फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Stylish-Diamond-Bracelets-Designs-for-Girls.jpg

5.jpeg6.jpeg7.jpeg

इतके वेल ग्रूम्ड पाय असतील तर मस्त.. माझे कधीच नव्हते. बेसिक स्वच्छता आणि कापलेली नखे बस्स. Happy
मी एकेकाळी एकाच पायात पैंजणांच्या काळ्या धाग्याचे वेढे किंवा मग ते हासळी टाइप मोठ्ठे कडे घालत असे.
देशी हॅण्डलूमचे घोट्याच्या किंचित वर असलेले स्कर्टस असतील तर मस्त दिसे. केप्रीजवर पण मस्त.

गेले ते दिन गेले!! Happy

कडे अप्रतिम दिसतात नी.....मी जीन्स थोडी शॉर्ट घालते..वर टी आणि पायात नकली कडे घालते...मस्त दिसतं ते....

खुप सुंदर पाय आणि त्यांचे दागिने.
असे पाय होण्यासाठि मला दुसरा जन्म घ्यावा लागेल Sad

असे पाय होण्यासाठि मला दुसरा जन्म घ्यावा लागेल>>>>>>>> नाराज नको होउस.......थोडा वेळ काढ आणि पायाना मसाज पेडीक्युअर दे बघ तुझे पण पाय सुंदर होतिल...

मागच्या पानवरच नेल आर्ट आनि पायातले वरचे अ‍ॅक्से मस्तच आहेत..
हे पुण्यात मिळेन कुठेन पण ????
हे प्रश्न म्हण्जे भावाच्या लग्नासाथी प्रि-प्लॅनिंग चालु आहे बरं Happy

दुसरा आनि स्त्री चा जन्म म्हण ग >> चल अंकु तिने म्हणो वा न म्हणो मी म्हणते.
माझे पाय अत्यंत पसरट (पुरूषी) आहेत Sad तरी मी नेल पॉलिश वगैरे लावून बरे ठेवते. पण मूळातच माती खाल्ली असेल तर . Sad जाऊ दे..
पण पायात मी कडं घालते... चुडीदारवर पण ते खळखळ वाजते त्यामुळे हापिसात घालायला नको वाटतं. आतून पोकळ आहे आणि त्यात बहुतेक घुंघरू घातलेत.

माझे पाय अत्यंत पसरट (पुरूषी) आहेत>>>>>>>> दक्शे माझे पण Sad तरीहि मी माझी हौस पुरवते... पाय क्लीन व्यवस्थित मेन्टेन केले पाहिजेत फक्त....

माझ्या पायाच्या अंगठ्या मधे आणि दुसर्या बोटामधे चांगलं अर्ध्या इंचाहुन अधिक अंतर आहे......

मला नाही आवडत रॅप अराऊंड स्कर्टस Sad फार सांभाळावे लागतात, आणि कायच्या काय लांब असतात. जाडही दिसतं घातलं की.

मला नाही आवडत रॅप अराऊंड स्कर्टस फार सांभाळावे लागतात, आणि कायच्या काय लांब असतात. जाडही दिसतं घातलं की.>>>>>>>>>> दक्षे Rofl

वॉव.. मस्त आहेत पायातले कडे,पायल्,टो रिंग....
नी, दक्षे.. नेक्स्ट टैम अपुन नेल स्पा मे गटग रखेंगे.. Proud
अनिश्का.. खूप क्यूट आहे रॅपअराऊंड स्कर्टवरचं प्रिंट...
पर्सनली मेरे वॉर्डरोबमे ओन्ली प्लेन्स.. मिक्स मॅच करायला सोपे पडतात.. Wink
प्रिंट्स फारच कमी (/ जवळजवळ नाहीच) आवडत..

आधी पिशव्या वाटल्या होत्या...नंतर कळ्ळं स्कर्ट आहेत..... Lol Lol

स्कर्ट जुने झाले कि पिशव्या शिवून टाक हाकानाका!!! Proud

मला काही चलतं ...कशाचंच वावडं नाही......अगदी हॉट पॅन्ट्स, मिडीज , केप्री ,रॅप अराऊंड , साडी , प्रिन्ट , प्लेन , जाड, झिरझिरीत , पारदर्शक , अपारदर्शक....... अगदी सगळं

मला नाही आवडत रॅप अराऊंड स्कर्टस फार सांभाळावे लागतात, आणि कायच्या काय लांब असतात. जाडही दिसतं घातलं की.>>>>

मुख्यत्वे कंबर जाड असेल तर हॉरीबल दिसतं.... घाघरा घातल्या सारखं... उंच मुलींना बरं दिसतं... तरी नाहीच... छान बारीक मुलगी असेल तर आणि तरच शोभतं..... आणि ह्या वर टि. घातला तर अगदीच काही तरी .... त्या वर थोडा शॉर्ट टॉप स्लीट वाला चांगला दिसतो.

मला आवडायचे रॅप अराउंड एकेकाळी. आता तंबू झाल्यावर नको वाटतात Happy

पण एकुणात घोळदार 'जस्ट अबव्ह अ‍ॅन्कल' लेंग्थचे स्कर्टस, सराँग्ज आणि स्लीव्हलेस किंवा स्पगेटी स्ट्रॅप टॉप्स हे कॉम्बो मस्तच दिसते. क्लासी यट स्टायलिश..
मग त्यावर हेवी जंक ज्वेलरी किंवा स्टोल्सने हवे तसे अ‍ॅक्सेन्च्युएट करा.. Happy

बारीक असते तर मलाही काहीही आवडलं असतं. आवडायचं. घालायचे पण.
अर्थात अति जरी, खडी आणि चकाकणारे सिंथेटिक सोडून... अश्या गोष्टींना मी हातही लावू शकत नाही. Happy

वर्षु तु मला बोल्ली होतीस न बॅन्ड्रा च्या त्या शॉप बद्दल तिथुन मी अशी वाली हॉट पॅन्ट घेतली....दुकान खरच मस्त आहे.. 10.jpeg

Pages