गावांच्या नावाचा इतिहास

Submitted by कुमार१ on 5 March, 2013 - 04:54

गावांच्या नावांचा इतिहास वा व्युत्पत्ती इथे लिहावी.जगातील कुठलीही गावे चालतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला धागा. आमचे गाव फार काही मोठे नाही पण त्या आडनावांच्या धाग्यावर नंतर लिहिते म्हणता लिहायचे राहूनच गेले तसे इथे नको व्हायला म्हणून इथे लगेच लिहिते आहे.

आमचे गाव- श्रीरामपूर. अहमदनगर जिल्ह्यात आहे.

माझ्या माहितीप्रमाणे- तिथे आधी (बहुतेक ब्रिटिशांच्या काळात) ट्रेन स्टेशन झाले. जवळचे गाव म्हणून स्टेशनला बेलापूर नाव दिले होते. अजून सुद्धा कागदोपत्री 'बेलापूर' नाव आहे. स्टेशनच्या आजुबाजुला वस्ती वाढली. गाव म्हणता येइल एवढे मोठे झाले तेव्हा गावात एक काळा राम आणि एक नुसताच राम अशी दोन श्रीरामांची मंदिरे म्हणून 'श्रीरामपूर' नाव पडले.

"सोलापूर" : १६ लहान गावांचे मिळून झालेले म्हणून. ही माहिती सोलापूर रेल्वे स्टेशन्च्या प्रवेशद्वारावरच आहे.
'विजापूर' ; 'विज यपूर' पासून अपभ्रंश. ( विजय मिळवलेले गाव). दुर्दैवाने ब्रिटीशांनी ( चु भु दे घे ) त्याला 'बिजापूर' केले. सर्वात कडी म्हणजे रेल्वेच्या हिंदीतील पाटीवर तर 'बीजापुर' असे लिहीलेले आहे. स ध्या विजापूरला ज्या आधुनिक ४० सिटी बसेस देण्यात आल्या आहेत त्यांवर अभिमा नाने 'The city of Victory' असे लिहीले आहे.

बेलापुर तस मोठ बाजाराच गाव होत आणि आहे पण. त्याच्या स्टेशनच्या आजुबाजुला वसलेल श्रीरामपुर. माझ आजोळ .खाजगी साखर कारखानदारीमुळ (६०-७० सालात)त्या रेल्वे स्टेशनला खुप महत्व होत. आशियातला पहिला सहकारी साखर कारखानापण तेथुन जवळच (२०-३० किलोमीटरवर) आहे.
अहमद्नगर : अहमद शहाने वसवलेल गाव म्हनुन अहमदनगर. पुर्ण अहमदनगर नाव घेताना दम लागतो म्हनुन सगळे फक्त नगर म्हणतात.आमच गाव.
संगमनेर : ईथ ३ नद्यांचा संगम होतो म्हनुन संगमनेर. प्रवरा , म्हाळुंगी आणि तिसर्‍या नदीच नाव आठवत नाही.

सिंडरेला अहमदनगर हा जिल्हा आहे आणि श्रीरामपुर तालुका >>> अहमदनगर तालुका चुकून लिहिलं होतं. दुरुस्त केलं आहे.

>>मग कोल्हापूरचीही व्युत्पत्ती सांगा. कोल्हे होते काय पूर्वी तिथे?
कोल्हासूर नावाचा दैत्य होता म्हणे.

पुण्याच्या नावामागचं कारण माहित नाही महेश. इ.स. च्या ८व्या शतकापासून पुण्यकविषय असा या परिसराचा उल्लेख मिळतो. त्या पुण्यक चं पुणं झालं. पण ते नाव मुळात कसं आलं ते ज्ञात नाही

अरे.. इचलकरंजी बद्द्ल माहीत नव्ह्तं.. आम्ही कॉलेज मधे 'इची' हा शॉर्ट्फॉर्म केला होता उगाचच..
माझं गाव - जयसिंगपुर - कोल्हापुरच्या शाहु महाराजांनी वसवलं.. नि त्याला वडिलांच नाव दिले 'जयसिंग' म्हणुन 'जयसिंगपुर'

