महिलांनि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे?

Submitted by प्रिया७ on 18 December, 2012 - 11:06

गेले २ दिवस दिल्लीच्या रेपची माहिति वाचण्यात येत आहे. आजकाल बर्‍याच कारणाने महिलांना उशिरा पर्यंत घराबाहेर राहावे लागते. किंवा बाहेरगावी सुद्धा एकटे रहावे लागते. काहि सिंगल पेरेंट सुद्धा आहेत. अशा वेळी एकटे राहाणार्‍यानी घरि आणि घराबाहेर काय खबर्दारी घ्यावी? असा धागा असेल तर हा उडवुन टाकेन.

कवठीचाफा | 26 December, 2012 - 10:14
साडेतीन-चारवर्षे सेल्फ डिफेन्स अ‍ॅकेडमी नावाच्या संस्थेसोबत लहान काळाची शिबीरं झाली त्यात ज्या गोष्टींचे ट्रेनिंग दिले त्यातल्या महत्वाच्या गोष्टी. केवळ स्त्रियाच नाही पुरूषांनाही उपयोगी पडू शकतील अश्या.
१ ) कधीही समोरच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त असतील तर प्रतिकारापेक्षा माघार घेणं उपयुक्त अर्थात याचा अर्थ थेट पळायला सुरूवात करणं असा नाही, यात तुम्ही दमाल आणि आयतेच हाती सापडाल.
२ ) सर्वात आधी परिस्थिती/वातावरणाचं बारकाईनं निरीक्षण करत रहायला हवं अनेकदा संभाव्य धोका लक्षात येतोच.
३ ) समोरच्या व्यक्तींमधल्या म्होरक्या किंवा लिडरकडे आधी लक्ष द्या, (काही सेकंदातच तो लक्षात येतो ) आपलं पहिलं लक्ष्य त्यालाच करा. आता कसं ? ते पुढे
४) पायात जर हिल्स असतील तर त्यांचा आघात गुडघ्याच्या बाजूच्या भागावर करा, लक्षात घ्या संवेदनशील भागावर हल्ला होणार या तयारीत समोरची व्यक्ती असते तीथे प्रहार वाया जाईल. गुडघ्याचा बाजूचा भाग हा देखील विक पॉइंटच असतो तिथला मार सहन होत तर नाहीच पण त्यानंतर काहीकाळ पायही टेकता येत नाही.
५ ) डोळे हा अतिमहत्वाचा भाग त्याला लक्ष्य करा
६ ) पेन, डोक्यातली क्लिप ही उपयुक्त हत्यारं आहेत त्यांचा वापर करा, यांच्यासाठी हाताचा कोपराजवळचा भाग, तळहाताचा मागचा भाग, कान, त्याच्या मागच्या सॉफ्ट टिश्युज यांना लक्ष्य करा
७ ) पाठीमागुन पकड घातल्यावर ताबडतोब हताश होऊ नका ( सामान्यपणे इथेच आपण गडबडतो ) पायाच्या टाचेचा आघात मागच्या व्यक्तीच्या पायाच्या नडगीवर करा आथवा हातातला पेन, पीन मागच्या व्यक्तीच्या कानाच्या आसपास मारा.
८ ) दातांचा वापर करा मात्र हात किंवा दंड यांच्या बाबत माणूस सहनशील असू शकतो, त्यांचा वापर कान आथवा मानेवर करा.
९ ) दगड हे उत्तम शस्त्र आहे, अंतर मिळालं तर हमखास वापर करा
१० ) हे सगळं करण्यासाठी, मनात बेडरता आणि क्रूरता येण्याची गरज आहे त्याचसोबत सवयही लागण्याची गरज आहे. शक्य झाल्यास कुणीतरी पार्टनर घेऊन नॉनफेटल प्रॅक्टीस करा.
११ ) प्रतिकार करायचाच आहे याची खूणगाठ बांधून शरीर शिथील ठेवण्याची सवय करून घ्या.

उदयन.. | 18 December, 2012 - 22:15
चोरटे स्पर्श, नको तिथे चिमटे यांकडे दुर्लक्ष करा. आठवड्यातून तीन वेळा तुम्ही कुर्ला दादर अश्या ठिकाणी एकटीच नेहमी मारामारी करत बसू शकत नाही. >>>>>>>>>> इथेच चुकतात तुम्ही......एक ब्लेड नाहीतर लहानसा धारधार चाकु ठेवा..... असे काही झाल्यास लगेच मारा.......तेही जोरात.... परत कुणाला हात लावणार नाही

सामोपचार | 18 December, 2012 - 22:17
उदयनजींना अनुमोदन.......हल्ली लहान नेलकटरसारखी अवजारे असतात ती जवळ ठेवावीत. पटकन काढून भोसकायला बरी पडतात.

