग्णाला निरोगी बनवण्याच्या वाटचालीत आपण प्रामाणिक प्रयत्न केल्याचं समाधान काय असतं हे एक होमिओपथीक डॉक्टरच जाणू शकतो. You know your patient well.. Your patient partners You in the process of living & once we hunt & hit the root cause of disease cure precedes.

काय बरं काय वाइट याची चिरफाड न करता प्रत्येक उपचार पद्धतीचे कंगोरे अभ्यासून तिचा सर्वतोपरीने लाभ घेणं यात खरं स्वारस्य आहे... बाकी शिव्यांची लाखोली प्रत्येकालाच वाहायला येते की हो !!
Talk about result. not just a palliation but a Cure.. Yes.. a CURE !! & I mean it.

वयोमर्यादा दिवसेंदिवस का घटत जात आहे???>> मला तर वाटते की हल्ली बरेच लोक सहज सत्तरी पार करता आहेत. लोकसंख्या वाढायचे एक कारण पूर्वी सारखे लोक लवकर मरत नाहीयेत. माझ्या स्वतःच्या अनुभवाप्रमाणे साधारणपणे १९९० साली एखादा साठीच्या वर असेल तर अरे काय म्हातारा आहे. ६५ आणि ७० म्हणजे फारच वय झाले. हल्ली जवळपास बरेच लोक ७० च्यावर आहेत. आणि हे मुख्यत्वे अलोपथी मुळेच आहे. त्यामुळे तुमचे विधान जरा तपासून पहा. निदान माझ्या एकॉनोमिक्सच्या अभ्यास तरी मला असाच ट्रेड दिसला बुवा.

>>कारण आपल्या पिढीची पूर्वीच्या पिढीशी तुलना केल्यावर कळून येतं की मेडिकल सायन्स इतकं प्रगत होऊन सुद्धा वयोमर्यादा दिवसेंदिवस का घटत जात आहे???<<
ऑ! हे काय भलतच?

काय बरं काय वाइट याची चिरफाड न करता प्रत्येक उपचार पद्धतीचे कंगोरे अभ्यासून तिचा सर्वतोपरीने लाभ घेणं यात खरं स्वारस्य आहे.>>>> हेच जास्त उपयुक्त आहे.

मेडिकल सायन्स इतकं प्रगत होऊन सुद्धा वयोमर्यादा दिवसेंदिवस का घटत जात आहे???

या म्हणण्यावर ठाम आहात का ?

>>>> मेडिकल सायन्स इतकं प्रगत होऊन सुद्धा वयोमर्यादा दिवसेंदिवस का घटत जात आहे???

फारस पटल नाही. वयोमर्यादा वाढलेली आहे अनेक साथीचे रोग वगैरे आटोक्यात आले आहेत. आयुष्याची गुणवत्ता वाढली आहे का नाही हा नक्कीच वादाचा मुद्दा होउ शकतो.

एक मात्र आहे. होमिओपॅथीची औषध लहान अजाणत्या मुलाला दिली तरी देखील त्याचा गुण येतो. आता तुम्ही त्याला काकतालीय न्याय म्हणणार असाल तर भाग वेगळा. पण अ‍ॅलोपॅथीमध्ये देखील तुम्ही रोग शोधलात आणि त्यावर उपाययोजना केलीत तर त्याचा फायदा होतोच होतो असही दिसत नाही. या बाबतीत होमिओपॅथीला दोष देण्यात अर्थ नाही.

अजून एक गोष्ट... अधुनिक शास्त्रकाट्यावर होमिओपॅथी उतरते कीन्वा नाही यानी काहीच फरक पडत नाही जर मला होमिओपअ‍ॅथीने बर वाटत असेल तर त्याच औषध कस काम करत त्यात खरच औषध असत का हे सगळे प्रश्न अप्रस्तुत आहेत. जर अ‍ॅलोपॅथीच्या मन्डळीन्ना वाटत असेल की होमिओपॅथी अर्थहिन आहे तर त्यान्नी शासनदरबारी तक्रारी करून बन्दी आणण्याचा प्रयत्न करावा.

काय बरं काय वाइट याची चिरफाड न करता प्रत्येक उपचार पद्धतीचे कंगोरे अभ्यासून तिचा सर्वतोपरीने लाभ घेणं यात खरं स्वारस्य आहे.>>>> अनुमोदन.

बाकी काहींचा थयथयाट समजू शकतो मी Wink पुष्पौशधी घेऊन बघा हो ई Proud

कारण आपल्या पिढीची पूर्वीच्या पिढीशी तुलना केल्यावर कळून येतं की मेडिकल सायन्स इतकं प्रगत होऊन सुद्धा वयोमर्यादा दिवसेंदिवस का घटत जात आहे??? >>
आं ? हे कशाच्या आधारवर लिहिलंय ?