माझं गाव-- पुणे
पुणे या नावाचा स्पष्ट उल्लेख शहाजीपूर्वी क्वचित आढळतो.आणि जो आढळतो तो पुणे या नावाने नव्हे, तर "पुण्यविषय", "पूनकविषय", "पुणक" या नावाने, आणि तोही ताम्रपटातून. राष्ट्रकूट राजांच्या राजवटीत दानादाखल दिलेले जे दोन ताम्रपट उपलब्ध झाले, त्यात पुणे नावाचा उल्लेख नाही. पण पुण्यविषय, - पूनकविषय -- म्हणजे पुण्याची पंचक्रोशी असा स्पष्ट उल्लेख आहे. पुण्यविषय - पुणक- पुणे असा तो अपभ्रंश असावा.
औरंगजेबाचा एक नातू , मुहिउलमिलत(कामबक्षाचा मुलगा), १७०३ साली पुण्यात वारला. त्याची आठवण म्हणून पुण्याचं नाव "मुहियाबाद" असं ठेवलं गेलं. पण औरंगजेबाच्या पश्चात ते पुसलं गेलं.
(वरील ज्ञानकण म. श्री. दिक्षीत यांच्या 'असे होते पुणे' या पुस्तकातून वेचले आहेत.)

एक विचार---- " मुहियाबादच्या पाट्यांवर" काय बरं लिहीलं गेलं असतं?

""पाट्यांवर"">>>>>>>>>>>>>>>>
जरा उशीरा समजले पण् समजले
अतीशय मार्मिक प्रश्न !!
Lol

माझे गाव 'कोल्हापूर'.

पौराणिक संदर्भ द्यायचा झाल्यास कोल्हासूर नामक एका दैत्याने या भागात आपले वर्चस्व दाखविले होते. त्याच्या कारवायांने त्रस्त झालेल्या प्रजेने [नेहमीप्रमाणे] देवाचा धावा केला आणि मग उच्चपदस्थ देवांनी त्या कार्यासाठी नियुक्त केलेल्या अंबाबाईने कोल्हासूराचा युद्धात पराभव केला. मरणोन्मुख पडलेल्या कोल्हासुराने प्रजेची आणि अर्थातच अंबाबाईकडे क्षमायाचना केली आणि पुढील जन्मीही अंबाबाईच्या सेवेत आयुष्य व्यतीत करण्याची इच्छा प्रकट केल्यावर देवीने त्या शहरास त्याच्या स्मरणार्थ 'कोल्हापूर' असेच नाव दिले....[कारण शहराची उभारणी त्याने केली होती म्हणूनही...].

अर्थात "पुराणातील वानगी पुराणात" या न्यायाने अशा कथांकडे गांभिर्याने पाहाण्यात अर्थ नसतो. इतिहास काय होता, उत्खननात काय सापडले हे पाहणेही तितकेच गरजेचे असते. त्या दृष्टीने पाहिल्यास असे दिसते की इ.स.पूर्व १ ल्या शतकापासून ते इ.स. ९ व्या शतकापर्यत ऐतिहासिक कालखंडात कोल्हापूर येथील वसाहत आजच्या ब्रह्यपुरीच्या टेकडीवर होती. ब्रह्यपुरीच्या टेकडातील अवशेषांचे अन्वेषण व उत्खनन असे दर्शविते की, सातवाहन काळात या परीसरात समृध्द व सुसंस्कृत लोकसमुदाय वस्ती करून रहात होता. वाकाटक,कदंब,शेद्रक व मौर्य तसेच बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता येथे प्रभावी होती. इ.स.६३४ मध्ये या घराण्यातील राजा कर्णदेव याने महालक्ष्मी मंदिराच्या उभारणीस प्रारंभ केला. बहुतेक सर्व चालुक्य सम्राट कोल्हापूरास ‘दक्षिण काशी' व ‘महातीर्थ' संबोधितात.
इ.स.च्या ९ व्या शतकात महालक्ष्मी मंदिराची स्थापना झाली. त्यामुळे हे स्थान एका प्रबळ सांस्कृतिक व आर्थिक केंद्रबिंदूत बांधले गेले.