स्मितू | 18 December, 2012 - 22:57
मी उदय च्या मताशी सहमत आहे.... ...ट्रेन मध्ये... बसमध्ये प्रवास करतांना महिलांना ,मुलींना आश्या बर्‍याच प्रसंगांना तोंड द्यावे लागते आश्या वेळेस मुलींनी.... आपल्या जवळच्या सेफ्टी पिन चा वापर करावा.... पुरुषाच्या घाणेरड्या हालचाली लक्षात आल्या की लगेच बारिक पिन टोचायची...बरोबर चुपचाप बसतो तो.... ब्लेड, चाकु हे हत्यार जरा जास्तच होते..
शक्य्तोवर रात्रीचा प्रवास एकटीने टाळावाच... खुपच अर्जंट असेल तर सोबत कोणाला तरी घ्यावे...

mansmi18 | 19 December, 2012 - 03:12
पेपर स्प्रे मधे पेपरच असायला हवा का? हौ अबाउट सल्फ्युरिक अ‍ॅसिड?
असे काही चाळे करणार्‍यावर महिलानी अ‍ॅसिड का टाकु नये? एक दोन लोकाना या अ‍ॅसिडचा प्रसाद मिळाला की पुढे अशी काही विकृत इच्छा असणारे पुरुष असे काही करण्याआधी शंभर वेळा विचार करतील.

swanand_ml | 19 December, 2012 - 16:42
मला तात्वीक चर्चेत रस नसल्याने फारसे प्रतीसाद न वाचता प्रतिसाद देत आहे तरी माफी असावी.
महिलांसाठी स्वसंरक्शणावर दोन शब्द लिहु इच्छीतो.
ज्याला जगायचे आहे त्याला झगडावे लागेलच.
महिलांनी शस्त्र बालगण्यावर येथे चर्चा झाली. मला स्वताला ह्या दोन गोष्टी आवडतातः
http://en.wikipedia.org/wiki/Karambit
http://en.wikipedia.org/wiki/Push_dagger
लपवीण्यासाठी सोपे, हाताळण्यासाठी सोपे व हिसकावून घेण्यास अवघड. इंटरनेट वर उपलब्ध.
केवळ शस्त्र आहे हे पुरेसे नसते. ते हाताळन्याची व वापरण्याची मानसीकता असणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशीक्शण गरजेचे आहे.
बंगळुर वासी येथे जवु शकतातः
http://kravmagabangalore.in/
मुम्बई: http://www.kravmagaindia.in/locations/mumbai
दिल्ली: http://www.kravmagaindia.in/locations/delhi
वरील प्रशिक्शण केंद्रे शस्त्रप्रशिक्शणाची नसून संरक्शण प्रशिक्शण केन्द्रे आहेत ह्यची नोन्द घ्यावी.
बहुत काय लिहणे. आपण सुज्ञ असा.

दिनेशदा | 21 December, 2012 - 05:52
मीही जसे सुचेल तसे लिहित जातोच. एकटे घराबाहेर पडल्यावर, जर कुठल्याही असुरक्षित भागातून जात असू तर अगदी नियमित रित्या घरच्या व्यक्तीला किंवा सहकारी व्यक्तीला फोन करुन आपला खरा ठावठिकाणा कळवत राहणे हा एक उपाय सुचतो मला.
संध्याकाळच्या वेळी आपल्या परिसरातील कुठलाही भाग एकाकी राहणार नाही, याची काळजी. घरी असणार्‍या किंवा जेष्ठ व्यक्तीनी घेतली तरी चालेल. अशा भागात गटाने ऊभे राहून चर्चा करावी, जाग राखावी.
घरीच कंटाळत कण्हत राहण्यापेक्षा. बसस्टॉपवर / नाक्यावर जाऊन ऊभे राहिले तर काय वाईट ?
पुर्वी आमच्या कॉलनीत यायला अंधारा रस्ता होता. त्यावेळी एखाद्या व्यक्तीला उशीर होत असेल, तर घरची माणसे रस्त्यावर जाऊन थांबत असत. तसेच कुणी एकटा माणूस असेल, तर तो सोबत मिळेपर्यंत हायवेवरच थांबत असे.
ज्यांची कामाला जायची जागा निश्चित आहे त्यांनी यायच्या जायच्या वेळी गटाने आणि तेसुद्धा स्त्री आणि पुरुष अशा मिश्र गटाने शक्यतो प्रवास करावा. जर यायच्या जायच्या बस किंवा गाड्या ठराविक असतील, तर
सहप्रवाश्यांशी मैत्री करावी. एखादा सहप्रवासी नेहमीच्या वेळी दिसला नाही तर चौकशी करावी.

नीधप | 21 December, 2012 - 08:28
प्रतिकार करा हा उपाय व्यवहार्य नाही <<<
सतत शक्य नाही. हपिसला/ कॉलेजला जाताना, घरी परतताना... रोजचे रोज
एखाद्या दिवशी केला जातोच.
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.

