मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईकरांचे वर्क एथिक, दुसृयाच्या भानगडीत न पडण्याची , तरीही मदतीला येण्याची सवय. मोजके बोलणे, वक्तशीर पणा. मेहनती स्वभाव वाखाणण्यासारखे आहे. वेगळा मुंबईतील माणसे व अनुभव असा बाफ काढा की. <<
ये थोडा ज्यादा हो रहा है.

वसईला पण पुर्वी खुप इस्ट इंडीयन असायचे. त्यांची नावे पण वेगळीच असायची ( माझ्या ओळखीची एक मुलगी होती, तिचे नाव रुफिणा होते. ) त्यांची शेतीवाडी असायची. तिच्या शेतातली पडवळं, चिंचा, पांढरी करवंद यावर आमचा जणू हक्कच असे. त्यांच्या लग्नात डुक्कर मारावेच लागे आणि त्याच्या चरबीत वडे तळले जात.
त्यांची भाषा पण वेगळीच असे. हटं कटं ( इकडे कुठे ) कवर्‍याला घेतरी केरी तू ( केवढ्याला घेतली केळी तू ) असे काहीतरी बोलत.

त्यावेळी वसईकर पण, "मुंबई" ला जातो असे म्हणत. वसई स्टेशनच्या आसपास वस्ती नव्हती. वसई गाव लांब होते. आधी एस्टीचा प्रवास मग बर्‍याच वेळाने मिळणार्‍या लोकलचा प्रवास.. असे होते. पण मुंबईकरांना वसईची भाजी अतिप्रिय. कावडीत भाज्या घेऊन येणारे ते भाजीविक्रेते अजूनही कुठेकुठे दिसतात. ( कुर्ला नेहरुनगरमधे एक असतो. )

सिडको च्या बसेस सुरु झाल्यापासून, पनवेलच्या भाज्या यायला लागल्या. कलिंगडे, तांदूळ वगैरे बैलगाड्यातून यायचे. या पनवेलवाल्यांनीच दादरच्या गोल देवळाजवळचा बाजार वसवला.
पहिल्यांदा या बायका दारोदार फिरत. घेवडा, वांगी, टोमॅटो, मिरच्या अगदी खास चवीच्या असत.

०००

मुंबईत पुर्वी स्टेशनवरच्या गर्दीतून वाट काढायची असेल, तर "मच्छी का पानी" असे ओरडले कि आपोआप लोक बाजूला होत. पांढरे लाकूड आणि त्यावर टोपल्या आणि त्यावर मासे असे कोळी / कोळणी लोकलमधे असत. पुढे त्यांची जागा, मल्याळी कोळ्यांनी घेतली आणि त्यांनी प्लॅस्टीकचे ट्ब वापरायला सुरवात केली.

«««

चिकनी चमेली गाण्यात ज्या फव्व्याचा उअल्लेख येतो, ते फव्वे लोअर परेळ भागात उतरवले जात असत.

मला वाटलं तो "पव्वा" म्हणजे क्वार्टर असेल.

हटं तटं ही खास वसईची भाषा. वसई कल्चरवर अख्ख पुस्तक लिहिता येऊ शकेल एखाद्याला.

मला वाटलं तो "पव्वा" म्हणजे क्वार्टर असेल.

<>हो. कटरीनाला गाण्याच्या सुरूवातीला मारताना दाखवलीये की. Happy

हीरा, तुमच्याकडून भाऊचा धक्का या जागेविषयी अधिक माहिती मिळेल का? मला त्या जागेचं महत्त्व फार आहे. Happy

एवढे ग्रेट गुणवर्णन मुंबईकरांना स्वतःच स्वतःबद्दल करावे लागते. अनुमोदन देणारेही मुंबईकरच असतात. यातच काय ते आलं. Happy

चांगलीवाईट माणसं ही प्रत्येक शहरात असतात. मुंबईबाहेरच्या प्रत्येकाला कचरा समजणारी माणसं ठायीठायी असतात मुंबईत.
प्रत्येक शहराचा, गावाचा जगण्याचा एक पॅटर्न असतो त्याला अनुसरून चांगल्या वाईट सवयी आणि वृती पोसल्या जातात. त्यामुळे असं एवढं जनरलायझेशन कसं करता येईल?