कोल्हापूर या स्थल नामाचा "करवीर" म्हणूनही उल्लेख सापडतो. महालक्ष्मीने आपल्या शुभदायक करांनी या नगरीला प्रलयकाळाच्या संकटातून सुरक्षित उचलेले म्हणून त्यांस‘ करवीर ’असे सार्थपणे संबोधिले जाते. ही व्युत्पत्ती ब्रिटिश पुरातत्व खात्याने सूचित केलेली आहे, तर महालक्ष्मी देवीने आपल्या हाताने उचलून धरले ते ‘करवीरनगर’ असा उल्लेख ‘करवीर महात्म्या’ त आढलते. अर्थात 'अंबाबाई' म्हणजेच "महालक्ष्मी' मुळे या शहराचा 'करवीर' असाही उल्लेख आजही प्रचलित आहे. तत्पुर्वी कोल्लापुर,कोल्लपुर,कोल्लगिरी,कोल्लादिगिरीपट्टण अशी नावे प्रचिलत होती. प्राकृतात 'कोल्ल' म्हणजे दरी व द-यांचे गाव म्हणजे कोल्हापुर, अशीही एक व्युत्पत्ती मानली जाते..... पण याला ठोस असा लिखित पुरावा नसल्याने सर्वत्र महालक्ष्मीने प्रथम पराभूत करून नंतर 'नावा' साठी आशीर्वाद दिलेल्या कोल्हासूराच्या स्मृतीत गुंफलेले ते 'कोल्हापूर' अशीच व्याख्या सर्वसामान्य जनतेने स्वीकारली आहे.

अशोक पाटील

मामाश्री लै भारी.
तुमच्याकडे खजिनाच आहे. Happy

इचलकरंजी आणि जयसिंगपुर पहिल्यांदाच कळालं.
आता सांगलीची माहिती येवुदेत.

'केम' हे गाव पुणे-सोलापूर रस्त्यावर आहे. हे नाव 'क्षेम' चा अप. आहे. क्षेम या राजाचा मोठा रोग या गावी येउन राहिल्याने व येथील पाणी पिल्याने बरा झाला होता अशी कथा आहे.

अशोक :- मी असं वाचलय की करवीर म्हणजे कारवार.....मग ते कोल्हापुर कसे काय?? माफ करा पण मला माहित नाही आहे म्हणुन मी विचारतेय.. आत्ता तुमची कमेंट वाचुन थोडा गोंधळ उडाला...... जरा सविस्तर पणे सांगु शकाल का????

माझं गाव अलिबाग आहे.....पुर्वि म्हणे अलि नावाच्या माणसाच्या बागा होत्या खुप म्हणुन त्या जागेस अलिबाग म्हणतात..... अलिबाग तालुक्यामधे माझं गाव कोप्रोली आहे.....हे मांडवा च्या जवळ आहे....पुर्वी कोप्रोलीला गदिने असे म्हणत...अजुनही जुनी लोकं गदिने च म्हणतात....पुर्वी म्हणजे शिवाजी राजांच्या काळात वगैरे त्या गावावर मुसलमानांची सत्ता होती..त्यामुळे त्याला मदीना हे नाव पडले....पण पुढे त्याचा अपभ्रंश होउन ते गदीने व त्याही पुढे कोप्रोली कसे पडले ते काही माहीत नाही... Sad पण जाणुन घ्यायला आवडेल...

माझं गाव राजगुरुनगर. त्याचे आधिचे नांव खेड होते. शिवराम हरी राजगुरुंचे जन्मस्थळ म्हणुन राजगुरुनगर नांव दिले गेले.

