होमिओपॅथी आणि पेन-किलर्स

Submitted by अमितकरकरे on 25 April, 2013 - 09:12

होमिओपॅथी आणि पेन-किलर्स

“डॉक्टर, बाहेर थंडी पडली, किंवा जरा थोडे श्रम झाले की हा गुडघा लागलाच ठणकायला. हा असा सुजतो म्हणून सांगू! अगदी जीव नकोसा होतो. मग हाडांच्या डॉक्टरांनी दिलेली ‘क्ष’ गोळी घेतली की जरा दोन दिवस बरे, पुन्हा येरे माझ्या मागल्या! तुमच्या होमिओपॅथीमध्ये नसतात का पेनकिलर्स ?” ६८ वर्षांच्या जोशीआज्जी विचारत होत्या.

“एरवी वर्षभर काहीच त्रास होत नाही या डोकेदुखीचा, पण आमची वर्षातून एकदा कॉन्फरन्स असते, त्यात सकाळपासून इतक्या गोष्टी मॅनेज करायला लागतात की नाश्ता, जेवण यांची भेटसुद्धा होत नाही. त्यात तो कामाचा ताण. त्या दिवशी नेमके माझे डोके ठणकायला लागते, मग उलटीचे फिलिंग, मळमळ, आणि उजेड किंवा आवाजाचा अतिप्रचंड त्रास. शेवटी पित्त बाहेर काढल्याशिवाय चैनच पडत नाही! त्या दिवशी घेता येईल असे काही अनाल्जेसिक औषध होमिओपथीमध्ये नाही का?” २४ वर्षाचा आयटी कंपनीत काम करणारा रोहन जाजू विचारत होता.

वेदनाशामक औषधे (पेन किलर्स)

जगात सर्वात जास्त परस्पर (ओव्हर-दी-काउंटर) खपणारी औषधे म्हणजे पेनकिलर्स, अर्थात वेदनाशामक औषधे. पित्ताने उठलेले डोके असो वा गॅसेसमुळे झालेला पोटशूळ, वयाने धरलेले सांधे असोत वा कमरेत भरलेली उसण; वेदना आणि त्यासाठी लागणारी औषधे यांचा संबंध आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात एकदातरी येतोच. काहींना तर या औषधांवर इतके अवलंबून राहावे लागते की त्या औषधांचाही त्रास (साईड-इफेक्ट) व्हायला लागतो, म्हणजे मग त्या औषधासाठी वेगळे औषध! अशावेळी आठवते साईड-इफेक्ट्स नसलेली होमिओपॅथी . . .

होमिओपॅथिक वेदनाशमन

होमिओपॅथिक पद्धतीमध्ये सरसकट सर्वांसाठी एक-दोन औषधाचा मारा करण्याऐवजी प्रत्येक रुग्णाची प्रकृती आणि स्वभाव-भिन्नता पाहून उपचाराची दिशा ठरवली जाते. यात वेदनेची तीव्रता, भावना (ठणका, जळजळ, आवळणे, टोचणे इ.), रुग्णाची सहनशक्ती, व सर्वात महत्वाचे म्हणजे वेदना कमी-जास्त करणारे घटक जसे चोळणे, शेकणे, मसाज करणे, इ. यांचा विशेष विचार केला जातो. वेदना कोणत्या अवयवातून-भागातून अथवा पेशींपासून होत आहे हे बरेचदा रुग्णाने केलेल्या वर्णनावरून लक्षात येते, त्याचाही डायग्नोसीससाठी व त्यानुसार औषध ठरविण्यासाठी फार उपयोग होतो. गरज पडल्यास रक्ताची (गाऊट सारख्या आजारात) तपासणी अथवा इमेजिंग (एक्सरे, एमआरआय स्कॅन) द्वारे त्यावर शिक्कामोर्तब केले जाते.

वेदनांसाठी उपचार ठरविताना त्याचे सर्वसाधारण तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते:

१. तात्कालिक वेदना:

काही वेदना या तात्कालिक (acute) स्वरूपाच्या असतात – जसे पाय मुरगळणे अथवा अपघातात ईजा होणे. अशा आजारांमध्ये काही काळासाठीच उपचार दिले जातात. होमिओपॅथिक औषधांपैकी आर्निका, ऱ्हसटॉक्स, सिम्फायटम अशी औषधे लक्षणांचा विचार करून दिली असता वेदनांवर त्वरित उतार पडतो.

२. विशिष्ठ कारणामुळे उत्पन्न होणाऱ्या वेदना:

लेखाच्या सुरवातीला दिलेल्या उदाहरणामधील रोहन प्रमाणे काही वेदना काही विशिष्ठ कारणाने अथवा काही प्रसंगानुरूप डोके वर काढतात. बऱ्याच जणांना भूक अथवा उन सहन होत नाही, किंवा काही विशिष्ठ अन्नपदार्थ खाल्ले की पोटात दुखते (जसे खवा, अंडे, काही फळे) किंवा आईस्क्रीम खाल्ले की घसा धरतो किंवा वेगवेगळ्या अॅलर्जी. अशा पेशंट्सना ते विशिष्ट कारण टाळल्यास महिनोंमहिने काहीच त्रास होत नाही, पण जरा संयम सोडला की मात्र...

