'घर दोघांचं'

Submitted by संयोजक_संयुक्ता on 7 March, 2013 - 23:17

ghar doghaanche2_0.jpg

चंद्रशेखर गोखले ह्यांच्या 'मी माझा' ह्या प्रसिद्ध संग्रहात एक चारोळी आहे.
'घर दोघांचं असतं
ते दोघांनी सावरायचं
एकाने पसरवलं
तर दुसर्‍याने आवरायचं
'
एक आणि दुसरा आलटून पालटून पसरवणं-आवरणं करत असतील तर खरंच त्यात रेखाटलेलं सहजीवनाचं चित्र रम्य आहे. गोखल्यांच्या प्रत्येक चारोळीबरोबर अनेक प्रति-चारोळ्या येतातच. ही चारोळी वाचल्यावर वाटलं की प्रत्यक्षात मात्र ...
'घर दोघांचं असतं
त्यात दोघांनी वावरायचं
त्याने पसरवलं
तरी तिनेच आवरायचं
' असंच चित्र बहुतकरुन दिसतं.

शिक्षण आणि करियर-निवड आपल्या मनाप्रमाणे करणे आजच्या काळात मुलींसाठी तुलनेने सोपे झाले आहे. वयाच्या एका टप्प्यानंतर मात्र मुलीची वाट अजूनही वेगळी होते. त्यातही अधोरेखित करुन सांगायचे तर लग्नानंतर. करियर करायचे की होममेकर व्हायचे की नोकरी आणि ब्रेक आलटून-पालटून की आधीची नोकरी सोडून नवऱ्याबरोबर नवीन जागी स्वत:ला रुजवायची धडपड ... एक ना अनेक पर्याय ! ह्या पर्यायांबद्दल आक्षेप नाही. किंबहुना मुली अतिशय डोळसपणे ह्या पर्यायांना सामोरं जातात. पण पर्यायाची निवड केली की प्रश्न संपतात का ? तर तसे नाही. नाहीतर मग नोकरीत अत्यंत यशस्वी असणारी पण मुलांसाठी वेळ काढू शकत नाही ह्या गिल्टचं ओझं बाळगणारी किंवा घरासाठी खस्ता खाल्ल्या पण आपल्यासाठी वेळ काढायचा राहून गेला, छंद जोपासायचे राहूनच गेले असं म्हणून हळहळणारी किंवा पैसे कमावत असून आर्थिक स्वातंत्र्य नसणारी किंवा मल्टिटास्किंग करताना दमछाक होणारी स्त्री आजूबाजूला सतत का बरं दिसली असती ?

स्त्री नोकरी करत असो वा पूर्णवेळ गृहिणी असो, कुठलीही भूमिका निभावताना तिला ओढाताण न होता ती समाधानाने निभावता येणं, त्या भूमिकेचा काच न वाटणं हे साधायचं असेल तर तर तिच्या आजूबाजूच्या माणसांनी, विशेष करुन तिच्या जोडीदाराने सहजीवनातील आपली जबाबदारी ओळखणं आणि ती वाटून घेणं अतिशय आवश्यक आहे. जोडीदाराची साथ असेल तर बाकीचे अडथळे पार करणे सुकर होते हे नक्की !

आपापली स्वप्नं पूर्ण करत एकमेकांच्या साथीने वाट चालताना आणि 'घर दोघांचं' उभं करताना तिच्या जोडीदाराचा सहभाग आणि पाठिंबा किती आणि कसा असतो हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणं हा ह्या धाग्याचा उद्देश आहे.

ह्या धाग्यावर काय लिहिणे अपेक्षित आहे ? :

हा धागा पुरुषांसाठी आहे. 'मी अमूक अमूक करतो.' अशा प्रकारच्या पोस्ट्स अपेक्षित आहेत.