<<होतं असं कधी कधी. >>

???

कुलकर्णीसाहेब, जरा वाचा - मी उल्लेख केलेली व्यक्ती मुंबईच्या टॉप मेडिकल स्कुल मध्ये प्रोफेसर होती. आता याउप्पर आम्ही काय समजवणार?

जेम्स रँडी आणि त्याचं चॅलेंज - अहो तो परफॉर्मर/एंटरटेनर आहे. त्याच्याच जातकुळीच्या मायकेल मोरने काय अमेरिकन हेल्थकेअर सिस्टम (जी सो कॉल्ड अ‍ॅलोपथी बेस्ड आहे) चे गुणगान गायले होते? गो फिगर...

मला स्वतःला होमियोपथी कशी काम करते ह्याचे ज्ञान नाही आणि होमियोपथीच काय इतर कुठल्याच पथ्यांबद्दल काही माहिती नाही. काही त्रास झाला की डॉक्टरकडे जायचं येवढच करतो. घरात होमियोपथीची औषधं घेणारीही लोकं आहेत आणि एक दोन औषधं देणारी सुद्धा आहेत.
वरच्या दोन्ही बाजू मांडणार्‍या पोस्ट बघून आणि आता पर्यंत आलेल्या वैयक्तिक अनुभवावरुन येवढं मात्र समजलं की होमियोपथी मेजर आजारांकरता, लाईफ थ्रेटनिंग सिंप्टम्स करता वापरता येऊ शकत नाही. तसं असतं तर अर्थातच होमियोपथी ही मेडिसिनची एक मेजर स्ट्रिम समजली गेली असती. होमियोपथी वाल्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घेऊन भलभलत्या गोष्टींमध्ये होमियोपथीनी फरक पडेल असले सल्ले देऊ नये (इथे कोणी दिलेत असं म्हणत नाहीये पण जनरली). लफडं असं आहे की विजय ह्यांनी दिलेल्या उदाहरणं बघितली की भिती वाटते. साधी दिसणारी सिंप्टम्स जर होमियोपथीच्या नादी लागून, मौल्यवान वेळ वाया घालवून जर पुढे आणखिन वाईट झाली तर काय करायचं? पेशंट लोकं शेवटी डॉक्टर आपल्याला नीट सल्ला देत आहेत ह्या भरवश्यावर असतात. भारतात तर कुठलीही मेडिकल डिग्री असो, नुसती दवाखाना अशी पाटी लागली की लोकं उपचाराकरता धाव घेतात.

राहिला प्रश्न होमियोपथी आजार/रोग बरा कसा करते? वर आस्चिग, विजय, इब्लिस म्हणतायत त्या प्रमाणे नेमकी बरी कशी करते ह्याचा कॉम्प्रिहेन्सिव स्टडी केलाय कोणी? आहेत ते फक्त पेशंटचे अनुभव. आता काही लोकं होत पण असतील बरे काही व्याधींमधून पण ते नेमकं प्लेसबो इफेक्ट आणि त्यांच्यी मूळ प्रतिकारशक्ती ह्याच्या कॉम्बिनेशनमुळे होत नसेल हे कशावरुन? कोणी विचारत नाही अन कोणी शोधायलाही जात नाही. मी वर म्हंटलं तसं खरतर डॉक्टरांची जवाबदारी असते सिंप्टम्स बघून हे आपल्याला व आपल्या पथी ला झेपणारे प्रकरण आहे की नाही हे सांगणे पण डॉक्टरी हा पण एक व्यवसाय असल्यामुळे ते डॉक्टर कितपत ही जवाबदारी चोखपणे पार पाडतील ह्या शंका आहे तस्मात पेशंटवरच कॉमन सेन्स वापरण्याची जवाबदारी येऊन पडलेली आहे.

वैद्यबुवा उत्तम पोस्ट. माझे आजोबा चांगले नावाजलेले आयुर्वेदिक वैद्य होते. ते स्वतः होमियोपथी वापरत. फक्त एकाच तत्व आपल्याच्याने बरे होत नाहीये तेंव्हा सरळ योग्य डॉक्टर गाठ हा सल्ला ते देत असत. कित्येक पेशंट पुन्हा येत असत. तुमच्या औषधाने बरे वाटते ह्या नावाखाली. त्यांचे म्हणणे हे मानसिक आहे. ह्याला काहीही झाले नाहीये पण एकदा मनात बसले की झाले. काही वेळेला असा काही प्रकार होतो की ज्यावर काहीच इलाज नाही. उदाहणार्थ सायनस. काय वाटेल ते केले तरी फिरून सर्दी कधी ना कधी होतेच. मग हे आयुर्वेदिक आणि होमियोपथीवाले समूळ बरा करतो वगैरे सांगतात पण असे फार काही होत नाही. शेवटी लोक कंटाळून कधी कधी मान्य करतात किंवा स्वतःला समजावतात की मला बरे वाटते. हे स्वतः त्यांचे मत होते. त्यामुळे ह्यावर कितीही बोंबाबोंब झाली तरी काहीही होणार नाही. कारण आपल्याकडे हे नाही तर दुसरे काहीतरी निघेल.