Kiran.. | 21 December, 2012 - 08:50
सुरक्षिततेच्या उपायांची यादी
१. पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. नेहमीच नाही पण काही वेळा.
२. कराटे वगैरे मधे फार नाही पण योग्य जागी एक जीवघेणी लाथ मारता येईल इतपत तरी शिक्षण घेणे
३. वेळी अवेळी काम करणार्‍या लोकांनी ज्या क्षणाला शक्य होईल त्या क्षणाला स्वतःचे वाहन घेणे. गाडी चालवता येण्याबरोबरच त्याची काळजी, बेसिक मेंटेनन्स इत्यादीची व्यवस्थित माहिती व सवय करून घेणे.
+
()महिला जागृतीसाठी अभियान निर्माण करणे : राज्य / राष्ट्रव्यापी अभियान आणि त्याच्या गाव/तालुका/जिल्हास्तरीय समित्या यातून कायमस्वरुपी जागृती घडवून आणणे. यात स्वयंसेवी संस्था / सरकारी संस्था / खाती यांचा समन्वय साधलेला असावा. कार्यकर्त्या निर्माण करून घराघरापर्यंत जागृतीचे अभियान न्यायला हवे.
* ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी परिसंवाद / वर्कशॉप्स राबविणे. माध्यमप्रतिनिधी / पोलीस / न्याययंत्रणा यांच्या प्रतिनिधींनाही सामान्यजनांबरोबर सहभागी करून घेतल्यास लोकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षातल्या अडचणी याबद्दल देवाण घेवाण होऊ शकेल.
* महिलांविषयक गंभीर गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना व्हावी यासाठी पाठपुरावा करणे.

आहना | 21 December, 2012 - 08:46
१. पेपर स्प्रे बाळगणे>>> पेपर प्रे उपलब्ध नसल्यास पर्स मधे डिओड्रन्ट वापरा

उदय | 21 December, 2012 - 09:01
(अ) प्रसंगावधानता दाखवणे महत्वाचे आहे. १९९८, दिल्लीच्या DTC मधेच एका युवतीवर असाच प्रसंग आलेला होत, पाच लोकांशी सामना करत सुटका केली... पुढे कोर्टाने गुन्हेगारांना शिक्षाही दिल्यात.
थोडा कमी पणा आला तरी चालेल, पण 'पाच लोक' टवाळी करत आहेत, तर तेथे हुज्जत घालण्यापेक्षा सटकणे महत्वाचे. माघार घेण्यात कमीपणा कधिच नसतो...
युक्ती (थोडे डोक) आणि बळ असा समन्वय साधल्यास घटना कमी घडतील.
(ब) सर्वात महत्वाचे असे प्रसंग अगदीच अनोळखी लोकां कडुनच होतात हा गैरसमज काढुन टाकणे. बहुतेक प्रकारांत ओळखी किंवा नात्यामधिलच व्यक्ती असतात. वर अनेकांनी सुचवलेल्या उपायांत हा मुद्दा मला दिसला नाही म्हणुन लिहावेसे वाटले.
दर दिवशी जरी त्याच व्यक्तीसोबत प्रवास करत असाल किंवा कामा निमीत्त संपर्कात येत असलांत, तरी प्रत्येक क्षणी सतर्क राहुन "उद्देशांत काही बदल झालेला नाही आहे नां?" हे तपासायला हवे. दोन व्यक्ती एकाच ठिकाणि काम करत आहेत, कामा निमीत्त प्रवासाला सोबत जावे लागणार आहे... सावध आणि सतर्क रहाण्यात काहीच हरकत नाही.
(क) प्रसंगावधानता मधे गाड्यांना (मग ऑफिसची असेल किंवा सार्वजनिक वहान असेल) पारदर्षक काचा नसतील तर प्रवास करायला चक्क नकार द्यायचा. सार्वजनिक वहानांना कशासाठी हवेत टिंटेड काचा किंवा पडदे ?

प्रिया७ | 21 December, 2012 - 16:12
ब्राईट एलईडि फ्लॅश लाईट जो वेळ प्रसंगि कामी येतो सरळ डोळ्यात मारता येतो,सेफ्टि पिन,सेल फोन वर (९११) किंवा ईमर्जन्सि नंबर स्पीड डायल ला सेव्ह करुन ठेवणे, पेपर स्प्रे नसेल तर छोटि परफ्युम बाटलि सुद्धा वापरता येते, फेसबु़क वर कुठे जात असाल तर त्याची माहिति न टाकणे किंवा Laxmi (कसे लिहायचे मराठित) पुजन चे दागिन्यांसकट फोटो न टाकणे,कुठे एकटे असतांना कानात हेड्सेट घालुन ठेवु नये,गाडि चे रिमोट लॉक गाडिजवळ जावुनच उघडणे,गरज पडल्यास खोटे बोलणे,रात्रिच्या वेळि एकटे असाल तर कोणाला दया दाखवायच्या आधि/ मदत करायच्या आधि २-३ दा विचार करा .

