शुभ वर्तमान - चांगल्या बातम्या

Submitted by हर्पेन on 23 January, 2013 - 07:40

माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"

खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.

मनावर मळभ आणणार्‍या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्‍या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"

http://vishesh.maayboli.com/node/1120

चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवात करतोय चार्टर्ड अकाँटंटच्या परिक्षेत पहिल्या आलेल्या प्रेमा जयकुमार हिच्या बातमीने...

मुंबईमधील पश्चिम उपनगरात मालाड येथे चाळीत रहाणार्‍या, रिक्षा चालकाच्या मुलीने सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. प्रेमा जयकुमार असे त्या विद्यार्थिनीचे नाव असून, विपरीत परिस्थितीशी झुंजून तिने हे अद्वितीय यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, प्रेमाच्या सख्ख्या भावानेही याच परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.

हर्पेन, तिचे खरेच कौतु़क आहे. अभ्यासासाठी तिने केलेले प्रयत्न आणि तिला मिळालेली मदत, दोन्हीही महत्वाचे.

हर्पेन, अरे पण मुळात बातमीदारीचा मंत्रच हा असतो की काहीतरी सनसनाटी आणि ब्रेकीन्ग माहिती पुरविणे.
एखाद्या माणसाला कुत्रा चावला तर ती बातमी होत नाही, पण जर माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी होते. Happy
असो, हा उपक्रम चांगला आहे. अशा अजुन चांगल्या बातम्या मिळवून शेअर करूयात.

(..सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा...) +१

धाग्याची कल्पना आवडली.

हर्पेन....

फारच सुंदर आणि मनाला भिडू शकणारा हा धागा होऊ शकतो. वर्तमानपत्रे काय आणि टीव्ही न्यूज चॅनेल्स काय...शेवटी जो तो टीआरपीच्या नादात असल्याने बातम्या देतानाही त्यात सनसनाटीपणा असला नाही तर कदाचित माझ्या नोकरीवरच गदा येईल की काय अशा भीतीतच ही टेम्परवारी नोकरी करणारे वार्ताहर वावरत असतात.

पण असो.... निदान या धाग्याच्या निमित्ताने का होईना वर तुम्ही जशी 'सी.ए.' मुलीची अगदी हर्षभरीत करून टाकणारी बातमी दिली, ती वाचून का होईना सुखद वाटणारी झुळूक लाभली.

यात अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील औदुंबर गावात झालेल्या एका आगळ्या विवाहाची बातमी दै.सकाळ मध्ये वाचली आणि खरेच फार आनंद झाला. त्या बातमीच्या आधारे हे लेखन धागा वाचणार्‍या सदस्यांसाठी....
एक प्राथमिक शिक्षक श्री.दत्तात्रय खटावकर यांनी आपला मुलगा नितिन याचा विवाह आजरा [जि.कोल्हापूर] येथील कापड दुकानदार औंधकर यांची कन्या स्वाती हिच्याशी केला. दुसर्‍या वर्षी नितिन आणि स्वातीला गोंडस [नाव : अपर्णा] असे कन्यारत्नही प्राप्त झाले. सुखी संसार सुरू झाला आणि जसे म्हणतात 'दृष्ट लागली' तसेच झाले आणि कन्या एक वर्षाची असतानाच नितिन हृदयविकाराने मृत्युमुखी पडला. खटावकर कुटुंबियांना हा जबरदस्त धक्का होताच, पण स्वाती आणि त्या लहानगीच्या दृष्टीने तर आभाळ कोसळल्यासारखे होते. मुलाचे पहिले श्राद्ध झाल्याच्या दुसर्‍याच दिवशीच खटावकर ह्या हाडाच्या शिक्षकाने एक क्रांतिकारी निर्णय घेतला आणि 'कन्यादान' चित्रपटातील कथानकाप्रमाणेच हा 'सासरा' त्या सुनेचा 'पिता' झाला आणि त्याने आपल्या सुनेसाठी वरसंशोधन सुरू केले. सुनेसाठी नव्हे, तर मुलीसाठी वर शोधावा, अशीच खबरदारी घेतली. गरीब चालेल; पण माझ्या मुलीला सुखात ठेवणारा मुलगा हवा, अशी अपेक्षा ते व्यक्त करत. वधू-वर सूचक मंडळांत जायचे, चौकशी करायचे, जुन्या रुढीपरंपरेला फाटा देणार्‍या त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या मित्रमंडळींनी तसेच आप्तेष्टांनीही साथ दिली आणि जानेवारी २०१३च्या पहिल्याच आठवड्यात शिराळा येथील महेश मनोहर टिळे या युवकाशी खटावकर दांपत्याने आपल्या सुनेचा...नव्हे मुलीचाच....विवाह संपन्न केला.
महेश टिळे... शिराळ्यातील तरुण. त्याचा विवाह 29 जानेवारी 2007 रोजी कराड येथील वसंतराव गणपती भस्मे यांची कन्या वंदना हिच्याशी झाला होता. त्यांना 25 मे 2010 ला सृष्टी नावाची मुलगी झाली. दुर्दैवाने तिला बाळंतपणानंतर कावीळ झाली. सहा महिन्यांत तिने जगाचा निरोप घेतला. मुलगी आईला पोरकी झाली. महेश पत्नीच्या विरहाने आणि मुलगी आईला पोरकी झाल्यानं दुःखी होता. त्याच्या कुटुंबीयांनीही त्याच्यासाठी वधू संशोधन सुरू केलं. दैवयोग जुळून आला... महेश आणि स्वातीच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. सारं जमून आलं... खटावकरांना स्थळ पसंत पडलं. साध्या पद्धतीने लग्न उरकण्याचा मानस महेशच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला; पण गुरुजींनी 4 जानेवारी 2013 रोजी औदुंबर येथे साजेसं कन्यादान करून दिलं. अपर्णाला वडील, सृष्टीला आई मिळाली... त्या दोघी छोट्या बहिणी-बहिणी झाल्या अन्‌ महेश-स्वातीच्या आयुष्यात हरवलेला आनंद पुन्हा गवसला.