आणि कुठली उप्चार पध्हती चांगली की वाईट हे समजण्या इतके पेशंट सूज्ञ आहेत.
निव्वळ औषधाची mode of action तोंडपाठ असली आणि उत्तम डयग्नोसिस करता येत असलं तर उत्तम डॉक्टर होता येतं का??
अहो आज काल पेशंट स्वतः सांगत येतात, डॉक्टर मला मायग्रेन झालाय, वर्टिगो होतोय नाही तर फ्रोझन शोल्डर झालाय. बोला.... आता गाडी अनाल्जेसिक किंवा मसल रिलक्संट वगैरेच्या पुढे जाइल का?
<<

मॅडम,
माफ करा.

मायग्रेन नक्की कसा डायग्नोज करतात? तो का होतो? मायग्रेन ला अ‍ॅनाल्जेसिक्स देतात की दुसरं काही? अर्गट अल्कलॉईड्स काय असतात? डोकेदुखीची इतर कारणे कोणती? मायग्रेन मधे ऑरा येतो तो का येतो?

अन पेशंट सांगतो 'मला मायग्रेन झालाय' तर त्यावर तुम्ही उपचार करणार? डायग्नोस करायचा प्रयत्नही न करता?

हसू का??

अहो, डोकेदुखीचे कारण शोधून उपचार करतात. पेशंट सांगतो मायग्रेन म्हणून एम आरने सांगितलेली "अ‍ॅलोपथी" औषधे लिहून वरून त्यांच्या साईड इफेक्ट बद्दल बोलत नसतात. कारण सापडून उपचार होणे या दरम्यानच्या काळात तुमचे काम सुरू रहावे म्हणून दिलेच तर वेदनाशामक देतात. याला वैद्यकशास्त्र म्हणतात. किमान डॉक्टरकी शिका, अन्यथा बोलू नका. अन हो. कृपया मॉडर्न मेडिसिन वापरू नका.

रच्याकने : आजच मुंबई हायकोर्टाने स्वतःच्याच निर्णयाला स्टे दिलाय. LCEH डॉक्टरांना मॉडर्न मेडिसिन औषधे वापरू द्या असे चुकून एका आदेशात म्हटले गेले होते, त्याला स्टे आहे.

होमिओपथी डॉक्टरांनी परवा मुंबईत मोर्चा काढला की काढणार असे वाचले. का होता म्हणे मोर्चा? तर आम्हाला ज्याच्यातले का ही ही कळत नाही ती मॉडर्न औषधे वापरू द्या. नीम हकीम खतरे जान, अहो, डोकेदुखीला पेन किलर अशी ट्रीटमेंट डॉक्टर देत नसतात. तसे कंपाऊंडरांना वाटत असते.

***
ता.क.
'सेनापती'सावरकर उर्फ असा, खी:खी:खी:

***
ता.क.२
>.Talk about result. not just a palliation but a Cure.. Yes.. a CURE !! & I mean it.<<

मॅडम, आपण बरेच काही लिहिले आहेत. अ‍ॅलोपथी स्टिरॉईड्पर्यंत! एल.ओ.एल. महान आहात तुम्ही. तुमचे जीपडे ("कट" मागायला दात विचकटून समोर उभा रहातो, तो- D/B-H-U-A इ. 'एम एस' म्हंजे मेडिसिन एन्ड सर्जरी. जीपी G.P. नव्हे तर जिपडा) नको तिथे अन नको तितके स्टिरॉईड्स वापरतात, हे अ‍ॅलोपथीचे नव्हे, तुमच्या जिपड्यांचे लिमिटेशन आहे.

हा प्रतिसाद मुळात टंकला तेव्हा जरा घाईत होतो. शिवाय तुम्ही पडलात मॅडम. सरळ बोललो तरी पाप. पण राहवत नाही, म्हणून हा ता.क.

now something that I mean -> "मी उद्यापासून एकही मॉडर्न मेडिसिनचे औषध लिहिणार नाही" अशी प्रतिज्ञा करा पाहू. अन अवघे जग क्युअर करून सोडा! तितके केलेत तरी माझा हा जन्म सफल झाला असे मानेन मी. मग अ‍ॅक्यूटमधे अ‍ॅलोपथी, अन क्रॉनिकला आम्ही असेही म्हणू नकाच. तुम्हाला शुभेच्छा.

