सुप्रसिद्ध पशु-पक्षी

Submitted by मामी on 5 April, 2013 - 01:25

लहानपणी आपल्याला सगळ्यात पहिले भेटतात ते काऊ, चिऊ, माऊ आणि भुभु. मग विठुविठु पोपट येतो. 'साळुंकी साळकी, तुझी माझी पालखी' करत साळुंकी येते. रामाच्या देवळाला पाच फेर्‍या मारणारी घार भेटते. ससा, कासव भेटतात ...... हळूहळू हे संग्रहालय वाढायला लागतं.

पण या कोणाला अजून खास नावं आलेली नसतात. टिप्या, मोती अशी जेनेरिक नावं असली तरी त्यांना खास व्यक्तिमत्त्व आलेलं नसतं.

पण मग पुढच्या आयुष्यात एकसेएक सुप्रसिद्ध प्राणी-पक्षी भेटू लागतात. त्यांचं खास वैशिष्ट्य असतं, त्यांना व्यक्तिमत्व असतं आणि/किंवा त्यांनी एखादी लक्षात राहणारी भुमिका तरी बजावलेली असते.

खर्‍याखुर्‍या जीवनात किंवा गोष्टींच्या / सिनेमांच्याद्वारे सुप्रसिद्ध झालेल्या पशु-पक्ष्यांबद्दलची माहिती इथे एकत्र करूयात का? वाचताना खूप मजा येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वासवदत्ता - उदयनाच्या गोष्टीतला उदयनाची दिशाभूल करून त्याला पळवून न्यायला तयार केलेला पांढरा छद्म हत्ती.
शिबी राजाच्या कथेतले कबूतर व ससाणा.

रशियन परीकथांमधली कोंबडीच्या पायावर गरगर फिरणारी बाबायागाची झोपडी!! Happy

बेब पिक्चर मधील बाळडुक्कर. बांबी / बँबी हरीण त्याच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांमुळे लक्षात राहिलेलं. बॉर्न फ्री मधली एल्सा.

पेशवे पार्कातली सोनाली सिंहीण! ती लहान असताना डॉ. पूर्णपात्र्यांच्या घरी तिचा व माझ्या वडिलांचा एकमेकांशी अनपेक्षित परिचय झाला होता. तिने वडिलांच्या पायांवर लाडीकपणे पंजा मारला होता... नशीब त्यांच्या पायांत तेव्हा हंटरचे बूट होते. परिणाम एवढाच झाला की वडिलांचा सोनालीने पंजा मारलेला बूट फाटला व वडिलांची बोबडी वळली!! Lol

दादा कोंडकेंच्या एका सिनेमातला वाघ्या कुत्रा. सिनेमाचं नांव आठवलं की सांगते.
त्या कुत्र्यासोबत अख्खं गाणं आहे. 'चल रे वाघ्या रडु नको....' असं काहीसं

स्मार्ट फोन्सवर आपली नक्कल करणारा 'टॉम कॅट' आठवुन झाला का?

हा बाफ पाहिल्या पाहिल्या पन्क्स्वटानी फिल च आठवला! पेन्सिल्वानिया चा सेलेब्रिटी ग्राउन्डहॉग Happy
फेब्रुअरी पहिल्या आठवड्यात हे महाशय स्प्रिन्ग चे भविष्य वर्तवतात!! Happy
स्प्रिन्ग केव्हा येणार ऐकायला ऐन थंडीत हजारो लोक तिथे जमतात!
या वर्षी ते भाकित खरे न ठरल्यामुळे लोकांनी केस पण केलीय फिल वर Happy
इथे वाचा
http://en.m.wikipedia.org/wiki/Punxsutawney_Phil

दादा कोंडकेंच्या एका सिनेमातला वाघ्या कुत्रा. सिनेमाचं नांव आठवलं की सांगते.
<<< तुमचं आमचं जमलं.