मुंगेरीलाल | 23 December, 2012 - 00:51
एक साधा आणि परिणामकारक उपाय म्हणजे एक जोरदार, तीव्र आवाजाची शिट्टी (पर्समध्ये अथवा किचेन म्हणून) जवळ बाळगणे. कुठलाही गुन्हेगार (किंवा त्यांचा समूह) एका क्षणात दचकतो आणि तुम्हाला सुटका करून घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. शिवाय हे शस्त्र नसल्यामुळे जवळ ठेवण्याला कुठली परवानगीही लागत नाही आणि वापरायला कसलं कौशल्यही लागत नाही.

अश्विनीमामी | 23 December, 2012 - 03:12
एक गोष्ट मला लक्षात आली, मुली, स्त्रीया ऑफिसला जातात किंवा घरी उशीरा येतात. तर आपला हपीसचा मजला आणि ग्राउंड फ्लोअर, कँतिनचा फ्लोअर हेच सहसा माहीत असते. घरीही तेच. ग्रा. फ्लो आणि आपला मजला. व्यतिरिक्ग आपली बिल्डिंग कशी दिसते आपल्याला माहीत नसते. सवडीने, फुल प्रकाशाच्या दुपारी पूर्ण बिल्डिंग/ ऑफिस काँप्लेक्क्ष , खास करून पार्किंगची जागा ह्याची माहिती करून घ्यावी. नजर सरावलेली असावी. फोटो काढून जागांची माहिती करून घ्यावी. प्रत्येक जागी आडोसे, अंधार्‍या जागा, उंचावरून मुलीला फेकून देता येइल अश्या जागा विशेषतः पार्किंग मध्ये खूप आढळतील. त्या अवगत करून घ्याव्यात. मैत्रिणींना, घरच्यांना सांगावे बोलावे ह्याबाबत. बरेचदा पहाटे किंवा रात्री आपलीच बिल्डिंग अनोळखी भीती दायक जागा बनू शकते. अ‍ॅटॅकरला तेच हवे असते. तो तुमचा गैरफायदा घेण्यास पूर्ण समर्थ असतो. फोनवर इमर्जन्सी नंबर आधीच देऊन स्पीड डायल वर ठेवावा. आयत्यावेळी कोणाला फोन करावा असे व्हायला नको.
पोर्टेबल टेसर सारखे उपकरण पर्स मध्ये असावे. बॅटरी नक्की. मुली फ्लॅट मध्ये राहात असतील तर शक्य असल्यास एक कुत्रा नक्की पाळावा. हे मी विनोदाने आजिबात लिहीत नाही. त्यासारखे संरक्षण नाही.
पुरुषांना त्याची भीती नक्की वाट्ते.
बिनओळखीच्या पुरुष व स्त्रीयांशी आजिबात बोलू नये. लिफ्ट मध्ये खास करून.
वॉचमन ला पण आपल्या जाण्या येण्याच्या पॅटर्न ची माहीती फार देऊ नये. रिक्षा वाले टॅक्सीवाले कधे कधी फार बोलतात त्यांना उत्तेजन देऊ नये. इथे किती पटेल माहीत नाही पण शहरांमध्ये सर्विस इंडस्ट्री जसे वाहन चालक, वेटर, वॉचमन ऑफिसातील प्यून्स वगैरे बाहेरच्या राज्यातून आलेले एक्टे
पुरुष असतात. एकाच रूटीन कामात अडकलेले, जास्तीच्या तासांचे काम करून वैतागलेले असतात.
बायको गावी त्यामुळे ..... पण त्यांना आपली मानसिकता समजेल अश्या भ्रमात राहू नये. स्त्रीवाद वगैरे तर दूरची गोष्ट.

सुमेधाव्ही | 29 December, 2012 - 08:02

आमच्या ऑफिसमधे मध्यंतरी एसीपी पुणे यांचे भाषण झाले होते त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या खालीलप्रमाणे, (भाषण साधारणपणे हिंजवडी परिसरात काम करणार्‍या महिलांची सुरक्षा असा असल्यामुळे नयन पुजारी केसच्या संदर्भात होत्या पण त्या सगळ्यांनाच उपयोगी पडतील त्यामुळे आठवेल तसे लिहिते आहे.)