अशा आजारावर उपचार करताना त्रास देणाऱ्या त्या व्यक्ती-विशिष्ठ कारणाची व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या लक्षणांची चिकित्सा होमिओपॅथीमध्ये केली जाते व त्यानुसार काहीकाळ औषध दिल्याने त्रास कमी होतो. त्याचसोबत प्रकृती-चिकित्सा करून औषध दिल्याने त्याचा समूळ नाश होण्यास मदत होते. प्रकृतीनुसार दिलेल्या हिपार-सल्फ, बेलाडोना, पल्सेटिला, सबाडीला, ब्रायोनिया, अर्सेनिक अल्बम, किंवा फॉस्फरस यांसारख्या औषधांचा अशा रुग्णांना खूप उपयोग होतो. बऱ्याच मुलींना मासिक पाळीच्या पहिल्या-दुसऱ्या दिवशी प्रचंड पोटात दुखते, अगदी सुट्टी घेऊन घरी बसावे लागते – अशांना मॅग फॉस, क्युप्रम मेट, कोलोसिंथ अश्या औषधांचा खुपच फायदा होतो, आणि पाळी चालू असली तरी अभ्यास अथवा काम थांबून राहत नाही.

माझे बरेचसे पेशंट्स त्यांच्या प्रकृतीनुसार दिलेले असे एखादे औषध नेहमी जवळ बाळगतात. अगदीच अचानक त्रास देणारे कारण घडल्यास किंवा दुखण्याची नुसती सुरवात होत आहे असे वाटल्यास एखादा डोस घेऊन ताबडतोब कामाला लागतात. कोणी विचारले की सांगतात, “हे माझे पर्सनल पेनकिलर आहे.”

३. अगदी रोजच्या झालेल्या वेदना:

वयोमानामुळे झीज होऊन सुजणारे-दुखणारे जोशी-आज्जींचे गुडघे मात्र तिसऱ्या प्रकारात मोडतात. या प्रकारच्या आजारांमुळे शरीरात घडलेल्या बदलांमुळे अगदी दरदिवशी वेदनांचा सामना करावा लागतो. गुडघ्यांची झालेली झीज, जास्त प्रमाणात वाढलेला संधीवात, मणक्यांच्या झिजेमुळे सुरु झालेला स्पॉन्डीलायटीसचा विकार किंवा कर्करोगाच्या अंतिम अवस्थेतील होणाऱ्या वेदना यांचा विचार या प्रकारात होतो. यातील आजारामध्ये पुन्हा फारशी भरून न येणारी झीज अथवा बदल झालेले असतात, अशा वेळी लक्षणांचा विचार करून विशिष्ठ अवयवांवर काम करणाऱ्या होमिओपॅथिक औषधांची (organ remedies) निवड करणे जास्त हितावह ठरते. हेक्ला लावा, कल्केरिया फ्लुर, मर्क्युरीयस, ब्रायोनिया, किंवा एपिस सारख्या औषधांचा वापर करणे जास्त हितावह असते. यातील काही आजारांच्या अवस्थेत वनस्पतींचे मुलार्क जास्त परिणामकारक ठरतात.

थोडक्यात सांगायचे तर होमिओपॅथीमध्ये सुद्धा अत्यंत परिणामकारक अशी वेदनाशामक औषधे उपलब्ध आहेत. या उपचारपध्दतीच्या तत्वाप्रमाणे आजार हळुवारपणे पण नेमका आणि कायमचा बरा करणे या औषधांच्या मदतीने अगदी सहज साध्य होते. फक्त त्यासाठी रुग्णाकडून आपल्या प्रकृतीचे आणि आजाराचे योग्य वर्णन व निरीक्षण, व त्याचप्रमाणे त्यानुसार डॉक्टरांकडून योग्य औषधाची निवड होणे महत्वाचे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> वरील दोघे जण पैसेवाले होते आणि सर्वात महाग उपचार करुन घेऊ शकत होते. त्या दोघांचा मृत्यू
ईस्पितळातच झाला. >>

>> पैसा नव्हे फक्त अ‍ॅपॅ च सर्व काही ठीक करु शकते , जरा लक्षात घ्या >>

जरा नाही पूर्ण लक्षात घेतले , तरीही अजून काय कळले नाय ब्वॉ ..
भाऊ जरा समजंल असं सांगा ना.

@ शुगोल.

आपण ३ मुद्दे मांडलेत.

१. होमिओपथी काम कशी करते त्याबद्दल. याविषयी मला काहीच म्हणायचे नाही.