आणि पिच्चर संपल्यावर 'समाप्त', 'The End' वगैरे ऐवजी पाटी झळकते - 'संपलं'! Proud

अय्यो मामी!! सोनाली पुण्यातली पेशवे पार्कातली फ्येमस सिंहीण होती गो! Biggrin

पण वाघ काय किंवा सिंह काय, एखाद्याच्या घरात बैठकीच्या खोलीत पाहुणी व्यक्ती आरामात बसलेली असताना आतल्या खोलीतून येणारी गुरगुर ही कुत्र्याची नसून सिंहाची आहे हे ते सिंहाचे पिल्लू बैठकीच्या खोलीत आल्यावर पाहुण्यांना उमजणे आणि त्या धक्क्यातून सावरेपर्यंत त्या पिल्लाने पाहुण्यांच्या पायावर लाडीक चापट मारणे - फारच म हा न!!! Biggrin

आज्जी कोकणातली एक गोष्ट सांगायची अजगराची आणि अजगराने गिळलेल्या बाळाची... त्या गोष्टीतले अजगर... त्या बाळाचे भावंड आई काम करत असताना तिला पळत येऊन सांगते, ''माये, आर्धा खाल्लान...'', ''माये पाऊण खाल्लान''... आणि आईला वाटत असते आपले मूल कोणाच्या तरी खाण्याचे वर्णन करत आहे - तिला पत्ताच नसतो की अजगर आपल्या छोट्या बाळाला गिळतो आहे...

अनी, बनी, जनी या तीन मांजरी व टम्म फुगलेल्या पुरीची गोष्ट....

कोल्ह्याची व आंबट द्राक्षांची गोष्ट...

अलीबाबा आणि चाळीस चोर मधील गाढवे (की खेचरे?) ऐकावे जनाचे, करावे मनाचे गोष्टीतले विनाकारण बुडलेले गाढव!! ''मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी'' म्हणून उपड्या घागरीवर बसणारे लबाड मांजर... दोन माकडांचे लोण्यावरून होणारे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणारे व लोण्याचा गोळा लांबविणारे मांजर...

पण वाघ काय किंवा सिंह काय, एखाद्याच्या घरात बैठकीच्या खोलीत पाहुणी व्यक्ती आरामात बसलेली असताना आतल्या खोलीतून येणारी गुरगुर ही कुत्र्याची नसून सिंहाची आहे हे ते सिंहाचे पिल्लू बैठकीच्या खोलीत आल्यावर पाहुण्यांना उमजणे आणि त्या धक्क्यातून सावरेपर्यंत त्या पिल्लाने पाहुण्यांच्या पायावर लाडीक चापट मारणे - >>> बापरे माझा तर हार्ट फेलच होईल

मामी,

>> अरे काय त्या झुरळाचं???? उद्या म्हणाल मदर इंडियात शेत दाखवलं त्यात एक गांडूळ होतं

Rofl

अहो, त्या झुरळावर एक पूर्ण प्रवेश (सीन) बेतला होता! Happy तो सिनेमा कसेकत होता का दिल है के मानता नाही होता ते मात्र आठवत नाही.

अमीरखान आणि हिरवीण कोण्या मोठ्या धोंड्याआड दडलेले असतात. दोन मारेकरी त्यांना शोधत असतात. तेव्हढ्यात या दोघांना नाग दिसतो. हिरवीण किंकाळी मारायला जाते, तर आखान तिचं तोंड गच्च दाबून धरतो. मारेकरी इथेतिथे शोधतात आणि परत जातात. आखान तिच्या तोंडावरील पकड सोडतो आणि धापा टाकत म्हणतो "देखा, चिल्लानेकी कोई जरूरत नाही थी!" असं म्हणून स्वत:च उठून मोठ्याने ओरडतो. हिरवीण भंजाळते. तर आखान तिला तिच्या ब्लाउजवरील झुरळ दाखवतो. ती ते सहजी झटकून टाकते. पण याचा आवाज ऐकून निघून गेलेले मारेकरी परततात. आणि परत झटापट, वगैरे वगैरे वगैरे!

नाग न आठवता झुरळ का आठवलं, हा प्रश्न कृपया विचारू नका! Lol

आ.न.,
-गा.पै.

