'घर दोघांचं'

Submitted by संयोजक_संयुक्ता on 7 March, 2013 - 23:17

ghar doghaanche2_0.jpg

चंद्रशेखर गोखले ह्यांच्या 'मी माझा' ह्या प्रसिद्ध संग्रहात एक चारोळी आहे.
'घर दोघांचं असतं
ते दोघांनी सावरायचं
एकाने पसरवलं
तर दुसर्‍याने आवरायचं
'
एक आणि दुसरा आलटून पालटून पसरवणं-आवरणं करत असतील तर खरंच त्यात रेखाटलेलं सहजीवनाचं चित्र रम्य आहे. गोखल्यांच्या प्रत्येक चारोळीबरोबर अनेक प्रति-चारोळ्या येतातच. ही चारोळी वाचल्यावर वाटलं की प्रत्यक्षात मात्र ...
'घर दोघांचं असतं
त्यात दोघांनी वावरायचं
त्याने पसरवलं
तरी तिनेच आवरायचं
' असंच चित्र बहुतकरुन दिसतं.

शिक्षण आणि करियर-निवड आपल्या मनाप्रमाणे करणे आजच्या काळात मुलींसाठी तुलनेने सोपे झाले आहे. वयाच्या एका टप्प्यानंतर मात्र मुलीची वाट अजूनही वेगळी होते. त्यातही अधोरेखित करुन सांगायचे तर लग्नानंतर. करियर करायचे की होममेकर व्हायचे की नोकरी आणि ब्रेक आलटून-पालटून की आधीची नोकरी सोडून नवऱ्याबरोबर नवीन जागी स्वत:ला रुजवायची धडपड ... एक ना अनेक पर्याय ! ह्या पर्यायांबद्दल आक्षेप नाही. किंबहुना मुली अतिशय डोळसपणे ह्या पर्यायांना सामोरं जातात. पण पर्यायाची निवड केली की प्रश्न संपतात का ? तर तसे नाही. नाहीतर मग नोकरीत अत्यंत यशस्वी असणारी पण मुलांसाठी वेळ काढू शकत नाही ह्या गिल्टचं ओझं बाळगणारी किंवा घरासाठी खस्ता खाल्ल्या पण आपल्यासाठी वेळ काढायचा राहून गेला, छंद जोपासायचे राहूनच गेले असं म्हणून हळहळणारी किंवा पैसे कमावत असून आर्थिक स्वातंत्र्य नसणारी किंवा मल्टिटास्किंग करताना दमछाक होणारी स्त्री आजूबाजूला सतत का बरं दिसली असती ?

स्त्री नोकरी करत असो वा पूर्णवेळ गृहिणी असो, कुठलीही भूमिका निभावताना तिला ओढाताण न होता ती समाधानाने निभावता येणं, त्या भूमिकेचा काच न वाटणं हे साधायचं असेल तर तर तिच्या आजूबाजूच्या माणसांनी, विशेष करुन तिच्या जोडीदाराने सहजीवनातील आपली जबाबदारी ओळखणं आणि ती वाटून घेणं अतिशय आवश्यक आहे. जोडीदाराची साथ असेल तर बाकीचे अडथळे पार करणे सुकर होते हे नक्की !

आपापली स्वप्नं पूर्ण करत एकमेकांच्या साथीने वाट चालताना आणि 'घर दोघांचं' उभं करताना तिच्या जोडीदाराचा सहभाग आणि पाठिंबा किती आणि कसा असतो हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणं हा ह्या धाग्याचा उद्देश आहे.

ह्या धाग्यावर काय लिहिणे अपेक्षित आहे ? :

हा धागा पुरुषांसाठी आहे. 'मी अमूक अमूक करतो.' अशा प्रकारच्या पोस्ट्स अपेक्षित आहेत.

१.प्रापंचिक जबाबदारीचं ओझं फक्त बायकोच्या खांद्यावर पडू नये म्हणून तुम्ही काळजी घेता का ? घेत असल्यास कशा प्रकारे घेता ? कामांचं स्वरुप लिहू शकाल का ?
२.आपापल्या ध्येयांमागे धावताना नवरा-बायकोंची वर्तुळं छेदतात ती घर आणि घरातील इतर सदस्य, मुलं ह्यांच्यामुळे. ह्यांच्याशी संबंधित असलेली कामं तुम्ही कशाप्रकारे वाटून घेता ?
३.घरातल्या स्त्रीला तिच्या छंदांसाठी वेळ काढता येतो का ? तिला आपले छंद जोपासता यावेत म्हणून तुम्ही कशाप्रकारे प्रयत्न करता?
४.तुमची बायको नोकरी करणारी किंवा गृहिणी ह्यापैकी कुठल्याही भूमिकेत असेल तरी तिला फक्त स्वत:साठी असा थोडा तरी वेळ बाजूला काढण्याची संधी मिळते का ? ती संधी मिळावी म्हणून तुम्ही खास प्रयत्न करता का ? कोणते ?
५.दोघांपैकी एकाला तडजोड करण्याची वेळ येणं हे कधीकधी अपरिहार्य आणि स्वाभाविक असू शकतं. अशावेळी साकल्याने विचार करुन बायकोऐवजी निदान काही काळासाठी ती तडजोड तुम्ही केली असे कधी घडले आहे का ? असेल तर त्याविषयी सांगू शकाल का ? उदा. जागाबदल, कामाच्या स्वरुपात बदल, हाती आलेली संधी सोडणे, बॅकसीट घेणे किंवा पूर्णपणे घरी राहणे, मुलांसंबंधीचे निर्णय किंवा तत्सम तडजोडी.