२.
तुमचे डॉक्टर इतर उपचारपद्धतींविषयी जे तुम्हाला सांगतात :
याविषयी मीही पेशंटला समोरासमोर, एक्झॅक्टली तेच सांगतो. मलाही तिथे फाऽर तोलून मापून शब्द वापरून बोलावे लागते. अनेक कायद्यांचा, व इतर सोशल्/बिझिनेस रिलेशन्सचा विचार करावा लागतो. सो व्हॉट ही सेज इज पॉलिटिकली करेक्ट.

Please let me take liberty to quote an example here.

मी नवा होतो प्रॅक्टिसमधे तेव्हाची गोष्ट. एका प्लॅन्ड सर्जरीसाठी पोस्ट केलेले आजोबा. डायबेटीस. डायबेटीस कण्ट्रोल करून मग ऑपरेशन करू म्हटले. आजोबा म्हटले, मी फक्त होमिओपथीची औषधे घेतो. माझे होमिओपथीचे डॉक्टर डायबेटीस बरा करून देणार आहेत. २ महिने थांबा. माझे रिपोर्टस सुद्धा लघवीतली साखर कमी होतेय असे दाखवताहेत.

म्हटलं वा! असेल बुवा. आपल्याला काय कळत नाही होमिओपथीमधलं. तसं आधुनिक वैद्यकही फार येतं अशातला भाग नाही. म्हटलं, आजोबा, ठीक आहे, २ महिन्यानंतर हे ऑपरेशन केल्याने फार बिघडणार नाही.

४ महिन्यांनी आजोबा आले. डॉक्टर, हे माझे रिपोर्ट्स! साखर निल!! होम्योपथीने डायबेटीस गेला माझा!!!

वा! मी रिपोर्ट पाहिले. डी.एम.एल.टी. "डॉक्टर"चे रिपोर्ट. युरिन शुगर शून्य होती. पण दुसरं कायतरी गडबड होतं. आजोबांकडे दुरून पाहूनच काय ते उमजत होते. आजोबांना रिनल प्रोफाईल करायला लावले. डायबेटीसने दोन्ही किडन्या गेलेल्या होत्या.

आजोबांना बीपी वगैरे थातुरमातूर कारण सांगून मी फिजिशिअनकडे पाठवले. सध्या ऑपरेशन नको करूयात. दिवाळीच्या सुटीत बघू असे सांगितले. महिन्याभरात आजोबाच गेले...

त्या दिवशीपासून अशा पेशंटला मी पोलिटिकली करेक्ट भाषेत सांगतो, 'आजोबा, आपल्याला अ‍ॅलोपथीचे ऑपरेशन करायचे आहे ना? मग त्यासाठी डायबेटीस देखिल अ‍ॅलोपथीने कन्ट्रोल करावा लागतो. ऑपरेशन नंतर परत होमिओपथी घेऊ आपण.'

३.
पुण्यातले सर्जन.
३५ + २५ + अजून काही वर्षे.
सरांनी सर्जरीत एम एस केलं, तेव्हा दुसर्‍या महायुद्धाच्या आसपासचा वेळ असेल. अँटीबायोटीक्स, लशी, स्टरलायझेशन इ. चा शोध लागण्याचे दिवस ते होते. त्या काँटेक्स्ट मधे त्यांनी केले बरोबरच आहे, असे म्हणेन.

आज तिथून खूप पुढे आलंय शास्त्र. अहो, अगदी आमच्या कॉलेजडेज मधे देखिल मिल्क प्रोटीन इन्जेक्शन्स अन ऑटो हिमो थेरपी सारखी बिनडोक ट्रीटमेंट्स टेक्स्टबुकांत होती!

त्यानंतरचे आजचे दिवस व ते दिवस, व "पॅथीज" यांबद्दल त्यांच्याशीच बोलण्यात अर्थ आहे. इथे मी काही म्हणणे योग्य नव्हे.

***
शक्य तितक्या कमी शब्दांत मांडण्याचा यत्न केला आहे. चूभूदेघे.

इब्लिस,बरं वाटलं...असंच सौम्य शब्दात लिहा..मतभेद असणारच.ते गृहित धरून आपापली बाजू मांडा..म्हणजे चर्चा व्यवस्थित सुरु राहील...आम्ही सर्वसामान्य लोक आहोत...त्यामुळे वैद्यकिय सल्ला ’डॉक्टर’ लेबल असलेल्याकडूनच घेणार...पॅथी कोणतीही असो...उद्देश रुग्णांना दिलासा मिळावा,बरे वाटावे हाच असतो ना? आम्हाला ह्यापेक्षा जास्त काय हवं?

बिचारे आजोबा... गेले ते गेले..!!!
आपल्या इब्लिस च्या मनात प्रचंड होमिओपथिबद्दल द्वेष निर्माण करून गेले.