१.प्रापंचिक जबाबदारीचं ओझं फक्त बायकोच्या खांद्यावर पडू नये म्हणून तुम्ही काळजी घेता का ? घेत असल्यास कशा प्रकारे घेता ? कामांचं स्वरुप लिहू शकाल का ?
२.आपापल्या ध्येयांमागे धावताना नवरा-बायकोंची वर्तुळं छेदतात ती घर आणि घरातील इतर सदस्य, मुलं ह्यांच्यामुळे. ह्यांच्याशी संबंधित असलेली कामं तुम्ही कशाप्रकारे वाटून घेता ?
३.घरातल्या स्त्रीला तिच्या छंदांसाठी वेळ काढता येतो का ? तिला आपले छंद जोपासता यावेत म्हणून तुम्ही कशाप्रकारे प्रयत्न करता?
४.तुमची बायको नोकरी करणारी किंवा गृहिणी ह्यापैकी कुठल्याही भूमिकेत असेल तरी तिला फक्त स्वत:साठी असा थोडा तरी वेळ बाजूला काढण्याची संधी मिळते का ? ती संधी मिळावी म्हणून तुम्ही खास प्रयत्न करता का ? कोणते ?
५.दोघांपैकी एकाला तडजोड करण्याची वेळ येणं हे कधीकधी अपरिहार्य आणि स्वाभाविक असू शकतं. अशावेळी साकल्याने विचार करुन बायकोऐवजी निदान काही काळासाठी ती तडजोड तुम्ही केली असे कधी घडले आहे का ? असेल तर त्याविषयी सांगू शकाल का ? उदा. जागाबदल, कामाच्या स्वरुपात बदल, हाती आलेली संधी सोडणे, बॅकसीट घेणे किंवा पूर्णपणे घरी राहणे, मुलांसंबंधीचे निर्णय किंवा तत्सम तडजोडी.

सगळ्यांनी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्यावी असं नाही पण इतरांना उपयोगी ठरतील अशा गोष्टी आवर्जून शेअर करा. मात्र प्रश्नांची उत्तरं फक्त होकारार्थी किंवा नकारार्थी देऊ नये. उदाहरणे देऊन लिहावे.

आपल्या प्रतिसादांची वाट पाहत आहोत Happy
--------------------------
वरील चारोळी वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल व्यवस्थापनातर्फे श्री. चंद्रशेखर गोखले यांचे मनःपूर्वक आभार.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा "आपले घर" असे आपण म्हटले की आपल्याला जमेल तेवढे आपण करत जावे. आपल्या घरासाठी कुठलेही काम करताना लाज वाटायला नको किंवा आपण काय ओझी उचलत आहोत ही भावनाही असता कामा नये. मी जे करतो आहे/करते आहे हे माझे नियमित कामच आहे हे एकदा पक्के मनात बसले की मग आपण जे काय करतो त्याचे श्रम जाणवत नाहीत आणि कामात मजा येते.>> वेल सेड.

केदार जाधव, मुक्तेश्वर, विशाल आणि मनस्मी- मस्त लिहिले आहे. तुम्हाला शुभेच्छा. हे वाचून अजून माबोकर पुरुष लिहीतील ते वाचायलाही आवडेल. हा धागा वाचून एखाद्याचे 'मी काही करत नव्हतो आजपर्यंत, पण यापुढे जमेल तेवढी मदत करीन' इतके परिवर्तन जरी झाले तर या उपक्रमाचे हे खरे यश होईल!

(प्रतिसादाला थोडा विनोदी बाज देण्याच्या प्रयत्नात मदतीऐवजी जबरदस्तीने काम करताय अशी शंका येते. पण ते तसे नाही याची खात्री आहे ) >>>> जबरदस्तीने अजिबात नाही करत. हि नसली तर आईला सुद्धा मदत करतोच. तसा लहानपणा पासुन सराव झाला. घरात सोवळे-ओवळे फार. आई-बाबा दोघेही कामा निमित्त बाहेर पडायची. त्यामुळे हे कर, ते कर चालुच असायचे . लग्ना नंतरही चालुच आहे. आई-बाबा दोघेही बाहेर गेल्यावर तर हातभार द्यावा लगेलच ना? .
सर्वांचे आभार. आणि महिला दिनाच्या शुभेच्छा ! (ज्या सुरुवातीला द्यायच्या राहील्यात.)

