गावांच्या नावाचा इतिहास

Submitted by कुमार१ on 5 March, 2013 - 04:54

गावांच्या नावांचा इतिहास वा व्युत्पत्ती इथे लिहावी.जगातील कुठलीही गावे चालतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Today's Bihar was actually Vihaar. A place to stroll, roam around, play, was built by the sides of Angadesh ( today's Orissa ) & Wangadesh ( today's Bengal ).
It also was too close on other side with another place called Magadha, the king of this place called Jarasandha ( was killed by Bhim in Mahabharata times later on ), being aggressive brought this place, Vihaar inside his territories, made his own palace there, later on named the place as Patliputra ( another history is there ), which is today's Patna.

Going to get out of the box a little bit to share a very interesting thing with you all.

Hold your breath..............as per Puran Shastras ( Ved Shastra ), when Samudra Manthan was done in our Pauranik Kaal, with collective forces of Sur ( Gods ) & Asur ( Rakshas ), by revolving the most huge Mountain at that time called Mandaraachal, right in the middle of the ocean, we can only imagine amount of force applied for the whole process !
Due to the extreme force, of that huge mountain by getting it revolved on its own axis, the magnetic forces created are still having the very weird effects in the area.... now a days know as Bermuda Triangle.

बिहार हे नाव तिथे एकेकाळी मोठ्या संख्येने असलेल्या बौद्धविहारांमुळे पडलेले आहे असे वाचले आहे.
बाकी लिहिण्यासारखे काही नाही.

Hi Hira ,

Bihar is an actual slang ( in Marathi called as - Apabhransha ) of originally Sanskrit word,

Vihaar, means, roaming or a place to roam around.

Basically its very close to Bengal & the way word are pronounced in Bengal are similar to Bihar's way,

e.g. Kapda ( fabric, cloth ) as kapra,

you will be surprised to know in Bengali language they don't have a leter called bha in Marathi.
like if there is a name to be called Abhay, they will say Ovay. or Obhoy.

Its actually Vihaar , as Budhist Monks use to stay for a while in carved caves are also known as Vihaar..

बंगाली भाषेविषयी थोडीफार माहिती आहे आणि विहार या संस्कृत शब्दाचे बिहार हे रूप झाले आहे हेही माहीत आहे. विहार म्हणजे हिंडणे फिरणे हे माहीत आहे. बौद्ध भिक्षूंच्या वावरण्याच्या स्थळाला विहार म्हणत. मगधामध्ये बौद्ध धर्म शिखरावर असताना या विहारांची खूप मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली म्हणून या प्रदेशाला 'विहार-बिहार' नाव पडले असे वाचले आहे. कदाचित तसे नसेलही.

Hold your breath..............as per Puran Shastras ( Ved Shastra ), when Samudra Manthan was done in our Pauranik Kaal, with collective forces of Sur ( Gods ) & Asur ( Rakshas ), by revolving the most huge Mountain at that time called Mandaraachal, right in the middle of the ocean, we can only imagine amount of force applied for the whole process !
Due to the extreme force, of that huge mountain by getting it revolved on its own axis, the magnetic forces created are still having the very weird effects in the area.... now a days know as Bermuda Triangle.
>>>>>>> परब्रम्ह ज्ञानानं डोळे दिपले.

@ केदार जाधव: मी असे "ऐकले" होते कि इचलकरंजी हे नाव "इंजी, उंजी आणि करंजी" या फुलांच्या नावावरून आले आहे, कारण या फुलांची झाडे या गावी खूपच होती. यातील काही (कदाचित सर्व ) फुलांची झाडे राजवाड्याजवळ आहेत. अर्जुननगर /निपाणीच्या देवचंद कॉलेज मधील एका प्राध्यापकांनी "इचलकरंजी शहराचा इतिहास" या नावाने इंग्रजीमध्ये एक पुस्तक लिहिले आहे, त्यामध्ये "कदाचित" असेल याविषयी.

अहो अमोल केळकर (सांगलीकर), जर "सहा गल्ल्यांचे शहर" म्हणून "सांगली" असे नाव पडले असेल, तर "सातारा" हे नाव त्या शहरातून फक्त सहाच तारे दिसत असल्यामुळे पडले का?

@ राहुल_कित्तुरे_... - सातारा नावाची व्युत्पत्ती मि आधीच टाकली आहे. सातारच्या आजुबाजुला ७ डोंगर असल्यामुळे सातारा नाव पडले आहे.
@ हीरा - बिहार हे नाव तिथे एकेकाळी मोठ्या संख्येने असलेल्या बौद्धविहारांमुळे पडलेले आहे असे वाचले आहे.>>>> अनुमोदन. मीहि असेच वाचले आहे.

बंगाल - 'ब्रम्'हपुत्रा आणि 'गं'गा > ब्रंगा > बंगा. ह्या दोन्ही नद्यांचा त्या प्रदेशात संगम होतो.
त्रिपुरा - ३ टापुंवरती वसलेला प्रदेश.

स्वाती,
ते लिहितान्ना बी आणि एच आहे, पण म्हणतान्ना सरळ ओव्होय, असा उच्चार करतात.

मामी,
असे का म्हणता . . . . खरच आहे ते, पहाना आता, त्रेता युगात बान्धलेला तो द़क्षिण भारता पासून लन्के पर्यन्तचा रामसेतू आज सुद्धा अस्त्तित्वात आहे.
आणि द्वापर युगात, भगवान बलरामाने महाभारताच्या नन्तर समुद्रात बुडवलेली अर्धी द्वारका आजही आपण पाहु शकतो.