चिकनी चमेली मधला पव्वा ही क्वार्टरच आहे. ड्यॅन्समधे अ‍ॅक्शन पण आहे त्याची Wink

वसईच्या इस्ट इंडियनांबद्दल काहीच फारशी माहिती नाही. बाटली मसाला सोडला तर. Happy

>>>> एवढे ग्रेट गुणवर्णन मुंबईकरांना स्वतःच स्वतःबद्दल करावे लागते. अनुमोदन देणारेही मुंबईकरच असतात. यातच काय ते आलं. <<<< आख्ख्या पोस्टला अनुमोदन Happy

त्या बंगल्यावर 'पिवळा बंगला' असे लिहिलेले आहे आणि बाहेरच्या रस्त्यावर कायम कसलेतरी घाण पाणी सांडलेले असते तोच ना?

मला मुलींनी मी गेली केली बोलली असे म्हटले की जाम त्रास होतो.>>>>. +१

<मुंबईकरांचे वर्क एथिक, दुसृयाच्या भानगडीत न पडण्याची , तरीही मदतीला येण्याची सवय. मोजके बोलणे, वक्तशीर पणा. मेहनती स्वभाव वाखाणण्यासारखे आहे>>>> +१ टोटली एग्रीड पण म्हणूनच मुंबई स्पिरीट च्या नावाखाली बरच सहन करतात Sad साधारण १० वर्षापूर्वी इथे सार्सने भयंकर धुमाकूळ घातला होता , तेव्हा इथे राहणारे मुंबईकर अगदी रीलक्स होते त्या सार्सपेक्षा जास्त घाणेरडे जंतू पचवले होते ना आम्ही त्याचही श्रेय मुंबईलाच Happy
कुठेही कटकट न करता जे समोर आहे त्यात आनंद मानून पुढे जाणे हाच टीपिकल मुम्बईकारांचाच गुणधर्म Happy

मुंबईकरांना वसईची भाजी अतिप्रिय. कावडीत भाज्या घेऊन येणारे ते भाजीविक्रेते अजूनही कुठेकुठे दिसतात.>>>> हो, आमच्या पार्ल्यात असायचे Happy त्यात कच्ची केळी , केळफुल वगैरे गोष्टी असायच्या Happy

आमच्या पार्ल्यात असायचे त्यात कच्ची केळी , केळफुल वगैरे गोष्टी असायच्या <<
असतात की अजूनही.
वसईवाल्याकडे कैच्याकै झुंबड असते. आम्ही पण असतो त्यात. Happy

त्याला 'उंबराचे पाणी' म्हणतात > हा विधी आमच्या परळ गावातले क्रिश्चन अजूनही करतात. पुर्वी आमच्या घरा समोर विहिर होती. कालांतराने ती बुजवण्यात आली. या विधीच्या निमित्ताने त्या जुन्या आठवणी मात्र नेहमी उगाळल्या जातात.

वसईवाल्याकडे कैच्याकै झुंबड असते. आम्ही पण असतो त्यात. >+१

साधारण पंधरा वीस वर्षांपुर्वीची गोष्ट... विरार वरुन सुटणारी रात्रीची शेवटची लोकल चुकल्याने आमच्या वर दुसर्‍या दिवशीची पहिली ३.३०ची लोकल पकडण्याची वेळ आली. रात्र भर स्टेशन वरिल डासांचे आक्रमण सहन करत पहिल्या लोकलची वाट पहात होतो. लोकल फ्लॅटफॉर्म लागली... म्हटले फ्रेश होऊन लोकल पकडू.. परत येऊन बघतो तर काय वसई वाल्यांनी आपल्या निवडक जागी पथारी पसरून प्रत्येक भोगीचे दरवाजे आतून बंद करुन घेतले होते. वसईकरान खेरीज दुसरा कोणीही आत चढू शकत नव्हता. स्टेशन मास्तर आम्ही तक्रार असता त्याने बिनधास्त फस्ट क्लासने प्रवास करा असे सांगून टाकले.

