सुप्रसिद्ध पशु-पक्षी

Submitted by मामी on 5 April, 2013 - 01:25

लहानपणी आपल्याला सगळ्यात पहिले भेटतात ते काऊ, चिऊ, माऊ आणि भुभु. मग विठुविठु पोपट येतो. 'साळुंकी साळकी, तुझी माझी पालखी' करत साळुंकी येते. रामाच्या देवळाला पाच फेर्‍या मारणारी घार भेटते. ससा, कासव भेटतात ...... हळूहळू हे संग्रहालय वाढायला लागतं.

पण या कोणाला अजून खास नावं आलेली नसतात. टिप्या, मोती अशी जेनेरिक नावं असली तरी त्यांना खास व्यक्तिमत्त्व आलेलं नसतं.

पण मग पुढच्या आयुष्यात एकसेएक सुप्रसिद्ध प्राणी-पक्षी भेटू लागतात. त्यांचं खास वैशिष्ट्य असतं, त्यांना व्यक्तिमत्व असतं आणि/किंवा त्यांनी एखादी लक्षात राहणारी भुमिका तरी बजावलेली असते.

खर्‍याखुर्‍या जीवनात किंवा गोष्टींच्या / सिनेमांच्याद्वारे सुप्रसिद्ध झालेल्या पशु-पक्ष्यांबद्दलची माहिती इथे एकत्र करूयात का? वाचताना खूप मजा येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉल्ट डिस्नेचा जगप्रसिध्द मिकी माऊस, त्याची मैत्रिण मिनी माऊस आणि त्याचे दोस्त डोनाल्ड डक आणि गूफी कुत्रा.

मामी ..... मस्त धागा आहे.

कुठल्यातरी हिन्दी सिनेमातला व्हिलन
"मैं अजगर हूँ, काटता नहीं निगल जाता हूँ" असा काहीसा डायलॉग मारत असतो.
त्या अजगराचा इथे समावेश करता येईल का ?? ..... Happy

Beethoven part 1 & 2 मधला डॉगी! खुप आवडलेले मला हे दोन्ही भाग.

'धरमवीर' मधे प्राणाच्या हातावर बसणारा पक्षी (ससाणा असावा बहुतेक)
याचा उल्लेख आधी कोणी केला नसल्यास तो पक्षी सुप्रसिद्ध म्हणता येऊ शकेल.

त्याचप्रमाणे अमिताभच्या एका सिनेमात असाच एक पक्षी दाखवल्याचे स्मरते.

अमिताभच्या 'गंगा जमुना सरस्वती'मधे मगर होती आणि 'अजुबा' मधे त्याची 'आई' असलेली डॉल्फीन!

'अजुबा' मधे त्याची 'आई' असलेली डॉल्फीन! >>> आई म्हणून डायरेक्ट डॉल्फिन???? हे राम .... Biggrin

या आईचे प्रेमाचे उलट, जीवावर बेतल्यास काखेतल्या पोराला नाकापर्यन्त पाणी येईस्तोवर डोक्यावर ठेवणारि, पण नन्तर पाणी वाढल्यावर पोराला पायाखाली घेणारी माकडीण

आई म्हणून डायरेक्ट डॉल्फिन???? Lol
मामे.. कस्ले कस्ले म्हणून धागे काढशील....
आणी ती धन्नो??? धन्नो चा रोल मागणारीची धन्य होय!!! Lol

कुली= अल्लारक्खा ससाणा
बेताब = बूझो कुत्रा
मर्द- तूफान घोडा

उपकारीची फेड परोपकारानेच करण्याचे शिकविणार्‍या सिन्ह अन उन्दीर यान्ची गोष्ट, त्यातिल सिन्ह व उन्दीर.

शक्तिपेक्षा युक्ती श्रेष्ठ शिकविणार्‍या गोष्टीतील टोपीविक्या व त्याच्या टोप्या पळवुन, नन्तर टोपीविक्याचिच नक्कल करत डोक्यावरुन खाली फेकणारी माकडे.

>>>> >>> लिंबू, इतकं टोकाला नेऊ नका हो! <<<<
नको नेऊ? बर,
मग मैने प्यार किया मधिल पान्ढरे कबुतर चालेल? Wink
(कबुतर एकवेळ मिळेल मला, निरोप कुणाला कुठे पाठवू? Proud )

पोपटाचा डोळा फोडायला सांगितल्यावर जेव्हा कौरव-पांडव जनतेने डोळा सोडून इतर सगळे फोडले, तेव्हा द्रोणाचार्यांनी वैतागून 'एवढे साधे येत नाही, माणसे आहात की डुक्कर!' असे शिष्यांना झापले होते असे ऐकीवात आहे. त्यांना फेमस प्राणी म्हणून घ्यावे का नाही हा अभ्यासाचा प्रश्न आहे.) >>>> त्यांना म्हंजे द्रोणाचार्यांना की शिष्यांना Proud

पिग इन द सिटी = बेब ही पिगिण

हाथी मेरे साथी- रामू हत्ती.. सिनेमात याचे निधन झाल्यावर थेटरात आलेल्या महापुरात आमचेही चार आँसू होते

टॉम, जेरी आणि त्यांचा तो बुलडॉग ह्यांना कसे विसरले सगळे? झालंच तर स्कूबी कुत्रा, अप्पू हत्ती (एशियाड वाला आणि टीव्हीवरील पुरातन 'अप्पू और पप्पू' मधला)

>>कुठल्यातरी हिन्दी सिनेमातला व्हिलन
"मैं अजगर हूँ, काटता नहीं निगल जाता हूँ" असा काहीसा डायलॉग मारत असतो.

हा बहुतेक अजगर जुर्राट असावा. तो व्हिलन अमरीश पुरी होय. Proud

<<आई म्हणून डायरेक्ट डॉल्फिन???? हे राम <<
हो गं मामी! अजुबा सिनेमात, मधुनमधुन अमिताभला आठवण आली की तो सागरकिनारी जाउन "माँSSSSSS अशी हाक मारतो. की लगेच ही डॉल्फीन माँ उसळुन वर येते. Biggrin

कुणाला हा अ. आणि अ मुव्ही बघायचा असेल तर इथे आहे.
http://www.youtube.com/watch?v=-5OKvqeKe9I&NR=1&feature=fvwp

हो गं मामी! अजुबा सिनेमात, मधुनमधुन अमिताभला आठवण आली की तो सागरकिनारी जाउन "माँSSSSSS अशी हाक मारतो. की लगेच ही डॉल्फीन माँ उसळुन वर येते. >>>> बापरे, काय सांगतेस! बरं झालं मी हा सिनेमा पाहिला नाही ते.

पण तशा बाकीच्या आयापण उसळून येतात हं - रागानं. Proud

Pages