पुणे पोलीस, फोन नं फक्त १०० एवढाच नाहीये. १०० नं लक्षात रहाण्यासाठी उत्तम पण इथे काहीही+ सर्व कंप्लेंट्स येत असतात त्यामुळे हा नं दर वेळेस लागतोच असे नाही. त्यामुळे इतर नं पण माहीत हवेत. ते मोबाईलवर सेव्ह केलेलेही हवेत.
पोलीस कं रुम. १००, २६१२२०२, महिला/ बाल हेल्पलाईन - २६०५०१९१ क्राईम अ‍ॅलर्ट -२६११२२२.
हे नं दिवाळी किंवा कोणत्याही निमित्ताने शुभेच्छा संदेशाबरोबर एकमेकांना वारंवार समस करून पाठवले म्हणजे मग ते आपोआप सेव्ह होतात व सेव्हड रहातातही.
(वि.सु. पोलीसांशी बोलताना मराठी लोकांनी मराठीतच बोलावे, कारण पुण्यातले जवळपास सगळे पोलीस पुणे परिसरातले व मराठी बोलणारे आहेत. इंग्लीशला ते कधीकधी बिचकतात व मग संभाषण नीट होऊ शकत नाही.)
अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागु नये. सार्वजनीक वहान सगळ्यात सेफ.
काही जणींना कॅबमधून यावे लागते ती कॅब जरी कं ने पुरवली असेल तरी ती बाहेरील एजन्सीकडून आणलेली असते त्यामुळे सजग रहावेच लागते. कॅबमधे बसल्यावर "रोज"सगळ्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात घरी एक फोन करायचा. त्या फोनमधे कॅबचा नं तुम्ही उच्चारुन अमुक अमुक कॅबमधून तुम्ही प्रवास करत आहात व आत्ताचे तुमचे लोकेशन सांगायचे व अजून कीती वेळ घरी पोचायला लागेल त्याचाही उल्लेख करायचा. (जर का मोबाईलमधे बॅलन्स नसेल, किंवा रेंज येत नसेल तरी हा फोन खोटा खोटा असायलाही हरकत नाही. तेवढे अ‍ॅक्टींग जमवायचे स्मित
"कायम" हो हो...कायम्...कधीही जोरात पळता येउ शकेल असेच बुट्/चपला/कपडे असावेत. म्हणजे उंच टाचांचे बुट वगैरे ऑफिसात किंवा ऑफिसच्या पार्टीजना जिथे तुम्ही एक्ट्या जाणार आहात तिथे नकोत.
आर्थिक व्यवहारांची, घरगुती भांडणे, भानगडींची चर्चा कॅबमधे नकोच. इथे रोज अ‍ॅलर्ट रहायला हवेच.
बरेचसे कॅब ड्रायव्हर हे युपी एमपी मधील खेड्यांमधून आलेले असतात जिथे बायका त्यांच्या दृष्टीसही फारश्या पडत नाहीत. त्यामुळे शहरातल्या कॉन्फिडन्ट, पैसे मिळवणार्‍या, स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करणार्‍या व स्वतंत्र विचारांच्या बायकांबद्दल त्यांना असुया वाटते. अनेकदा त्यांचा इगो दुखावल्यामुळे सुडापोटी पण बलात्कार केले जातात. त्यामुळे शक्यतो ह्या लोकांशी हुज्जत न घालणे, जेवढ्यास तेवढे बोलणे, जास्त माहीती शेअर होणार नाही हे पहाणे हे महत्वाचे. काही मुली कॅबमधे बसल्या की घरच्यांशी जे काही बोलतात त्यातून बरीच माहीती दुसर्‍याला मिळते आहे हे त्या विसरतात.
एटीएम मधे दर शुक्रवारी पैसे काढणे, एकाच एटीएम मधून पैसे काढणे असे करू नये...बदलत रहावे. थोड्क्यात म्ह़णजे प्रेडीक्टेबल राहू नये. बर्‍याच जणी जाता जाता २ मि. थांबायला सांगून एटीएम मधून पैसे काढतात.
एकटीदुकटी मुलगी/स्त्री रात्री कारमधून घरी परत जात असताना जर गाडी बंद पडली, तर आड रस्त्यावर असाल तर गाडीतून बाहेर पडण्यापेक्षा पोलीसांना फोन करावा. रात्री त्यांच्या मोबाईल व्हॅन्स हिंजवडी परिसरात गस्त घालतात. (त्यांचा सेल नं पण आहे) त्या दहा मिनिटात मदतीसाठी पोचू शकतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही पोस्ट मला आवडली... म्हणून शेअर करतेय...
थोपुवरुन साभार

बलात्कार कसे रोखाल ?

1. तुमच्या सभोवतील परिस्थितीचे नेहमी भान ठेवा -

सोसायटी किवा ऑफिस इमारतीतील पार्किंग ची जागा किवा वापरत नसलेली जागा, जास्त रहदारी नसलेला रस्ता, उंच इमारतीचे टेरेस अशा जागी बलात्कार होण्याची शक्यता जास्त असते. अशा ठिकाणी जाताना विशेष काळजी घ्या. तिथे आरोपी लपून बसलेला किवा तुमची वाट पाहत असू शकतो. गरजच पडली तर गेल्यावर फोन वर मोठ्या आवाजात बोलत राहा म्हणजे तुम्ही एकटे नाहीत असे त्यास वाटेल.

