शुभ वर्तमान - चांगल्या बातम्या

Submitted by हर्पेन on 23 January, 2013 - 07:40

माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"

खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.

मनावर मळभ आणणार्‍या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्‍या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"

http://vishesh.maayboli.com/node/1120

चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणास्तव कोणीतरी निरपेक्ष भावनेने करत असते हे वाचून बरे वाटते. त्या अर्थाने ही एक चांगली बातमी आहे. वेळासला दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिलच्या काळात कासव महोत्सव भरतो. सह्याद्री निसर्ग मित्र संस्था, चिपळूणचे संस्थापक सदस्य श्री. भाऊ काटदरे यांच्या पुढाकाराने गेली 22 वर्षे सागरी कासव वाचविण्याचे काम सुरू आहे

सकाळ मधे आलेल्या बातमीचा हा सारांश..

या वर्षी या महोत्सवात कासवांच्या 13 घरट्यांतून 40 पिल्लांनी समुद्रात झेप घेतली.

रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीच्य भागात ऑलिव्ह रिडले या जातीची सागरी कासवं प्रजननासाठी येतात. पश्‍चिम किनाऱ्यावरील त्यांच्या प्रजनन, मादीच्या विणीविषयीच्या सवयी, असा अनेक बाजूंनी काटदरे यांनी अभ्यास केला. गेली 22 वर्षे सागरी कासव वाचविण्याचे त्यांचे काम सुरू आहे. 2006 पासून वेळास येथे कासव महोत्सवाच्या माध्यमातून ही मोहीम तीव्र करण्यात आली. आत्तापर्यंत 32 हजार कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली.

कासवांची मादी रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर येते आणि भरतीरेषेपलीकडे वाळूत सुमारे दीड फुटाचा खड्डा करून त्यात अंडी घालते. एका वेळेस ती सुमारे 100 ते 150 अंडी घालते आणि निघून जाते. अंडी घातल्यानंतर मादी पिल्लांसाठी पुन्हा परत येत नाही. साधारणपणे 45 ते 70 दिवसांच्या दरम्यान अंड्यातून पिल्ले बाहेर येतात आणि समुद्राच्या दिशेने जातात.

याबाबत बोलताना श्री. काटदरे म्हणाले, ""कासवांच्या पिल्लांना पाण्यात असलेला धोका तर आपण दूर करू शकत नाही; मात्र, त्यांचा जमिनीवरचा धोका नक्कीच टळू शकतो. अंड्यांची चोरी थांबवू शकतो. पक्षी आणि प्राण्यांनी त्यांना भक्ष्य करण्यापासून आपण त्यांचा बचाव करू शकतो. याच विचारातून त्यांनी वेळास येथे कासवांची हॅचरी उभी केली आहे. नोव्हेंबर ते मार्च हा या कासवांचा विणीचा हंगाम असतो. या काळात समुद्रकिनाऱ्यावर गस्त घातली जाते. मादीने घातलेली अंडी हॅचरीत आणली जातात. आणि पिल्लं बाहेर आली की त्यांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात येतात.''

पिल्ले सोडताना फिल्म शो केला जातो. पर्यटकांची व्यवस्था करण्यासाठी कासव मित्रमंडळाने 25 घरे तयार केली आहेत. महिला बचत गटांनी घरगुती खाद्यही विक्रीसाठी उपलब्ध ठेवले आहे.

ह्या महोत्सवामुळे निसर्गचक्राचे जतन, संवर्धन व स्थानिकांना घरबसल्या रोजगाराचे साधन प्राप्त करून देणे हे दोन्ही हेतू साध्य होतात.

खालील दुव्यावर टिचकी मारली असता ह्याबाबत अधीक माहीती आपल्याला मिळू शकेल .
http://snmcpn.in/index.php

उदय यांनी दिलेल्या दुव्यावरील बातमी:

लग्न 500 रुपयांत, शाळेला 'आहेर' पाच लाखांचा!

जनार्दन लांडे - सकाळ वृत्तसेवा
Wednesday, February 20, 2013 AT 03:15 AM (IST)
Tags: rutuparn matkar, marriage, school donation, shevgav

शेवगाव - घरची आर्थिक स्थिती चांगली असूनही, उच्चशिक्षित ऋतुपर्ण मतकर याने अवघ्या 500 रुपयांत "दोनाचे चार' केले. विवाहसमारंभात वाचविलेले पैसे त्याने "आपण समाजाचे देणे लागतो' या भावनेने आणि गावाशी असलेले नाते अधिक घट्ट करण्यासाठी पाचेगावच्या शाळेच्या वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी दिले! ही रक्कम आहे पाच लाख रुपये!!

शेवगावातील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण मतकर व पुण्यातील फर्गसन महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. शर्मिष्ठा मतकर यांचा एकुलता एक मुलगा ऋतुपर्णचा विवाह आणि त्यानिमित्त शाळेला केलेला "आहेर' सारीकडे चर्चेचा विषय ठरला.

अमेरिकेतून उच्च शिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर ऋतुपर्ण पुण्यातील एका बहुराष्ट्रीय उद्योगात मोठ्या पगाराची नोकरी करतो. पुणे विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. एस. वाय. पाटील यांची मुलगी आसावरी हिच्याशी त्याचा विवाह ठरला. विवाह साध्या पद्धतीने करण्याचा प्रस्ताव ऋतुपर्णने मांडला. त्याला मतकर दांपत्य आणि पाटील कुटुंबीयांनी संमती दिली. त्यानुसार विवाहनोंदणी करून पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेत फक्त 501 रुपयांमध्ये वैदिक पद्धतीने दोघांचे शुभमंगल झाले.