हो हो सिंहीण. बरोबर. माहिताय मला सोनाली सिंहीण होती ते. किशोरमध्ये वाचला होता ना लेख. लिहिताना मिष्टुक बिकेम. Happy

आपण मारे मायबोलीवर आहोत तरीही भीमथडीची तट्टे आठवली नाहीत कुणाला? झाशीच्या राणीचा राजरत्न घोडाही एव्हाना यायला हवा होता. आणि शिवरायांची कृष्णा घोडी पण आहे की.
-गा.पै.

मस्त!!!

भालू चित्रपटातला भालू.... फार लहानपणी हा सिनेमा बघितला होता... भालूला दुखापत होते (आणि तो मरतो बहुतेक) ते पाहुन थेटरातच हमसाहमशी रडले होते.

<<<वासवदत्ता - उदयनाच्या गोष्टीतला उदयनाची दिशाभूल करून त्याला पळवून न्यायला तयार केलेला पांढरा छद्म हत्ती.>>>
यावरुन ट्रोजन हॉर्स आठवला..

मत्स्य,वराह वगैरे अवतार झाले का सगळे आठवून?

राजा-रँचो म्हणून एक जुनी मालिका होती..त्यातील रँचो माकड आवडायचा मला..

हॅरी पॉटरमधले सगळे अ‍ॅनिमॅगस आवडतात मला..

एल्सा..........सिंहीण....शिवाय चतरन सिनेमातला चतरन आणि इतर सगळेच प्राणी (अगदी कावळ्यासकट)
आणि ब्लॅक स्टॅलियन मधला घोडा........... ज्युडा बेनहर मधले घोडे... (अब्दुल्ला मधले घोडे....जोधा अकबर मधले घोडे, हत्ती!!) Wink

अनिल कपूर आणि माधुरी दिक्षित.................. घाबरू नका, ही जनावरांची नावे नाहीत, त्यांचा चित्रपट, बहुतेक जमाईराजा ... त्यात एका एका पालीचे नाव शांताबाई आणि झुरळांच्या जोडीचे नाव चंगूमंगू होते. Wink

मैने प्यार किया मधिल पान्ढरे कबुतर >> असं सतत लिहून त्याच्या नावाचा अनुल्लेख करू नका. हँडसम नाव होतं त्या कबुतराचं. Proud

शिवाय मै प्रेम की दिवानी हूं मधला कुत्रा 'जॉनी' आणि पोपट 'राजा' राहीलाच की!! Happy

आपले सदाबहार टॉम & जेरी, डोनाल्ड डक, Talespin मधला Baloo, मोगली मधले बगीरा, भालु, चील and last but not the least शेरखान

परदेस चित्रपटातील (सुभाष घई-शारुक-महिमा) कुत्रा, गाय, म्हशी, आणि हो मोठ फुटेज खाणारा नाग!!
Air Buddies, Santa Buddies, Space Buddies, Spooky Buddies - या प्रचंड क्युट चित्रपटांमधील लॅब बडी आणि त्याचे संपूर्ण कुटुंब, त्यांच्यासोबत प्रत्येक चित्रपटाच्या स्टोरीप्रमाणे येणारे बाकीचे दोस्त.
लहान मुले ज्यांना आहेत त्यांनी हे चित्रपट आवर्जून पाहावेत. Happy

पिंगू मधलं व्रात्य पेंग्विन पोरगं
मिफी मधली गोडुली सशीणुली
कीपर द डॉग मधला शहाणा, मॅच्युअर कुत्रा
ऑसवल्ड मधला सेल्फसेंटर्ट, पॅरानॉईड पेंग्विन

ही कार्टून कॅरॅक्टरस असली तरी अगदी लहान मुलांच्या भावविश्वावर राज्य करणारी आहेत. इतक्या सुंदर छोट्या छोट्या गोष्टींतून त्यांची व्यक्तिमत्त्व खूप सुरेख उभी केली आहेत. यातलं पिंगू तर एकही वाक्य नसलेलं आणि निखळ आनंद देणारं कार्टून आहे.

Pages