..... या घटनेशी आपला कसलाही संबंध असो वा नसो, पण अशा बातम्या खरोखरी मनाला फार समाधान देवून जातात.

अशोक पाटील

नमस्कार. मी खूप दिवसांनी इथे लिहीते आहे ह्याचे कारण एक अतिशय चांगला योगायोग की मला सुद्धा १-२ दिवसांपूर्वी असेच वाटलेले, की कमितकमी पहिल्या पानावर तरी वर्तमानपत्रानी प्रेरणादायक घटना छापाव्यात, ज्यामुळे तरूण पिढीला वर्तमान पत्र वाचावेसे तरी वाटेल. मी जेव्हा मुलांना सांगते, वर्तमानपत्र वाचा, तेव्हा त्या विधानामधील फोलपणा मलाच कळून येतो! हा धागा चांगलाच आहे, पण येथे तरूण वर्ग खूपच कमी येतो. आपली ही मागणी आपण वर्तमानपत्रांपर्यंत पोहचवणे जरूरीचे आहे.
By the way, thnx very much for this thread. i hope i will be able to contribute to this thread by spreading some good news. someone please convey our feelings to newspapers too! thnx.

"अंधार खूप झाला पणती जपायला हवी" >> जियो !!!

माझेही दोन आणे (भाषांतर करायला वेळ नाहीये) Sad

Mr.Kalayanasundaram worked as a Librarian for 30 years. Every month in his 30 year experience(service), he donated his entire salary to help the needy. He worked as a server in a hotel to meet his needs. He donated even his pension amount of about TEN(10) Lakh rupees to the needy.

He is the first person in the world to spend the entire earnings for a social cause. In recognition to his service, (UNO)United Nations Organisation adjudged him as one of the Outstanding People of the 20th Century.. An American organisation honored him with the ‘Man of the Millennium’ award. He received a sum of Rs 30 cores as part of this award which he distributed entirely for the needy as usual.

Moved by his passion to help others, Super Star Rajinikanth adopted him as his father. He still stays as a bachelor and dedicated his entire life for serving the society.

We all Indians should be PROUD. UNO has honored him but we Indians don't even know that such a personality exist amongst us.

At least have the courtesy to pass this on and on till the whole world comes to know about this Great Good Samaritan.
Man of the Millennium.....

Hat's off Kalayanasundaram..

We Indians are extremely proud of you and proudly say "EVEN THIS , HAPPENS ONLY IN INDIA"

धाग्याची कल्पना खूप आवडली Happy सतत निगेटिव्ह ऐकताना पाहताना अश्या पॉझिटिव्ह गोष्टींमुळे जरा आशावाद वाढतो, हुरुप येतो.

हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद!

मध्यंतरी एका पुस्तकात वाचलं होतं की आपल्याकडे एखादी छानशी बातमी असेल किंवा काही छानसं शेअर करायचं असेल आणि आपण सारे एकत्र जमलेले असू तेंव्हा " अरे, माझ्याकडे एक गुड न्यूज आहे असं म्हणून ती सांगावी ( ते आपले सहकारी , आपला स्टाफ या संदर्भात होतं) असं म्हटलं की सगळे कान टवकारले जातात, ऐकायला छान वाटतं, हुरुप येतो, काम करण्याचा उत्साह वाढतो वगैरे Happy
इथे माबोवर हा धागा उघडलात.. पुन्हा धन्यवाद!

छान धागा
मळभ असलेल्या वातावरणात सुखवण्यार्या अशा बातम्या एकदरीत गरजेच्या आहेत
प्रेमाचे मनपूर्वक अभिनंदन
अशोक सरांची बातमीही चांगली आहे

हर्पेन यानी धाग्याच्या निमित्ताने मुंबईतील एका रिक्षाचालकाच्या मुलीची...प्रेमाची...सीएबाबतची बातमी दिली आहेच. त्याला जोडूनच कोल्हापूरच्या धनश्री विलास तोडकर या मुलीची 'सीए' बातमी. वडील चहागाडी चालवतात. त्या वेळी त्यांच्या हाताला मदत म्हणून धनश्री चहाच्या गाडीवर उभी राहायची. उरलेल्या वेळात अभ्यास करायची. तिनं ठरवलं होतं, की आहे त्या परिस्थितीबद्दल कधीच कुरकुरत बसायचं नाही आणि तिनं ते करून दाखवलं. परिस्थितीपुढं ती झुकली नाही. तिनंच परिस्थितीला झुकवलं आणि चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या आपल्या जिद्दीला सत्यात उतरवलं.

धनश्री विलास तोडकर या एका चहागाडीवाल्याच्या मुलीची ही यशोगाथा. कोल्हापुरातील ताराराणी विद्यापीठाच्या मागे एक अरुंद बोळ आहे. त्या बोळात एका छोट्याशा घरात धनश्री राहते. टाकाळ्यावर निगडे हॉस्पिटलच्या दारात वडिलांची चहाची गाडी. धनश्री शाळा सुटली, की बाबांना गाडीवर मदत करायला उभी राहायची. धनश्री कमला कॉलेजमध्ये शिकायची. खासगी क्‍लासची फी तिच्या आवाक्‍यातच नव्हती. घरी स्वतः सराव करून तिनं बारावीचा अभ्यास केला आणि ती बोर्डात अकरावी आली. बी.कॉम.च्या परीक्षेत शिवाजी विद्यापीठात ती पाचवी आली. आजही धनश्री साध्या कुडाच्या घरात राहते. घराला भिंती नाहीत. घराला तट्ट्या आणि प्लॅस्टिकचा कागद. धनश्रीला आता हे चित्र बदलायचे आहे. सीए म्हणून पहिल्यांदा काही काळ नोकरी व नंतर स्वतःची प्रॅक्‍टिस सुरू करायची आहे. धनश्री अजूनही एखाद्या बारावीच्या मुलीएवढी छोट्या चणीची आहे. मूर्ती छोटी; पण तिची जिद्द मोठी आहे. अडचणी अनेक येतात; पण जिद्द ठेवा. एक दिवस यशच आपल्या मागे धावू लागेल, एवढं साधं सोपं तत्त्वज्ञान तिनं जपलं आहे आणि ते तिनं खरं करूनही दाखवलं आहे.

dhanashree.jpg

धनश्रीचे अभिनंदन करत असताना तिच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणार्‍या अशिक्षित आईवडिलांचेही अभिनंदन करणे गरजेचे आहे.

अशोक पाटील

गेल्या तीन चार वर्षात मी अनेक वेळा विनंति केली होती की असा धागा काढा, मी स्वतः काढलाहि होता.
पण मी अमेरिकेतला - सगळ्या भारतीयांनी नुसतीच माझी टिंगल केली नि धागा बंद पाडला.

तुम्हाला तरी यश मिळो.

धन्यवाद.
वरील सर्व घटना वाचुन खरच खुप बरे वाटले. पियुपरी ने लिहिलेले तर वा वा वा आहे. कोणी इतके त्यागी असु शकते ह्याची कल्पनाच केली नव्हती.
झक्की, काय सांगताय काय? असे व्हायला नको होते.

