फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाहीतर धारावी...लेदर बॅग्ज मस्त मिळतात>> +१. त्या बॅगा टिकतात पण उत्तम.

अनिष्का, तुझ्या ज्वेलरीचे फोटो वेगळा बीबी काढून त्यावर टाक. स्टेपवाईज फोटो असतील तर ते पण टाक.

मी तो धागा टाकलाय.....नंदीनी....माझ्या प्रोफाईल मधे मिळेल...स्टेप वाइज नाही केलेत...पण अजुन बनवायचा विचार आहे ...तेव्हा टाकेन....सोप्प असतं ते....

थांकु थांकु सर्वांना..
पेरू, हळूहळू करून जमेल कलेक्शन .. हाकानाका.. ओन्ली लेदर बॅग्स स्टोअर करताना जर्राशी काळजी घ्यावी लागते ..
ती टॅन कलर ची बॅग नापा लेदर मधे बनवलेली आहे. मुंबईतील एक मैत्रीण(नी ला म्हाईत आहे ती !!) बनवून घेते या बॅग्स( अर्मीज ब्रँडची केलीज, बिरकिन सारख्या लुक अलाईक्स)
अनिश्का.. माझे रीबॉक शूज ,गेस व्हॉट??? नवर्‍याने पसंत केला कलर.. मला तो जर्रा गॉडी वाटत होता पण आता वापरून वापरून सवय झाली.. एकदा घातल्यावर खाली कशाला पाहतेय मी Wink

अनिश्का.. सुंदर आहेत नेकपीसेस.. स्टोन्स आणी पर्ल मिक्स चे कधी ट्राय केलेस का???
आणी ते स्काय हाय बूट्स वॉव.. ते कश्याबरोबर पेअर करून घालतेस???
इथे विंटर मधे पोरी सर्रास घालून फिरतात.. वूलन मिनी स्कर्ट्,वूलन स्टॉकिंग्स बरोबर..

वर्षु दी मी ते शुज लग्नाआधी स्कर्ट, पेन्सिल फिट जीन्स वर घालायची गेल्या महिन्यात फाटले.. Sad

मोत्याचे अजुन बनवले नाहीत....माझ्याकडे जी काही कचरपट्टी अव्हेलेबल होती त्यातुन बनवलेत ते मी.......

1.jpg1.jpg

जी़नत अमान च्या स्टाईल चे कुडते?? हे नवीन ट्रेंड आलंय कि काय भारतात?>>>>>> आला नाहीय आजुन पण येण्याच्या मार्गावर आहे....(आलाय पण बोकाळला नाहीय)

'वर वर्षु ताईने दाखवली तशी नॅरो बॉटम कॉटन पँट... ..
मोकिमी.. ती पँट नॅरो बॉटम ची नाहीये.. बेल्ल बॉटम आहे.. हँगर ला लटकल्याने बिचारीचा शेप नीट दिसत नाहीये आणी फ्लॅश मुळे जेट ब्लॅक कलर ही भुद्रट दिस्तोय Happy

कि तुला ती ग्रे वाली म्हणायचीये?????????? हां..ती नॅरो बॉटम ची आहे..

धारावीला कोणती दुकानं आहेत? काही पर्टिक्युलर???
मला भारतातील ' हाय डिझाईन' च्या बॅग्स आवडतात.. लेदर चांगलं आहे त्या बॅग्स चं., पॅटर्न्स क्वचित चांगले(स्मार्ट?? Wink ) असतात नाहीतर त्यांचे अधिकतर पॅटर्न्स वर्किंग वीमेन करता फिट आहेत..

वर्षू, पर्टिक्युलर दुकाने अशी नाहीत. तिथे लेदर मार्केट आहे. त्यामुळे लेदरचं सर्वच सामान तिथे स्वस्तात मस्त मिळून जातं. मात्र खरेदीला जाताना कोणतरी जाणकार माणूस सोबत घ्यावा आणि भरपूर बार्गेनिंगची तयारी ठेवावी.

हां नंदिनी.. यू सेड इट.. खू>>>प वर्षांपूर्वी धारावी चं नाव ऐकून गेले होते एका मैत्रीणीबरोबर.. तिलाही काही विशेष माहिती नव्हती.. ऐन रस्त्यावरच्या दोनचार दुकानांत भेट दिली.. धारावीच्या महिमेबद्दल ऐकून होतो म्हणून बहुतेक, पण आत खोलात जाऊन अजून दुकानं शोधण्याची हिम्मत झाली नव्हती..

दक्षु, बॅगिट ची आऊटलेट्स पाहिली मॉल्स मधे.. त्यांचं इंडिविजुअल शोरूम पण आहे का???

हाय डिझाईन मला पण खुप आवडतात...

होली च्या पर्सेस/वॉलेट्स, बेल्ट्स, क्लचेस, शोल्डर बॅग्ज इ इ पण छान आहेत... जरा कलरफुल असतात पण मला आवडतात... Happy

http://www.holii.in/ इथे काही डिझाईन्स आहेत.

नी.......... कुछ भी क्या रे.. डोन्ट बी मोडेस्ट Happy

इकडे समर स्प्रिंग फॅशन मधे फ्लोरल पँट्सनी भलताच जोर धरलाय..
बघा तुम्हाला आवडतोय का हा लेटेस्ट ट्रेंड
१)









१०

११

थांकु वेका Happy
लाजो, मस्त आहे गं लिंक.. ऑसम कलेक्शन..
ऊप्स्..या भारतवारीत माझं लक्ष कसं गेलं नाही या ब्रँड कडे!!!!

वर्षू मी पाहिल्या त्या पॅन्ट्स आणि मला खुप आवडल्या.. पण घेण्याची हिंमत नाही झाली कारण त्यावर कशा प्रकारचे टॉप घालायचे तेच कळत नाही. कॉम्बिनेशन्स करणाच्या बाबतीत मी अगदी ढ आहे Sad

पेरू.. सातव्या पिक मधे बघ.. तू दोन प्रिंट पण मिक्स मॅच करू शकतेस.. ट्राय गर्ल्..बी बोल्ड Happy

पेरु +१ .. सेम कन्फ्युजन.. ट्राय करेन एकदा तरी
पुणे सेन्ट्रल मधे आहे हे कलेक्शन..

Pages