वाचवलेल्या रकमेचा विनियोग समाजासाठी करण्याचे ऋतुपर्णने ठरवले. आजी कलावती यांच्या स्मरणार्थ आपल्या मूळ गावी - पाचेगाव (ता. नेवासे) येथील न्यू इंग्लिश स्कूलला खोल्या बांधण्यासाठी पाच लाख रुपये देण्याचे त्याने निश्‍चित केले. या रकमेचा धनादेश शाळेच्या पदाधिकाऱ्यांना त्याने नुकताच दिला.

मतकर दाम्पत्यानेही पंचवीस वर्षांपूर्वी साध्या पद्धतीने विवाह केला होता. आई-वडिलांच्याच पावलावर, किंबहुना त्यांच्या पुढे एक पाऊल टाकत ऋतुपर्णने विवाहातील खर्च टाळून गावाशी असलेले अधिक दृढ केले. शाळेला दिलेल्या या देणगीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

विशेष म्हणजे उदय आणि हर्पेन यानी दिलेली वरील स्तुत्य उपक्रमाची बातमी वाचत असतानाच ती इथे 'शुभ वर्तमान' म्हणून द्यावे या विचारातच लॉग इन झालो आणि मग दिसले की त्या जोडप्यांचे ते वृत्त इथे आलेले आहेच. फार कौतुक वाटले या निर्णयाचे आणि केवळ हे नवोदित दांपत्यच नव्हे तर मतकर + पाटील कुटुंबियदेखील अभिनंदनास पात्र आहेत.

जोडीचा फोटो मुद्दाम इथे देत आहे.... कारण असे दिसून आले आहे की कित्येक कार्यालयीन ठिकाणी अशा लिन्क्स ब्लॉक केल्या जातात.

ARitu.jpg

मतकर + पटिल कुटुम्बियान्चे मनःपुर्वक अभिनदन ...... नविन मुले पण असा विचार करु लागलि आहेत हे वाचुन फारच मस्त वाटले ........... ही बातमी जास्तित जास्त लोकान पर्यन्त पोहॉचणे गरजेचे आहे .;

नक्की हे हास्य असेच कायम राहिल, दिनेश..... मला खूप आनंद झाला आहे, तो अशासाठी की या दोघांनी स्वतःहून हा निर्णय घेतला आणि तो अंमलातही त्यांच्या बरोबरीच्या लोकांनी आणला, हे विशेष.

या आठवड्यात काही राजकीय पुढार्‍यांच्या मुलामुलींच्या लग्नाच्या थाटमाटाच्या बातम्या झळकत आहेत त्या वाचलयवर/पाहिल्यावर जिथे त्या पक्षाच्या अध्यक्षाला चक्कर आली, तिथे अन्यांचे काय ? हा प्रश्न पडला असतानाच गोबीच्या वाळवंटात अशी हिरवीगार झुळूक अनुभवयाला मिळाही अशाच धाटणीचा हा मतकर पाटील विवाह समारंभ म्हटला पाहिजे.

मला वाटते इथेच गेल्या महिन्यात पुण्यातील एका स्वागत समारंभाची बातमी दिली होती, जिथे त्या दांपत्याने जमा झालेली सारी रक्कम [जी जेवळपास दोन लाखापर्यंत होती] आदिवासी मुलांच्या उन्नतीसाठी झटणार्‍या 'मैत्र' संस्थेला देऊन एक चांगला पायंडा पाडला.

[हर्पेनला हे जोडपे माहीत असावे]

अशोक पाटील

महाराष्ट्र टाईम्स मधील एक चांगली बातमी (शेवट्चे वाक्य सर्वात चांगले)

मराठी भाषादिनापासून श्राव्य-पुस्तके अर्थात 'ऑडिओ बूक'

मराठी साहित्याचा ठेवा 'ऑडिओ बुक'च्या माध्यमातून जतन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे आत्मचरित्र 'कृष्णाकाठ', ज्ञानपीठ विजेते साहित्यिक विंदा करंदीकर आणि कुसुमाग्रज यांच्या प्रत्येकी दोन कवितासंग्रहांसह समर्थ रामदासांचा दासबोध पहिल्या टप्प्यात ऑडिओ बुकच्या स्वरूपात आणण्यात आला आहे.

२७ फेब्रुवारीला मराठी भाषादिनी हा ठेवा मराठी सारस्वतासाठी खुला होईल. राज्य सरकारने पुढाकार घेऊन सुरू केलेला हा प्रकल्प राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. महत्त्वपूर्ण साहित्याचे डॉक्युमेंटेशन ऑडिओ बुकच्या माध्यमातून करण्याचा हा प्रयत्न असून, यात संतसाहित्य, साहित्य अकादमी आणि राज्य पुरस्कार प्राप्त दर्जेदार साहित्याचा समावेश आहे.

या ऑडिओ साहित्यिकांमध्ये कुसुमाग्रज यांच्या 'प्रवासी पक्षी', 'रसयात्रा' आणि विंदा करंदीकर यांच्या 'संहिता', 'आदिमाया' या कवितासंग्रहातील कविता डॉ. श्रीराम लागू, सुलभा देशपांडे, चंद्रकांत काळे, डॉ. गिरीश ओक, सुबोध भावे, अमृता सुभाष, सचिन खेडेकर, किशोर कदम यांच्यासह इतरही नामवंत अभिनेत्यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आल्या आहेत. राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. अशोक सोलणकर यांनी 'मटा'ला या उपक्रमाची माहिती दिली. 'मराठी साहित्य जतनाच्या संदर्भातील हा महत्त्वाचा उपक्रम आहे.