सकाळमधूनच : --------

पुणे - मंगळसूत्र हिसकावून घेतले... चोर पळून गेले आणि वहिनी, ताई, काकू, मावशी रडवेल्या झाल्या ही झाली परवाची गोष्ट. कालची गोष्ट भक्कम विश्‍वास देणारी. मंगळसूत्र हिसकावण्यासाठी आलेल्या चोरांना ज्योती देशपांडे यांनी असा हिसका दिला, की ते पार कोलमडले. धडपडले. त्यातला एक हाताशी लागला आणि त्याला आधी नागरिकांचा, नंतर पोलिसांचा हिसका बसला. पुण्यातील विमाननगरात घडलेली ही घटना म्हणजे राज्यभर फोफावलेल्या साखळीचोरांशी महिलांनी कसे लढावे, याचे उदाहरण ठरावे.

उदाहरणातील इतर तपशील नेहमीसारखाच. म्हणजे गर्दी नसलेल्या रस्त्यावरून चाललेली मध्यमवयाची महिला... तिच्या दिशेने येणारे मोटारसायकलस्वार... त्यांनी मंगळसूत्राला हात घालणे... शहरी भागांमध्ये रोजच घडणाऱ्या या उदाहरणात 55 वर्षे वयाच्या ज्योती देशपांडे यांनी मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता जबरदस्त "ट्विस्ट' दिला. त्या आणि त्यांचे पती अरुण कामानिमित्त मुंबईला जाऊन रात्री विमाननगरला परतले. घराजवळच्या थांब्यावर ज्योती उतरल्या. दूध आणण्यासाठी म्हणून अरुण पुढे गेले. रस्त्यावरून एकट्या चालणाऱ्या ज्योती यांनी पाहिले की, दोघे तरुण मोटारसायकलवरून त्यांच्याच दिशेला येत आहेत. ज्योती यांना शंका आली. तेवढ्यात दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने त्यांचे मंगळसूत्र हिसकाविण्याचा प्रयत्न केला... सावध असलेल्या ज्योती यांनी चोराचा हात पकडला. इतकेच नव्हे, त्याला खाली ओढले. मोटारसायकलीसह दोघेही चोर खाली पडले. तरीही ज्योती यांनी चोराचा हात घट्ट पकडून ठेवला आणि आरडाओरडा सुरू केला. आवाज ऐकून आकाश बाबू वडवराव आणि अजय झेंडे या सजग नागरिकांनी त्यांची चारचाकी रस्त्याला आडवी केली. त्यामुळे दुचाकी सोडून एका चोराने पळ काढला. दुसरा हाती लागला. त्याने कुकरी काढली आणि धमकाविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत जमलेल्या गर्दीने हत्याराला भीक न घालता त्याला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले.

साखळीचोरांना कसा धडा शिकवावा, याचा धडाच ज्योती यांच्या धाडसाने मिळाला. त्याबद्दल पोलिसांनीही त्यांचे अभिनंदन केले. मच्छिंद्र हरिश्‍चंद्र येवले (वय 23, रा. डोंगरकिणी, ता. पाटोदा, जि. बीड) असे या चोराचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. विमाननगरात राहणाऱ्या ज्योती यांच्या पतीचे वर्कशॉप आहे. त्यांना दोन विवाहित मुली आहेत.

वृत्तपत्रांमध्ये साखळीचोरीच्या बातम्या रोजच येतात. त्या वाचते. त्यामुळे मोटारसायकलस्वारांच्या हालचालींचा लगेच संशय आला. सावध झाले. म्हणून चोर पकडता आले.
- ज्योती देशपांडे

अशोक, पियुपरी, यांना विशेष धन्यवाद! खूपच चांगल्या बातम्या इथे टाकल्या बद्द्ल....
आपण टाकलेल्या या बातम्या माझ्या नजरेतून सुटल्या होत्या.

चैत्राली, केदार जाधव यांचे ही आभार...

सर्वच प्रतिसादकांचेही मनापासून आभार. आपले प्रोत्साहनपर शब्द माझ्यासाठी खूपच मोलाचे आहेत.

अलका_काटदरे - आपल्याला हा धागा पाहून खूप दिवसांनी लिहावेसे वाटले हे वाचून छान वाटले. आपल्याकडच्या चांगल्या / प्रेरणादायी बातम्यापण येऊद्या!

