चंद्रशेखर गोखले ह्यांच्या 'मी माझा' ह्या प्रसिद्ध संग्रहात एक चारोळी आहे.
'घर दोघांचं असतं
ते दोघांनी सावरायचं
एकाने पसरवलं
तर दुसर्याने आवरायचं'
एक आणि दुसरा आलटून पालटून पसरवणं-आवरणं करत असतील तर खरंच त्यात रेखाटलेलं सहजीवनाचं चित्र रम्य आहे. गोखल्यांच्या प्रत्येक चारोळीबरोबर अनेक प्रति-चारोळ्या येतातच. ही चारोळी वाचल्यावर वाटलं की प्रत्यक्षात मात्र ...
'घर दोघांचं असतं
त्यात दोघांनी वावरायचं
त्याने पसरवलं
तरी तिनेच आवरायचं' असंच चित्र बहुतकरुन दिसतं.
शिक्षण आणि करियर-निवड आपल्या मनाप्रमाणे करणे आजच्या काळात मुलींसाठी तुलनेने सोपे झाले आहे. वयाच्या एका टप्प्यानंतर मात्र मुलीची वाट अजूनही वेगळी होते. त्यातही अधोरेखित करुन सांगायचे तर लग्नानंतर. करियर करायचे की होममेकर व्हायचे की नोकरी आणि ब्रेक आलटून-पालटून की आधीची नोकरी सोडून नवऱ्याबरोबर नवीन जागी स्वत:ला रुजवायची धडपड ... एक ना अनेक पर्याय ! ह्या पर्यायांबद्दल आक्षेप नाही. किंबहुना मुली अतिशय डोळसपणे ह्या पर्यायांना सामोरं जातात. पण पर्यायाची निवड केली की प्रश्न संपतात का ? तर तसे नाही. नाहीतर मग नोकरीत अत्यंत यशस्वी असणारी पण मुलांसाठी वेळ काढू शकत नाही ह्या गिल्टचं ओझं बाळगणारी किंवा घरासाठी खस्ता खाल्ल्या पण आपल्यासाठी वेळ काढायचा राहून गेला, छंद जोपासायचे राहूनच गेले असं म्हणून हळहळणारी किंवा पैसे कमावत असून आर्थिक स्वातंत्र्य नसणारी किंवा मल्टिटास्किंग करताना दमछाक होणारी स्त्री आजूबाजूला सतत का बरं दिसली असती ?
स्त्री नोकरी करत असो वा पूर्णवेळ गृहिणी असो, कुठलीही भूमिका निभावताना तिला ओढाताण न होता ती समाधानाने निभावता येणं, त्या भूमिकेचा काच न वाटणं हे साधायचं असेल तर तर तिच्या आजूबाजूच्या माणसांनी, विशेष करुन तिच्या जोडीदाराने सहजीवनातील आपली जबाबदारी ओळखणं आणि ती वाटून घेणं अतिशय आवश्यक आहे. जोडीदाराची साथ असेल तर बाकीचे अडथळे पार करणे सुकर होते हे नक्की !
आपापली स्वप्नं पूर्ण करत एकमेकांच्या साथीने वाट चालताना आणि 'घर दोघांचं' उभं करताना तिच्या जोडीदाराचा सहभाग आणि पाठिंबा किती आणि कसा असतो हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणं हा ह्या धाग्याचा उद्देश आहे.
ह्या धाग्यावर काय लिहिणे अपेक्षित आहे ? :
हा धागा पुरुषांसाठी आहे. 'मी अमूक अमूक करतो.' अशा प्रकारच्या पोस्ट्स अपेक्षित आहेत.
१.प्रापंचिक जबाबदारीचं ओझं फक्त बायकोच्या खांद्यावर पडू नये म्हणून तुम्ही काळजी घेता का ? घेत असल्यास कशा प्रकारे घेता ? कामांचं स्वरुप लिहू शकाल का ?
२.आपापल्या ध्येयांमागे धावताना नवरा-बायकोंची वर्तुळं छेदतात ती घर आणि घरातील इतर सदस्य, मुलं ह्यांच्यामुळे. ह्यांच्याशी संबंधित असलेली कामं तुम्ही कशाप्रकारे वाटून घेता ?
३.घरातल्या स्त्रीला तिच्या छंदांसाठी वेळ काढता येतो का ? तिला आपले छंद जोपासता यावेत म्हणून तुम्ही कशाप्रकारे प्रयत्न करता?
४.तुमची बायको नोकरी करणारी किंवा गृहिणी ह्यापैकी कुठल्याही भूमिकेत असेल तरी तिला फक्त स्वत:साठी असा थोडा तरी वेळ बाजूला काढण्याची संधी मिळते का ? ती संधी मिळावी म्हणून तुम्ही खास प्रयत्न करता का ? कोणते ?