भारती, तुमच्या पिताजींना सलाम.
केदार, मुक्तेश्वर, विशाल तुमचे कृतीशील विचार आणि सहभाग आवडला.

मुल लहान होती तेंव्हा सकाळी आमच्या मंडळी शाळेत शिकवायला जात असत. त्यावेळेस मुलांना सकाळी उठवून सर्व सोपस्कार करून शाळेत पाठवण्याचे कार्य तेव्हढे केले आहे. (बाबा क्रिकेट खेळता खेळता दूध देतात नाहीतर तू, असे आईला ऐकवून झालेले आहे). मला हल्ली खर म्हणजे घरी काही काम करण्याची वेळच येत नाही. बाकी मुख्य काम म्हणजे "चालक".

वेळ आल्यास आपल्या सासरच्यांची जबाबदारी घेणे ही एक आजकाल अतिशय महत्वाची गोष्ट झाली आहे याचे पुरूष वर्गाने भान ठेवावे येवढेच मी म्हणेन.

व्वा! मस्त धागा. या संकल्पनेसाठी संयोजकांचं खास कौतुक. Happy
विकु, केदार, मनस्मि, मुक्तश्वर कुलकर्णी तुमच्या पोस्टी आवडल्या. खासकरून प्रामाणिकपणा आवडला.
Happy अजून पोस्टस येऊ द्या...

भारती अतिशय हृद्य पोस्ट. तुमच्या बाबांना सलाम.
हा धागा वाचून एखाद्याचे 'मी काही करत नव्हतो आजपर्यंत, पण यापुढे जमेल तेवढी मदत करीन' इतके परिवर्तन जरी झाले तर या उपक्रमाचे हे खरे यश होईल.>>>>पौर्णिमा+१००००००! Happy

स्वतःचा घरातील सहभाग वा घरातील पुरुषवर्गाचा सहभाग याबद्दलच्या पोस्ट खुप चांगल्या वाटल्या.
खरेच यापासुन कोणी स्फुर्ती घेतली तर ते कित्ती चांगले होईल. मला वाटते सं_व्य चाही हाच हेतु असावा. Happy

छान धागा..

केदार व मुक्तेश्वर कुलकर्णी तुमचि पोस्ट आवडली.

.सगळ्या स्त्रीवर्गाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

विकु, केदार, मनस्मि, मुक्तेश्वर कुलकर्णी - सुरेख लिहिलंय, प्रामाणिकपणा भावला...

भारती अतिशय हृद्य पोस्ट. तुमच्या बाबांना सलाम. >>> +१०००...

या संकल्पनेसाठी संयोजकांचं खास कौतुक >>>> +१००..

हा धागा वाचून एखाद्याचे 'मी काही करत नव्हतो आजपर्यंत, पण यापुढे जमेल तेवढी मदत करीन' इतके परिवर्तन जरी झाले तर या उपक्रमाचे हे खरे यश होईल! >>> पौर्णिमा +१०००..

छान आहेत प्रतिसाद सर्वांचे.
भारती अतिशय हृद्य पोस्ट. तुमच्या बाबांना सलाम. >+१

फारच मस्त संकल्पना!!! सर्व पुरुष आयडी लिहिते झाले तर उत्तमच. Happy

मनस्मी, विशाल कुलकर्णी , मुक्तेश्वर आणि केदार जाधव ह्यांच्या पोस्ट्स आवडल्या.

संयोजक, मस्त संकल्पना!
विशाल, केदार , मनस्मि, मुक्तेश्वर कुलकर्णी, पोस्ट्स आवडल्या.
भारती, तुमच्या बाबांना नमस्कार.

संकल्पना आवडली.

विशाल आणि manasmi18 यांच्या पोस्टी फार आवडल्या.