झक्की - असे म्हणेन की आपण काळाच्या पुढे होता / आहात. कृपया आपण अमेरिकन / भारतीय असे काही मनात आणू नका, जगाच्या पाठीवर सगळीकडे माणूस उडीदच.

मी सध्या एका "मैत्री" नावाच्या सामाजीक संस्थेशी संलग्न आहे. संस्थेच्या चांगल्या कामांकरता मदत मिळवण्यासाठी एक अभिनव कल्पना प्रत्यक्षात उतरली त्याची बातमी.....
फार जूनी नसल्याने (२ जानेवारीच्या मटात आली होती) इथे टाकत आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17849124.cms

एका सोशल लग्नाची लाखाची गोष्ट! (ह्यांचे वेगळे आहे)

तो आणि ती दोघेही उच्चशिक्षित...मनात आणले असते तर धूमधडाक्यात लग्न करू शकले असते. पण त्यांनी असे वाजतगाजत लग्न करण्यापेक्षा आपल्याप्रमाणेच इतरांची स्वप्नपूर्ती कशी होईल , याचा वस्तुपाठ घालून दिला.

लग्नात आपल्याला आहेर न करता मेळघाटातील कुपोषित बालकांसाठी काम करणाऱ्या ' मैत्री ' या संस्थेला मदत करण्याचे आवाहन त्यांनी नातेवाइकांना केले आणि अवघ्या पाच तासात तब्बल एक लाख २० हजार ७०० रूपयांचा निधी जमला.

गायत्री आणि प्रसाद यांच्या लग्नाची ही गोष्ट. गायत्री ही अमेरिकेतील ओहायो युनिव्हर्सिटीतून केमिस्ट्रीत पीएचडी झालेली. तर प्रसादने आयआयटी मुंबईतून अॅडव्हान्स डिझायनिंगमध्ये पीएचडी केलेली. गायत्रीने आयआयटी कानपूरमध्ये शिकत असताना प्रसादही काही काळ तेथे शिकत होता. तेथेच महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून त्यांचे सूर जुळले आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघेही विवाहबंधनात अडकले.

लग्नानिमित्त पुण्यात आयोजित स्वागत समारंभात एखाद्या सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांना बोलावून आपल्या मित्र-मैत्रिणींना त्या संस्थेला मदत करण्याचे आवाहन करायचे , असे प्रसाद आणि गायत्रीने ठरविले. दोघांच्या कुटुंबीयांनीही त्यांना पाठिंबा दिला. मेळघाटातील कुपोषित बालकांसाठी काम करणाऱ्या ' मैत्री ' संस्थेलाच बोलविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ' मैत्री ' च्या स्वयंसेवकांनीही होकार दिला आणि या स्वागत समारंभावेळी ' मैत्री ' चे तीन स्टॉल तेथे उभारण्यात आले.

' मैत्रीचे प्रकल्प आणि काही वस्तू आम्ही तेथे मांडल्या होत्या. त्यांना भेट देत उपस्थितांनी उपक्रमांची माहिती घेतली आणि मदतीचा हातही पुढे केला. दिवसअखेर आमच्याकडे एक लाख २० हजार ७०० रूपये इतका निधी जमा झाला ,' असे मैत्रीच्या स्वयंसेवक जयश्री शिदोरे यांनी सांगितले.
' आमच्या आवाहनाला कसा प्रतिसाद मिळेल , याची आम्हाला काहीशी धास्तीच होती ; परंतु प्रत्यक्षात अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रतिसाद मिळाला. लोकांनी देणगी तर दिलीच शिवाय मेळघाटातील समस्या आणि तेथे मैत्रीच्या माध्यमातून चालणारे कामही त्यांना समजले , ही बाबच आमच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची आहे ,' असे गायत्री आणि प्रसादने सांगितले.

समाजकार्याची शपथ

' आम्ही समाजाच्या शेवटच्या थरापर्यंत वैभवाची फळे पोचावीत यासाठी अनुकूल भूमिका घेऊ. निर्भयतेने जगण्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी आमच्यासारखा विचार करणाऱ्यांच्या नेहमी संपर्कात राहू ,' अशी शपथ गायत्री आणि प्रसादने उपस्थित वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने घेतली.
लग्न हा एक सोशल इव्हेंट आहे. त्याचा आधार घेऊन आपल्या समाजासाठी काहीतरी करावे , या कल्पनेतून आम्ही हा निर्णय घेतला. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत.