माझ्या माहेरच्या कोकणातील गावाचे नाव कळंबुशी आहे (संगमेश्वर तालुक्यात आहे), हे नाव कळंब ह्या वृक्षावरून पडले आहे, तिथे कळंबाचे खूप वृक्ष होते.

रत्नागिरी करन स्वातन्त्र्य लढ्यातील अनेक रत्ने जशी सावरकर ,टिळक इयादि रत्नागिरीत झाले ,म्हणून रत्नागिरी

ं Mountain of Jewels= रत्नागिरी

नाही, रत्नागिरी नाव त्याही आधीपासून आहे. भगवती किल्ल्याचे मूळ नाव रत्नदुर्ग आहे आणि त्यावरून रत्नागिरी हे नाव आलेले आहे. सावरकर रत्नागिरीत झाले नाहीत, ते इथं येण्याआधीपासून साआजिक आणि राजकीय नेते होतेच. त्यांना इथे स्थानबद्ध करून ठेवलं होतं, मात्र त्यावेळी सावरकरांनी रत्नागिरीमध्ये प्रचंड सामाजिक सुधारणा केल्या.

रत्नागिरी एकेकाळी अतिशय दुर्गम आणि जायलायायला किचकट गाव होते, म्हणून ब्रिटीश काळात इथे स्थानबद्ध करून ठेवले जायचे. थिबाराजाला म्हणूनच इथं आणून ठेवले होते. तसंच, याच दुर्गमतेमुळे रत्नागिरीमध्ये ब्रिटीशांनी जेल आणि मनोरूग्णालय बांधले होते. (आजही हे दोन्ही आहेत).

लाहोर हे नाव कसे पडले हे ईम्रान खान च्या पुस्तकात वाचले होते.

लव आणि कुश हे लाहोर मध्ये जन्मले होते किंवा मोठे झाले होते म्हणुन त्या जागेचे नाव लव और कुश झाले कालंतराने लव और आणि मग लाहोर .

नंदिनी, रत्नदुर्ग यावरून पडलेलं नाव रत्नगिरी हवं ना? जास्तीचा काना कुठून आला?
आ.न.,
-गा.पै.

साहिल शहा, माझ्या माहितीप्रमाणे लवपूर वरून लाहोर तर कुशपूर वरून कुसूर ही नावं पडली आहेत. कसुरी मेथी ही कुसूर गावची. Happy
आ.न.,
-गा.पै.

रत्नागिरी करन स्वातन्त्र्य लढ्यातील अनेक रत्ने जशी सावरकर ,टिळक इयादि रत्नागिरीत झाले ,म्हणून रत्नागिरी > Lol भारी , एकदम भारी .

माझे गांव आंबेगांव तालुक्यातील घोडेगांव .................
नाव घोडेगांव, पण घोड्याचा आणि घोडेगांव चा काही-काही ही संबंध नाही !... पण दैवगती पाहा गावात कुंभार समाजाची मोठी वस्ती असल्याने त्यांच्याकडील उपयुक्त पशू गाढवे मात्र सदैव गांवभर उधळत असतात !!...
*********************************************************************************************************
घोडेगांव जवळुन भीमा नदीची उपनदी 'घोड नदी ' जाते. ती घोडेगांवी घोड्याच्या नाली सारखी वाहत जाते. म्ह्णुन घोडेगांव-----------

...... काही एकीव इतिहासकार असेही म्हणतात ...... इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पागा होत्या

नंदिनी यांनी सांगितलेली व्युत्पत्ती च बरोबर आहे. पण रत्नांचे आगर म्हणून रत्नागिरी असेही ऐकलं आहे.

@गा.पै., कसूरी मेथीबद्दल आपण विनोदाने लिहिले आहे खरे, पण उन्हात बेगमीसाठी सुकवलेल्या भाज्यांस सुमारे साठसत्तर वर्षांपूर्वी मराठीत कुसरी म्हणत असत. उदा. गवारीची कुसर, भेंडीची कुसर किंवा कुसरी भेंडी वगैरे. विदर्भ-मराठवाड्यामध्ये अशा कुसरी करून ठेवण्याची पद्धत होती. कसूरी मेथी म्हणजे सुकवलेली मेथी.

ते आमच्या शाळेमध्ये भाषणासाठी पेटंट वाक्यं होते. "रत्नागिरी म्हणजे रत्नांचे आगर. याच रत्नागिरीत टिळक आळीत टिळकांचा जन्म झाला" वगैरे वगैरे. Happy

रत्नागिरीपेक्षा दापोली रत्नांचे आगर. चार भारतरत्नं या तालुक्याने दिलेली आहेत.

अमरावती- अंबेच्या प्राचीन स्वयंभू स्थानामुळे, अंबिकापुर. या परिसरात, उंबराची विपुल झाडे असल्याने उम्बरावती हे नाव मिळाले, पुढे उमरावती किंवा अमरावती झाले असावे.

माझे मूळ गाव शिरुर तालुक्यातले मलठण
पुर्वी हे मल्लांचे (पैलवान) ठाणे म्हणून ओळखले जाई, कालांतराने अपभ्रंश होउन सोपे झाले आणि मलठण हे नाव प्रचलित झाले.

Pages