त्याच्या पुढील टप्प्यात 'तुकाराम गाथा', 'ज्ञानेश्वरी' आणि ज्ञानपीठ विजेत्या वि. स. खांडेकर यांचे साहित्यही ऑडिओ बुकमध्ये आणण्यात येईल.' 'दासबोध' स्वरबद्ध करणे ही मोठी जबाबदारी असल्याचे मत संगीतकार राहुल रानडे यांनी व्यक्त केले.

ऑडिओ बुक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावीत या हेतूने डाउनलोड सहज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, राज्य मराठी विकास संस्थेच्या वेबसाइटवरून ती वाचकांना २७ फेब्रुवारीनंतर विनामूल्य डाउनलोड करता येतील.

अशोक. - ते जोडपे म्हणजे, गायत्री आणि प्रसाद. ती बातमी मीच इथे पोस्ट केली होती, पण मी व्यक्तीशः त्या जोडप्याला ओळखत नाही. तसेच बातमी मटा मधे छापून यायच्या आधीच ही गोष्ट मला माहित झाली होती.

https://www.facebook.com/ayushyawar.bolu.kahi.vny.cmyk

शाबास पहेलवान, दुष्काळग्रस्तांना दिला लग्न खर्च !!

राज्यात दुष्काळ सुरू असताना अनेक नेते वेगवेगळ्या सोहळ्यांसाठी उधळपट्टी करत आहेत. तर काही ठिकाणी दुष्काळाचाही गैरफायदा घेतला जातोय. पण, यातही आंतरराराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या हिंद केसरी अमोल बुचडे यानं एक आदर्श घालून दिला आहे. त्यानं कुठलाही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणानं लग्न केलं आणि सर्व पैसा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी दिला आहे.

182679_558071694227793_2139805246_n1.jpg

हर्पेन, सॉरी खूप दिवसांनी इथे आले.

१. सागायम हे मदुराईचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर. Melur, Kilayur and Keezhavalavu इथल्या उस आणि पॅडीच्या शेताखाली असलेल्या ग्रॅनाईटच्या साठ्यामुळे बेकायदेशीर पणे उत्खनन चालल्यचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे सुपीक जमीन आणि पाण्याचे साठे ह्यांचं नुकसान होत होतं. कलेक्टरने तामिलनाडू सरकारला १३ पानी रिपोर्ट पाठवला. ४ दिवसांत बदलीची नोटीस आली - Tamil Nadu Handloom Cooperative चा एम डी म्हणून.२१ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांची ही १९ वी ट्रान्सफर.

पण त्यांच्या रिपोर्टचा परिणाम असा झाला की १५ कंपन्याविरुध्द २८ केसेस पोलिसांनी दाखल केल्या. ह्यात एक केस दयानिधी अलागिरी उर्फ दुराई - करुणानिधीचा नातू - ह्याच्यावरही आहे.

ह्या लेखाप्रमाणे दुराई फरार आहे. If convicted, Dayanidhi faces a prison term of up to three years, and a loss of Rs.240 crore will recovered from Olympus, in addition to a fine of Rs.12 crore.

सागायमच्या लहानपणचा एक किस्सा:

Playing with his friends one day under the trees, he’d found a windfall of ripe fruit, which the children collected and took home to their mothers. Sagayam’s mother was furious, he remembers, and made him throw the fruit even when he protested that nobody had seen him and that everyone else had done the same thing.

“Just because all the others are doing a wrong thing it does not become right,” she told him—a lesson that the adult Sagayam repeats like a mantra.

त्यांचा सेक्रेटरी म्हणतो

“I have seen 17 IAS officers in my career and most of them are honest,” said G. Krishnamurthy, Sagayam’s secretary, “but Sagayam is different in the sense that he expects the system to be clean and will not hesitate to punish his subordinates, while the other officers may be honest but will overlook if corruption is around the place, thinking ‘if I report then I would have to take wrath of these people’.”

२. http://www.livemint.com/Politics/hfYKI3nSyGrkIRYg9LNOwJ/When-Mowgli-met-...

हर्पेन, तुमच्या पोस्टनुसार लेखातला काही भाग कॉपीपेस्ट करत आहे

Sikkim: In the upper reaches of Sikkim, there can’t be too many government servants who can actually keep up with and even outrun the sturdy Lepchas, also known as the Rong. Indian Forest Service (IFS) officer Sandeep Tambe is one such rarity. But his recent contribution to the region has been much more vital in nature.

Four years ago, Tambe met a delegation of Lepcha elders who were troubled as the usually bountiful Himalayan mountain springs—locally known as Mohaan, Kuaan and Dhara—were fast drying up because of the usual reasons: increasing population, burgeoning livestock, soil erosion, erratic rainfall, deforestation, forest fires, road construction.

The solution that Tambe hit upon was spring-shed development, which is based on the principles of rainwater harvesting.

The novelty lies in sustainably developing the spring-shed to increase the percolation of rainwater and thus recharging the ground water. The concept of water harvesting was a completely alien one to the people of the region as scarcity was new to them.
Today, the mountain springs once again gurgle with water—testimony to the success of an initiative that has won the Ground Water Augmentation Award from the ministry of water resources. Tambe credits teamwork for the success of the water conservation effort.

To help reverse the scarcity, Tanbe sought the expertise of WWF-India, the People’s Science Institute (PSI) in Dehradun and the State Institute of Rural Development in Jorethang, Sikkim, to start the spring-shed conservation programme, better known as Dhara Vikas, to rejuvenate the dying springs.

The once well-forested spaces that used to act as water catchment areas had been reduced to a few trees, limiting the percolation of rainwater and creating the hydrological imbalance.