पूनमच्या पोस्टीला अनुमोदन. हे वाचून 'मी असं करत नव्हतो, करायला हवं' एवढी उपरती झाली तरी धाग्याचा उद्देश सफल होईल.

'घरकामात, मुलं वाढवण्यात, मी बायकोला 'मदत' करतो' असं वाटून/ असून उपयोग नाही.

संपदा +१
विशाल आणि manasmi18 यांच्या पोस्टी फार आवडल्या.
विशाल, तू केलेली कविता पण आवडली..

हे वाचून 'मी असं करत नव्हतो, करायला हवं' एवढी उपरती झाली तरी धाग्याचा उद्देश सफल होईल.>>> +११११

केदार जाधव, मुक्तेश्वर, विशाल आणि मनस्मी............सर्वांच्या पोस्ट आवडल्या. अगदी प्रामाणिक पोस्टस!
छान धागा. इतरांच्याही पोस्टसची वाट पहाते!

विकु, केदार, मनस्मि, मुक्तेश्वर कुलकर्णी - पोस्ट्स आवडल्या. प्रामाणिकपणे लिहिले आहे ते जास्त आवडले.
पौर्णिमाला अनुमोदन. Happy

आत्ता रात्री उशिरा आल्यावर हा धागा पाहिला. केदार जाधवांचं विशेष अभिनंदन करावंसं वाटलं.

शक्यतो अशा धाग्यांवर किंवा एकंदरच ऑनलाईन किंवा मुद्रीत लेखांमधे काय लिहीलं तर बरं दिसेल हा विचार करून केलेलं लिखाण असावं असं वाटतं. आपण जे जगतो तेच लिहीणं हा प्रामाणिकपणा केदारच्या पोस्टमधे आढळल्यानं अभिनंदन करावंसं वाटलं. संयोजकांनाही या उपक्रमात हेच अभिप्रेत असावं, ज्यामुळं नेमका फीडबॅक मिळण्यास मदत होईल.

ह्या धाग्याचा उद्देश लोकांना म्हणजे एस्पेशली पुरुष मंडळीना एन्करेज करणे आहे असं गृहीत धरुन लिहिते आहे. माझे बाबा आणि माझा नवरा माबो मेंबर नाहीत आणी होण्याची शक्यता पण नाही म्हणून मीच त्यांची कामं लिहिण्याचं काम करते.

बाबा सकाळी पाणी भरण्यापासून, कचरा दाराबहेर ठेवणे, चहा करणे, शीरा/पोहे/अंडाभुरजी असे नाष्टे बनवणे, आमट्या उसळी करणे, कपडे मशिन मध्ये धुवायला लावणे अशी सर्व कामं करतात. पूर्वी पण करायचे पण गेली १० वर्षं जास्ती करतात.
ते स्वतःचं ज्या बाबतीत यथास्थित कौतुक करून घेतात आणि आम्ही वैतागतो पण ती गोष्ट महत्वाची आहे. स्वैपाकघरात कोणताही पदार्थ केला की नंतर भांडी धून विसळून जागेवर गेली म्हनजेच काम पूर्ण झालं असाही त्यांचा खाक्या आहे.
आत्ता इथे कोणी चहा केला होता हे तुला खरं तरी वाटेल का? असं अगदी आवर्जून रोज विचारतात Happy

नवरा आणी मी कामं एकामेकांवर ढकलून काही उपयोग होत नाही हे लक्शात येताच ती झक मारत करतोच. मी स्वैपाक करते, तो भांडी घासतो, डिश वॉशर लावतो, टॉयलेट घासतो(हे काम मी फार्फार क्वचित करते). घर आवरतो. टेबल पुसतो. धाकलीला आंघोळीला मदत करतो. थोरलीचा अभ्यास घेतो,
बिलं भरतो, पोरींना निरनिराळ्या क्लासेसवरुन आणण्यापोचवण्याची असाइअन केलेली ड्युटी करतो.

बाबा/नवरा हे कधीच हे बायकोचं काम आहे पण मी ते करतो आहे अशी भुमिका घेत नाहीत.

Pages