असे किती आजोबा भेटले तुम्हाला ??... नाही माझ्याकडे पण असे allopathy ला दूषण देणारे बरेच patient आहेत. पण म्हणून त्यांच्या सुरात सूर मिसळून allopathy वाईट असा प्रसार नाही करत बसत आम्ही. !!There are better things to do in life.

Homeopathy कशी काम करते यावर कितीही सविस्तर लिहा ... आणि पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी पचनी पडून घ्यायची नाही असा सूर असेल तर....

गाढवापुढे वाचली गीता ... कालचा गोंधळ बारा होता असच म्हणावं लागेल !!!

Still I'd request people to invest there energy on making their mode of treatment more fruitful. You give good result, none of your patient will divert to homeopathy. But if you fail to do so then its none of my business to make you understand.

बाकी मी माझ्या म्हणण्यावरून हटणार नाही... की प्रत्येक उपचार पद्धती ही आपल्या वेशिष्ट्याने समृद्ध आहे. तिचा लाभ घ्या. अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरु असतो.
मी अनुभवलं. आणि म्हणून च ठाम पणे बोलत आहे. बाकी निर्णय तुमच्या हाती..!!

देव सर,

तुम्ही हे म्हणायची वेळच येऊ नये असेच वागण्याचा प्रयत्न करीत असतो हो नेहेमी.. मुळात हे असे भरपूर संताप दाबून ठेवलेले आहेत मनात. ते प्रतिसादांतून उफाळून येतात बाहेर. म्हणून खडूसपणा दिसतो.

नम्रपणे लिहिले तर छुपी दुकाने चालविणार्‍यांना फरक पडत नाही. ते त्यांचे रेटत रहातात.

उदाहरण देतो मायबोलीचेच.

दिनेशदांनी इथेच कधीतरी म्हटले होते, की तुम्हा डॉक्टर लोकांनी तुमचे पत्ते, फोन इ. द्या, म्हणजे सल्ला मागता येईल.

साती, कैलासजी, मी, व ज्ञानेश या ४ लोकांनी 'एथिक्स' म्हणून रिमोट कन्सल्ट्/नेट कन्सल्ट ला नाही म्हटल्याचे आठवते आहे. सगळे अ‍ॅलोपथीचे पदवीधर आहेत. दुकाने आमचीही आहेत... मग या वागणूकीत फरक का आहे?? साती यांचे देखिल धागे आहेत माहितीपर. फरक कुठे आहे?

या महोदयांच्या पहिल्याच धाग्यावर त्या पुष्पौशधी ताईंचा प्रतिसाद वाचला का? किंवा अमुक ठिकाणी तमुक वर्कशॉप, इ. गोष्टी पाहिल्यात का? 102.gif अरे हो ना!

असो!

Homeopathy कशी काम करते यावर कितीही सविस्तर लिहा ... आणि पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी पचनी पडून घ्यायची नाही असा सूर असेल तर....
<<
मॅडम,

सूर नव्हे.

याला सायन्स म्हणतात.

गरम चहावर फुंकर मारली तर चहा गार का होतो? थंडीत हातावर फुंकर मारली तर हात गरम का होतात? याच्या उत्तरांना शास्त्र उर्फ सायन्स म्हणतात.

जरा सांगाच होमिओपथी काम कशी करते ते.

(अनुभवी, सूरदास) इब्लिस. Happy

>>
नाही माझ्याकडे पण असे allopathy ला दूषण देणारे बरेच patient आहेत. पण म्हणून त्यांच्या सुरात सूर मिसळून allopathy वाईट असा प्रसार नाही करत बसत आम्ही. !!There are better things to do in life.
<<

वा!

१. असा प्रचार तुम्ही करीत नाही? मग ते अ‍ॅलोपथीची धाव. अनुभव, अन शेलकी शब्दरत्ने काय आहेत? जरा थांबा, एकेक शोधून डकवतो इथे Happy

२. मी प्रचार कधीच केला नाही. फक्त एक उदाहरण सांगितले. अहो होमिओपथीच नव्हे, रामदेवबाबा देखिल सोसावे लागतात मला. गम्मत जम्मत आहे सगळी आपल्या देशात.

इब्लिस,बरं वाटलं...असंच सौम्य शब्दात लिहा..>>>>>>>>>>
LOL Lol

अनुमोदन Happy
हा इब्लिस ... इतका राग बरा नव्हे..!!

Research says, anger is linked with heart attack, hypertension and many more such diseases.. !! So calm down.. take a chill pill !!
आणि त्याने नाही च जमलं तर Sugerpills आहेतच !! Lol

इब्लिस स्टिव्ह जॉब्स ला कसे काय विसरलात! अर्थात जॉब्सनी होमिओपथी वापरली कि नाहि ते माहिति नाहि Happy ;पण स्टिव्ह जॉब्सने सर्जरि करण्यास दिलेला नकार आणि वापरलेलि अल्टरनेटिव्ह मेडिसिन त्यांच्या म्रुत्युला कारणिभुत ठरली असे वाचले आहे.

