गावांच्या नावाचा इतिहास

Submitted by कुमार१ on 5 March, 2013 - 04:54

गावांच्या नावांचा इतिहास वा व्युत्पत्ती इथे लिहावी.जगातील कुठलीही गावे चालतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुर्द आणि बुद्रुक चा अर्थ माहीत आहे का कुणाला?

Submitted by DShraddha on 10 January, 2019 - 22:45

बुद्रुक - मोठे (बुझुर्ग या शब्दा वरुन)

खुर्द - लहान (खुर्द / चिल्लर खुर्दा या अर्थाने)

चोमो लुंग् मा आहे. त्याचा अर्थ बहुधा सागरमाथा असा होतो >> नाही. एव्हरेस्टला नेपाळी भाषेत सागरमाथा म्हणतात. चोमो लुंग् मा हा तिबेटी शब्द असून त्याचा अर्थ "पर्वतांची मातृदेवता" असा होतो.

असम्/अहोम >> याविषयी कोणतेही मत ठामपणे व्यक्त करता येत नाही, ते अयोग्य आहे. या विषयक किमान तीन प्रवाद आहेत. १) असम हा शब्द संस्कृतमधून "समतल नसलेला भूभाग" किंवा "अद्वितीय, ज्यासारखा दुसरा कोणी नाही" या अर्थाने आला हा एडवर्ड गेट (gait) या कलकत्त्याच्या इतिहास अभ्यासकाचा १९०६ मधला दावा आहे. २) जॉन पीटर वेड याने १८०५ मध्ये हा शब्द अहोम राजवंशाकडून आला असा सिद्धांत मांडला. पण अहोम वंशीयांच्या आधीसुद्धा या प्रदेशाला असम संबोधल्याचे पुरावे सापडल्याने या सिद्धांताची लोकप्रियता आता लोप पावत चालली आहे. तसेच अहोम राजांचे अनेक ताम्रपट संस्कृत-अहोम असे द्वैभाषिक असल्याने 'अहोम' हा शब्दच संस्कृतवरून असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ३) १८९६ मध्ये बेडन पॉवेलने बोडो भाषेतील आ-काम/हा-काम (यातला "हा" चा उच्चार बराचसा "आ" सारखा) या शब्दावरून आलेला असल्याचा सिद्धांत मांडला. याला पुष्टी देणारे संशोधन उपलब्ध आहे.

<<१८९६ मध्ये बेडन पॉवेलने बोडो भाषेतील आ-काम/हा-काम (यातला "हा" चा उच्चार बराचसा "आ" सारखा) या शब्दावरून आलेला असल्याचा सिद्धांत मांडला. याला पुष्टी देणारे संशोधन उपलब्ध आहे.>>
या प्रदेशाचे प्राचीन नाव कामरुप असे आहे

>> या प्रदेशाचे प्राचीन नाव कामरुप असे आहे

इंटरेस्टिंग आहे. विकिपीडिया वर दिल्या नुसार प्राचीनकाळी कामरूप हा सध्याच्या आसामचा एक भाग व्यापेल इतका होता. सध्या तो फक्त एक जिल्हा म्हणून अस्तित्वात आहे म्हणे. माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

एवरेस्ट शिखराचे स्थानिक भाषेतले नाव चोमो लुंग् मा आहे. त्याचा अर्थ बहुधा सागरमाथा असा होतो. >>>

तिबेटी लोक त्याला 'चोमोलुंगमा' म्हणतात, म्हणजे सर्व पर्वतांची आई असलेली देवी.

नेपाळी लोक त्याला 'सगरमाथा' (सागरमाथा नव्हे) म्हणतात. नेपाळीमध्ये सगर म्हणजे आकाश आणि माथा म्हणजे डोके. आकाशाचे डोके. चोमोलुंगमाचा अर्थ सगरमाथा नव्हे.

>> नेपाळीमध्ये सगर म्हणजे आकाश आणि माथा म्हणजे डोके.
वाह भास्कराचार्य... खूपच चांगली माहिती. मलाही थोडे विचित्र वाटायचे 'सागरमाथा' ऐकताना Happy पण नेपाळी मध्ये सगर म्हणजे आकाश. शिवाय सगर नावाचा राजा पण होऊन गेला (दशरथ राजाच्या पूर्वजांपैकी) असाही एक संदर्भ सापडतो.