५.दोघांपैकी एकाला तडजोड करण्याची वेळ येणं हे कधीकधी अपरिहार्य आणि स्वाभाविक असू शकतं. अशावेळी साकल्याने विचार करुन बायकोऐवजी निदान काही काळासाठी ती तडजोड तुम्ही केली असे कधी घडले आहे का ? असेल तर त्याविषयी सांगू शकाल का ? उदा. जागाबदल, कामाच्या स्वरुपात बदल, हाती आलेली संधी सोडणे, बॅकसीट घेणे किंवा पूर्णपणे घरी राहणे, मुलांसंबंधीचे निर्णय किंवा तत्सम तडजोडी.
सगळ्यांनी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्यावी असं नाही पण इतरांना उपयोगी ठरतील अशा गोष्टी आवर्जून शेअर करा. मात्र प्रश्नांची उत्तरं फक्त होकारार्थी किंवा नकारार्थी देऊ नये. उदाहरणे देऊन लिहावे.
आपल्या प्रतिसादांची वाट पाहत आहोत
--------------------------
वरील चारोळी वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल व्यवस्थापनातर्फे श्री. चंद्रशेखर गोखले यांचे मनःपूर्वक आभार.
भाऊंची पोस्ट परफेक्ट. शेअर्स
भाऊंची पोस्ट परफेक्ट.
शेअर्स , बँका , होम लोन्स etc ह्या गोष्टी बघणे >>> त्यातल्या त्यात हा मुद्दा जरासा विचार करण्याजोगा आहे.
बल्ब बदलणे हे तसं किरकोळ काम.. पण माझ्या एका मैत्रिणीचा नवरा कामानिमित्त ६ महिन्यांसाठी परराज्यात जायचा होता, तेव्हा तिला अशा कामांचंही टेन्शन आलं होतं.
थोडक्यात हे सापेक्ष आहे.
थोडक्यात हे सापेक्ष आहे.>>
थोडक्यात हे सापेक्ष आहे.>> याला अनुमोदन!
एखादे काम मला सोपे वाटेल, तेच दुसर्या/री ला महाअवघड वाटु शकते.
<< शेअर्स , बँका , होम लोन्स
<< शेअर्स , बँका , होम लोन्स etc ह्या गोष्टी बघणे >>>या क्षेत्रातल्या अनुभवामुळे हीं कामं करायला मीं अधिक सक्षम असूनही, माझी बायकोच उत्साहाने, आवडीने व पद्धतशीरपणे हीं कामं आज कित्येक वर्षं करते आहे. [माझ्या वेंधळेपणावरचा तिचा गाढा विश्वास हें त्याचं कारण नसावं, हा आपला माझा गोड गैरसमज !
]. म्हणून, याबाबतीतही 'जनरलायझेशन' करणं योग्य नसावं.
बल्ब बदलणे, वायर्ड आणि
बल्ब बदलणे, वायर्ड आणि वायरलेस राऊटर आणि मग कनेक्शन आणि पीसी चा मेंटेनन्स, गरजेनुसार प्लंबर/ टेक्निशिअन बोलावणे, माझी दुचाकी मेंटेन करणे (कधीकधी इन्शुरन्स/ पीयुसीची आठवण वगैरे करून देतात साबु), गरज पडली तेव्हा पीएफ/ बँक/ आधार कार्ड/ पॅन कार्ड/ अन्य काही सरकारी हापिसात जाऊन करायची कामं वगैरेसाठी चकरा मारणे हे मीच केलं! आणि त्यात विशेष काही नाही वाटलं.
(अवांतरः अजून कर्ज/ शेअर्स आणि आर्थिक व्यवहारात पडले नाहिये, अभ्यासातून मोकळीक मिळाली की तेही करायचं आहे! ती सगळी बाजू माझा नवरा आणि साबा-साबु भक्कमपणे पेलतायत म्हणून मी निर्वेधपणे शिकतेय!)
बल्ब बदलणे - कामाचा वेळ ५
बल्ब बदलणे - कामाचा वेळ ५ सेकंद - कौशल्य पातळी: काहीच नाही.
भाजी निवडणे - कामाचा वेळ अर्धा ते एक तास (भाजीचा प्रकार आणि क्वांटिंटीवर अवलंबून) - कौशल्य पातळी: ठेवायचे कुठले आणि टाकायचे कुठले माहित असायला हवे.
तस्मात दोन्ही उदाहरणे समान नाहीत. पण आयुष्यात कधीच कुठलंच काम न केलेल्याला बल्ब बदलणे हे काम वाटू शकते.
शेअर्स , बँका , होम लोन्स etc
शेअर्स , बँका , होम लोन्स etc ह्या गोष्टी बघणे >>> त्यातल्या त्यात हा मुद्दा जरासा विचार करण्याजोगा आहे>>>
लले माझ्या "इन्व्हेस्ट्मेंट अवेअरनेस फॉर वुमेन " च्या लेक्चरला ये पाहू......
( जस्ट जोकिंग)
हा मुद्दा पण सापेक्ष आहे....
कुठलेही काम न येणं असे
कुठलेही काम न येणं असे नसतेच.. तीनच कारणे असतात,
गरज नसणे= इतर माणसं सांभाळायला आहेत म्हणून
आवड नसणे = म्हणून प्रयत्न केलाच जात नाही.