इब्लिस, तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे...पण हल्ली रेडिओ-टीव्ही वर्तमानपत्रातूनही अशा जाहिराती येत असतात..त्यात सर्व पॅथीचे डॉक्टर दिसून येतात...मला तर नेहमीच त्याचं आश्चर्य वाटत आलंय..की जर वैद्यकिय व्यवसायाची जाहिरात करणं कायद्यात बसत नाहीये तर ह्या जाहिरातबाज डॉक्टरांवर संबंधित खातं/सरकार कारवाई का नाही करत?
डॉक्टर तुमच्या भेटीला किंवा आरोग्यविषयक सल्ला अशा कार्यक्रमातून ही जाहिरात राजरोसपणे सुरु असते.
तुम्हाला ऐकून/पाहून माहीत असेल...एक डॉक्टर पाटील(बहुदा अनिल नाव असावं त्यांचं) हे अ‍ॅलोपाथी,आयुर्वेद,नेचरोपाथी,अ‍ॅक्यूपंक्चर इत्यादि सर्व पॅथ्या वापरतात..वृत्तपत्रात तर त्यांची नेहमीच जाहिरात असते...अशा वेळी संबंधित खाती डोळ्यावर कातडं ओढून बसलेली दिसतात....कधीकधी वाटतं की तत्संबंधीचा
कायदा फारच लवचिक असावा.
असो...आंधळं दळतंय..असाच प्रकार आहे एकूण.

@ इब्लिस,
पुण्यातले सर्जन.
३५ + २५ + अजून काही वर्षे.
सरांनी सर्जरीत एम एस केलं, तेव्हा दुसर्‍या महायुद्धाच्या आसपासचा वेळ असेल >>> हे असं नाहीये. ते सर्जन म्हणून अ‍ॅक्टीव असतानाच अ‍ॅक्यु. शिकून त्याची पण प्रॅक्टीस सायम्ल्टेनीयसली करत होते. माझा त्यांच्याशी शेवट्चा संपर्क सुमारे ५ वर्षापूर्वी झाला.( आता कॉमन फ्रेंड्सकडून खुशाली समजते तेव्हडीच) त्यावेळी ते ६९चे होते. सांगण्याचा मतितार्थ इतकाच की ते तुम्ही म्हण्ता इतक्या जुन्या काळचे नाहीत. त्यांना स्टरलायजेशनचे महत्व इतर कुणाही पेक्षा जास्त कळत असणार कारण ५ वर्षापूर्वीदेखील ते डिस्पोजेबल नीड्ल्स व बॅटरीवर चालणारी, प्रेशर पॉईंट स्टिम्यूलेट करणारी गन वापरुन अ‍ॅक्यु. करायचे. आजही पुण्यातले काही अ‍ॅक्यु. मला माहित आहेत ते डिस्पोजेबल नीड्ल्स वापरत नाहीत.
मला जे सांगायचे आहे ते असे की---१. त्यांनी अ‍ॅलोपॅथीचे डॉ. असूनही इतर पॅथी वा पद्धती डिसकार्ड केल्या नाहीत. त्यातील जमेल ती शि़कून घेतली. ज्या शिकता आल्या नाहीत त्यातले देखील उपयोगी पडेल ते घेण्याचा सल्ला दिला. २. अमेरिकेतील डॉक्टरांनी देखील अभ्यास नाही म्हणून मत देता येत नाही, प॑ण त्यात तथ्थ्य असावं असा अंदाज वर्तवला. काहीही डिसकार्ड केलं नाही.

तुम्ही दिलेल्या उदाहरणावरुन त्या पेशंटचं अज्ञान दिसून येतं, ती पॅथी सदोष आहे असं नाही सिद्ध होत. अर्थातच हेमावैम आणि शे. पो.
धन्यवाद.

इब्लिस, मला नीटसं कळलं नाही. तुमचा राग होमिओपथी या (तुमच्या मते) थोतांडाची माहिती दिली म्हणून आहे की ही तुम्हाला छुपी जाहिरात वाटते म्हणून?
आमच्यासारख्या सामान्यांना खरोखरच काही समजत नाही. सगळ्याच पॅथ्यांची आपापली बलस्थानं आणि मर्यादा असाव्यात असं वाटतं. त्यात खुद्द केअरगिव्हर्समधेच असे मतभेद पाहिले की अजूनच गोंधळायला होतं म्हणून विचारते आहे.