It was estimated that less than 15% of the rainwater was percolating down to recharge the underground springs, while the rest was flowing down as run-off, often causing floods. Global warming and erratic weather patterns had also hurt the spring water resources of Sikkim. The situation was worsened by rain falling in short bursts and extreme weather events becoming more frequent.

The main challenges Tambe and his team faced initially were identifying recharge areas accurately, developing local capacity, encouraging rainwater harvesting in farmers’ fields, and sourcing public financing.

“Water supply programmes have traditionally received priority in public financing, but with the drying up of spring water sources, water supply schemes have taken a beating,” said Tambe.

It was found that the farming practice most amenable to spring recharge was paddy cultivation and in locations where farmers had discontinued agriculture, water sources located downstream had started drying up.

Civil structures such as check dams were unstable and not sustainable on such steep terrain, given the weak geology prone to frequent cloud bursts and heavy rainfall. The non-governmental organizations involved put together a number of engineering measures to harvest rainwater such as conserving soil and moisture with contour trenches and pits, gully plugs and bunds on terraces.
The desilting of dried-up ponds and lakes was among the many interventions that were central to the success of Dhara Vikas.

Further greening measures included brushwood check dams, the planting of shallow-rooted grass that doesn’t need much water, shrubs, hedgerows and trees.
Restrictions were imposed on livestock grazing, fuel-wood gathering and fodder cutting. The recharge area was fenced off.

Work is now under way to revive five springs in the south, east and west districts. Information on nearly 200 springs has been collected and a “web atlas” application that shows village springs being developed to make the information accessible to all users. Weather stations are being set up to record atmospheric changes. The next step is to artificially recharge the Nagi Lake in Namthang by harvesting spring water.

इथे मंडळींनी त्यांना आलेले चांगले अनुभव लिहिले आहेत. त्यात माझी भर.

१. ऑफिसमधून बाहेर पडल्यावर रिक्षा मिळवायला नाक्यावर ४-५ रिक्षावाल्यांना तरी विचारावं लागतं. त्या दिवशी संध्याकाळी समोर दिसला त्या पहिल्या रिक्षावाल्याला विचारलं. तिथे २ वाहतूक पोलिस उभे होते त्यांच्याकडे माझं लक्ष नव्हतं. रिक्षावाला काही बोलायच्या आत त्यातला एक म्हणाला 'बसा, बसा मॅडम. त्यांना विचारायची गरज नाही'. मी म्हटलं 'आज तुम्ही आहात म्हणून घेऊन जातील. उद्या काय?' तर तो म्हणाला आम्ही रोजच असणार आता इथे. खरंच संध्याकाळी असतात ते दोघं तिथे.

२. ऑफिसला जाताना बसमध्ये एका स्टॉपवर एक सिनियर सिटिझन बाई चढल्या. सगळ्या जागा खचाखच भरल्या होत्या. समोरची एका माणसाची सीट भरली होती पण तो माणूस ढिम्म. एव्हढ्यात माझ्या मागे बसलेल्या बाईने काहीतरी नाव घेऊन हाक मारली. त्या एक माण्साच्या सीटमागे सिनियर सिटिझन्स्/अपंगांसाठी सीट असते त्यात खिडकीतून बाहेर बघत बसलेल्या मुलाने वळून पाहिलं. माझ्या मागे बसलेली बहुधा त्याची आई असावी. तिने त्याला उठ म्हणून सांगितलं. तो मुलगा ताडकन उठला आणि त्या सिनियर सिटिझन बाईकडे हसून बघत त्याने जागा करून दिली. मग मागे आईकडे आला. मला त्या बाईचं खूप कौतुक वाटलं. कसं वागावं ह्याचा मस्त धडा तिने मुलाला दिला. आणि आताची पिढी आईबापांचं काही म्हणून ऐकत नाही अशी ओरड होत असताना त्या मुलाने हसतमुखाने आईचं म्हणणं ऐकलं. खूप छान वाटलं.

सरकारचे महाराष्ट्रातील किल्ल्यांकडे अजिबात लक्ष नाही. परंतु दुर्गविकसन करणारी शिवाजी ट्रेल नामक एक संस्था आहे. हीच बाब मोठी दिलासादायक आहे. अशा अनेक संस्था होवोत.
-गा.पै.

@ हीच बाब मोठी दिलासादायक आहे. अशा अनेक संस्था होवोत.>>> धन्यवाद गामा पैलवान... मला हा ग्रुप/विभाग माहितीच नव्हता... महत्वाच्या बातम्या इकडे हायलाइट करणं अतिशय छान आहे. Happy

स्वप्ना राज, खूप चांगल्या पोस्ट्स्. (पण दुसरी पोस्ट प्रयत्नपूर्वक वाचावी लागली, माबो वर आले की फार इंग्रजी वाचता येत नाही :)) आपल्या शेवतच्या पोस्ट मधला दुसरा अनुभव, हा खरोखरच 'कसं वागावं ह्याचा मस्त धडा'

गापै - परंतु दुर्गविकसन करणारी शिवाजी ट्रेल नामक एक संस्था आहे. हीच बाब मोठी दिलासादायक आहे. सत्यवचन!

अत्रुप्त आत्मा - मला हा ग्रुप/विभाग माहितीच नव्हता... महत्वाच्या बातम्या इकडे हायलाइट करणं अतिशय छान आहे. इथे एकदा याल, तर पुन्हा पुन्हा येत रहाल Happy
गडाकिल्ल्यांच्या सहवासात आपणास अनेकानेक सकारात्मक अनुभव आले असतीलच, इथे जरूर टंका.

