गावांच्या नावाचा इतिहास

Submitted by कुमार१ on 5 March, 2013 - 04:54

गावांच्या नावांचा इतिहास वा व्युत्पत्ती इथे लिहावी.जगातील कुठलीही गावे चालतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा आवडता विषय. मी नेहमीच प्रवासात गावांच्या व्युत्पत्ती मागे हात धुवून लागत असतो.

तिरुनेलवेली गावात काही काळ वास्तव्य होते.
स्थानिकांकडून मिळालेली माहिती.
तिरु = या तमिळ शब्दाचा उल्लेख बऱ्याच तमिळ/ तेलुगू गावांमध्ये येतो. त्याचा अर्थ आहे पवित्र.
नेल+ वेली या शब्दांमागे स्थानिक नेल्लईअपार या शिव मंदिराची कथा आहे. प्रचंड पावसामुळे भातशेतीचे नुकसान होऊ नये म्हणून शिवाने आपल्या एका भक्ताच्या शेतावर छप्पररुपी कुंपण घातले होते, असा स्थानिक मंदिरातील जुन्या भुर्जपत्र लिखाणात उल्लेख आढळतो.
नेल वेली म्हणजे छप्पररुपी कुंपण. म्हणून गावाचे नाव तिरूनेलवेली म्हणजे पवित्र कुंपणाचे छप्पर.
---
माणूस आपल्या कल्पनाशक्तीला वाव देत जे काही जग आपल्या भोवती उभे करतो त्याचा आविष्कार म्हणजे अशा कथा आणि टोळींच्या वास्तव्याला मिळालेली अनोखी अशी नावे.
(Sapiens पुस्तक वाचनानंतर मनी रुजलेले तथ्य.)

Pages