२. तुमच्या कपड्यांची योग्य निवड करा -

हे तुमच्या आकर्षक किवा मादक स्वरूपाच्या कपड्याशी संबंधित नाही. सार्वजनिक जीवनात जर वाईट प्रसंग आलाच तर पळून जाण्यासाठी किवा स्वताची सुटका करून घेताना उपयोगी पडतील असेल कपडे वापरा. खूप सैल कपडे किवा उंच कपडे चांगले नाहीत. जे कपडे अंगावर तंग बसतात ते कधीही चांगले. जीन्स, बेल्ट बांधलेला पायजमा कधीही चांगले. ईलास्तिक असलेला पायजामा सारखे सहज काढता येणारे कपडे आरोपीस अत्याचार करायला मदत करतात. म्हणून अंगावरून काढायला अवघड जाईल असे कपडे वापरा.

३. पार्टी आणि बार सारख्या ठिकाणी जास्त काळजी घ्या -

पार्टीत तुमचा ग्लास कोणाच्या हि हातात देऊ नका किवा कोठेही ठेऊ नका. कोणीही दिलेले पेय पिऊ नका. स्वताचा ग्लास स्वताच्या डोळ्या देखत भरून घ्या. आणि भरताना लक्ष द्या. पेय तेथील वेटर किवा बार टेंडर यांनीच स्वत तुम्हाला दिले पाहिजे इतर व्यक्तीने नाही.

अशा वेळी आपले मित्र किवा मैत्रिणी काय म्हणतील याची अजिबात काळजी करू नका. जर तुम्हाला काही शंका आली तर ते पेय न पिता बाथरूम ला जाण्याचे नाटक करून तुम्ही पेय फेकून देऊ शकतात.

४. स्पष्ट आणि उघडपने बोलणे शिका -

सार्वजनिक ठिकाणी किवा जीवनात जर कोणी तुमच्या कडे कारण नसताना किवा वाईट नजरेने पाहत असल्याचे तुम्हास दिसले तर लगेच त्याच्याशी थोडी हुज्जत घालायला पाहिजे. तुम्ही काहीच बोलले नाही तर त्याची हिम्मत वाढत जाते. त्यामुळे स्पष्टपणे बोलायला शिका. शंका आलीच तर अशी व्यक्तीचे वय, व्यक्तिमत्व, नाते याचा विचार करू नका. आजकाल वडील सुद्धा मुलीवर बलात्कार करतात अशा घटना होत आहे.

५. तुमची केसांची style तपासा -

होय, तुमचे केसांची style ने आरोपीला मदत होऊ शकते. लांब वेणी किवा सुटे केस तुम्हाला पकडायला मदत करतात. सैल केस नकोत किवा सहज पकडता येतील अशी वेणी नको.

६. जोरात ओरडा -

काहीही शंका आली तर जोरात ओरडा. लक्षात घ्या कोणी तात्पुरते मूर्ख म्हंटले तर चालेल पण बलात्कार झालेला नको.

७. मोठ्या आवाजाच्या ठिकाणी जास्त काळजी घ्या -

पार्टी किवा समारंभात जेथे मोठ्या आवाजात संगीत किवा गाणी वाजवली जात असेल तेथे जास्त काळजी घ्या. कारण तिथे तुमचे ओरडणे सुद्धा इतरांना ऐकू जाणार नाही आणि मदतीला येऊ शकणार नाही. चांगल्या मित्र किवा मैत्रीनिसोबातच राहा.

८. आत्मविश्वासाने चला किवा वावरा -

चालताना पाठ सरळ ठेवा. पाऊले टाकताना आत्मविश्वासाने टाकत आहे असे दिसले पाहिजे. स्वताची रक्षा करायला आपण समर्थ आहोत आहे इतरांना दिसले पाहिजे. आरोपी अश्या स्त्रीच्या शोधात असतो जी गरीब आणि स्वताची रक्षा करू शकणार नाही.

९. स्वताची वैयक्तिक माहिती कोणाला देऊ नका -

कोणालाही आपली माहिती देऊ नका उदा. फोन नंबर, फोटो, पत्ता. Internet वर सुद्धा आपली माहिती टाकू नका. कोणासही भेटण्यास एकटे जाऊ नका. Internet वरील मैत्रीवर भरवसा करू नका.

१०. बगीच्यात किवा समुद्र किनारी फिरायला सोबत कुत्रा घ्या -

अश्या ठिकाणी नेहमी जात असेल तर कुत्रा नक्की सोबत असू द्या. लहान किवा मोठा कसाही आकार असू द्या कुत्र्यांना धोक्याची सूचना लवकर मिळते आणि ते धोक्याचा सामना नक्कीच करतात.

११. कोणी पाठलाग करत असेल तर त्या व्यक्तीच्या नजरेला नजर द्या -

थोडी जरी शंका आली कि कोणी पाठलाग करत आहे तर थोडे थांबून न घाबरता मागे ओळून नजरेला नजर द्या तो व्यक्ती नक्की घाबरेल आणि त्याला कळेल कि हि महिला कमजोर नाही.