होमिओपॅथी उपचाराचा बेस पुष्कळदा "काट्याने काटा काढणे" या थेअरीला अनुसरुन असतो.( जसे अ‍ॅलर्जीसाठीचे शॉट -- अ‍ॅलोपॅथीतले. ज्याची अ‍ॅलर्जी असते त्याचीच लस अत्यंत सूक्ष्म प्रमाणात टोचून टोचून व्यक्तीला त्या वस्तूसाठी इम्यून करायचे.) होमिओपॅथीची बरीच औषधे याच थिअरीनी बनवलेली असतात. त्यामुळे बर्‍याचदा होमिओपॅथीचे औषध घेतले की तुमची सिंप्टम्स अ‍ॅग्रीव्हेट होतात. औषध घेऊन दुखणं वाढलं म्हणून पेशंटचा जीव दडपतो, पण योग्य औषधावर हात पडला म्हणून हो.डॉ. मात्र समाधानी असतो. असो.

मी कसलीच डॉक्टर नाही. गेली काही वर्षे माझ्या प्रोग्रेसीव्ह मानल्या गेलेल्या हेल्थ कंडीशन्सवर अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदीक, अ‍ॅक्यूपंक्चर, फिजीकल व ऑक्युपेशनल थेरपी या सर्वाचा वापर करुन कंट्रोल करण्यात व काही प्रमाणात कमी करण्यात यश आलं आहे. अमेरिकेतील माझ्या अ‍ॅलोपॅथ डॉ.शी मी जे जे काय करते ते ते वेळोवेळी बोलते. त्या सर्वांचा या बाबतीतील सूर साधारण एकच आणि अतिशय प्रामाणिक असतो की "आमचा या कशाचाच अभ्यास नाही. पण जगभर यातलं काही ना काही कुठे ना कुठे वापरलं जातं त्या अर्थी एवढी सगळी माणसं काही स्टुपीड असणार नाहीत. त्यामागेही काही विज्ञान असेल फक्त माझा त्यावर अभ्यास नसल्यामुळे मी तुला एनकरेज करणार नाही. तसंच तुझ्यासारख्याच कंडीशन्स असणार्‍या माझ्या इतर पेशंटस बरोबर तुझी तुलना मी करतो तेव्हा तू योग्य मार्गावर असावीस असं वाटतं. म्हणूनच मी तुला डीसकरेजही करणार नाही."

ज्यावर कुठल्याच पॅथी मधे औषध नाही अशा कंडीशन्ससाठी अशी सगळ्यातली थोडी थोडी आपल्याला सूट होतील अशी कॉबीनेशन्स जरुर वापरावी नव्हे वापरावीतच हा ऑऊटलूक मला पुण्यातील एका सर्जननी दिला. ३५ वर्ष सर्जर्‍या करुन ते निवृत्त झाले आहेत. गेली २०-२५ वर्ष ते अ‍ॅक्यूपंक्चरची प्रॅक्टीस करत होते. ती ही मला वाटतं आता थांबवली असावी. काही अ‍ॅलोपॅथी डॉक्टरही त्यांचाकडे अ‍ॅक्यूपंक्चर शिकून गेले आहेत.

हॅ पॅ, आयुर्वेद, नेचरो पॅ ईत्यादी सर्व थोतांड , प्लेसाबो ई फ्फेक्ट वैगेरे वैगेरे ..................

पण याच जरा ऊत्तर द्याल ?

१. राजेश खन्ना वय ६९ वर्षे : मृत्यू; आजाराच व मृत्यूच कारण अनाकलनीय.
( रेफः http://www.bbc.co.uk/news/world-asia-india-18881804 हा बी बी सी चा रेफ आहे लक्षात ठेवा )
२. यश चोप्रा वर ८० : मृत्यू डेंग्यु :

वरील दोघे जण पैसेवाले होते आणि सर्वात महाग उपचार करुन घेऊ शकत होते. त्या दोघांचा मृत्यू
ईस्पितळातच झाला.

राजेश खन्नाचा आजारही कळू नये ??

तरीही आपली अ‍ॅ.पॅ.च बरी रे बाबा

डँबिस१
जरा वाचत चला हो. राजेश खन्ना ला काय झाले होते ते कितीतरी पेपर्स्,साईट्स वर आले होते, टी व्ही
वरती दाखवत होते.
आणि हो फक्त पैसा असेल तर कोणत्याही आजारातून बरे होता येते का?

१.http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-07-20/news-interviews/3...
२.http://zeenews.india.com/exclusive/rajesh-khanna-solitude-pushed-the-sup...
३.http://en.wikipedia.org/wiki/Rajesh_Khanna

बाकी चालू द्या.

Pages