सगळ्यांनी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्यावी असं नाही पण इतरांना उपयोगी ठरतील अशा गोष्टी आवर्जून शेअर करा. मात्र प्रश्नांची उत्तरं फक्त होकारार्थी किंवा नकारार्थी देऊ नये. उदाहरणे देऊन लिहावे.

आपल्या प्रतिसादांची वाट पाहत आहोत Happy
--------------------------
वरील चारोळी वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल व्यवस्थापनातर्फे श्री. चंद्रशेखर गोखले यांचे मनःपूर्वक आभार.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला अनेक गोष्टींची हौस आहे. त्याला मी बराच वेळ देत असतो. ते तिला विचित्र वाटते. तिला ते विचित्र वाटते ते मला विचित्र वाटते. मग भांडतो, शिकतो, पुढे जातो. 'भांडण हाच खरा गुरू' ह्या मंत्राने वाटचाल करीत आहोत.>>> क्या बात है! लगे रहो!

वाचते आहे...

पेशवा, ते शेवटच्या षटकात १० धावा आणि तेंडुलकर सापडणे - लई आवडलं. माझंही असंच आहे. (आणि अर्थातच, माझ्या नवर्‍याचं तसं अजिबातच नाहीये.)

टण्या, तुझ्याकडून तुझ्या प्रपंचाचे वर्णन ऐकणे एकदम गंमतीचे वाटले Happy पण मस्त लिहिले आहेस. आवर्जून लिहिलेस याबद्दल धन्यवाद Happy

आपण आपल्या संसारासाठी आणि जोडीदारासाठी किती - काही करु शकतो, ते ही फारसा त्रास न घेता हे कळुन येतय इथल्या पोस्टसवरून. It will definitely help...

धन्यवाद मंडळी Happy

पेशवा , चांगले लिहिलेय.
>>एकमेकांच्या कामाच्या पद्धतीवर आधी राग, मग अविष्वास, मग अपरिहार्य स्विकार आणि आता विष्वास आलेला असल्यान>><<

आमचीही गाडी अशीच चाललीय.
(एक(नवरा) अंसयोजनबद्ध असला की दुसर्‍याला बरीच डोकेफोडी करावी लागते..) Happy

भांडत भांडतच शिकतात सगळी जोडपी वाटतं. Happy

>>एकमेकांच्या कामाच्या पद्धतीवर आधी राग, मग अविष्वास, मग अपरिहार्य स्विकार आणि आता विष्वास आलेला असल्यान>><< माझ्या बाबतीत हे 'अपरिहार्य स्वीकार' पातळी पर्यंत पोहोचते आहे!
आम्ही दोघे एकाच व्यवसायात एकाच ठिकाणी काम करीत असल्याने आणि कामाकडे बघण्याची वृत्ती १८० अंश वेगळी असल्याने त्याच्या पद्धतीवरूनचे वाद जास्त तीव्रतेने होतात.

विषय चांगला आहे. वाचत आहे. एक गोष्ट इकडे सांगावीशी वाटते. आपण खूप वेळा असं म्हणतो कि बायकांना हे करावं लागतं ते करावं लागतं ..पण काही काही गोष्टी (काही ठिकाणी )फक्त पुरुष च करताना दिसतात . उदाहरणं द्यायची झाली तर :

१) बल्ब गेला असेल तर तो लावणे.
२) घरी काही ब्लाम्बिंग , electricity etc ची कामं असतील तर बाहेरून कुणाला तरी बोलावून आणणे किंवा त्यांना फोन करणे.
३) घरी इंटरनेट बसवायचा असेल किंवा मॉडेम वगेरे ची काही कामं असतील तर ती करणे.
४) शेअर्स , बँका , होम लोन्स etc ह्या गोष्टी बघणे
इत्यादी ..

अर्थात काही बायका हि कामे करतात पण बहुतेक वेळा हि कामे पुरुष च करताना दिसतात. अशा कामांमध्ये पण "घर दोघांचं" पाहिजे न? तुम्हाला नाही का असं वाटत ?
इकडे हा विषय योग्य नसेल तर काढते पोस्ट .

चमची , महिन्यातुन बल्ब बदलणे , प्लंबिंग , इलेक्ट्रीकल , इंटरनेटची कामं कितीवेळ निघतात , त्यामुळे त्याच आणि घरकामाच अजिबात कंपॅरिजन नाही होऊ शकत.
पेशवा मस्त पोस्ट !