स्वाती_आंबोळे +१

मोठ्या आणि गंभीर स्वरुपाच्या आजारांमध्ये सर्जरी आणि इतर अधुनिक वैद्यकीय औष्धोपचार करूनही रोग बरा होणार नसतो आणि आजूबाजूच्या जवळच्या प्रेमाच्या लोकांना पेशंटचे हाल बघवत नाहीत मग सगळेजण त्या कुटुंबाला काहीबाही सुचवत असतात वेगळा डॉक्टर किंवा वेगळी उपचार पद्धती(त्यात होमियोपथी, आयुर्वेद, नॅचरोपथी सर्वच आले). दहा दिशांनी दहा सल्ले आले की आधीच आगतिक असलेल्या गोंधळून गेलेल्या पेशंटच्या कुटुंबाने त्यातली एखादी पद्धत पडताळून पहायची ठरवली त्यात काही गैर आहे का?

हे झालं बर्‍या न होणार्‍या मोठ्या आजारांबाबत. तसच सर्दी खोकला ताप वगैरे किरकोळ आजारपणं असतील जी गनरली २-३ दिवसात बरी होणार हे आपलं आपल्यालाच(पेशंटलाच) खात्रीने वाटत असतं अशा केसेस मध्ये घेतली तर त्यातही काही गैर आहे का?

शेवटी प्रत्येकाला स्वतःचं शरीर आणि लक्षणं आणि काय स्वतःसाठी नॉर्मल आहे आणि काय नाही हे साधारण माहित असतच त्यामुळे तारतम्य वापरून पथी निवडावी की. सो लॉग अ‍ॅज आपण ओपन माइंड ठेवतो आणि आंधळा विश्वास कोणत्याच मेडिसिनवर(किंवा डॉक्टरवर) ठेवत नाही तोवर नुकसान नाही ना?

रोगनिदानाबाबत इब्लिस तुम्ही म्हणतात त्यावरून आठवलं. घरातलंच उदाहरण. डायग्नोसिस आधुनिक वैद्यकाकडून पण उपचार मात्र होमियोपॅथीचे हे मी बघितलं आहे घरातच Happy

@ स्वाती_आंबोळे.
नेहेमीप्रमाणे मुद्द्याचा प्रश्न.

उत्तरः
१. तुमच्या साबणाची जाहिरात करायची करा.
२. तुम्ही साबणाच्या नावाखाली सोपस्टोन विकताहात हे तुम्हाला कळत नसेल, तरी मला ठाऊक आहे.
३. मग जाहिरात करताना, सोपस्टोन साबणापेक्षा बरा हे सांगत माझे काम कठीण का करता??? मला माझी धुणी पुरेशी आहेत हो. नका ना त्रास देऊ.

पहा समजते आहे का?
पुढची कॉपे अहेत.

>>जगात सर्वात जास्त परस्पर (ओव्हर-दी-काउंटर) खपणारी औषधे म्हणजे पेनकिलर्स, अर्थात वेदनाशामक औषधे. : who sales OTC? the "allopathic doctor??"
>>काहींना तर या औषधांवर इतके अवलंबून राहावे लागते की त्या औषधांचाही त्रास (साईड-इफेक्ट) व्हायला लागतो, म्हणजे मग त्या औषधासाठी वेगळे औषध! अशावेळी आठवते साईड-इफेक्ट्स नसलेली होमिओपॅथी . .
: did you ever study 'side effects' of your own medicines? i have given ONE example of such drugs. just a wiki link.
>>होमिओपॅथिक पद्धतीमध्ये सरसकट सर्वांसाठी एक-दोन औषधाचा मारा करण्याऐवजी :wow! "allopathy" bombards one or two drugs for everything.
^^
हे वरचे थोडेसे मूळ लेखकांचे आहे.
पुढे त्या मॅडम्नी तर लै भारी लिहिले आहे. अ‍ॅलोपथीची धाव स्टिरॉईडपर्यंत. यांना मायग्रेन चे प्रश्न विचारले. व्हर्टायगो, फ्रोझन शोल्डरची उत्तरे दूरच आहेत अजून.

असो.

तुम्ही होमिओपथी वापरा. मला आनंद आहे. पण ती वापरताना, कृपया माझ्या कामात पाय अडकवू नका. जो पेशंट येतो तो हेच विचारतो, डॉक्टर, याचे साईड इफेक्ट काय? अरे भाऊ, ते मला ठाऊक नसले तर मी पेन हातात घेऊन ते औषध लिहायला काय बीएचेमेस वाटलो का तुला?? याला इतकेच समजवण्यात मी माझी एनर्जी वेस्ट करायची. का? सिंपल रिझन. हे असले प्रचार.

तुम्ही अमेरिकेत आहात. तिथे डॉक्टर तुम्हाला तुमचा आजार समजवून साम्गतो. उपचारांची चर्चा करतो. मी तुला अमुक औषध देणार, त्याने अमुक होऊ शकते, तमुक त्रास होऊ शकतो, झाला तर मला सांग, हेही सांगतो. त्याला तुमची रिअ‍ॅक्शन काय असते? इथे मला माझे काम करताना यांच्या असल्या प्रचारामुळे काय अडचण येते, किती एनर्जी वाया जाते, ते सांगायचा प्रयत्न करतो आहे, बास..