भारती, स्वाती - टंकल्यावर जाणवले, ती बातमी २७ नंतरच (पडताळून पाहून) इथे टंकायला हवी होती. Happy

मटा ऑनलाइन वृत्त । श्रीहरीकोटा

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18657185.cms

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) सोमवारी पीएसएलव्ही-सी-२० रॉकेटच्या सहाय्याने सात उपग्रह अंतराळात पाठवणार आहे. यात भारत-फ्रान्सची संयुक्त निर्मित असलेल्या सरल या चारशे किलो वजनाच्या उपग्रहाचा समावेश आहे.

सरल व्यतिरिक्त कॅनडाच्या सफायर (वजन - १५० किलो) आणि निओसॅट (वजन - ८० किलो), ऑस्ट्रियाच्या ब्राइट आणि युनीब्राइट, इंग्लंडच्या स्टँड-१ आणि डेन्मार्कच्या आउसॅट-३ या सहा उपग्रहांनाही पीएसएलव्ही अंतराळात नेणार आहे.

नियोजीत उड्डाणासाठी सतीश धवन अंतराळ केंद्रात शनिवारी सकाळी ६.५६ वाजल्यापासून उलटी मोजणी (काउंटडाऊन) सुरू आहे. वेळापत्रकाप्रमाणे सोमवारी संध्याकाळी ५.५६ वाजता उड्डाण होणार आहे.

आतापर्यंत २१ यशस्वी मोहिमा करणा-या पीएसएलव्हीची ही २३ वी मोहीम आहे. या मोहिमेत २९५ टन वजनाचे आणि ४४ मीटर लांबीचे पीएसएलव्ही-सी-२० रॉकेट सात उपग्रह घेऊन अंतराळात जाणार आहे. पृथ्वीपासून सुमारे ७८५ किमी अंतरावर टप्प्याटप्प्याने सर्व उपग्रह अंतराळात सोडले जाणार आहेत.

पीएसएलव्हीवर सात उपग्रहांचे मिळून तब्बल ७०० किलोचे पेलोड आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सात उपग्रहांपैकी सहा उपग्रह विदेशी संस्थांचे आहेत. त्यामुळे ही मोहीम इस्त्रोसाठी अतिशय प्रतिष्ठेची मोहीम आहे.

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार उड्डाण

पीएसएलव्ही-सी-२० चे उड्डाण पाहण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, इस्त्रोचे सर्व वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहे.

तांत्रिक कारणामुळे उड्डाणाची वेळ बदलली

पीएसएलव्ही-सी-२० चे उड्डाण आधी मागच्यावर्षी म्हणजे १२ डिसेंबर २०१२ रोजी होणार होते. मात्र तांत्रिक कारणामुळे उड्डाण सोमवार २५ फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलण्यात आले.

>>राज्य मराठी विकास संस्थेच्या वेबसाइटवरून >> हर्पेन, तुम्हांला ही साईट माहिती असली तर द्याल का कृपया? Happy

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ( इस्त्रो ) सोमवारी पीएसएलव्ही - सी - २० रॉकेटच्या सहाय्याने सात उपग्रह अंतराळात पाठवले . ठरलेल्या वेळेनुसार आज संध्याकाळी ५ . ५६ वाजता पीएसएलव्ही - सी - २०ने श्रीहरीकोट्टाच्या सतीश धवन उड्डाण केंद्रावरुन प्रेक्षेपीत करण्यात आले . या मोहिमेत भारत - फ्रान्सची संयुक्त निर्मित असलेल्या सरल या चारशे किलो वजनाच्या उपग्रहाचा समावेश आहे .

सरल व्यतिरिक्त कॅनडाच्या सफायर ( वजन - १५० किलो ) आणि निओसॅट ( वजन - ८० किलो ), ऑस्ट्रियाच्या ब्राइट आणि युनीब्राइट , इंग्लंडच्या स्टँड - १ आणि डेन्मार्कच्या आउसॅट - ३ या सहा उपग्रहांनाही पीएसएलव्हीने अंतराळात सोडले .

आतापर्यंत २१ यशस्वी मोहिमा करणा - या पीएसएलव्हीची ही २३ वी मोहीम आहे . या मोहिमेत २९५ टन वजनाचे आणि ४४ मीटर लांबीचे पीएसएलव्ही - सी - २० रॉकेट सात उपग्रह घेऊन अंतराळात प्रवेश केला आहे . पृथ्वीपासून सुमारे ७८५ कि . मी . अंतरावर टप्प्याटप्प्याने सर्व उपग्रह अंतराळात सोडले जाणार आहेत .

पीएसएलव्हीवर सात उपग्रहांचे मिळून तब्बल ७०० किलोचे पेलोड आहे . महत्त्वाची बाब म्हणजे , सात उपग्रहांपैकी सहा उपग्रह विदेशी संस्थांचे आहेत . तसेच २०१३ सालातील इस्त्रोची ही पहिलीच मोहीम असल्याने ही मोहीम इस्त्रोसाठी अतिशय प्रतिष्ठेची मोहीम आहे .

बालाजीचे आशीर्वाद

पीएसएलव्हीचे महत्त्वाकांक्षी उड्डाण यशस्वी व्हावे यासाठी इस्रोचे प्रमुख के . राधाकृष्णन यांनी रविवारी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले होते ! कोणत्याही उड्डाणापूर्वी राधाकृष्णन न चुकता बालाजीचे दर्शन घेतात .

मला माझ्या बेंगलोरच्या एका मित्राकडून आलेली मेल
Joy in poverty!