आळशीपणा = शंभर कारणे देवू शकतो आळशी माणूस जशी मला उरक नाही , समज नाही,तुलाच छान जमते अशी कारणे असतात..
इतर कितीही शंभर कारणे कोणीही दिली तरी ती लागू होत नाहीत धडधाकट माणसाला.(बाईमाणूस/पुरुषमाणूस(आयडी नाही))
इथे आपापली कामं करावीच लागतात.( एकटे असताना/रहाताना झक मारत करावी लागतातच...)
कुटुंबव्यवस्था ही जगभरातील
कुटुंबव्यवस्था ही जगभरातील बहुतांशी संस्कृतींत खोलवर रुजलेली गोष्ट आहे. त्यामुळे स्त्री सक्षमीकरण करताना तिचे प्रबोधन करणे जितके आवश्यक आहे तितकेच कुटुंबाचेही प्रबोधन आवश्यक आहे. प्रवाहाविरुद्ध पोहण्यात जी शक्ती खर्ची पडते ती वाचवणे हे उद्दिष्ट अनावश्यक म्हणता येणार नाही. त्यादृष्टीने कळत वा नकळत कुटुंबातील स्त्रीला जरुरीपेक्षा जास्त गृहित धरले जाऊ नये ह्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक वाटते. ह्या प्रयत्नांचा एक छोटासा भाग म्हणून ’घर दोघांचे’ हा उपक्रम राबवण्यात आला. कुटुंब ही संकल्पना फक्त जोडीदारापुरतीच सिमित नाही ह्याची आम्हाला कल्पना आहे पण दोन व्यक्तींनी एकत्र येऊन सहजीवन जगण्याचा निर्णय घेणे ह्यातून एका कुटुंबाची सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे ह्या एकाच पैलूवर लक्ष केंद्रित करावे आणि विषयाची व्याप्ती मर्यादित ठेवावी असा विचार व्यवस्थापनाने केला.
उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. इथे मांडल्या गेलेल्या सकारात्मक प्रतिसादांमुळे आपल्या जाणीवा विकसित व्हायला मदत होईल ह्याची खात्री वाटते
-संयुक्ता व्यवस्थापन
संयोजक_संयुक्ता | 15 March,
संयोजक_संयुक्ता | 15 March, 2013 - 15:20 नवीन<<<
हा प्रतिसाद आवडला
पेशवे, छान पोस्ट! >>भाऊंची
पेशवे, छान पोस्ट!
>>भाऊंची पोस्ट परफेक्ट.>> +१
धागा बराच मोठा आहे
धागा बराच मोठा आहे (प्रतिसादांसह) तो संपूर्ण वाचणे शक्य नाही परंतू माझा घरकामातील सहभाग थोडक्यात देत आहे
१. सकाळी पावणेसहाला सर्वात आधी उठणे व फ्रीजमधून भाजी आणि चपातीचे पीठ काढणे.
२. नंतर पत्नीला उठवणे आणि आंघोळीआधीचे विधी आवरणे.
३. साधारण सव्वासहाला थोरल्या मुलाचे शाळेचे कपडे इस्त्री करायला घेणे.
४. थोरल्या मुलाचे दप्तर भरणे.
५. साडेसहाला थोरल्या मुलाला उठवून नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर बसवणे.
६. त्याचा नाश्ता होईपर्यंत दाढी करणे.
७. थोरल्या मुलाला आंघोळ घालणे
८. त्याचे कपडे करून होईस्तोवर स्वत:ची आंघोळ आवरून त्याला व्हॅनमधे सोडायला जाणे.
९. आल्यानंतर माझा डबा भरून घेणे
१०. भाजीपाला आणणे. कधी मधी एखादी भाजी करणे आणि डाळ फोडणी घालणे. दररोज चपात्या भाजून घेणे.
११ रात्रीच्या जेवणाची भांडी हॉलमधे आणणे, व जेवण झाल्यावर परत नेऊन ठेवणे.
वगैरे वगैरे
शिवाय आमचे द्वितीय चिरंजीव अकरा महिन्यांचे असल्याकारणाने ही तारेवरची कसरत करण्याकरीता लागेल तो सर्व सहभाग पत्नीला संपूर्णपणे देणे ही एक अनप्लॅन्ड अॅक्टीव्हीटी आहेच(ह्यात त्याची अंगडी टोपडी बदलण्यापासून ते शी/शू काढण्यापर्यंतच्या सर्व कार्यांचा सहभाग आहे).
असो, धागा एकदम उत्तम. विशेषतः पुरूषांकरीता अनेक गोष्टी नकळत विचार करायला लावणार्या.
धन्यवाद!
छान धागा आहे.
छान धागा आहे.
संयोजकांचा प्रतिसाद आवाडला
संयोजकांचा प्रतिसाद आवाडला !
विदिपा तुमच्या पोस्टची वाट पाहत होतो. आपण पुर्वी गगोवर यावर बोललो आहेच.
Pages