पुढचे तुम्हीच सांगा?

असो.

ह्म्म. आलं लक्षात. मान्य आहे. Happy

होमिओपथीत साइड इफेक्ट्स नाहीत असं काही शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही, अपेक्षित इफेक्ट्स खरंच होतात का आणि झाले तर कसे होतात याबद्दल नेमकी माहिती नाही, आणि तरीही धडधडीत तसा प्रचार केला जातो आणि आमच्यासारखे अज्ञ लोक त्यावर विश्वासही ठेवतात - असा एकूण अर्थ कळला.

माहितीसाठी सर्वांनाच धन्यवाद.

<<इब्लिस | 10 May, 2013 - 14:34 नवीन >>

डॉ. इब्लिस - आय थिन्क यु नीड अ ड्रिंक; अ लार्ज वन... Happy

राज,

थॅंक्स फॉर द ऑफर, ड्रॉप बाय एनी टाईम, अँड वी शॅल एन्जॉय वन Wink ट्रीट इज ऑन मी.

BTW, im not in same time zone as you, so please copy paste the post which you mean.

डोंट वरी अबाउट द रेफरंस्... ड्रिंक इज इंपॉर्टंट.

माय हॅपी अवर इज अबाउट टु बिगिन... थँक्स फॉर बिइंग अ गुड स्पोर्ट...

चिअर्स!!!

इब्लीस्...मला वैद्यकीय ज्ञान नाही परंतु इथली चर्चा वाचून तुमच्या सर्व पोस्ट्स व तुमची त्यामागची तळमळ पटली.

होमीओपॅथी वाले एकीकडे अ‍ॅलोपॅथी ( हा शब्दच मुळात चुकिचा आहे) ला शिव्या घालतात आणी दुसरीकडे आम्हाला अ‍ॅलोपथी ची प्रॅक्टिस करायला परवानगी द्या म्हणून मोर्चे काढतात. हे म्हणजे रिक्षावाल्यांनी आम्हाला विमान चालवायला परवानगी द्या म्हणून मोर्चा काढल्यासारखे आहे.

आणखी एक फरक म्हणजे एम बी बी एस वाले एखादा आजार अवघड असेल तर स्पेशालिस्ट कडे जायचा प्रामाणीक सल्ला देतात. बारावीला जेमतेम पन्नास टक्के घेतलेला होमिओपॅथीवाला मात्र सर्दीपासून एडस पर्यंत सारे रोग बरे करायचा दावा करतो !

स्वाती/शुम्पी, होमिओपॅथीतील काही कळत नाही असं म्हणताय, पण थोडी शोधाशोध केली तर त्यातील डायल्युशन्सबद्दल कळेल (मायबोलीवरपण, पण इथे लिहिलेल्या गोष्टींना सत्य मानायची गरज नाही).

एका ग्रामच्या गोळीत १०^२३ रेणू असतात (अव्होगाड्रो नंबर) . जेंव्हा पोटेन्सी १२ पर्यंत जाते तेंव्हा १०^२३/१०^(२*१२) इतके औषधी रेणू उरतात (शंभरात एक अशा प्रमाणात प्रत्येक पोटेन्सीचे डायल्युशन असते) - म्हणजे अख्या गोळीत एकापेक्षा कमी. सुर्यात १०^(२३+३४) इतके रेणू असतात (वस्तुमान १०^३१ किग्रॅ, १०^३४ ग्रॅम) . ३० पोटेन्सीची सुर्या एवढी गोळी घेतली तर त्यात १०^५७/१०^(२*३०) इतके, म्हणजे एकापेक्षा कमी औषधी रेणू असतात.

त्यानंतरही होमिओपॅथीच्या औषधामुळे उपयोग होतो असे म्हणता येत असेल तर नक्कीच कशामुळेही व्हायला हवा (आणि अनेकदा होतो).

अ‍ॅलोपथी आणि होमिओपथी, दोन्हीं वापरल्या आहेत आणि दोन्हींची औषधे घेतली आहेत. वेगवेगळ्या गोष्टींसाठी एक दुसरीपेक्षा अधिक उत्तम रिझल्ट्स देते, असे साधारण निरीक्षण आहे. अ‍ॅलोपथी अँटीबायॉटीक्स कधीकधी suit होत नाहीत व त्यातून अजूनच त्रास होतो हेही अनुभवले आहे. तसेच काही इतर गोळ्यांबद्दल.

मात्र हल्ली पथी आणि औषधे ह्यापेक्षा डॉ. बद्दलचे - एकूण पेशंटशी वागणे, पेशंटच्या निरीक्षणांकडे दुर्लक्ष करुन आपलेच म्हणणे, suit न होणारी औषधे माथी मारणे वगैरे वगैरे, भरमसाट फिया उकळणे, कट प्रॅक्टीस, प्रत्येक वेळी अ पासून ज्ञ पर्यंत चाचण्या करण्यास सांगणे इत्यादि - अनुभव अधिक त्रासदायक आहेत इतके नक्की.