As part of the Udyam Scholarship program, we conduct a test, an essay competition and a personal interview. Here are some snippets of the interviews held recently to identify Udyam Scholars 2013-2014:

A frail looking girl comes in, takes her seat and is being asked general questions. We ask her what she wants to do. And she says with confidence that she wants to become a Doctor. She articulates why she wants to become a Doctor and how she wants to help the poor people and all that. One of the members has a question on her family background; the child breaks down. No amount of comforting helps her. We give her water. No help. We give her more time. That doesn’t help ether. Then, we warn her the interview will be called off…….slowly but surely the girl is able to speak again. Hesitantly, she says….”Sir, my father sells “Bajjis and Bondas, on the roadside” (Fritters for those not familiar with Kannada). “Why do you have to cry for that?” asks a member. “Sir, I am ashamed to admit that fact. My classmates and friends tease me if I tell them that”. Inside me I know, how much joy her father is giving to hundreds of people who eat his bajjis and bondas!

Well done my child. You are the second topper in the school; you have done well in your test, essay and interview. You are very “RARE” indeed. Wish you the very best.

Another frail looking boy walks in and is asked to take a seat. The drill of asking questions continues. Time to ask him what he wants to be when he grows up. He is very bold and with great confidence he says he wants to be an Astronomer! Why Astronomy we ask. He says he wants to discover something new in space. A colleague reminds him, that whatever is to be discovered has already been and there is nothing new. He says, “Sir that is not correct. The space is infinite and there are many more to be discovered.” Impressive. Another member asks him about the status of Pluto and why it has been removed from the list of planets. His answer deserved a (Junior) Nobel prize if there was one! Beautiful. Another member asks him about how he plans to become an Astronomer. He rattles a list of institutions in India where they offer Programs at undergraduate, graduate and PhD levels. Very impressive! We tell him when children are aspiring to become software engineers since it is a highly paying job, his answer; The joy of discovering something unknown is more than the money a software engineer earns! We were all floored with his response.

We ask him about his family background. “Sir my father is an Auto Rickshaw Driver and he has managed to complete only 10th standard”.

Wonder where the kids get their inspiration from!

Good luck to you my child. You are the school topper; you have done very well in test, essay and interview. May you be “VICTORIUS”.

Talking to these children, who are supposed to be from the underprivileged sections of society, strengthens my belief in the theory of “Karma”. For an outsider, they are from the poor class, they live in below normal conditions, and their parents do not have education and paying jobs. How these children rise above all the negative things………..is a mystery.

For me, I do not want to see them as children of Auto Rickshaw drivers or people who sell street food. I see that in spite of the backgrounds, from which they come, they study well, they are articulate and moreover they are passionate! Perfect candidates for Udyam Scholarship program.
खूप अभिमान वाटला हे वाचून,
खरच हे खूप सुखकारक आहे

‘जात’ वगळण्याची मुभा द्या!

जात' हा शब्द व्यक्तिस्वातंत्र्यविरोधी असून त्यामुळे राष्ट्रीय भावना निर्माण होण्यास अडथळा होतो. त्यामुळे 'जात' वगळण्याची मुभा द्यावी,' असा ठराव भारतीय बौद्ध महासभेच्या राज्य अधिवेशनात करण्यात आला.

जात वगळण्याच्या ठरावाबद्दल बौद्ध महासंघाचं अभिनंदन. जातीबरोबर येणारे फायदे पण सोडणार का, ते वरील बातमीवरून कळत नाही. काहीका असेना सुरूवात झाली हे महत्त्वाचं. हळूहळू आरक्षणेही बंद होतील अशी आशा आहे.

-गा.पै.

पदवीचे प्रमाणपत्र हातात पडण्यापूर्वीच पुण्याचा अब्दुल्ला फकी कंपनी सेक्रेटरी अर्थात ' सीएस ' झाला आहे. इतकेच नाही , तर तो ' सीएस प्रोफेशनल प्रोग्रॅम ' या सीएस अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत संपूर्ण भारतात पहिला आला आहे. ' सीएस ' च्या अंतिम परीक्षेत इतक्या लहान वयात प्रथम येण्याचा बहुमान मिळवणारा तो बहुदा पुण्याचा पहिलाच विद्यार्थी आहे.
विशेष म्हणजे अब्दुल्लाने कोणताही खासगी क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे.

मटा मधील बातमीचा दुवा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18683306.cms

मानसिक विकलांगांच्या आधारवड - नाशिकच्या रजनीताई

मटामधल्या बातमीचा दुवा
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18665184.cms

बुद्ध्यांक कमी आहे म्हणून ज्या काळात मानसिक विकलांगांना वेडे ठरविले जात होते त्या काळात मूळ शिक्षकाचा पिंड असलेल्या रजनीताई लिमये यांनी दाखवून दिले की , याच मुलांना योग्य शिक्षण दिल्यावर ते त्यांच्या पायावर उभे राहू शकतात. अनेक प्रतिकूलता पार करत गेली ३५ वर्षे मानसिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचा आधारवड ठरलेल्या रजनीताईंच्या कार्याविषयी ...

मानसिक विकलांगता हे आयुष्याला लागलेले पाप आहे , असा अपसमज असताना त्याविरोधात खंबीरपणे उभे राहण्याचे धाडस रजनीताई लिमये यांनी दाखवले. ३५ वर्षांपूर्वी त्यांनी मानसिक विकलांगांसाठी नाशिकमध्ये पहिली शाळा काढली. आजवर या शाळेने कित्येक विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे.