१२. मानसिक दृष्ट्या अश्या वाईट प्रसंगी तुम्ही काय आणि कसा प्रतिकार कराल याची योजना आखून ठेवा -

समजा कोणी तुमच्यावर वाईट प्रसंग करायला लागला तर तुम्ही काय आणि कसा प्रतिकार कराल याची योजना आखून ठेवा. उदा. ओरडणे, आरोपीच्या गुप्तांगाला मारणे, डोळे नाक अशा नाजूक भागाला मारणे इ. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

१३. मदत केंद्राचे नंबर हाताशी ठेवा -

पोलीस आणि महिला मदत केंद्राचे नंबर लक्षात ठेवा. मोबाईल वर लगेच call करता येईल असे ते राहू द्या.

इतर काही प्रासंगिक उपाय योजना-

१. प्रसंग - रात्री लिफ्ट मध्ये -

जर कंपनीच्या किवा एखाद्या उंच इमारतीच्या समजा १३ व्या मजल्यावर तुम्हाला जायचे असेल आणि लिफ्ट मध्ये अनोळखी मनुष्य आणि तुम्ही एकट्याच असेल तर ?
लिफ्ट मध्ये प्रवेश करा. आणि समजा १३ व्या मजल्यावर जायचे असेल तर १३ व्या पर्यंत सर्व मजल्याची बटन दाबा. जी लिफ्ट प्रत्येक मजल्यावर थांबते अशा लिफ्ट मध्ये कोणीही तुमच्यावर बलात्कार करण्याचे धाडस नाही करणार.

२. प्रसंग - घरात एकटे असताना -
घरात कोणी तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरात पळा. फक्त तुम्हाला माहित असते कि लाल मिरची किवा हळद कुठे आहे. किवा चाकू, चिमटे कुठे आहे. वेळप्रसंगी या साधनांचा खूप चांगला उपयोग होतो. काहीच नसेल तर भांडी अशा व्यक्तीच्या अंगावर फेकत राहा. आणि हो जोर जोरात ओरडा. असा आवाज आरोपीचा शत्रू असतो कारण त्याला पकडले जावे असे कधीही वाटू शकत नाही.

३. प्रसंग - रात्रीच्या वेळी रिक्षा किवा Taxi घेताना -
रात्री एकटे असताना रिक्षा, Tax मध्ये प्रवेश करताना तिचा नंबर लिहून घ्या. आणि घरी मोबाईल वरून कोल करून तो नंबर सांगा, सांगताना ड्रायवर ला ऐकू जाईल असेल मुद्दाम संभाषण करून सांगा. फोन जरी घरच्यांनी किवा मित्रांनी उचलला नाही तरी नाटक करा कि त्यांनी ते ऐकले आहे. ड्रायवरची हि आपोआप जबाबदारी निर्माण होईल कि त्याने सुरक्षित तुम्हाला घरी पोचवावे. (कारण त्याचे Details तुम्ही घरी किवा मित्रांना दिले आहे )

४. प्रसंग - जर गाडीचा ड्रायवरने नको त्या रस्त्यावर गाडी वळवली आणि तुम्हाला धोका दिसतोय-
तुमच्या हातातील वस्तूंचा वापर करा उदा. पर्स किवा दुपट्टा. यांचा वापर करून तुम्ही त्याच्या मानेला आवळून मागे खेचू शकतात. लगेचच त्याला गळा चोक -उप होऊन helpless वाटेल. जर दुपट्टा नसेल तर क्वालर पकडा.

५. प्रसंग - जर तुमचा कोणी पाठलाग करत असेल तर -
कोणत्याची दुकानात घुसा आणि त्यांना पाठलाग बद्दल सांगा. जर रात्र असेल आणि दुकाने बंद असेल तर ATM box मध्ये जा. तेथे सुरक्षा रक्षक असतोच आणि विदिओ केमेरा सुद्धा असतो त्याला घाबरून कोणी हल्ला करणार नाही.

हि माहिती आपल्या बहिणीला, मुलीला आणि माहिती असलेल्या सर्वच महिलांना वाचायला द्या काळजीपूर्वक वाचून मनाने सुदृढ आणि आत्मविश्वासपूर्ण राहिल्यास बरेच प्रसंग टाळता येऊ शकतात आणि वेळ प्रसंगी सामना करून आपली सुटका करता येऊ शकते.
----------------------------------------------------------------

नमस्कार,

काही खूप उपयुक्त गोष्टींची भर घालु ईछितो.............

स्त्री ही मनाने जितकी कठोर होऊ शकते, तितके कठोर चक्क ह्या ब्रम्हांडात कोणीही नाही. पुरुष हा फक्त शरिराने कठोर असु शकतो, मनाने नाही.

आणी दोन्ही प्रकारच्या मनुष्य प्राण्यांची एक अत्यंत समान कमजोरी असते, ती म्हणजे आंतरिक भय.

हे भय इतके भयानक असु शकते कि अचानक घडलेल्या कैक गोष्टीं मुळे माणसाचा हार्ट अटॅक वा हार्ट फेल सुद्धा होतो.