१००% अनुमोदन विकु!
किती टक्के होमिओपथी वाले प्युअर होमिओपथिक प्रॅक्टिस करतात ते पहा म्हणजे कळेल.
इमर्जन्सीमध्ये त्याना काही मॉडर्न मेडिसीन वापरायची परवानगी असते तर ते प्रत्येकच लहानमोठ्या आजारात वापरतात.
इतकेच नव्हे तर कुठल्याही अ‍ॅलोपथिक मेडिसीनच्या हॉस्पिटलात शिकाऊ उमेदवार म्हणून काम करायला हेच पुढे असतात. माझ्याकडेच ३-४ होमिप्थीवाले आयुर्वेदिकवाले आहेत.
फुकटात/ २-३ हजारात मिळतात म्हणून आम्हीही ठेवतो. Wink
मग ते एक दोन वर्षानी बाहेर जाऊन आमचीच प्रिस्क्रिप्शने कॉप्या करतात.

त्यात जे काही सो कॉल्ड प्युअर होमिपथिक प्रॅक्टिस करतात ते 'कंप्युटराईज्ड क्लिनिक ' अशी जाहिरात करून छोटी छोटी गोळ्यांची दुकाने थाटतात. पेशंटचा डाटा टाईपला की डायग्नोसिस आणि औषधे तयार. कोण ते मटेरिआ मेडिका पाठ करत बसणार.
अजून काही खास होमिपथीवाले/ आयुर्वेदिकवाले 'खास' आजारांचे डॉक्टर असतात. त्यांच्याकडे कुठल्यातरी उत्तर भारतातल्या किंवा लंडन्,जर्मनीतल्या डिग्रीतले गोल्ड मेडल असते. त्यांच्या जाहिराती हमखास रेल्वे / बस स्टेशनच्या आत बाहेर लावलेल्या असतात. महाराष्ट्रात अगदी काही महिन्यांपर्यंत हमखास इमर्जन्सी काँट्रासेप्शन करून घ्यायचे/ इल्लिगल अ‍ॅबॉर्शन करण्याचे ही खोपटी क्लिनिके हमखास ठिकाण होते. आता सरकारने त्यास बंदी आणलीय.

आम्हा सो कॉल्ड अ‍ॅलोपॅथ्स मध्येही काही वाईट मेंटॅलिटी असलेले डॉक्टर नक्की आहेत पण माहित नसलेली पॅथी बिनधास्त दडपून वापरण्याचे प्रमाण आमच्यात नक्कीच कमी.
आणि सवंग जाहिरातीचे प्रमाण अगदी नगण्य!

इब्लीसभाय लगे रहो, सगळ्याच पोस्ट्सना अनुमोदन!
मी इथे जेम्स रँडीची तीच लिंक द्यायला आलो होतो.
या सर्व क्वॅकपॅथीचा धंदा चालण्यामागे सामान्य रुग्णाचा 'अ‍ॅलोपथी'वरचा खोलवर रुजलेला अविश्वास आहे. या अविश्वासाचे कारण मानवी स्वभावात असावे. आपल्याला गूढ, मॅजिकल, भासणार्‍या गोष्टींचे अप्रूप असते. हॉमिओपॅथी काम कसे करते हे त्यांना सांगता न येणे हेच तिच्या 'चार्म'मधे भर टाकते असा तिढा आहे. पुन्हा कोणतीही गोष्ट 'नॅचरल' असे लेबल लावले की ती चांगलीच, अपाय न करणारीच असते हा ही एक भ्रम सोबत आहेच.
होमिओपॅथीचा इफेक्ट होत असेल तर जरुर घ्या, पण कृपा करुन त्याला 'सायन्स' म्हणू नका.
http://www.youtube.com/watch?v=c0Z7KeNCi7g हे पहाच!

आयुर्वेदिक औषधे सामान्यतः वनस्पतींपासुन बनवलेली असतात. वनस्पतीत काही रसायने असतात जी रोगकारक जंतूंना मारतात.
पण होमियोपाथी मध्ये नक्की काय असते? ती कशी काम करतात हे कोणी सांगेल काय?

एक प्रसिध्द हो. क्लिनीकची सगळ्याच वृत्तपत्रात जाहिरात येत असते. ते तर टक्कल केशऱोपण करुन नाहीसे करतात असा त्यांचा दावा आहे.

हे केशऱोपण कोणत्या पॅथीमध्ये येते?

रच्याकने: मला लहानपणी कडु काढे, सिरप, गोळ्यांपेक्षा साखरेच्या गोळ्याच जास्त आवडायच्या.

Pages