रजनीताई लिमये त्यावेळी ' पुष्पावती कन्या विद्यालया ' त शिक्षिका म्हणून काम करीत होत्या. १ जानेवारी १९७७ रोजी नाशिकच्या सम्राट हॉटेल शेजारील ' आनंदभुवन ' या वास्तूत पाच मतिमंद मुलांना घेऊन त्यांनी शाळेची सुरूवात केली. आज शाळेचे वय ३५ आहे , तर रजनीताईंचे ७५. विख्यात शिक्षकतज्ज्ञ ग. वि. अकोलकर यांचे मार्गदर्शन , डॉक्टर शिरीष सुळे यांचे वैद्यकीय साह्य , कमलताई सारडा यांची आर्थिक मदत व रावसाहेब ओक यांनी शाळेसाठी दिलेली जागा अशा शिदोरीवर त्यांचे काम सुरू झाले. प्रबोधिनीत रोजच वेगवेगळ्या मुलांची भर पडत होती. त्यामुळे ताईंना पैशांसाठी कसरत करावी लागत होती. सरकारी मान्यतेसाठी प्रबोधिनीला समाजकल्याण विभागाने तीन अटी घातल्या. त्या म्हणजे शाळेला मोठी जागा , मुलांची सरासरी हजेरी पंधरा , व शिक्षक प्रशिक्षित असावा. पहिल्या दोन अटींची पूर्तता शक्य होती , पण प्रशिक्षित शिक्षकांचा प्रश्न होता. त्यावेळी ताईंनी स्वतः पुण्याला जाऊन त्या संदर्भातील प्रशिक्षण पूर्ण केले. त्यावेळी पती भाई अर्थात नागेश लिमये यांनी त्यांना मोलाची साथ दिली. हळूहळू प्रबोधिनीचा विस्तार होत गेला. पाच मुलांसह एका खोलीत सुरू झालेली शाळा मोठ्या इमारतीत भरू लागली. आज शाळेत ३४० विद्यार्थी आहेत. सुसज्ज फिजिओथेरपी सेंटर , मोठी कार्यशाळा , बालवाडी , सुंदर बगिचा , बसगाड्या आदी गोष्टी देणगीदारांच्या मदतीने झाल्या. प्रबोधिनी विद्यामंदिर , प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळा , सुनंदा लेले विद्यामंदिर हे मानसिक विकलांगांसाठी जणू वटवृक्षच ठरले. मतिमंदत्व या विषयावर दीर्घ अभ्यास , संशोधन करून वैशिष्ट्यपूर्ण रचनेच्या इमारती ट्रस्टने उभ्या केल्या. शिक्षकाबरोबर मानसोपचार तज्ञ्ज , फिजिओथेरपिस्ट आदींच्या मदतीने मुलांच्या कुवतीनुसार व्यक्तिगत लक्ष इथे दिले जाते. व्यक्तिविकासाला संगीत , कला , व्यायामाची जोड दिली जाते. शाळेच्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांतील एका विद्यार्थ्याचे वय आज पन्नास वर्षे आहे , त्याचे आई-वडील पंच्याऐंशीच्या घरात आहेत. या शाळांमधून आज कित्येक पालकांना आपली चिमुरडी भविष्य कवेत घेताना दिसतात , त्याचे श्रेय रजनीताईंनाच आहे.

राज्यभरात मराठीसाठी लवकरच एकच फॉन्ट
प्रफुल्ल साळुंखे - सकाळ वृत्तसेवा
Wednesday, February 27, 2013 AT 01:00 AM (IST)

मुंबई - मराठी भाषा ऐकायला जशी गोड आहे तेवढीच मराठी भाषेचे अक्षरसौष्ठवही तितकेच सुंदर आहे; पण संगणकावर मराठीचा वापर करताना प्रत्येक जण आपल्या सोयीने विविध टंकांचा (फॉन्ट) वापर करतो आहे. यामुळे आपल्या भाषेचे नक्की रूप कुठले, हे आपल्याला कळतदेखील नाही. हे टाळण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. राज्य मराठी विकास संस्था आणि सी-डॅकच्या प्रयत्नाने मराठी भाषा टंक तयार करण्यात आला आहे. यापुढे मराठीमधील कुठल्याही छपाईला हा टंक बंधनकारक असणार आहे.

"माझ्या मराठीची बोलू कवितके, परि अमृतातेंही पैजा जिंके...' अशा शब्दांत संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वरांनी मराठी भाषेचे सामर्थ्य व्यक्त केलेले आहे. मराठी ऐकण्यासाठी जेवढी मधुर आहे; तसेच तिचे रूपही तेवढंच सुंदर आहे. बाजारात व्यापारी तत्त्वावर अनेक टंकाचा वापर होतो. हे पाहता मराठीचे नेमके रूप कुठले, हे आपण ठामपणे सांगू शकत नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने मराठीसंवर्धन विकासावर भर दिला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत मराठी भाषेत एकरूपता असावी, असा प्रस्ताव राज्य मराठी विकास संस्थेतर्फे सरकारला सादर करण्यात आला. याची तत्काळ दखल घेत राज्य सरकारने 2009 मध्ये वर्णमाला आणि वर्णलिपीविषयक शासन निर्णय जाहीर केला. या निर्णयानुसार मराठी भाषेच्या छपाईसाठी एकच प्रकारच्या टंकाचा वापर करण्यासाठी एक टंक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या आधारावर राज्य मराठी विकास संस्था आणि संगणक संस्था असलेल्या सी-डॅकने मराठीसाठी टंक तयार करण्याचे काम हाती घेतले. मराठी मुळाक्षरांची वळणं, आकार, उकार, वेलांटी, चिन्ह यांची रचना कशी असेल, जोडाक्षरे कशी असतील, अक्षरांच्या जाडीनुसार त्याचा आकार कसा बदलेल, अशा बारीकसारीक तपशिलांचा विचार करून चार टंक सी-डॅकने तयार केले आहेत. यातील दोन टंकांचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.