ही पहिली ट्रेन खास भाजी, फुले विक्रेत्यांनी भरलेली असते. दादरला पुर्ण खाली होते.
इतक्या पहाटे आगाशी, अर्नाळा इ. गावातुन खास एस. टी. सोडतात, ती पण अशीच भाजी-फुल विक्रेत्यांसाठी राखीव असल्यासारखी!

पहिल्या ट्रेन वरून आठवले. पूर्वी विरार लोकल्स अगदी कमी होत्या त्या काळी संध्याकाळी ऑफिसेस सुटल्यानंतरची साधारणतः ५.२० वाजताची डाउन विरार ही पहिली विरार म्हणून ओळखली जायची. त्यानंतर वीस पंचवीस मिनिटांच्या अंतराने चर्च गेट वरून सुटणार्‍या विरार लोकल्सना अनुक्रमे दुसरी विरार, तिसरी विरार आणि चौथी विरार म्हणत .' मी उद्या दुसर्‍या विरारला असणार आहे किंवा तू आज मला पहिल्या विरारला भेट' अशी निरोपांची देवाणघेवाण व्ह्यायची. संध्याकाळी पाच वाजताची विरार ही स्कूल बॉय विरार कारण या गाडीला चर्च् गेट परिसरातल्या शाळा कॉलेजातली मुले असायची..

विरारहून चर्चगेटला शाळेत शिकायला येणं हा केवढा वैताग आहे. पुढे नोकरीधंद्यासाठी ते करावंच लागतं. पण शिक्षणात सुद्धा तेच? काही झालं शहरामधे की आईबापांचे जीव टांगणीला...

आमच्याइथे अजून येतो कावडीतून भरभरुन भाज्या घेतलेला वसईवाला. पुर्वी दर आठवड्याला, नंतर पंधरवड्याला आणि आता दोन महिन्यातून एखाद्यावेळी येतात वसईवाले मामा. अप्रतिम भाजि असते त्यांच्याकडे आणि काहीच्या काही महाग. पण ते सांगतील तो दर द्यायला काही वाटत नाही कारण इतकी जड कावड वाहून आणणेच ग्रेट वाटते. गणपतीत तर वसईवाले आले नाहीत तर ऋषीची भाजी शिजणारच नाही.

वसई गावात जमिनीचा भाव १५ लाख रु गुंठयाच्या पुढे , जर एकरभर जागा (४० गुंठे) असेल तर जागेचा भाव बघा मग तुम्हालाही भाजी स्वस्त वाटेल Wink
वसईच्या आजुबाजुच्या गावात जागा एव्हढी महाग नसली तरी एकुणात जागेचे भाव भयंकर आहेत.
तरीही इथे अजुन शेती , नारळी /केळीच्या बागा टीकुन आहेत हे महत्वाचे

रेल्वे लाईन शेजारच्या जागा, भाजीपाल्यासाठी रेल्वेनेच ( एका विशिष्ठ राज्यातील लोकांनाच म्हणे ) भाड्याने दिलेल्या आहेत. माटुंगा - सायन भागातल्या जागा माझ्या आठवणीत साफसुफ केल्या गेल्या. माठ / मुळा / पालक / भेंडी या खास तिथे लावल्या जाणार्‍या भाज्या. बाजारात नेमक्या त्या आपण घेत नाही, असे खात्रीने नाही सांगता येणार.

अगदी पहाटे पहाटे, दादरला वीर कोतवाल उद्यान परिसरात मेथी / पालक / कोथिंबीरीचे ढीग लागलेले असतात.
त्यावेळी तिथे असलो तर अगदी स्वस्तात मिळतात भाज्या. उरलेल्या भाज्या ते लोक तिथेच टाकून जातात.