नगरमधे पाथर्डी तालुक्यात नांदूर दैत्य नावाचं गाव आहे . त्याचा किस्सा अमानवीय धाग्याचा विषय आहे पण तिथं न लिहिण्याची प्रतिज्ञा केल्याने इकडे टाकतोय
https://www.youtube.com/watch?v=ZshX1A6Z97A
https://www.youtube.com/watch?v=Ru6pZiF5nCk

माझं गांव अक्षी . व्युत्पत्ती कळली . संतोष जाहला. समुद्रावरील गांव . एक शंका : : अल् अक्सा ही मुसलमानांची प्रसिध्द मशीद तर डोंगरावर आहे ! हे कसे काय ? आगाशी चा रूढ अर्थ गच्ची , terrace असा आहे .
हडपसर चा संबंध वि.वा. हडप लेखक व सर = तळें असा मीं लावला .
हळ्ळी , वल्ली , पल्ली , पालयम् हा दक्षिणेकडील गांव अर्थाचा प्रत्यय .
पिठोरगड हे तिबेट सरहद्दीजवळील गांव .
दिल्ली हे देहली = ऊंबरठा अर्थाचे रूपांतर .
बडोदा , बरोडा , वटोदरा = वट उदरा . वडाच्या झाडाच्या खोडामध्यें सांपडलेली , दृृृृृृश्यमान झालेली देवी . अशी व्युत्पत्ती सांपडली .
थत्ते आडनांव थट्टा या सिंधमधील समुद्र , खाडीवरील गांवावरून पडले असावे . दक्षिणेकडे पुदुचेरी ( पाँडिचेरी ) च्या उपनगराचे नांव थथ्थनचावडी असे आहे .
link : : गांवांच्या नांवांची व्युत्पत्ती .

माझं गांव अक्षी . व्युत्पत्ती कळली . संतोष जाहला. समुद्रावरील गांव . एक शंका : : अल् अक्सा ही मुसलमानांची प्रसिध्द मशीद तर डोंगरावर आहे ! हे कसे काय ? आगाशी चा रूढ अर्थ गच्ची , terrace असा आहे .
हडपसर चा संबंध वि.वा. हडप लेखक व सर = तळें असा मीं लावला .
हळ्ळी , वल्ली , पल्ली , पालयम् हा दक्षिणेकडील गांव अर्थाचा प्रत्यय .
पिठोरगड हे तिबेट सरहद्दीजवळील गांव .
दिल्ली हे देहली = ऊंबरठा अर्थाचे रूपांतर .
बडोदा , बरोडा , वटोदरा = वट उदरा . वडाच्या झाडाच्या खोडामध्यें सांपडलेली , दृृृृृृश्यमान झालेली देवी . अशी व्युत्पत्ती सांपडली .
थत्ते आडनांव थट्टा या सिंधमधील समुद्र , खाडीवरील गांवावरून पडले असावे . दक्षिणेकडे पुदुचेरी ( पाँडिचेरी ) च्या उपनगराचे नांव थथ्थनचावडी असे आहे .
link : : गांवांच्या नांवांची व्युत्पत्ती .