या टंकांचे काम पूर्ण झाल्यावर तो सरकारकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. त्यानंतर सरकारच्या अध्यादेशानुसार यापुढे मराठीत जी जी छपाई होईल, ती याच टंकानुसार छापणे बंधनकारक होणार आहे. हा टंक मुक्त परवान्यासह (फ्री ऍण्ड ओपन सोर्स) नुसार सर्व प्रकाशने, वृत्तपत्रे, संस्था, आस्थापने यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आयटी क्षेत्रातली गलेलठ्ठ पगाराची वाट सोडून भारतीय हवाई दलात भरारी घेणारा ठाण्याचा गुणज्ञ खर्चे ठरलाय शौर्यचक्राचा मानकरी
बातमीचा स्त्रोत मटा - आकांक्षांना गगन ठेंगणे...
दुवा - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18621740.cms

' यू डोन्ट लूज युवर लाइफ , बट यू लिव्ह युवर लाइफ हिअर... ' असे अभिमानाने सांगणारा स्क्वाड्रन लीडर गुणज्ञ खर्चे हा आयटी क्षेत्रातली गलेलठ्ठ पगाराची वाट सोडून भारतीय हवाई दलात भरारी घेण्यास रुजू झाला. अरुणाचलसारख्या प्रदेशात प्रतिकूलतेचा सामना करीत अवजड ट्रान्सपोर्ट विमानांचे सारथ्य त्याने केले आहे. यंदा तो शौर्यचक्राचाही मानकरी ठरला.

काही व्यक्तिमत्त्वांचा जन्मच मुळी मळलेल्या वाटा सोडून ' जरा हटके ' मार्गावरून चालण्यासाठी झालेला असतो. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे ठाण्यात लहानाचा मोठा झालेला गुणज्ञ खर्चे. इंजिनीअर झाल्यावर भारतात गलेलठ्ठ पगाराची नोकरी किंवा परदेशात डॉलर कमावण्याची संधी असताना गुणज्ञने हवाई दलात भरारी घेतली आणि तो शौर्यचक्राचाही मानकरी ठरला. सध्या तो भारतीय हवाई दलात स्क्वाड्रन लीडर पदावर कार्यरत आहे.

शालेय जीवनापासूनच हुशार विद्यार्थी असलेला गुणज्ञ इंजिनीअर झाला आणि आयटी क्षेत्रात गलेलठ्ठ पगाराची नोकरी करू लागला. त्याचे वडील टेलिग्राफ कार्यालयात , तर आई महापालिका शाळेत शिक्षिका. अशा मध्यमवर्गीय कुटुंबातला हा एकुलता एक मुलगा साधारण दीड वर्ष हेक्झावेअर टेक्नॉलॉजीजमध्ये स्थिरावल्याने आता समाजाच्या दृष्टीने ' सेटल ' होण्याच्या मार्गावर होता... मात्र वडिलांनी आणलेला कम्बाइन्ड डिफेन्स सर्विसेसचा फॉर्म त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. उपजत हुशार असलेल्या गुणज्ञने लेखी परीक्षा , स्टाफ सिलेक्शन बोर्डाची मुलाखत आणि ' मेडिकल ' चा टप्पाही पार केला आणि हवाई दलात रुजू झाला.

बेंगळुरुला येलहांका विमानतळावर गुणज्ञचे प्रशिक्षण सुरू झाले. सुरुवात झाली ती एचपीटी ३२ या विमानाचे सारथ्य करण्यामपासून. नंतर डॉर्निअर आणि त्यानंतर एएन ३२ हे हवाई दलाचे ट्रान्सपोर्ट विमान चालविण्यात गुणज्ञ तरबेज झाला. काळजाचा ठोका चुकवणा‍ऱ्या लढाऊ विमानांच्या तुलनेत प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अवजड युद्धसामग्री तसेच रसद पुरवठा करणा‍ऱ्या महाकाय विमानांचे पायलट सामान्यांच्या दृष्टीने दुर्लक्षितच राहतात. रस्त्यांचे जाळे नसलेल्या अरुणाचल प्रदेशसारख्या दुर्गम भागांमध्ये रसद पुरवठा करणे , डोंगराळ भागांत शत्रूशी दोन हात करताना जखमी झालेल्या जवानांना तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचविणे , पूरग्रस्त प्रदेशांमध्ये तातडीने मदत पुरविणे , अशा आव्हानात्मक कामांसाठी एएन ३२ या ट्रान्सपोर्ट विमानांचा वापर केला जातो. अरुणाचलमध्ये तर चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या दरीत अत्यंत तोकड्या धावपट्टीच्या विमानतळावर विमान उतरविण्यासाठी कसबी वैमानिकच हवा. गेल्या सात-आठ वर्षांमध्ये गुणज्ञने अशी अनेक खडतर आव्हाने पेलली आहेत.

६ फेब्रुवारी २०१२ रोजी गुणज्ञने एएन ३२ विमानाचा कॅप्टन म्हणून धुरा सांभाळताना प्रसंगावधान दाखवून सुरक्षित इमर्जन्सी लॅण्डिंग केले होते. धोकादायक परिस्थितीत कॅप्टन म्हणून नेतृत्व करण्याचा मर्यादित अनुभव असूनही त्याने बजावलेल्या या कामगिरीची दखल घेत नुकतेच त्याला शौर्य चक्र पुस्काराने गौरवण्यात आले आहे. आजवर दीड हजारांहून अधिक तासांचे उड्डाण केलेल्या स्क्वाड्रन लीडर गुणज्ञसाठी येत्या मार्च किंवा एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात शौर्यचक्राचा सन्मान स्वीकारणे हा मानाचा क्षण असेल.

Pages