प्लाझाजवळच्या ब्रिजखालची जागा तर खास हिरव्या मिरचीच आहे. मलातरी हमखास ठसका लागतो तिथे !

मला पण ते पव्वाच वाटलेल

मी जन्माने पुणेकर असून मुंबईकरांचे कौतूक करते आहे. चांगल्या गोष्टी त्या आहेतच.
दादर जिप्सी हॉटेलचा परिसर पण छान कोझी आहे. माहीम पण उगीचच आवड्ते.
कुर्ला स्टेशनच्या बाहेर पडले कि हैदाबादची ओल्ड सिटीच लगेच सुरू होते असे वाट्ते.

तेच ते फव्वे, लोअरपरेलला उतरले जायचे. त्यावेळी एकच प्लॅटफॉर्म होता तिथे आणि नेमक्या विरुद्ध बाजूला हे चालायचे. तिथेच पश्चिमेला वाफेच्या इंजिनाची दिशा बदलवायचे चक्र होते. आता बुजवले बहुतेक ते.

त्या काळात कुणा बापट माणसाची मुंबईत दशहत होती. बापट रेट असा एक खास भाव पण असायचा आणि तो निम्म्याहून कमी असायचा. हे बापट कोण, ते कधी मला कळले नाही.

अगदी अगदी दिनेशदा, अजिबात लक्ष नसलं तरी ठसका लागल्यावर लक्षात येतच आपण कुठे आहोत ते. मला सकाळि उठून बाजार बघायला खूप आवडतं. धूसर प्रकाशात ती लगबग वेगळीच वाटते.

पाटील, खरय तुमचं. एक किस्सा आठवला. मित्राच्या घरी घोडबंदर रोड वरुन ओवळा गावची म्हातारी यायची भाजी घेऊन. कधीकधी शेतातले मुठ्ये (खेकडे) पण आणायची. एकदा मित्राने विचारलं मावश्ये बर्याच दिवसात खेकडे नाही आणलेस ? ती म्हणाली अरे बाबा, शेतात मिळायचे खेकडे, आता शेतं विकली पोरांनी, थोडीच जागा उरली मळ्याएव्हढी, आता खेकडे कुठून आणू ?

विकली म्हणजे ? मित्राने विचारलं. कितीला विकलीस ? साधारण दहा पंधरा वर्षापूर्वींची गोष्ट आहे ही. म्हातारी म्हणाली, दोन कोटी मिळाले. दोन्ही पोरांनी रीक्षा घेतल्या आनि बाकीचे ब्यान्केत ठेवले.

घरात बसून काय करू ? म्हणून कोट्याधीश म्हातारी भाजी विकत फिरत होती. ऐकून थोडं बर वाटलं, पण काहितरी हरवतय असही वाटलं

ठाण्यात अजूनही सकाळच्या बाजाराला जवळच्या गावातून भाजी घेऊन येतात अश्या म्हातार्‍या.... काहींकडे खेकडे पण असतात.

दिनेश - बापट रेटची स्टोरी वेगळी आहे, बापट नावच्या कोणत्याही माणसाची दहशत वगैरेही कधी नव्हती.
दादर स्टेशन (प) चा रोड म्हणजे सेनापती बापट रोड (तुलसी पाईप रोड), त्या एरिआत एका त्यावेळी एका गँगची वसुली चालायची म्हणुन त्या गँगचे नाव बापट गँग ( गँगच्या म्होरक्याचे नाव लिहित नाही इथे पण bapat gang dadar असे गुगलुन बघितले तर सापडेल). म्हणुन बापट बाव फक्त दादर भागतल्या रस्त्यावर चालायचा. बापट भाव सांगीतल्यावर घासाघिस न होता निम्मे पैसे देउन वस्तु घेउन जायची, त्यापुढे घासाघिस नाही. उदा, बापट २०० म्हणजे १०० रुपये

Pages