- गायत्री आणि प्रसाद

ही अतिशय अभिनव संकल्पना होती. आम्हाला देणगी तर मिळालीच , पण लोकांना संस्थेची माहिती झाली. अनेक व्यक्ती ' मैत्री ' शी जोडल्या गेल्या. गायत्री आणि प्रसादच्या मित्र-मैत्रिणींकडून अजूनही ऑनलाइन देणग्या येत आहेत.

- जयश्री शिदोरे , स्वयंसेवक , मैत्री

नुकत्याच माझ्या (अल्मा मेटर) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडलेल्या सर विश्वेश्वरैया स्मृती करंडक वाद-विवाद आणि वक्तृत्व स्पर्धेत, एका विद्यार्थिनीने केलेल्या तिच्या भाषणात डॉ. अब्दुल कलाम राष्ट्रपती असतांना, इस्त्राएलच्या दौर्‍यावर असतांना झालेल्या एका घटनेबद्दल (त्यांच्या एका पुस्तकात लिहिलंय असं) सांगत होती.
की इस्त्राएल मध्ये प्रचंड मोठा हल्ला झाला आणि बरीच लोक मारली गेली. दुसर्‍या दिवशी कलामांना वर्तमानपत्रात ह्या हल्ल्याची बातमी पहिल्या पानावर येणं अपेक्षित होतं, ठळक अक्षरांत वगैरे... परंतू त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, की त्या देशात चाललेल्या पॉजिटीव्ह गोष्टींबद्दल, सुधारणा आणि प्रगतीबद्दलच्या बातम्या पहिल्या पानावर होत्या. आणि कालच्या हल्ल्याची बातमी मधल्या कुठल्याशा पानावर छोटीशी दिली होती. ह्यातून त्या देशाचे प्रसारमाध्यमं कशाप्रकारची भुमिका निभावतात याकडे लक्ष वेधले जाते.

हर्पेन : धाग्याची संकल्पना आवडली Happy

हर्पेन, पुन्हा एकदा धन्यवाद ह्या धाग्याबद्दल. माझ्या निवडक दहात. नवीन पोस्ट्स न चुकता वाचत राहणार.

पुणे - मंगळसूत्र हिसकावून घेतले... चोर पळून गेले आणि वहिनी, ताई, काकू, मावशी रडवेल्या झाल्या ही झाली परवाची गोष्ट. कालची गोष्ट भक्कम विश्‍वास देणारी. मंगळसूत्र हिसकावण्यासाठी आलेल्या चोरांना ज्योती देशपांडे यांनी असा हिसका दिला, की ते पार कोलमडले. धडपडले. त्यातला एक हाताशी लागला आणि त्याला आधी नागरिकांचा, नंतर पोलिसांचा हिसका बसला. पुण्यातील विमाननगरात घडलेली ही घटना म्हणजे राज्यभर फोफावलेल्या साखळीचोरांशी महिलांनी कसे लढावे, याचे उदाहरण ठरावे.>>>

सेम घटना मी एस वायला असताना वर्गातल्या एका मुलीसोबत झाली होती. तिनेदेखील चेन तुटली तरी त्या चोराचा हात घट्ट धरून ठेवला होता. नंतर पोलिसामधे वगैरे पण नेला होता त्या भुरट्याला. ही मुलगी माबोवर असते (ओळखा कोण?)

AP youth becomes India’s first blind CA :

The vision to achieve his childhood goal helped 23-year-old J.Rajashekar Reddy qualify the final hurdle of becoming a chartered accountant. He is the first completely blind candidate in India to manage the feat.He lost his vision owing to a damaged optic nerve caused by brain tumor at the age of 11.
I would record the classes at my coaching institute and hear lectures after returning home. Also, the questions for the practical paper are lengthy, and going over them again and again is tedious as my peers with normal vision could always go back to a certain part of the question or pick up a book and start reading right-away. For practical preparation, my teachers and volunteers had been helpful,” said the B.Com graduate from Osmania University.
My father works as an electrician and mother is a homemaker. my parents had given up on me.
My mother was worried that I chose a profession which causes stress and wanted me to relax at home,” he added.

http://newindianexpress.com/states/andhra_pradesh/article1431906.ece

CA.jpg

Pages