चमची अजिबात न पटलेली पोस्ट

१) बल्ब गेला असेल तर तो लावणे. - माझी १२ वर्षाची लेकसुद्धा बल्ब बदलते.
२) घरी काही ब्लाम्बिंग , electricity etc ची कामं असतील तर बाहेरून कुणाला तरी बोलावून आणणे किंवा त्यांना फोन करणे. - हे करायला नवर्याची किंवा पुरुषाची अजिबात गरज नाही.
३) घरी इंटरनेट बसवायचा असेल किंवा मॉडेम वगेरे ची काही कामं असतील तर ती करणे. - ही कामे मी करत नाही पण योग्य माणसाला बोलावून नकीच करत येतात. मला नाही वाटत नवरेसुद्धा ही कामे करत असतील.
४) शेअर्स , बँका , होम लोन्स etc ह्या गोष्टी बघणे - शेअर्स आणि होम लोन्सची गरज अजून पडली नाही पण बँकेची कामे बायका नकीच करतात.

अर्थात काही बायका हि कामे करतात पण बहुतेक वेळा हि कामे पुरुष च करताना दिसतात. अशा कामांमध्ये पण "घर दोघांचं" पाहिजे न? तुम्हाला नाही का असं वाटत ?>>> असे नकीच वाटते पण उदाहरणे वेगळी द्या.

बल्ब बदलणे हे काम आहे? म्हणजे असे वेळखाऊ, ताण येणारे वगैरे.
घरात जास्तीचे बल्बस ठेवलेले असतात ना? गेला की बदलायला ५ सेकंद पुरे होतात (जास्तीचे बल्ब कुठे ठेवलेत ते सापडण्यासारखे असेल तर!)
त्याचं काय कौतुक?

<< त्याचं काय कौतुक? >> असं कौतुक वाटण्याची या चर्चेत पाळी यावी याचं कारण [अगदीं न राहवून मला सांगावसं वाटतं कीं ] घर आवरणं, स्वैंपाकघरात मदत इ. गोष्टी केवळ प्रतिकात्मक असाव्यात पण त्यालाच 'घर उभं' करण्याचा पायाच समजला जातोय. ह्या गोष्टींतील मदतीमुळे घरातल्या स्त्रीला दिलासा, मोकळीक मिळत असली तरी 'घर उभं' करण्याचा पाया हा कोणत्याही महत्वाच्या बाबतींत आपण याच्या/हिच्या पाठींब्यावर निर्धास्त अवलंबून राहूं शकतो, हा नवरा व बायको यांमधील आत्यंतिक विश्वासच असतो. तो विश्वास असेल तर अशी घरातली मदत हा स्त्रीसाठी 'बोनस' असूं शकतो पण मूलभूत विश्वासाला पर्याय नाही होऊं शकत, असं मला तीव्रतेने वाटतं. असा विश्वास निर्माण करण्याच्या दिशेने झालेल्या प्रयत्नांवर चर्चेत भर असणं अधिक अर्थपूर्ण झालं असतं.

मी नताशा,
चमची यांनी 'काही काही गोष्टी (काही ठिकाणी )' असं म्हटलंय,
म्हणजे त्यांच्या बघण्यात ही कामे करणारे फक्त पुरुषच असतील त्याला त्या तरी काय करणार... Wink

तो विश्वास असेल तर अशी घरातली मदत हा स्त्रीसाठी 'बोनस' असूं शकतो पण मूलभूत विश्वासाला पर्याय नाही होऊं शकत, असं मला तीव्रतेने वाटतं. असा विश्वास निर्माण करण्याच्या दिशेने झालेल्या प्रयत्नांवर चर्चेत भर असणं अधिक अर्थपूर्ण झालं असतं.<<< +१. भाऊकाका, नेमक्या शब्दांत छान सांगितलंत

बहुतेक वेळा हि कामे पुरुष च करताना दिसतात. अशा कामांमध्ये पण "घर दोघांचं" पाहिजे न? तुम्हाला नाही का असं वाटत ?>>> असे नकीच वाटते पण उदाहरणे वेगळी द्या.

नताशा तुम्ही कुठे राहता माहित नाही पण अमेरिकेमध्ये बरेच ठिकाणी वायरलेस router आपला आपणच बसवावा लागतो.
काही ठिकाणी घरी नुसता box पाठवतात. आपण आपला install करायचा असतो.

कार मधले windshield liquid बदलणे. (काही वेळेस ह्याची गरज लागते)
कार servicing करणे.
घरी होम थिएतर बसवणे.
इत्यादी आणि अशा प्रकारची कामे !

बल्ब बदलणे हे काम आहे. त्याचं काय कौतुक? >>>> हे मी जस्ट उदा दिलं होतं .
कोणी असं म्हणालं कि भाजी निवडणं हे काही काम आहे का? त्याचं काय कौतूक ..तर ..

ह्या वर नीट विचार करून बघा.

Pages