असं वाचलय की करवीर म्हणजे कारवार.....मग ते कोल्हापुर कसे काय?? << नक्की कुठे वाचले आहेस ते कळेल का? कारण करवीर म्हणजे कोल्हापूरच. अंबाबाईला करवीरनिवासिनी असे म्हणतात.

अनिश्का....

"करवीर" आणि 'कारवार' मध्ये तुमचा काहीसा गोंधळ झाला आहे. वर नंदिनी यानी उल्लेख केल्याप्रमाणे महालक्ष्मी अंबाबाईचे जे 'निवासस्थान' ते म्हणजेच करवीर. जिल्ह्याला जरी गॅझेटमध्ये 'कोल्हापूर' असे नाव असले तरी अंबाबाईमुळे भक्तजनात या शहराला 'करवीर' नामानेच ओळखले जाते. विशेष म्हणजे 'करवीर' म्हणजे शहरातील अमुक एक भाग वा पेठ असा कुठेही उल्लेख नाही. मात्र वडणगे, निगवे, पाडळी, गांधीनगर, कळंबा, बालिंगा आदी छोटी छोटी गावे 'करवीर' तालुक्यातील म्हणून मानली जातात.

'कारवार' हे कर्नाटकातील एक बर्‍यापैकी मोठे शहर आहे. गोव्याचा काणकोण हा भाग ओलांडला की कर्नाटकाची हद्द सुरू होते आणि या हद्दीवरील कारवार हेच प्रमुख गाव. सुंदर आहे आणि मराठी वस्तीही भरपूर आहे. गावात प्रवेश करताना चक्क देवनागरीत लिहिलेली 'गणेश प्रसन्न', 'आराधना', 'नारायण स्मृती' अशी बंगल्यांची नावे दिसतील तुम्हाला. किराणा भुसारी दुकानातदेखील कन्नड्समवेत मराठी भाषेतूनही देवाणघेवाण चालते.

अशोक पाटील

रत्नागिरी: इथे एक रत्नदुर्ग नावाचा किल्ला आहे. त्यावरून गावाचे नाव रत्नागिरी पडले असावे.

आमचे घर ज्या गावात आहे त्याचे नाव कुवारबाव. एका कुमारिकेने इथल्या एका विहीरीत उडी मारून जीव दिला (आणि नंतर बरेच वर्षे इथे तिचे भूत फिरते वगैरे गमतीजमती असल्याने) गावाचे नाव कुवारबाव. आता वस्ती वाढल्याने भुताने स्थलांतर केले असावे.

माझ्या वडील ज्या कंपनीत काम करत त्या गावाचे नाव मिर्‍या. याची आख्यायिका अशी सांगतात की हनुमान जेव्हा संजीवनीसाठी द्रोणागिरी पर्वत घेऊन लंकेकडे निघाला होता, तेव्हा त्यातला एक मिरीएवढा तुकडा खाली पडला, तेच हे मिर्‍या. (आता हनुमान इथे पश्चिम दिशेकडे अरबी समुद्राकडे का आला वगैरे मला माहित नाही हां)

नंदिनी....

'रत्नदुर्ग' वरून 'रत्नागिरी' हादेखील अनेक तर्कापैकी एक असू शकेल. मी देवरुख आणि गणपतीपुळ्याच्या काही स्थानिकांशी रात्रीच्या भोजनानंतर समुद्रकिनारी अशाच शिळोप्याच्या गप्पा मारत असताना 'रत्नागिरी' नाममहात्म्याबद्दल विषय छेडला गेला. त्यातून एकदोन दंतकथाही ऐकल्या आहेत. त्यानुसार परशुरामाने वस्तीसाठी काही कोस समुद्र मागे हटविला आणि कोकण नामक देवभूमी निर्माण केली असा एक प्रवाद आहे. परशुरामाचा एक भक्त उपासक रतनगिरी होता, जो कर्नाटकातील विजापूर गावचा रहिवासी. त्याने या ठिकाणी येऊन समुद्र हटविल्यामुळे झालेल्या पडझडीची साफसफाई केली, जमिनी स्वच्छ करून राहण्यालायक केल्या, वस्तीसाठी तिथून दूरदूर गेलेल्यांना परत बोलावून घेऊन तो भाग पुनःश्च गजबजून टाकला. स्वतःसाठी त्याने तिथल्याच एका टेकडीवर राहुटी उभी केली आणि उर्वरित आयुष्य लोक सेवेत आणि परशुराम स्तुतीत घालविले. 'रतनगिरी' मुळे तो भाग फोफावला म्हणून त्या भागाचे नाव 'रत्नागिरी' पडले.... ही एक दंतकथा...

