फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिपांजली...

नेल आर्ट काय मस्त आहे !!!!

मला गेल्या वर्षी पासुन चूकीचा व्यायाम केल्या मुळे टाच दुखीचा त्रास सुरु झाला होता. त्या मुळे डॉक्टर हिल्स च्या चपला कंपलसरी वापरायला लागतात...

chappal.jpg

फारतर ह्यातले सँडल्स.... बाकी काही वापरता येत नाही...

वॉव ... खुप छान आहे ती रींग. पण मला अजिबातच नाही सूट होणार.

रच्याकने, दर शुक्रवारी ऑफिसमध्ये जिन्स घालुन येताना सँडल कोणत्या प्रकारचे घालावे हा नेहेमी प्रश्न पडतो Sad

मदत... मदत...

नंदिनी मी तर सरळ जोडव्याच घालते.. मला आवडतात पारंपारिक. Happy

पेरू डिपेन्ड्स जिन्स घातली तर स्पोर्ट्स शूज घालू शकतो (वर टिशर्ट असेल तरच). किंवा बेलिज पण घालू शकतो. शॉर्ट स्कर्ट वर पण बेलिज, लाँग स्कर्टवर फ्लॅट सॅंडल्स..

खूप वर्षांपूर्वी गोव्याला एक मजेदार जोड जोडवी ( दोन जोडव्यांना मधे हुक लावून एकत्र जोडलेल्या)घेतली होती. ती दोन टोज मधे एकदमच घालावी लागते.. खूप स्टायलिश दिसते Happy
सवडीने फोटो काढून टाकते इथे

लेडीज ,, एक प्रश्ण - क्वाड्रॉय आणि जीन्सच्या जेगिंग ची अनुक्रमे किंमत किती असते?

हाय मुलिंनो.......:) जाईजुई जीन्स जेगिंग चांगल्या क्वालिटी चे ८०० पर्यंत मिळतात

वर्षु मला एक पण बॅग नाही आवडली. Sad लईच रंगिबेरंगी हैत.
आणि मी प्रत्येक ड्रेसवर वेगळी अशी नाही वापरत. हापिसला सरसकट एक कॉमन चालेलसा कलर (आणि साईज पोत्यापेक्षा जरा कमी म्हणजे जास्ती कोंबाकोंबी करता येते. मला बॅगिटच्या पर्सेस खूप आवडतात पण त्या भयंकर टिकतात अगदी कशाही वापरल्या तरिही.. त्यामुळे कंटाळा येऊन ठेवून द्याव्या लागतात. माझ्याकडे एक पर्स ५ वर्षं झाली आहे (बॅगिटचीच) त्यात ताक सांडलेलं तुला माहितच आहे की.. ती धुतल्यावर क्लिन झाली एकदम. ताक सांडल्याचा नामोनिशान नाही अजिबात. अजूनही आहे ती अधून मधून वापरते.
(सध्या तू दिलेली वापरतेय :))

पहिल्या पोस्टीतल्या चौथ्या फोटोतल्या काही स्लिंगबॅग्ज आणि पाचव्या फोटोतली जरा ओके. बाकी नॉट आवडेश.
२०१३ इज रिटर्न ऑफ गॉडी एटीज असं म्हणतायत... शूज आणि बॅग्जवरून ते खरं दिसतंय. Happy

मला ब्राईट कलर्स खूप आवडतात बाबा, निऑन बिऑन सर्व चालतात मला Wink
त्यांचा झटाक इफेक्ट , लाईट कलर चे कपडे घातले तर सोबर डाऊन होऊन जातो..

मला फार आवडल्या त्या बॅग्ज वर्षु.. विशेषतः निळ्या, जांभळ्या अन ऑलिव्ह ग्रीन शेड्स.. कलर्स मेक मी हॅपी Happy

ऑलिव्ह ग्रीन सुंदर.....ब्राइट कलर्स बॅग्ज सही दिसतात....एक मला वाटतं क्लच पण आहे सिल्वर मधे तो पण मस्त....फंकी आहेत.....बॅन्ड्रा लिकींग वा हिल रोड बेस्ट असल्या बॅग्ज साठी.....

कलर्स मेक मी हॅपी.......... यस्स्स्स टोटली अ‍ॅग्री विथ यू नताशा..
अनिश्का , हिल रोड वर काही शॉप्स मस्त आहेत..बँड्रा वेस्ट ला 'गॉड मेड मी फंकी', चीप जॅक हे शॉप्स चेक केलंयस का??

65244_10151182534042854_904608740_n.jpg150031_10151185718467854_1235471628_n.jpg

बँड्रा वेस्ट ला 'गॉड मेड मी फंकी', चीप जॅक हे शॉप्स चेक केलंयस का??>>>>>>>. हो मी तिथुन घेते...अत्ता महिन्यापुर्वी हॉट पॅन्ट घेतल्या २.....मस्त....

Fashion-Trend-Summer-2013-Cropped-Tops-05.jpg

अनिश्का....... ते ब्लॅक न व्हाईट .. इटर्नल........ सुप्पर्ब काँबो...
लाल काळा काँबी पूर्वी आवडायचं मला.. आता लाल बरोबर बेज , लाईट ग्रे , आवडंत..
हॉट पँट्स .. वॉव यू चिक.. Happy

वर्षु Happy

Pages