मनाने कठोर होउ शकत असल्याने आणी त्यांच्यावर होणार असलेल्या वा होण्यार्‍या अत्याचाराच्या प्रतिकारासाठी , होत असलेल्या अपमानाच्या प्रतिशोधासाठी, स्त्रीयांना हे दुर्गेचे रुप धारण करणे फारसे कठीण नाही.

बहुतेक मंडळींनी वर खूप उपयुक्त माहिती व मार्गदर्शन केले आहे, पण एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे " स्ट्राँग ऑफेन्स इज ऑलवेज द बेस्ट डिफेन्स", , तुमची पूर्ण मानसिक शक्ति, आक्रमणाच्या शराग्रावर विद्युतवेगाने समोरच्या हल्लेखोराच्या मनाच्या तळाला जाउन भीडलीच पाहिजे, ह्या सर्व कृतित त्याच्या शारिरीक बळाची जागा कुठेही नाही आहे.

एक उदाहरण : कुत्र्या-मांजरांचे वैर जग जाहिर आहे. एक कुत्रा मांजरीच्या मागे तिला मारण्यासाठी धावु लागला, मांजर जीव मुठित धरुन पुढे पळत होती. अचानक दोघांना कळले कि पुढे एक डेड्-एंड आहे, मांजरीला कळुन चुकले कि, आता सर्व संपले.
जीव मुठीत धरुन पळणारी मांजर अचानक उलट मागे वळली, आणी जीव खाउन कुत्र्यावर धावुन आली, ह्या झटकन घडलेल्या अनपेक्षित घटनेने कुत्रा हादरला, कुत्र्याचे अवसान गळाले आणी आता तो जीव मुठीत धरुन पुढे धावु लागला जीव वाचवीण्यासाठी आणी मांजर त्यच्या मागे जीव घेण्यासाठी.

मित्रहो ! हे आंतरिक भय, ह्या चराचरात सर्वत्र सर्व जीवांच्या मनात वास करतं, त्याला फक्त जागं करावं लागतं.
सर्व स्त्रीयांना सल्ला आहे कि, जे काय सुचेल ते करा, पण ते इतक्या प्रचंड वेगाने झाले पाहिजे कि तुम्हाला घेरुन उभे राहिल्येल्या ४ राक्षसांपैकी एकाची जरी तुम्ही ह्या गतीने वाट लावली, तर बाकिचे गळाले असे खुशाल समजा, त्याच वेगाने तुम्ही आणखीन एक टिपलात, तर खूपच छान.
आणी हे आक्रमण करतांना जोरात ओरडावे, त्याचे फायदे म्हणजे...... समोरचा अर्धमेला होतो, तुमची मानसिक शक्ती वाढते, आसपासच्या लोकांना संदेश मिळतो.

खूप पूर्वी एक गुरु होते, त्यांचे म्हणणे होते कि, remain like a coiled cobra & your stroke should be felt before it is seen or registered.

खरंतर, एक जुनी विद्या अजुनहि अस्तित्वात आहे, त्यात हे शिकवले जाते कि कोणत्या वेळेस कुठे प्रहार अथवा हल्का दाब दिला तर मनुष्य तत्काळ बेशुद्ध होतो वा मरण पावतो.
पण सध्या ईथे त्याचे विश्लेषण टाळतो आहे.

. देव कुठेतरी जागा आहे म्हणायचं....
------ Sad काय शिक्षा झाली? एक नराधम तर बालसुधारगृहात गेलेला आहे, पण कायद्याच्या दृष्टिने जाणता झाल्यावर (वय १८ वर्षे) तो बाहेर पडेल असे काही वाचले होते. म्हणजे तो एव्हाना मोकाट झाला आहे का?
त्याचे नाव, चेहेरा गुप्त ठेवला जाणार जेणेकरुन तो सुधारगृहातुन बाहेर आल्यावर त्याला लोकान्च्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.

शिक्षा अजून नाही सांगितली पण रेप आणि खूनचे आरोप मान्य झाले आहेत. मला वाटत उद्या का परवा शिक्षा सांगणार आहेत.
आरोपीचे इन्फेक्शन मुळे मृत्यू इ इ दावे कोर्टाने मान्य केले नाहीत. कायद्यातील पळवाटामुळे लोक सुटतात तसले आता काही होणार नाही. शिक्षा नक्की होईल - फक्त मृत्युदंड का एवढाच आता कोर्टापुढे निकाल बाकी आहे.

गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेता भारतीय घटनेत पुरेशी शिक्षा उपलब्ध नाही असे म्हणावे लागेल. त्यामुळे फाशीवर त्यांचे निभावेल इतकेच.

देव कुठेतरी जागा आहे म्हणायचं...>> सरळ सरळ ओपन आणि शट केस पण त्याचा निकाल लागला तरी आपण चला काहीतरी होते म्हणतो ह्यातच सिस्टम काय पद्धतीने काम करते हे कळते.

.

Pages