तर दुसरी कथा : रत्नदुर्गावर भगवती देवीचे आगमन झाले आणि तिने त्या भागात उच्छाद मांडलेल्या रत्नासूर नामक दैत्याचा वध केला आणि परिसराच्या रक्षणाकरिती तिने तिथेच विश्रांती घेतली ते गिरीस्थान तिचे कायमचे वास्तव्य झाले.....या कथेतील 'रत्नासूर' आणि 'गिरीस्थान' यांच्या मिश्रणातून त्या भागाचे नाव 'रत्नागिरी' असे पडले असेही मानतात.

छान वाटते अशा कथा स्थानिकांकडून ऐकताना....विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण रात्र रंगते भारी असा माझा अनुभव आहे.

अशोक पाटील

तर दुसरी कथा : रत्नदुर्गावर भगवती देवीचे आगमन झाले आणि तिने त्या भागात उच्छाद मांडलेल्या रत्नासूर नामक दैत्याचा वध केला आणि परिसराच्या रक्षणाकरिती तिने तिथेच विश्रांती घेतली ते गिरीस्थान तिचे कायमचे वास्तव्य झाले.....या कथेतील 'रत्नासूर' आणि 'गिरीस्थान' यांच्या मिश्रणातून त्या भागाचे नाव 'रत्नागिरी' असे पडले असेही मानतात>> ही कथा मी पण ऐकली आहे. पहिली तुमची विजापूर रहिवाश्याची कथा वाचताना अचानक डोक्यात आलेला प्रकाश म्हणजे, रत्नागिरीमधे मिर्‍या गावचे सावंत आहेत. (जे इतके दिवस भगवतीला कुलदैवत मानत होते.) त्यांना अचानक कागदपत्रांवरून समजले की त्यांचे मूळ गाव बदामी, कर्नाटक आहे. या मुद्द्यानुसार तुमची पहिली कथा इंटरेस्टिंग आहे.

पण ऐतिहासिक दृष्ट्या रत्नदुर्गवरून रत्नागिरी हे जास्त तार्किक वाटते.

वरदा, किधर है? तिच्याकडे भरपूर माहिती असेल.

लखनऊ - ह्या नावाबद्दल अस ऐकलं आहे की हे, लक्ष्मणावरुन पडलं, ह्याचं आधी नावं लक्ष्मणपुर असं होतं, मग त्याचा अपभ्रंश होऊन ते लखनपुर असं झालं आणि मग लखनऊ.

असंच लाहोरबद्दलही ऐकलं आहे की ते श्रीरामच्या मुलाच्या नावावरुन - लव - हे नावं पडलं!

सातारा (जिल्ह्यचं ठिकाणं असलेलं) - हे माझं गावं नाहिये पण इथे खुप वर्ष राहिलेलो आहे. ह्या गावच्या आजुबाजुला ७ डोंगर आहेत. अजिंक्यतारा, जरंडेश्वर, पेढ्याचा भैरोबा इ. म्हणुन सातारा.

माझे गाव 'नाशिक'. Happy
माझ्या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत ३ संदर्भ आहे.
१. ९ शिखरांचे शहर म्हणून 'नवशिख' नंतर अपभ्रंश होऊन नाशिक.
२. राम, सीता आणि लक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात असताना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत भाषेमध्ये 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक नाशिक.
३. नाशिकचा डोंगर ही सह्याद्रीच्या नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक

मुघलांच्याकाळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने होते.

Pages