नमस्कार मी मुरबाड पासून 20 किलोमीटरच्या अंतरावर राहतो. आणि माझं गाव आहे ' किन्हवली' . माझ्या ऐकण्यात आलं होतं की ज्या गावांच्या पाठीमागे ' वली ' या शब्दाचा उल्लेख येतो ती गाव शिलाहारांनी वसवलेली आहेत असं सांगितलं जातं. मग आता वली या नावाची बरीच गावं आमच्या आजूबाजूला आहेत. म्हणजे अगदी डोंबिवली पासून सुरुवात केली तर,डोंबिवली अगदी माझ्या गावापासून जवळ असलेली शेलवली,चेरवली परटोली आमचं गाव किन्हवली, वडवली, मुंबई - बोरीवली अशी वेगवेगळी वली नावाची गाव या परिसरामध्ये आहेत. तर त्याच्या संदर्भात जाणकारांनी प्रकाश टाकावा आणि माझा तालुका 'शहापूर' आहे . तर शहापूर या गावाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या अख्यायिका सांगितल्या जातात त्यातली एक म्हणजेच जेव्हा शहाजीराजे निजामशाहीचा अंताच्या काळामध्ये म्हणजे अगदी १६३६ च्या दरम्यान निजामशाही संपायला आली त्यावेळेला ते इकडे कोकणात उतरले खाली प्रेमगिरी होऊन.जेव्हा ते खाली उतरले आणि मग ते माहुलीच्या किल्ल्यावर राहिले आणि मग काही काळ राहिल्यानंतर त्यांनी इथल्या लोकांना जबाबदारी दिली किंवा एक गाव बसवलं आणि म्हणून ते शहापूर, शहाजींच्या नावाने बसवलं गेलं म्हणून शहापूर . त्यानंतर काही लोक याच गावाला सिंहपूर असे म्हणत होते का आता ते सिंहपूर का म्हणत होते याबद्दल मला माहिती नाही पण शहापूरच्या गावाचा नावाचा इतिहासाचे पुस्तक उपलब्ध झाल होत आणि त्या पुस्तकांमध्ये असा उल्लेख आला होता. तर साधारणपणे शहाजीराजे येथे आले होते आणि म्हणून त्यांच्या नावाने शहापूर हे नाव संयुक्तिक वाटतं. (आपल्याकडे वेगळी माहिती असल्यास सांगावी) मुरबाड या नावाचा उल्लेख जर करायचा झाला तर माझे एक मित्र आहेत अविनाश हरड यांनी एकदा चर्चे चर्चेमध्ये मला सांगितलं होतं की ठाणे जिल्ह्याच्या गॅझेट मध्ये मुरबाड या नावाचा उल्लेख आला आहे तो असा, पूर्वी सातवाहन कालीन व्यापारी मार्ग जो कल्याण नाणेघाट जुन्नर पैठण अशा प्रकारचा मार्ग होता आणि मग पश्चिमेकडून येणारा जो काही व्यापारी मार्ग होता तो व्यापारी मार्ग कल्याण वरून यायचा या संपूर्ण जंगलामधून जायचा आणि म्हणून व्यापारी लोक सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून ते काही धष्टपुष्ट जी मंडळी आनत होती,ते मुरुब. कल्याणहून निघाल्यानंतर थेट नदीच्या जवळ आडोसा घ्यायचे तो भाग म्हणजे मुरूब आड. म्हणजे मुरूम लोकांची वस्ती तिथे राहायची ते लोक तिथे थांबा घ्यायचे आणि मग पुन्हा तिथून पुढील बाकीचे बाकी दुसरे मुरूम हे नाणेघाटापर्यंत येऊन त्या व्यापारी लोकांना सोडायचे आणि मग पुन्हा परतीच्या मार्गाला लागायचे तिकडून येणाऱ्या लोकांना सेक्युरिटी द्यायचे सो मुरूम आड म्हणून मुरबाड असा नावाचा उल्लेख किंवा नावाची उत्पत्ती सांगितले जाते. आता यात सत्यता तथ्यता ही जाणकारांनी याच्यावर उजेड टाकावा असं मला वाटतं आणि हे जे मी काही आता तुम्हाला सांगितले आहे याचा माझ्याकडे कागदोपत्री पुरावा नाही. ऐकीव माहिती वरुन मी तुम्हाला सगळं या ठिकाणी सांगितलेले आहे. यावर चर्चा व्हावी.
धन्यवाद!
नवनीत यशवंतराव.

न य
छान प्र. रंजक मुद्दे.
१. नुसत्या ‘वली’ चा हा अर्थ आहे (https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80):
साधु; संत; सत्पुरुष. २ मालक; धनी; पालक. [अर.]

२. तुमच्या प्रश्नांना खात्रीशीर उत्तरे या पुस्तकात मिळावीत :
विजय शेट्टी संपादित
नावांच्या गावा…

मी 'Early Indians ' टोनी जोसेफ यांच्या पुस्तकात वाचलंय की 'वली' किंवा 'ओली' असा शेवट असलेली गावं ही हडप्पा संस्कृतीतली माणसं जेव्हा (ती संस्कृती नाश पावायला लागली तेव्हा) भारतात पसरली, तेव्हा त्यांनी वसवलेली आहेत.
मी हे पुस्तक वाचून तसे बरेच दिवस झाले. त्यामुळे मी एकदा परत बघून सांगते, पण बहुधा हे असंच आहे.

Pages